Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कारलं, मिरची घातलेला केक खाणं
कारलं, मिरची घातलेला केक खाणं >>>>>>>>> केकमध्ये कारलं, मिरची घातल होत? पण बिबॉने तस काहीच म्हटल नव्हत. तसही कुठलाही पदार्थ अतिप्रमाणात खाण्याचा प्रयत्न केला तर उलटी होतेच.
बरं वाटूदे त्यांना. >>>>>>> +++++++१११११११
मीनल विकास शिव्या खाणार म्हणजे विकेंडला. >>>>>>>> फक्त मीनल विकासच नाही अख्खी बी टिम मार खाणार आहे. फायनलला एकच आठवडा उरला आहे आणि ही बी टिम एकमेकान्बरोबर भाण्डत आहेत. टिम ए त्यान्ना बघून हसत असेल. मीनल विकासच ठीक आहे पण विशाल सोनाली सुद्दा भाण्डायला लागले जुन्या गोष्टी उकरुन?
जे लोक ईतक्या वेळा हसत हसत
जे लोक ईतक्या वेळा हसत हसत नॉमिनेशनला सामोरे गेले ते आता त्या फालतू तिकीटावर भांडत आहेत. कोणीही विश्वास नाही ठेवणारे. उगाच कंटेंट क्रिएट करायला आटापिटा सुरू आहे. जयची बॉडी लॅंग्वेज तर क्लिअर सांगत होती, बोअर झाले आता. घरी जाऊ दे.
आजच्या एपिसोड मधे मिनलने
आजच्या एपिसोड मधे मिनलने दोन्ही ग्रुपला एक एक पॉइन्ट द्यायला हवा होता कारण जय आणी उत्क्या दोघानी सारखेच एफर्ट लावले होते पण दिला तिने दिला निर्णय,लावले तिचे निकष पन त्यावर विकासने जी काही बडबड केली ती अगदी टोकाची होती, काहिही चालल होत, त्याने मिनलला जे बोलल ते खरच अती होत होते.विकास नॉमिनेट झाला तिथेच तो वैतागला होता आणी हे त्याच फार आधिपासुन आहे फार इनसिक्युअर आहे तो अजिबात कॉन्फिडन्ट नाही.स्वत:ची वेळ आली तेव्हा काहिच केल नाही ,कस गुण देइल कूणी...
विशालचही तेच एक वाक्य बोलली सोना तेही मिनलला कम्फर्ट करायला लागला लगेच भान्डायला,भयकर स्ट्रॉन्ग हेडेड आहे तो..
टिम ए सगला तमाशा शान्त बसुन बघत होती खरी पण हाच निर्णय मिराच्या विरोधात असता तर तिने विकास पेक्षा जास्त दान्गडो घातला असता हे नक्कि.
मी अजून कालचा एपिसोड नाही
मी अजून कालचा एपिसोड नाही पाहिलाय.
पण जे पाहिलं त्यात मीराने सगळ्यात मस्त मेकअप आणि डेकोरेशन केलं सोनालीवर. तिला surprise झालं की तिला star मिळाला ते. तिला वाटलेलं बी टिम बायस खेळेल.
विकास ने mummy type गुंडाळला असता तरी चालला असतं. त्याचा टास्क अर्धवट राहिला. पण त्याला स्टार देणं हे एकदम bias दिसलं असतं, जे बाहेर negative जातं आणि त्यासाठी ह्या शेवटच्या आठवड्यात कोणी संचालक असं करणार नाही.
फ्रेम डेकोरेशन देखील मीरा उत्कर्ष आणि विशाल ह्यांचं वरचढ होतं.
सोनालीचा मेकअप वै टास्क सुरू असताना मीरा जयला negative remarks पास करत होती सोनालीला उत्कर्ष ने अजून टास्क चांगलं दिसण्यात मदत करू नये असं काहीतरी. हे असं बोलून घालवते ती.
तिकीट टू फिनाले मलाही नाही कळालं.
विशाल आणि विकासने इतक्या वेळा nomination मधून सेफ बाहेर आले आहेत तर टेन्शन घेणे सोडावे.
मिनल आता सेफ प्ले म्हणून उत्कर्ष मीरा आणि विशाल ह्यांना तिकीट टू फिनाले देईल की. आणि असंही ते लोकं ह्या टास्क मध्ये वरचढ आहेतच.
मी तर बघायचेच बंद केलेय.....
मी तर बघायचेच बंद केलेय..... आता फक्त चावडी बघतो
यावेळी मांज्या नसेल तर
यावेळी मांज्या नसेल तर चावडीला पण मजा नाही येणार. सिद्धूला काय हे ऐकणार नाहीत. उलट हेच सगळे सिद्धूवर चढतील अशी भीती वाटते आता
चावडी संचालक फार ओव्हररेतेड
चावडी संचालक फार ओव्हररेतेड पोझिशन आहे. दर वेळेस त्याने सगळ्यांना डॉमिनेटच केले पाहिजे असा काही नियम आहे का? म्हणजे तसा प्रोटोकॉल मुळ इंग्रजी बिग बॉसमधे फॉलो होतो का?
थोड्या फार गप्पा मारल्या , खेळ खेळले, चुका सांगितल्या ,हिंटस दिल्या बास की. त्याला जी क्रियेटिव/एडिटींग टीम असते त्यांनी मदत करावी.
कुणी तरी लार्जर दॅन लाइफ व्यक्तिमत्व आणले तर काय व्ह्यॅल्यु अॅड होते? उलट मांजरेकर कित्येकदा फार चुकीचे संचालन करत होते.
आजच्या एपिसोड मधे मिनलने
आजच्या एपिसोड मधे मिनलने दोन्ही ग्रुपला एक एक पॉइन्ट द्यायला हवा होता कारण जय आणी उत्क्या दोघानी सारखेच एफर्ट लावले होते पण दिला तिने दिला निर्णय,लावले तिचे निकष पन त्यावर विकासने जी काही बडबड केली ती अगदी टोकाची होती, काहिही चालल होत, त्याने मिनलला जे बोलल ते खरच अती होत होते... दुसर्या दिवशी तीनेच रडुन वाढवल ते प्रकरण. जेव्हा तुम्ही कॅप्टन असतात तेव्हा जे लुझिंग साइडला असतात्त त्यांना तुमचा डिसिजन चुकीचाच वाटतो..इति जय. हे अगदीच बरोबर अॅन्लिसिस होता.
मिनल थोडी सोनाली सारखी वागली, विकासचा अॅटॅक तीने अनुल्लेखाने हाणुन पाडला असता तर जास्त चांगली दिसली असती.
विकास खरच फार पिरपिरा आहे.
विकास खरच फार पिरपिरा आहे. उलट आता टिम ए शांत झालेली दिस्तेय. ममांचा हेतु सफल झाला.
मला वाटल फक्त खान्देशातच वापरतात.
तसही टास्कमधे इनोव्हेटीव्ह काही करण्यात टीम ए अग्रेसर आहे.
मला बोअर व्हायला लागलय , ही बी टिममधली भाण्डणे पाहुन. पुर्वी जी रोज साडेनऊ वाजता पटापट जेवणे आवरुन बघायला बसायची उत्सुकता असायची, ती राहीली नाही.. गायत्री गेल्यापासुन.
का कुणास ठाउक, सगळेच् ढेपाळल्यासारखे वाटत आहेत.
<<विकास पेक्षा जास्त दान्गडो घातला असता हे नक्कि.<< दांगडो.. शब्द खुप दिवसांनी ऐकला.
महा बोरिंग सुरु आहे आता सगळंच
महा बोरिंग सुरु आहे आता सगळंच. तो डान्स मेकअप चा टास्क पण अति बेक्कार होते. ही कसली एंटरटेनमेन्ट! मीनल विकास, सोनाली, विशाल सगळेच एकमेकाशी भांडत होते , कोणीच समजूतदारपणा दाखवत नव्हते. मूर्खपणा केवळ. एरव्ही टीम ए त्यांना हसली असती पण काल तेही त्यांच्यावर वैतागले होते, आवरा आता असं झालं होतं.
गम्मत म्हणून आत्ता २४ तास
गम्मत म्हणून आत्ता २४ तास लाईव्ह बघत होते तर सगळे जण बेडरुम मधे बसुन कुठल्या तरी टास्क ची वाट बघत होते.
बहुतेक त्यांना बेडरुम मधे बंद करुन ठेवलय आणि बाहेर काहितरी सेटअप चालु आहे.....
सगळे एकमेकांशी मस्त गप्पा मारत होते... विकास , मीनल मधलं भांडण मिटलेलं दिसतय या गप्पांवरुन तरी....
इतके प्रेमाने वागताना बघुन वाटतय की यांची भांडणं ठरवुन केलेली असतात की काय ?
त्या टास्क पेक्षा यांच्या गप्पा मस्त टाइमपास आहेत...
थोड्या फार गप्पा मारल्या ,
थोड्या फार गप्पा मारल्या , खेळ खेळले, चुका सांगितल्या ,हिंटस दिल्या बास की. त्याला जी क्रियेटिव/एडिटींग टीम असते त्यांनी मदत करावी.>>+१
मीनल ला फिनाले चे टिकेट
मीनल ला फिनाले चे टिकेट मिळणार की नाही हे टिकेट टु फिनाले टास्क मधे जिंकणारी टीम ठरवणार हे आधी जाहिर केले होते ना? मग मीनल ने विकास, सोनाली च्या टीम ला स्टार्स देऊन जिंकवायला हवे होते ना लॉजिकली? केक च्या टास्क मधे कोणाच्याही बाजूने निर्णय दिला असता तरी फार फेअर - अनफेअर दिसले नसते. तसे झाले असते तर विकासशीही ते भांडण नसते झाले आणि सोनालीने आणि त्याने नक्कीच मीनल साठी हो म्हटले असते! आता विशाल -उत्कर्ष - मीराच्या हातात आहे मीनल चा निर्णय घेणे. अर्थात या जर तर च्या गोष्टी. मीनल ने तसंही सोनाली -विकास ला फेवर केले असते तर काही बिघडले नसते. त्यांनी पण नक्कीच तिला फेवर केले असते. त्या बाबतीत विशाल इज टू अनप्रेडिक्टेबल.
काल विकासची मीरा झाली होती
काल विकासची मीरा झाली होती आणि मीराची सन्त मीराबाई झाली आहे !
आता बिबॉ शान्तपणे मीराला काढायला मोकळे, विकास आहे तिची उणीव भरून काढायला.. सगळा वेड्याचा बाजार.. फिनाले जवळ आल्यावर असली फालतु टास्क्स
मीनल ला फिनाले चे टिकेट
मीनल ला फिनाले चे टिकेट मिळणार की नाही हे टिकेट टु फिनाले टास्क मधे जिंकणारी टीम ठरवणार हे आधी जाहिर केले होते ना?>> विकासचा काय फायदा मग? मिनलसाठी तो का जीव तोडुन खेळतोय? थोडा विचित्र नाही का हे? जय तर वेगळेच म्हणत होता , जी टीम जिंकणार ते तिघेही उमेदवार असणार असे काही तरी.
नाही तो मीनल साठी नाही खेळत
नाही तो मीनल साठी नाही खेळत आहे, स्वतःसाठीच खेळतोय की. जिंकणार्या टीमपैकी २ मधे टिकेट टु फिनालेचे उमेदवार होणार आहेत. मीनल त्यात अॅडिशनल उमेदवार की तिला डायरेक्ट फिनाले चे टिकेट ते नाही कळले.
ओके, म्हणजे एक प्रकारे
ओके, म्हणजे एक प्रकारे कॅप्टंसी टास्कच आहे. जनरली लास्ट वीक मंगळवारी शेवटचे सहा डीक्लेअर करतात .पण एकदाही कोणी मंगळवारी बाहेर पडलेले नाही पाहिले, मग हा टास्क वायाच जाइल.
नाही मिळालं टिकट टु फिनाले
नाही मिळालं टिकट टु फिनाले
तीला कस मिळेल? मीरा, उत्कर्ष
तीला कस मिळेल? मीरा, उत्कर्ष कधीच देणार नाहीत. तीने थोडा तरी डोके लावायला हवे होते. कदाचित तीला नकोच होते ते तिकिट.
टिकिट टु फिनाले बाहेरुन येवुन
टिकिट टु फिनाले बाहेरुन येवुन गेस्ट देणार आहेत, मोस्टली उत्क्याला देतिल.
तसंही जय, विशाल आणि मीनल
तसंही जय, विशाल आणि मीनल क्वालिफाय होतीलच नॉमिनेशन मधे नसल्यामुळे. जर नॉमिनेटेड लोकांपैकी, त्यात पण मीरा आणि सोनालीपैकी कोणी तिकिट टु फिनाले जिंकले तर खरी गंमत येणार (त्यामुळे तसेच होईल हे चान्सेस आहेत)
मीरा यावेळी जाईल. तिला
मीरा यावेळी जाईल. तिला सर्वांत कमी वोटस आहेत, यावेळी वाचवतील असं वाटत नाही. आता फक्त उत्क्यापण बरोबर जातो का ते बघायचं.
तीला कस मिळेल? मीरा, उत्कर्ष
तीला कस मिळेल? मीरा, उत्कर्ष कधीच देणार नाहीत. तीने थोडा तरी डोके लावायला हवे होते. कदाचित तीला नकोच होते ते तिकिट.>> एकमताने द्यायच होत बहुमताने नाही त्यामुळे समजा विकास-सोनाने द्द्यायच ठरवल असत तरी जय नाहि म्हटला असता जस इकडे मिरा नाहि म्हटली, गेमच्या या स्टेजला येवुन कोणालाच मिनलसारख्या स्ट्रॉन्ग प्लेयरला पुढे जाउ द्यायचे नसणार.
मला वाटत उत्क्या किवा मिराला फायनल पर्यत पोहोचवायला हे बीबी टिमनेच केलय.
तीला कस मिळेल? मीरा, उत्कर्ष
तीला कस मिळेल? मीरा, उत्कर्ष कधीच देणार नाहीत. >>>>>>>> मीरा मीनलवर ओरडली हे प्रोमोमध्ये दाखवल होत. पण एपिसोडमध्ये नाही दाखवल.
मीनलचा ' छैया छैया" डान्स सुद्दा नाही दाखवला.
बाकी आजचा एपिसोड एन्टरटेनिन्ग होता. जय, सोनालीने छान एन्टरटेन केल जेलमध्ये असताना. उत्कर्षने सुद्दा.
हे सुद्दा नाही दाखवल आज :
https://www.lokmat.com/television/bigg-boss-marathi-3-discussion-continu...
आज एन्डला मिनलने जय्,सोनालीला
आज एन्डला मिनलने जय्,सोनालीला जेल मधे टाकली ते सगळ भारि एकदम हहपुवा, मिरा पाण्याला जेन्युइन घाबरते.
आरसा टास्क मधे उत्कर्श तुफान होता एकदम टु द पोईन्ट त्यातही स्मार्टली जयविषयी फार टोकाच नाही बोलला तेच सोनाली,विकास बद्दल एकदम सडेतोड त्यामानाने एरवीचा बोलबच्चन विकास आजभरकटल्यासारखा वाटला. विकासला मिनलने एकही स्टार दिला नाही ना त्या टिमला पोईन्ट दिले पण तिने फेअरली जज केल आणी एक केकचा टास्क सोडला तर बाकी सगळ्यात विशाल-उत्क्या-मिरा चान्गले होते.
मिरा मिनलला टिकिट टु फिनालेची उमेदवारी देणार नाही हे उत्क्यालाही माहित होते त्यामुळे त्याने नेहमीप्रमाणे साप पाहुण्याच्या हातुन मारुन घेतला आणी स्वतः नामानिराळे
हो तो शिक्षा पार्ट
हो तो शिक्षा पार्ट एन्टरटेनिंग होता.
दॅट सेज अ लॉट !
रोस्ट टास्क पण फार मजेचा नव्हता. तेच तेच सगळे एक्सेप्ट उत्क्याने पहिल्यांदाच जय बद्दल काहीतरी ब्र काढला.
जय त्याच्यानंतर बाथरूम मधे मीराला बाहुबली - कटप्पा काय म्हणत होता? उत्क्याला कटप्पा म्हटला का काय
+१
+१

जेल पार्ट फार भारी, खूप हस्स्ले , पहिल्यांदाच इतकं फन्नी लाइट अॅट्मॉस्फिअर दिसलं !
उत्क्या चांगला बोलला, बाहुबली जय का
विकास ला काहीही जमत नाहीये, त्याच्या शब्दात वजन नवह्तं टिका करताना.
तिकिट टु फिनाले मीराने मिळवून रविवारी उत्क्या घरी गेला तर मस्तं कहानीमे ट्विस्ट येईल
विशालला मिळालं तिकीट
विशालला मिळालं तिकीट
विशालला मिळाले म्हणजे खूपच
विशालला मिळाले म्हणजे खूपच प्रेडिक्टेबल.. तसेही तो होताच ना नॉमिनेशन पासून सेफ !
मीराने काल मीनलला दिले नाही तिकिट हे आवडले पण तीही आहेच ना नॉमिनेशन पासून सेफ, काय कळत नाही.. म्हणजे पुढच्या आठवड्यात मिडविक एव्हिक्शन नाटक असेल कदाचित , एवढं करून ६ ना नेतातच फिनालेला !
विशालला मिळाले नाही. त्याने
विशालला मिळाले नाही. त्याने कमावले. मिनी टॉर्चर टास्क होतं
टीम झोंबिवली आली होती.
Pages