मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल ला टिकेट टु फिनाले मिळाले म्हणजे उत्क्या आणि मीरा पुन्हा अनसेफ राहिले. पण आता सोनाली जाईल असे वाटतेय.

फायनल सहा करणार असतिल तर सोनाला काढतिल पण मिराला सगळ्यात कमी वोटिन्ग आहे अस म्हणतायत.

सोना ला काढु दे आता.. काय कारण नसताना उगीच कडकड चालू आहे.. कंटाळा आला..
आज पण विशाल जिंकल्यावर मस्त सेलिब्रेशन च्या मूड मध्ये होती मीनल, तर सोना ने भांडण उकरून काढलं. मीनल ने विशाल जिंकल्यावर तिला पण मिठी मारून जाऊदेत ग करत प्रयत्न केला होता वाद संपवायचा पण हिचं आपलं चालूच..

त्याउलट मीरा, उतक्या आणि जय ची मस्ती बघायला मज्जा येते आहे.. पुढच्या आठवड्यात अशी मजा बघायला आवडेल.
उतक्या बच्चन ची KBC वाली मिमिक्री कसली भारी करत होता..फारच कलाकार आहे हा माणूस..

विशालने तिकीट टू फिनाले "मिळवलं".. त्याची काऊंट करायची पद्धत बऱ्यापैकी ट्रॅक वर होती. हात किंवा पाय सतत टॅप करत होता तो...टास्क पण खरंच मस्त होता हा..

उत्क्या टायलेन्टेड माणुस आहे पण त्याला फार उशिरा जाग आली, आता जेन्युइअनली जरी खेळात बदल केले तरी त्याचा फार फायदा होत नाही हे म्हणजे परिक्षा होवुन निकाल लागायची वेळ आली आणी सराव परिक्षेत चान्गले गुण मिळवंण्यासारखे आहे त्याने काहिच फरक पडणार नाही...
सोना आणी मिरा मधे सोना जे काय करते ते बघायला तरी बर वाटत , मिराचा चेहराच सतत पडेल्,रागिट टाइप घेवुन फिरत असते खरतर दिसायला चान्गली आहे मिरा,एकदा विकेन्डला नौवारी अन्बाडा असा गेटप केला होता तर छान दिसत होती ,सरन्गे काकुपेक्षा तर लाखपटिने चान्गली आहे पण सतत गबाळ्यासारखी केस घेवुन फिरत असते, खुप काही नाही पण तुम्ही शोबिझ मधे आहात एका पॉप्युलर शो मधे लोक तुम्हाला रोज बघणार आहेत तेव्हा प्रेझेन्टेबल असण केव्हाही चान्गल.
हिन्दीत सगळे चकाचक असतात, नोरा फतेही बिग बॉस मधुनच पुढे आली.
सोना मधे प्रिमेकअप आणी पोस्ट मेकप भरपुर फरक दिसतो.

सोनाची मेकप स्किल्स बेस्ट आहेत, मीरा गायत्री हॉरिबल !
मीनल काहीही केलं तरी छान दिसते, तिची पर्सनॅलिटीच मस्तं आहे .

सोना मेकअप केल्यावरच छान दिसते. परवा एक दोन शॉट बघितले, विदाऊट मेकअप बघवत नव्हता चेहरा, प्रचंड काळे डाग आहेत आणि एरवी दिसते त्या मानाने एजेड दिसत होती. तिने मेकअप करूनच बसावं अस वाटलं.

यावेळी मीराच जाईल, फार फार तर उतक्या. सोनाला कस घालवतील, विकास खालोखाल वोटिंग आहेना तिला. मी यावेळी विकास सोनाला केलंय.

विशालने कमावले असेल टिकीट टू फिनाले तर मनापासून अभिनंदन त्याचं.

मिनल बाबत अगदी अगदि ! खुप छान कॅरी करते ती स्वतःला, मागच्या एका विकेन्ड एपिसोड मधे तिने ब्लॅक ड्रेस घातलेला तेव्हा फार छान दिसत होती.

मीनल एक नंबर.

विशाल पहिला येणार हे निश्चित असल्याने दोन नंबर आणि तीन नंबर उत्सुकता वाटते. मीनल विकासपैकीच असावेत ही इच्छा. मीनल पहिली यायला हवी पण नाही येणार माहितेय.

उतक्याला भारी votes मिळतायेत, सोनाला तो मागेही टाकेल अस होऊ शकते. विकास एक नंबरवर आहे. मीरा आता नक्कीच जाईल बाहेर. आता तिला ठेवलं तर पब्लिक भडकेल नक्की. आता वोटिंग लाईन्स बंद झाल्या असतीलना.

टीम बी ची भाण्डणे सम्पता सम्पत नाही. विकास मीनलच पॅचअप झाल. आता सोनाली मिनल भाण्डतायत.

सोना ने भांडण उकरून काढलं. >>>>>> अगदी अगदी त्यात विकास तिला मीनलच्या विरोधात भडकवत होता.

टीम बी च्या तुलनेत टिम ए पॉझिटिव्ह वाटायला लागली आहे.

विशालने कमावले असेल टिकीट टू फिनाले तर मनापासून अभिनंदन त्याचं. >>>>>>> ++++++++११११११११११
मीरा कित्ती खोट बोलते. स्वतः डाराडूर झोपली होती तरीही म्हणते की मी जागी होते. वरुन उध्दटपणा दाखवला. ' मला आता कुणाशीही बोलायच नाही." म्हणे.

बादवे, जयने केलेला झोम्बी नक्की झोम्बी होता की देवआनन्द! हा हा हा

टास्कमध्ये मीरा केस पुढे सोडल्यावर खरच झोम्बी वाटत होती. बिपाशा बसूचा राज आठवला.

बिचकुलेने इथेही घाण केली:

https://www.lokmat.com/videos/television/bigg-boss-15-abhijit-bichukale-...

पिळगांवकर कशी चावडी घेतील हे इमॅजिन करुनच हसत सुटलोय!!
स्वताबद्दल बोलण्यातून सवड होईल तेंव्हा जमेल तसे स्पर्धकांबद्दल बोलतील ते Wink

चावडी राहिली बाजूला स्वतःचं कौतुक नाही केलं म्हणजे झालं. 'मी तुमच्यापेक्षा तरुण आहे, मी साठी गाठली तरी तुमच्यापेक्षा जास्त व्यायाम करतो, तुमच्यापेक्षा मीच चांगला नाचतो, तुम्ही सगळे माझे अति अति ज्युनिअर आहात, बच्चन माझा ज्युनिअर आहे, तुमच्यापैकी कोणीतरी एक बिग बॉस जिंकेल कारण मी स्पर्धक नाही, मी असतो तर जय विशाल तुम्हाला एकाच वेळी लोळवला असता, मी स्पर्धक असतो तर प्रत्येक आठवड्याला मीच कॅप्टन झालो असतो' असं काहीतरी ऐकायला मिळेल आज.

खरंच पिळगावकर घेणार आहेत का?
नकोच की राव.
दुसरा एखादा बघा ममा नसतील तर.
ह्यावेळी टास्क मध्ये एकमेकांचे वाभाडे काढण्याची उत्तम संधी होती, ती उत्कर्ष आणि विकास दोघांनी encash केली.
केक टास्क मध्ये मिनल फार unfair न दिसता एक एक गुण देउ शकली असती आणि फोटो टास्क मध्ये विकास सोनाली टीम ला जिंकवू शकली असती. अर्थात पण त्यामुळे जयला तिकीट टू फिनाले चे चान्स जास्त होते.
आता सोनाली, उत्कर्ष, विकास आणि मीरा ह्यामध्ये कोण 2 जातील हे सांगणे अवघड आहे. कारण voting साठी सेटिंग करून आले असतील आणि बिगबॉस वोटिंग ट्रेंड नुसार निर्णय देत असतील तर उत्कर्ष सेफ होईल असं वाटतंय. त्याच्या मागे बाहेरून सपोर्ट देणारे त्याचे भाउ आहेतच. Btw, गायक म्हणून आदर्श भारीच आहे पण package म्हणून उत्कर्ष उजवा आहे. बोलबच्चन,डान्स, जिम वै सगळ जमवतो तो. त्यांचे शोज होतात वाटतंय.

खेळानुसार मीरा आणि सोनाली बाहेर गेल्या पाहिजेत खरंतर. Let us see.
Btw आता बोलता बोलता एखाद्याच्या soft टार्गेट करून उणीवा दाखवणं मस्त सुरुय. दोन्ही ग्रुप मध्ये. चर्चा करत करत चुका highlight करतात.

एका विकसाठी कुणी दुसर नकोच ममाच बरे आहेत, त्याना सगळ्याचे इक्वेशन्स निट माहित आहेत.
आज विकास उगाच मिनल-सोनालीत लावुन देत होता, मागच्या चावडिवर ममा म्हटले की मिनलच्या डोक्यात हवा गेलिये आता ममाना उत्क्या-जयला हायलाइट करायच म्हणून उगाच काहितरी बोलत होते त्यामुळे विकभर विकासने मिनल कशी वाइट दिसेल एवढ एकच चालू ठेवल पण त्याचा गेम चुकलाय, त्याला मिनलशी उगाच भान्डल्याने शिव्याच पडतायत.बघु ममा येतात का आणि यावर फेअर काही कॉमेन्ट्स करतात का

>>पहिल्या सीझनची विनर

तिच्यात आहे तो ॲटीट्यूड पण तो माज दाखवायला थोड्या established and well recognised पर्सनॅलिटीची गरज आहे...
That fellow needs some real achivements under his/her belt!!

आज मीनल ला मीरा केलं आहे बहुतेक.. सगळा एपिसोड तिच्यावरच दिसतोय.. कुठल्याही क्षणी रडेल आता ती असं वाटतंय..

मीनलला बिचारीला उगाच टार्गेट केलं जातंय! म्हणजे ती बोललिही असेल..पण तिच्यापेक्षा महाभयंकर गुन्हा केलेले लोक तिथं आहेत! त्यात विकास सोनालीनेही तिला रडवून सोडलंय!
विकास शातीर दिमाग..आता अगदी प्रेक्षकांच्या मनातले बोलला की, "चुकू द्या ना ए टीमला.... वै"
गरजेपेक्षा जास्त हिंट दिल्या ममांनी या तिघांना!

सोनाली कशी जाऊ शकते.. ती आणि विकास टॉप ला होते..

इतकं सेटिंग करत असतील तर विनर नक्की जय च असणार.. मीनल टॉप 2 ला येऊ नये म्हणून आज बरेच प्रयत्न झाले करून त्यांचे.

Which means Manjrekar's original ranking it is !
1. Vishal
2.Jay
3.Meenal
4.Vikas
5.Utkarsh
6.Meera

दोन आठवडे मीनलला का टारगेट करतायेत मांजरेकर. राग येतोय. मी नाही बघणार, मीनलला ओरडत असतील तर. मीनल टॉप टू मधे येउ नये म्हणून चाललं आहे सर्व.

सोनाला का काढलं, मीरा जायला हवी होती. जर खरंच सोनाली गेली असेल तर व्हिलन टीमचे तीन आणि हे तीन असतील.

विशाल नक्कीच विनर पण मीनल दुसरी यावी, विकास तिसरा. जय मागे जाऊदे.

Pages