Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विकास इंडिविज्युअल टास्क नीट
विकास इंडिविज्युअल टास्क नीट खेळू शकत नाही ,हे आज परत दिसून आल.आजतर काही फिजिकल स्ट्रेंथचा टास्क नव्हता,पण तरी त्याला जमल नाही,बाकी मीरा,सोना,जयने छान केल.
मिनलनेही फेअर संचालन केल.
नशिब ,आज त्यावरून तिच्याशी भांडला नाही,पण त्याची कसर उद्या भरून काढणार अस दिसत आहे.
एक आहे,टास्क कुठलाही असो,टीम ए काहीतरी वेगळ करून जीव ओतून खेळतात, त्यामानाने बी मध्ये मिनल सोडली तर तस कोणी दिसत नाही.
या आठवड्यात बहुतेक सोनालीला काढतील.
पण सहा असणार आहेत फिनँलेमध्ये,अस वाचल कुठेतरी.
दोन वर्ष सहाजण होते त्यामुळे
दोन वर्ष सहाजण होते त्यामुळे सहा असतील, फक्त तीन तीन की दोन चार काय माहीती.
विकासबद्द्ल मैत्रेयी पोस्ट मस्त.
विकास सोनाला वोटिंग करून आले.
विकास सोनाला वोटिंग करून आले. दोघे पहिल्या दोन नंबरवर आलटून पालटून आहेत. यावेळी मीरा उतक्या दोघे गेले तरी चालतील. मीराला यावेळी मत नाही देणार.
विकासला मीनल चान्गली प्लेयर
विकासला मीनल चान्गली प्लेयर नाही वाटत. तो मीराच नाव घेत होता वाटत सोनालीकडे. सोनालीने लगेच त्याची चुगली मिनलकडे केली.
नॉमिनेशन टास्कवेळी विशाल चक्क सुरी हातात घेऊन सोनालीशी बोलत होता. अरे देवा!
विशाल रिग्रेसिव आहे का? कणीक मळताना ' बायकान्ची कामे आहेत ही सगळी' अस काहीतरी बडबडत होता.
बाकी टास्कस छान झाले.
सोनाच फुगे फुगवण सराउण्ड साउण्ड मध्ये ऐकवल बिबॉने. हा हा हा
जय टॉयलेट पेपर्सना अण्डरवेअर चिटकवणार होता.
विशाल रिग्रेसिव आहे का? कणीक
विशाल रिग्रेसिव आहे का? कणीक मळताना ' बायकान्ची कामे आहेत ही सगळी' अस काहीतरी बडबडत होता.>>> तसे नाही. त्याने सोनालीला सांगितले कि कणिक मळलेली आहे. त्यावर सोना म्हटली कि ती मीराने मळली तर ती नाही वापरायची. तू नवी मळून दे. तो मळायला लागला तेव्हा मीरा बोलली कि कणिक मळली आहे आणि चपात्या पण आहेत मग पुन्हा मळायची गरज नाही. तो बोलला आता मला मळायला सांगितली तर मळतो मी. मग त्याने विकास आल्यावर त्याला सांगितले. विकासने त्याला तू आधीच चेक का नाही केले असे विचारल्यावर तो म्हटला स्वयंपाकाचे काम माझे नाही, माझी भांड्यांची ड्युटी आहे तर मी कुठे-कुठे बघू?
नंतर विशाल सोनालीला ते सांगायला गेला तर ती धडघडीत खोटे बोलली कि मला कणिक आहे ते तू सांगितलेच नाही, कणिक होती ते मला माहीतच नाही
ओहो असे होते का. धन्स सोनाली.
ओहो असे होते का. धन्स सोनाली.
आज मिरा,उत्कर्श एकदम
आज मिरा,उत्कर्श एकदम क्रियेटिव्ह होते डान्स मेकप मधे, बर्थडे फ्रेमही छान सजवली होती. टासस्क मधे टिम ए च डोक सॉलिड चालत, तेवढ्याच वेळात दोन्ही फ्रेममधे फरक दिसुन येत होता, ऑरेन्ज पिल मधे दिवे वैगरे आयडिया छान होती. सोनालीची कन्सेप्ट पण चान्गली होती पण पसारा खुप होता,जयची त्याच्यासारखीच अतरन्गी होती.विकास काहिच प्रिपेयर नव्हता वाटत,त्याने मेकप ड्रेसप काहिच नव्हते वापरले .सगळ्याना स्टार मिळत होते तर नाराज होत होता पण मग आधी निट प्रिपेयर करायचे ना.
मिनलला विकासकडून का अप्रुव्हल हव आहे?? तोच विषय चालू ठेवलाय सारखा, चावडीवर होइलच हा विषय परत.
उत्कर्षाला दोन स्टार दिले
उत्कर्षाला दोन स्टार दिले असते तरी चाललं असते. कॉन्सेप्ट आणि मेक अप दोन्ही भारी होता.
सोनालीचा कॉन्सेप्ट छान होता, पण खूप फाफट पसाऱ्यात नीट कम्युनिकेट नाही झाला.
विकासने साड्या, दुप्पटे वापरले असते तर नीट जमून आले असते.
विकासला पब्लिक रिऍक्शन काय आहे किंवा कशी सेट करायची याचा नीट अंदाज आहे. तो जो व्हिडिओ विकासचा व्हिडिओ आहे की मिनलच्या डोक्यात हवा गेली आहे, तो आज आलाय, पण फेसबुकवर पब्लिकने आधीच ओपिनियन पोल सुरू केले होते, 'कोणाच्या डोक्यात हवा गेलीये?, मिनलच्या डोक्यात कॅप्टन पदाची हवा गेली आहे का? '
सारन्गेकाकूने विशालला दिलेला
सारन्गेकाकूने विशालला दिलेला सल्ला:
https://www.youtube.com/watch?v=DLGx91s0rgQ
पोचलेली बाई आहे... विशाल ला
पोचलेली बाई आहे... विशाल ला सपोर्ट आहे हे बघून तिकडे वळली आहे... संधिसाधूसारंगी
मला टिकिट टु फिनाले प्रकारच
मला टिकिट टु फिनाले प्रकारच कळत नाहीये. आता या आठवड्यात जे लोक नॉमिनेटेड नाहीयेत ते सगळे फिनाले ला गेलेच ना? मग अजून वेगळे टिकेट कसले?
मला टिकिट टु फिनाले प्रकारच
स्नेहा विशाल ला "या तिघांपासून सावध रहा, ते आता तुला टार्गेट करतील" असं म्हणतेय, ती जय-उत्क्या-मीरा बद्दल बोलतेय असे मला वाटले. पण त्या व्हिडिओ मधे ती ते विकास -मीनल-सोनाली बद्दल म्हणतेय असे म्हटले आहे.
मला टिकिट टु फिनाले प्रकारच
मला टिकिट टु फिनाले प्रकारच कळत नाहीये. आता या आठवड्यात जे लोक नॉमिनेटेड नाहीयेत ते सगळे फिनाले ला गेलेच ना? मग अजून वेगळे टिकेट कसले>>>आम्ही पण हाच विचार करतोय...
आणखी एक एव्हिक्शन असू शकेल.
आणखी एक एव्हिक्शन असू शकेल.
नवी कॅप्टनसी नसल्याने इम्युनिटीसाठी.
सारंगेच ठिकय , ती जरा
सारंगेच ठिकय , ती जरा हुकल्यासारखीच वागते नेहमी. विशाल का लाळघोटेपणा करतो तिच्याशी बोलताना?
टीम बीच्या भांडणांचा कंटाळा
टीम बीच्या भांडणांचा कंटाळा आला.
आता सरळ फिनाले बघावा असं वाटतंय.
मिनल आता टीम सोडून एकटीनं
मिनल आता टीम सोडून एकटीनं पुढं निघालिये. पहिला धक्का विकासला दिलाय. केकचा टास्क टाय करायला हरकत नव्हती खरं तर पण विकास आणि जय नाॅमिनेट झाले तर बरंच आहे. सोना तशीही ढिल्ली आहे डोक्यानी. पहिली येणारी नाही. उत्क्या आणि मीराच्या पुढे जाणं शक्य आहे मीनलला. म्हणजे राहिला फक्त विशाल. एकाशीच स्पर्धा राहील मग तिची.
मीनल चा निर्णय मला तरी फेअर
मीनल चा निर्णय मला तरी फेअर वाटला.. कारलं, मिरची घातलेला केक खाणं आणि पचवणं ही जास्त मोठी गोष्ट आहे. जय ला ते झेपलं नाही,त्याने उलट्या केल्या म्हणजे तिथेच तो बाद झाला... पण उत्कर्षने पचवलं.. टास्क कॅन्सल केला असता तर उत्कर्ष चे efforts वाया गेले असते.
विकास नॉमीनेट झाल्यामुळे सटकला आहे.
विकास मिनलचा जय करतोय. तीला
विकास मिनलचा जय करतोय. तीला व्यवस्थित उचकवुन दिलय .त्याच्या आवाजाची पट्ट्टी कधीच बदलत नाही, शी इझ लूझिंग हर टेंपर. खरे तर तीला हे टाळता आल असते. विषय न वाढवणे फार कठिण नव्हते.
टास्क कॅन्सल केला असता तर
टास्क कॅन्सल केला असता तर उत्कर्ष चे efforts वाया गेले असते... हो पण विकासने दुसरा पर्याय दिला होता की, दोघांना एक एक गुण द्या. उत्कर्ष जयचा मांडलीक असल्याने त्याने पण काही कटकट नसती केली.
पण टास्क केक संपवण्याचाच होता
पण टास्क केक संपवण्याचाच होता. पचवण्याचा नव्हता. म्हणून मला विकासचा मुद्दा पटला.
आता शेवटच्या टप्प्यात काहीतरी
आता शेवटच्या टप्प्यात काहीतरी भलत्याच डिरेक्शनने चालला आहे हा सिझन


मागच्या आठवड्यात विशाल-मीनल झालं, आता मीनल-विकास आणि जय-उत्क्या सुद्धा होईलच !
मधल्या मधे तो मोस्ट अनॉयिंग उत्क्या जातोय पुढे
हे असं चालु राहिलं तर याही आठवड्यात म.मा उत्क्यालाच एक नं देणार
हो ना, आता बी ग्रुप च्या
हो ना, आता बी ग्रुप च्या सगळ्यांनी आपल्या स्वतः ला आणि एकमेकाला गोळ्या मारणे सुरु आहे. इतके मूर्ख कसे हे लोक?!
विशाल विकास इनसिक्युअर झालेत असे दिसतेय मीनल मुळे. त्यांचा तिच्यावर विश्वास नाही.
टिकिट टु फिनाले चे टास्क मनोरंजनाचे आहेत मोस्टली, ज्यात उत्क्याला अॅडवान्टेज आहेच. पण जज मीनल करणार होती. स्टार पण तीच तिच्या मनाप्रमाणे देणार. पण एवढे ठरवून काही करता आले तर ती टीम बी कसली.
उत्क्या तरी ठीक पण ती मीराही जाईल या सगळ्यात फिनाले ला, जिथे सोनाली ला सहज घेऊन जाता येत होते यांनी ठरवले असते तर. तिला नॉमिनेशन पासून वाचवता आले असते, स्टार पण जास्त देऊ शकले असते.
म मानी सोडल म्हणे बिग बॉस,
म मानी सोडल म्हणे बिग बॉस, त्याच्याएवजी महागुरु येणार अशी फेसबुक ग्रुपवर चर्चा होती.
विकास उचकवण्यात पटाइत आहे त्याची सायलेसए टेकनीक आहे स्वतःचे गुण वाढवता येत नाहिये दुसर्याचे कमी करा.
अजुन एपिसोड बघितला नाही पण शेवटि शेवटी स्वतःला कॉर्नर करुन घेणे, सिम्पथी मिळवणे,दुसर्याला पाडणे हे सगळ नेहमीच होत.
सारंगेच ठिकय , ती जरा
सारंगेच ठिकय , ती जरा हुकल्यासारखीच वागते नेहमी. विशाल का लाळघोटेपणा करतो तिच्याशी बोलताना?>> आल्या आल्या तीने फक्त विशालचीच तारिफ केली ना? भाउ भुलला मग्,तसही ती घरात होती तेव्हाही तिच्याशी एकदम रीस्पेक्ट ठेवुन वैगरे बोलायचा विशाल.
सरन्गे म्हणत होती ना की आपण एक वेगळी टिम (टिम सी ) प्लॅन करत होतो ते करायला हव होत.
त्याच्याएवजी महागुरु येणार >>
त्याच्याएवजी महागुरु येणार >>>>नहीऽऽऽऽऽऽऽ
मीनल विकास शिव्या खाणार
मीनल विकास शिव्या खाणार म्हणजे विकेंडला.
बाय द वे महागुरु त्या तिथे पलीकडे तिकडे म्हणजे स्टार प्रवाहवर शो करतायेत ना मग दोन्ही ठीकाणी कसे येणार.
म मां नी दोन आठवडे बाकी असताना शो सोडणं बरोबर नाही, तब्येत बरी नसेल तर वेगळी गोष्ट म्हणा.
त्यांच्या कॅन्सरने परत डोकं
त्यांच्या कॅन्सरने परत डोकं वर काढलं असं ऐकलं.
हा शो बघत नाहीये, पण पहिल्या एपिसोडला मांजरेकर अगदी कायच्या काय वाईट दिसत होते.
हो पहीले दोन आठवडे अगदीच बघवत
हो पहीले दोन आठवडे अगदीच बघवत नव्हतं. नंतर बरे दिसायला लागले.
बरं वाटूदे त्यांना.
हा शो बघत नाहीये, पण पहिल्या
हा शो बघत नाहीये, पण पहिल्या एपिसोडला मांजरेकर अगदी कायच्या काय वाईट दिसत होते.>>तेव्हा ट्रिटमेन्ट चालु होती तसेच येत होते शुटिन्गला दिसण्यात मेजर फरक पडला आहेच पण बाकी टेम्पर वैगरे सेम आहे.
Pages