मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे यार चांगला भाग मिसला मी. आधीचा पात्र विरूद्ध अपात्र पाहिला पण नंतर नवऱ्यावर रागवून टिव्ही बंद केला. आमच्याकडे बिग बॉस लावल्यावर नेहमीच भांडण होतात Lol त्यांची भांडण बघून नाही हा तर आवजवरून. यात आवजाचा चढ उतार फार असतो त्यामुळे नवरा भडकतो माझ्यावर आवाज कमी कर म्हणून. बरं आवाज कमी केला तर ते लोक आपापसात काय बोलतात ते एकूच येत नाही त्यामुळे मेन कंटेंट मिस होतं Wink आवाज कमी जास्त करत बघावा लागतो bb.

<<बरं आवाज कमी केला तर ते लोक आपापसात काय बोलतात ते एकूच येत नाही<<
अगदी अगदी... सारखा आवाज कमी जास्त करावा लागतो. Lol रात्री १०:३० वाजता, आख्खी गल्ली गुडुप झालेली असतान्ना आपल्या घरात मात्र, "आपलं मराठी बिग बॉऑऑस'... मधेच ते, "शनिवारी रात्री ८:०० वाजता." .. अन ते बिबॉच्या घरातील सदस्यांना उठवायला ८ वाजताची धाडधाड गाणी लागली की ... इकडे वैतागुन आवाज कमी करावा लागतो.

खरंच मी पण याच गोष्टीला वैतागून voot वर बघायला लागले bb. आपसातलं कुजबुजण पण व्यवस्थित ऐकू येतं. आणि शिवाय कुणाला आपल्या बघण्यामुळे त्रास पण होत नाही. खरंतर इथल्या चर्चेमुळे मी सुरू केलं बघायला खूप उशिरा.
बादवे कालचा task खरंच मस्त झाला. मिनलची खूप दिवसापासून ची ईच्छा शेवटी का होईना पूर्ण झाली. आणि सगळ्या मेम्बर्सना पण आनंद झाला. ती कधी कोणाच्या बॅड बुक मध्ये नव्हती फारशी. त्यामुळे ही असेल.

मनोरंजन टास्क मस्त झाले.

सोनाली आणि मीनल मस्त डान्स.
मीरा टणाटण उडया मारते असं वाटतं.
गायत्री व्हिल करू शकली ह्याचं आश्चर्य वाटलं.
जय आणि उत्कर्ष ह्यांच्या डान्स मध्ये जय ज्या अफाट energy ने नाचला ते भारी. पोटावर नागोबा ही बेस्ट मूव्ह.
हुकूमशाही बिमोड जरा सहजच झाला असं वाटलं.
अवार्ड मध्ये सोनाली ज्या उत्स्फूर्तपणे उत्कर्ष असं म्हणाली त्यावर उत्कर्ष चा चेहरा पूर्ण उतरला होता.
खोटं बोलणारा विकास हे पचल नाही, म्हणूनच त्यानेही अब्बबब्ब केलं.

कॅप्टन उमेदवारी टास्क मस्त झाला.
Dual असल्याने फार राडा नाही झाला.
विशाल हा पहिलवानी शिकलाय असं वाटतं.
खूप शक्ती आहे त्याच्याकडे. विकासला उचलून बाजूला नेलं त्याने. मीनल vs सोनाली मध्ये सोनालीला घाई नडली.
काय गरज नव्हती अर्ध्यातून बॉल उचलण्याची.
गायत्री आणि मीरा मध्ये देखील भारी झाला टास्क.
गायत्रीची शक्ती कमी पडली.
जय vs उत्कर्ष मध्ये जय ने बॉल उचलून एकदम।भारी जागा पकडली. जिथे त्याला त्याच्या।position चा फायदा झाला.

सगळ्यात high voltage जय विरुद्ध विशाल लढत.
जबरदस्त खेळले दोघेही. विशालची शक्ती दिसून आली.
सोप्पं नव्हतं ते. जय स्वतःवर नाराज झालेला. खेळाच्या ह्या टप्प्यावर असं नको व्हायला हवं होतं असं बोलला तो उत्कर्षला.

फायनल मध्ये स्त्री विरुद्ध पुरुष असल्याने बिग बॉसने समर्थक देऊन balance केला. सोनालीला खेळायला मिळू दे आणि कुठेतरी patchup होऊ दे म्हणूनही विशाल ने तिला निवडलं असेल.

मिनल फायनली कॅप्टन बनली.
मजा आली.

मला एक आवडलं म्हणजे मीनल ने कुठे जय ला म्हणायला जागा ठेवली नाही की घे तू माझ्यामुळे झालीस कॅप्टन. त्याला समर्थनाला घेऊन सुद्धा मोस्टली तो टास्क सोनाली आणि मीनल ने खेळला, सुरुवातीला जय आणि विशाल चक्क बाजूला उभे होते. शेवटी काही सेकंद जय - विशाल ने झटापट केली पण तोवर ऑलरेडी बॉल डिस्ट्रॉय झाला होता.

काही कारण नसताना मीनल ला बोलणी बसली. मामांना नक्की काय प्रूव्ह करायचं होतं कळलं नाही. तिचा गेम खराब करतायत विनाकारण असं वाटलं. विशाल ला चांगलं दाखवायच्या नादात उलट तो विनाकारण चिडला असं वाटलं मलातरी

काही कारण नसताना मीनल ला बोलणी बसली. मामांना नक्की काय प्रूव्ह करायचं होतं कळलं नाही. तिचा गेम खराब करतायत विनाकारण असं वाटलं. विशाल ला चांगलं दाखवायच्या नादात उलट तो विनाकारण चिडला असं वाटलं मलातरी>>> हो प्रोमो पाहिला, नक्की विषय कळला नाही पण उगाच का तिला बोलतायत?
पाहुणे कधिपर्यत आहेत नक्की?फिनाले पर्यत का?

चक्क मिरा आणि उत्कर्ष सेफ.. आणि जय अनसेफ....!! म्हणजे सगळे स्क्रिप्टेड वाटत आहे. जय, गायत्री आणि सोनाली यांच्यापैकी एक कोणी जाणार.

सोनाली किंवा गायत्री जाण्याची शक्यता आहे.

मीनलवर का चिडतायेत म मां. तिला कमीपणा देण्यात काय मोठेपणा यांचा.

मम्या आता येणार नाहीत? त्याच्या जागी सिद्ध्? >>> का बरं, दोघेही असूदेत, सिद्धु एवढं छान करेल असं नाही वाटत. म मां आता हा पुर्ण सीझन असुदेत. पुढेही असूदेत. सिद्धार्थ आवडतो पण म मां इतकं छान करेल असं वाटत नाही. तो starting आला तेव्हाच वाटलं की पुढच्या सीझनची धुरा त्याला सोपवतील आणि तो फिनालेलाही त्यांच्याबरोबर असेल. म मां ची तब्येत बरी आहेना.

मीरा आणि उत्कर्ष सेफ.
म्हणजे गायत्री जातेय वाटतं. >>> जाऊदे गा दा ला. मागे दोनदा अगदी शेवटी होती तेव्हा वाचवले होतं bb ने. सीक्रेट रूम मध्ये नका पाठवू आणि तिला ठेऊन सोनालीला नका काढू, तिने छान योगदान दिलंय. जयलाही काढू नका. मेन व्हिलन हवा शेवटी.

गादाच जाईल मोस्टली, सिद्धु?? त्याला जमेल का होस्टिन्ग? तो हास्यजत्रात आला होता पण काही निट बोलता येत नव्हत त्याला

मीरा सेफ याचे आश्चर्य वाटले. गायत्री जाईलच बहुतेक पण डबल एविक्शन असेल तर सोनालीलाही पाठवावे लागेल मग आता घरी. पण तिला तर हायेस्ट वोट्स येत होते ना? आणि जय ला शेवटी ठेवण्यात काहीच सरप्राइज पॉइन्ट नव्हता. तो सेफ असणारच आहे.

मीरा सेफ असेल तर गादा चा नंबर नक्की..
मीरा सेफ झाली तेव्हा तिची रिऍक्शन मस्त.. खरच चेहेरा खूप expressive आहे तिचा.
सोना ला आत्ता नाही काढणार असं वाटतंय..
नेक्स्ट वीक मिड वीक eviction असू शकेल तेव्हा सोना आणि मग उतक्या ला काढतील.
विकास, विशाल ,मीनल ,जय , मीरा असणार फायनल ला

मीरा, सोनालीला मी वोटिंग केलेलं. मी थोडंच करते पण या दोघींना केलेलं. सोना पण राहायला हवी.

मीरा गायत्री मध्ये मला मीराच बरी वाटते. मी फार बघत नाही पण गा दा ने फार उशिरा टीम बदलली. ती धड कुठलीच राहिली नाही.

व्हिलन टीममधले काही मेंबर तरी ठेवणार ना, दोन किंवा तीन तरी.

विकास, विशाल ,मीनल ,जय , मीरा असणार फायनल ला >>> सहाही असू शकतात. दोन वर्ष सहा होते.

पण हा सिझन पहिल्या दोन्ही सिझन चा आई/बाप आहे हे मान्य करायलाच हवे...
शिव नेहा किंवा मेघा पुसकी लै बोर केला होता...

ममा म्हणत होते की ह्या विकमध्ये राडे नाही झाले. हा विक बोरिन्ग होता. म्हणजे ह्याना राडे अपेक्षित होते.

ह्यान्च्यामुळे विनाकारण विशाल- मीनलमध्ये भाण्डण झाल.

स्नेहा इतरवेळी जयला टोमणे मारते पण चावडीला त्याच्याशेजारीच बसते. जय तिला बरोबर उत्तरे देतो. आविष्कारसारखा गप्प बसत नाही.

विकास-जयचे ' किम्मत-हिम्मत' चे वनलायनर्स भारी होते.

सोनाली बोलत होती तेव्हा ममाची रिएक्शन फनी होती. हा हा हा

आज मीराला बोलणी पडली नाही.

सिद्दु फक्त रविवारी- सोमवारी असेल. सद्या तो सगळया मराठी चॅनेल्सवर दिसतोय.

पाहुणे कधी जाणार आहेत? लास्ट सीझनला एव्हिक्ट झालेले स्पर्धक फक्त एक- दोन दिवस राहून गेले होते.

उद्या मीरा जयशी भाण्डणार आहे.

चावडीच्या वेळी कोणी कुठे बसायचं हे सांगितलं जात असावं.
मला काल स्नेहाने मांजरेकरांना दिलेली उत्तरं आवडली आणि पटली. मांजरेकर जयची वकिली करत होते असं वाटलं. गेमसाठी वापरलं जाण्याने दुखावलं जाणं स्वाभाविक आहे. एव्हिक्शन पर्यंतची स्नेहा आणि आताची स्नेहा यांत खूप फरक जाणवला. आधी तिला काय चाललंय, आपण काय करायला हवं, हे काही कळतच नाही, असं वाटत होतं. हे तिनेही कबूल केलं.
मांजरेकरांनी तिच्या इंटरनॅशनल फेस आणि नेमची त्यांनी फार खिल्ली उडवली नाही. फक्त ते वाक्य दोनदा वाचून दाखवलं.
स्नेहाच्या बोलण्यावर जयची रिअ‍ॅक्शन चांगली होती म्हणाले (त्यांनी वापरलेले नेमके शब्द आठवत नाहीत). पण त्याने हाताला इजा करून घेतली याबद्दल अवाक्षर नाही.

मीनलने फायनल राउंडला जयला समर्थक म्हणून निवडण्यावरून त्यांनी नक्की काय प्रुव्ह केलं ते मीनललाच काय, कोणालाच कळलं नाही. मीनल आपली मैत्री टास्कमध्ये कधीच आणत नाही. आधी तिनेही जयच्या बाजूने चांगला खेळ केला आहे.

मीनल विशालमध्ये काडी लावून ब्रेक घेतला आणि त्यांचं भांडण दाखवत राहिले . ब्रेकवरून परत आल्यावर - तुझ्या डोक्यात हवा जाते हे सिद्ध झालं असं म्हणाले. काहीही.

एकंदर काल टीम ए वाल्यांना चांगलं दाखवायचा आणि टीम बी वाल्यांना पाडायचा कार्यक्रम होता.

काल टीम ए वाल्यांना चांगलं दाखवायचा आणि टीम बी वाल्यांना पाडायचा कार्यक्रम होता.>>> +१
आज ममाना चावडीवर बोलायला काही मुद्देच नव्हते म्हणून नसते वाद उकरुन काढले
१) सोनाली-विशालचा मुद्दा परत सुरु झाला आदिश आल्यामुळे, सोनाली विशालशी बोलत नाहिये त्यामुले तिने लेट गो करुन बोलायला सुरवात करावी अस ममाना वाटतय का? जर प्रॉब्लेम दोघात आहेत तर एकटि सोनाली कशि जबाबदार? विशालला पण सल्ला द्या की माफी माग ,लेट गो कर
२) मीनल-विशाल मधे विनाकारण कशाला पेटवल सरानी तेच मला कळल नाही? त्यात त्या सणकी डोक्याच्या विशालने केली बडबड सुरु तरी विकास म्हणत होता की आपण नतर बोलु, सॉरी टु से पण विशाल भयकर डॉमिनेटिन्ग आहे,समोरच्याशी निट बोलताच येत नाही त्याला... सरानी ब्रेक नतर येवुन मिनललाच झापले पण अर्धी चुक त्यात विशालची पण आहेच त्याला काहिच बोलले नाहित सर?? तिने व्यवस्थित सगळे एक्स्प्लेन केल्यावर ममाना स्वत:चेच शब्द घशात घालायला लागले असते तर टॅन्जेट सुरु केल तु जय्ला का निवडल यव अन त्यव !! विशालला विनर बनवायच म्हणून त्याची इमेज चान्गली करायला हिची पाडण सुरु आहे छान!!
एवढि पडली असेल ना चॅनेलला त्या विशालची तर करा आत्ताच त्याला विनर अनाउन्स
उगाच एखाद्या प्रामाणिक प्लेयरला खालि कशाला पाडतायत.
३) स्नेहा आणी जयने एवढ काय काय केल अजुनही स्नेहा मॅडमने येवुन इतका माज केला तरी त्याना एकदम सॉफ्टली बोलले मिटवुन टाका आणी इकडे सोनालीला दमात घेतायत, बिचारिला मुद्देसुद बोलता येत नाही म्हणून.
ममा चावडीवर शाळा घ्यायची चटक लागलिये त्या भरात नाही त्या लोकाना पकडतायत, उत्कर्श ने काय गेम केलाय की त्याला एकदम १ न्बर दिलाय?

ममा एकंदरीतच मुलींना फारच अद्वातद्वा बोलतात असं जाणवतं. मुलांशी त्यामानाने बरेच सॉफ्ट बोलतात. सोनाली, मिरा आणि आता मिनल. पूर्ण बोलूच देत नाहीत. हे चूकीचे आहे.
मी कालचा एपिसोड पाहिला नाही आणि सोमिवर वाचून तर अजिबातच इच्छा नाही बघायची.
विशालला विनर बनवायच म्हणून त्याची इमेज चान्गली करायला हिची पाडण सुरु आहे छान!! >>>
करेक्ट. गेले १-२ आठवडे चांगलंच जाणवत आहे हे.

मला उलट वाटले जय ला विनर बनवण्याचा प्लान असावा. इतके त्याची साइड घेणे सुरु होते. मीनल ला अगदीच विनाकारण बोलले. तिचे मुद्दे बरोबर होते. उगीच टॅन्जन्ट मारला तुझे कौतुक केले तर तुझ्या डोक्यात हवा जाते का, तसे स्पेसिफिक काही नव्हतेच त्यांच्याकडे बोलायला. मीनल ने तसे नाही, तसे दिसत असल्यास मी काळजी घेईन असे म्हटलेही. पण विशाल ने उगीच तो मुद्दा पकडला अन मग गप्प बसेचना. तोही वाईटच दिसला आज. त्याची काही इमेज चांगली नाही होणार या बोलण्याने.
एकूण बेकारच झाला आजचा एपिसोड, अन सिद्दू ला बघून एवढे कळले की उद्याचा अजून बेकार असू शकतो.

जयलाच विनर करायच होत चॅनेलला पण तो कन्टिन्युअसली भयकर अ‍ॅरोगन्ट आणि अ‍ॅग्रेसिव्ह असाच खेळत आला ,कितिही शाळा घेवुन सुधारणा झालीच नाही,आता त्याला विनर करण चॅनेलच्या इमेजलाच घातक ठरेल... तरी आत काय सेटिन्ग असेल तर होइलही तो विनर
जय या आठवड्यात बरा होता,स्नेहा आल्याने त्याचा फोकसही हलला होता हे दिसत होत.

अतिशय बेक्कार आणि तद्दन फालतू झाला एकंदर एपिसोड!!
कौतुक जयचे आणि एक नंबर उत्क्याला? काय कारण? बर दिलाय एक नंबर तर काय बोलले एकंदर आठवड्याभरातल्या त्याच्या खेळाबद्द्ल? तसे काहीच नाही!!
मांजरेकरांचे एक बघितलेय समोरच्याने पलटवार केला की ते गडबडतात.... वेगळ्या टॅंजेंटवर जातात किंवा "माझे काही नाही जे प्रेक्षक बोलतात ते तुमच्यापर्यंत पोचवतो" म्हणत एकदम बचावात्मक पवित्रा घेतात!!
काल पण त्या लूझरच्या लॉकेटवरुन स्नेहाला छेडले असता ती जेंव्हा म्हणाली की तुम्हालापण माहितेय मी का केले किंवा असेच काहितरी तेंव्हा लगेच विषय बदलला त्यांनी!!
मीनलला विनाकारण बोलले; विशालला विनाकारण डोक्यावर घेतले: विकासकडे पूर्ण एपिसोडभर दुर्लक्ष केले आणि मीनल विशालच्या भांडणावर तो जेंव्हा मुद्देसूद बोलायला गेला तेंव्हा तेंव्हा त्याला मध्येच तोडले, सोनालीला तर उगाच गिऱ्हाइक बनवतात!!
ज्या आदिशला लोकांनी बाहेर इतके डोक्यावर घेतले त्याला सरळसरळ टारगेट केले!!
काय करतात त्यांचे त्यांना माहित!! गेल्या आठवड्यात एका insta live वर बघितले की आत गेलेले स्पर्धक म्हणे त्यांच्यासाठीही सरप्राईज होते; परत परत एकच गोष्ट बोलत होते की मी फक्त आढावा घेतो; डिसीजन मेकींगमध्ये माझा काही रोल नसतो वगैरे!! त्यांना हे स्पष्टीकरण परत परत का द्यावेसे वाटत असावे?
काल ते सोनालीचे चऱ्हाट ऐकत असताना ममां स्टेजवर झोपले ती सरळसरळ सलमानची नक्कल होती!!

बाय द वे; ते वोटींग ट्रेंडवाले तोंडावर पडले का काय? आठवडाभर सगळ्यांना मिळून जितकी मते आहेत तितकी एकट्या सोनाली आहेत म्हणत होते आणि सोनाली डेंजरझोन मध्ये? त्यांच्या ट्रेंडनुसार सोनाली, जय, उत्क्या, गायत्री आणि मीरा असा क्रम होता!!
म्हणजे हे ट्रेंड म्हणजे हवेत गोळीबार असतो वाटत नुसता? का चॅनेल शाळा करतेय?

सिध्दू फारफार तर उद्याचा एपिसोड असेल सनडे-फनडे वगैरे!! या लोकांची चावडी घ्यायला त्याला जमेल असे वाटत नाही!!

सध्यातरी माझा फेव्हरेट विकास आहे पण तो जिंकेल असे वाटत नाही!!

Pages