जुनी कुटुंबपद्धती विरुद्ध आधुनिक कुटुंबपद्धती?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2021 - 10:25

आज मायबोलीवर आलो आणि दोन धागे नजरेस पडले.
दोन्हींचा सारांश असा होता की,
रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा अमुक तमुक पदार्थच केले जातात कारण त्याने वेळेची बचत होते.

पण ही वेळेची बचत का करावी लागते?

म्हणजे बॅचलर असाल तर ठिक आहे. दिवसभर काम करायचे आणि रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण बनवायचे, मग स्वयंपाकघर आवरायचे, भांडी घासायची, ती जागेवर लावायची वगैरे वगैरे.. आता चांगले कमावत असाल तर काही कामांसाठी मदतनीस ठेऊ शकतोच. पण त्यातही स्वयंपाकासाठी कोणी ठेवायचे म्हटल्यास सतरा अडचणी आणि प्रत्येकाच्या अठरा आवडीनिवडी असतात. त्यामुळे लोकं ईतर धुणीभांडी आणि साफसफाईला मदतनीस ठेवतात, पण स्वयंपाकाचे स्वतःच काहीतरी करण्याकडे कल असतो. त्यात सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धकाधकीच्या आयुष्यात दिवसभर शारीरीक आणि मानसिक थकवा येणारे काम केल्यावर रात्री पुन्हा जाऊन स्वयंपाक करणे जीवावर येतेच.

आता या प्रॉब्लेमवर पूर्वी खूप सोपे सोल्युशन होते. छानपैकी लग्न करावे. जेवणाची चिंता बायकोवर सोडून द्यावी आणि घर चालवायला पैसे कमवायची जबाबदारी नवर्‍याने घ्यावी. दोघांनीही आपापले ईगो न कुरवाळता एकमेकांच्या कामाचा आदर करत मजेत राहावे. थोडक्यात याबाबतीत आपली जुनी कुटुंबपद्धतीच बेस्ट होती.

पण सध्या नवराबायको दोन्ही कमावू लागल्याने हे जेवणाचे हाल सुरू झालेत लोकांचे. दुपारचे एकवेळचे जेवण बाहेरच होते तर रात्रीच्या एकवेळच्या जेवणाला असे शॉर्टकट शोधावे लागतात. संध्याकाळी चहा कोण करणार यावरून मारामार्‍या होतात त्या वेगळ्याच.. रोजच्या पोहे, उपमा, घावणे, ईडल्या वगैरे नाश्त्याची बोंबच, बाहेरूनच वडे समोसे मागवले जातात किंवा पावाच्या दोन तुकड्यामध्ये कच्च्या भाज्या कोंबून काहीतरी पौष्टीक खातोय म्हणून मनाचे समाधान करावे लागते.

तरीही आधुनिकता जपायचीच असेल तर उलटे करावे. पत्नीने कमवायची जबाबदारी घ्यावी आणि पतीने स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा. पण नाही. जो कमावतो त्यालाच या समाजात मान मिळतो अशी काहीशी भावना मनात असल्याने आणि चार बूकं शिकलोय तर ते शिक्षण न कमावता फुकट कसे घालवणार या विचाराने स्त्री किंवा पुरुष कोणीही याबाबत मागे हटायला तयार नसतो आणि मग जेवणखाण्याबाबत कॉम्प्रोमाईज करण्याला पर्याय उरत नाही.

याऊपर जेव्हा दोन माणसे घराबाहेर कमवायला पडतात तेव्हा दुप्पट वा जास्त प्रदूषण करतात, निसर्गाचे जास्त रिसोर्सेस वापरतात ते वेगळेच. पण हे करून मिळते काय? तर दुप्पट कमाई? पण एकवेळच्या जेवणाची घिसाडघाई? कुटुंब वाढल्यावर मुले झाल्यावर हे प्रॉब्लेम्स आणखी वाढतात. आता काय डिटेल देत बसणार. ही तर घर घर की कहाणी आहे.

बघा अगदीच बेसिक आहे.
जसे क्रिकेटच्या संघात बॅटसमन आणि बॉलर दोन्ही आपापले काम चोख बजावणारे असतील तरच त्याला संतुलित संघ म्हणतात. सारेच प्लेअर बॅटींगला हावरे झाले आणि आम्ही रन्स बनवायचे कामच करणार असेच बोलू लागले. तर जगातले सर्वोत्तम अकरा फलंदाज घेऊनही ती टीम कधीच सामना जिंकू शकणार नाही.

आपली कुटुंबपद्धतीही या काळात अशीच होत चालली आहे. म्हणायला आपण म्हणतोय की प्रत्येकाने अष्टपैलू बनावे (कमवायला आणि स्वयंपाक करायला दोन्ही शिकावे), पण प्रत्यक्षात फॅक्ट हे आहे की सर्वांना फलंदाजीची (कमवायची) हाव सुटली आहे, गोलंदाजीची (स्वयंपाकाची) जबाबदारी कोणी खांद्यावर घ्यायला तयार नाही.

जर समाजात जगतानाही आपण आपले धान्य आपण पिकवत नाही, ते काम शेतकर्‍यांवर सोडतो. आपण आपला ईंजिनीअरींगचा जॉब करतो, आपल्या आरोग्याची काळजी करायची जबाबदारी डॉक्टरांवर सोडतो, मुलांना शिकवायची जबाबदारी शिक्षकांवर सोडतो, सार्वजनिक जागांची काळजी घ्यायला प्रशासनाची निवड करतो.... तर मग घर चालवताना, एक कुटुंब म्हणून जगताना अशी विभागणी टाळायचा अट्टाहास का दिसतो..

हो, आता अपवाद असतील. ते दाखवायची चढाओढही लागेल. पण थांबा. शांतपणे विचार करा. आणि प्रामाणिकपणे सांगा. आपली जुनी जीवनपद्धती, जुनी कुटुंबव्यवस्थाच योग्य नव्हती का? दोघांपैकी एकाने कमवावे, आणि एकाने घर सांभाळावे.. आणि आज जे आहे, तो आपला नाईलाज आहे, गोड मानून घ्यावे लागतेय.

तळटीप - धागा कोणीही वैयक्तिक घेऊ नये. कोणावर हे आरोप नाहीत. कोणाला यात दोष द्यायचा हेतू नाही. सध्या आजूबाजूला जे बघतोय आणि जे एकेकाळी जगलोय, त्यातील भेद प्रामाणिकपणे मांडायचा हा एक प्रयत्न आहे ईतकेच.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यापेक्षा सरळ गरमागरम वाफाळता भात करावा आणि सगळ्यांनी एकत्रच खावा.
>>>
बरेचदा लोकं वरण गरम करतात आणि भात थंडच घेतात. एकत्र कोलसवल्यावर होऊन जाते गरम. पण गरम वाफाळत्या भाताची मजा काही औरच. आणि तो चमच्याने नाही तर हातांना चटके देतच खावा... छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नवरा बायको दोघे कमवायला लागल्यामुळे आपण यातल्या कित्येकांना मुकलो आहोत. याची किंमत पैश्यात नाही करू शकत.

नवरा बायको दोघे कमवायला लागल्यामुळे आपण यातल्या कित्येकांना मुकलो आहोत. याची किंमत पैश्यात नाही करू शकत.>>विषयाला धरून प्रतिसाद. फाऊल.

दोघे कमवायला लागले आहेत तर घरकाम हा इश्यू निर्माण च झाला नाही पाहिजे .दहा वीस हजार पगार देवून घरकाम करायला बाई ठेवू शकतो.

गेल्या शंभर वर्षात स्त्री जेवढी बदलली तेवढा पुरुष नाही बदलला. म्हणजे ( विचार, घरकामातील स्किल आणि ते करण्याची इच्छा इ ) काही असतील ही पुरुष बदललेले , आणि ज्या घरात पुरुषांची मानसिकता बदललेली आहे त्या घरात पुरुषाने कमवावे आणि स्त्रीने रांधावे असे नसेल वाटत. कमावत्या घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीवर नसेल डबल भार पडत. तेव्हा स्त्रीने घरात थांबावे ह्या ऐवजी पुरुषाने ही घरकामाचा निम्मा भार उचलावा असे झाले तर ह्या धाग्याची गरजच पडणार नाही.

स्त्रीने राबायला घरात थांबणे आणि ते आवड, इच्छा, पदरमोड, आळस, कॉप्रोमाईज इ. कुठल्याही सदरात टाकायला माझा ठाम आणि स्वच्छ विरोध आहे. कारण त्याचे नकळत फारच भयानक परिणाम होतात. त्या व्यक्तीवर, पुढच्या पिढीवर आणि समाजावर. तसंच पुरुषाने बाहेर काम करणे आणि घरात डायपर बदलतो, मॅगी करतो, पोरांचे दात घासतो आणि आंघोळ घालतो आणि मग त्याची शेखी मिरवत नामानिराळा होतो याचे ही वाईट संस्कार होतात.
सो नवे ते सोनेलाच मत.>>>>
इतकं स्पष्ट लिहून देखिल धागाकर्त्याचं आपलं तेच पालुपद सुरू आहे. ॠन्मेश तुला इतर लोकांच्या मतांना फक्त खोडुन च काढायचे असले तर तसे स्पष्ट धाग्यात लिहि, की हे माझे मत आहे आणि मला या वर फर्दर चर्चा नकोय.
इतर लोकांचे वेगळे विचार असू शकतात आणि ते तुझ्याहून बेटर आणि मुद्देसुद असु शकतात हे तुला बिलकुल कळत तरी नाही किंवा तुला ते कळतं पण तू येडा बनून पेढा खातोस आणि मजा लुटतोस.
सो म्हणुन च तुझ्या धाग्या वर समजूतदार पोस्ट्स येत नाहित फारशा आणि येणार ही नाहित. (अपवाद अमितव आणि सिमंतिनी ह्यांची पोस्ट्स)

तेव्हा स्त्रीने घरात थांबावे ह्या ऐवजी पुरुषाने ही घरकामाचा निम्मा भार उचलावा असे झाले तर ह्या धाग्याची गरजच पडणार नाही.
>>>>>>

पुरुषांनी घरकामाचा निम्माच भार ऊचलावा ईतक्याच अपेक्षा स्त्रियांच्या असतील तर समाजात खरेच काही बदल घडला नाहीये. ना पुरुषांमध्ये ना स्त्रियांमध्ये.
मला वाटते जर नवराबायको दोघांमध्ये स्त्री जास्त कमवायला सक्षम असेल तर पुरुषाने घरकामाचा पुर्ण भार ऊचलायला हरकत नाही.
ईतका काय अहंकार पुरुष असल्याचा !

तर तसे स्पष्ट धाग्यात लिहि, की हे माझे मत आहे आणि मला या वर फर्दर चर्चा नकोय.
>>>>>
हे माझे मत आहे, मला यावर चर्चा हवी आहे. माझे धागे असे असतात.

तुम्हाला एखाद्याचे मत पटले तर ते मलाही पटायला हवे हा हट्ट का?

मी सर्वांच्या मताचा आदर करतो. पण याचा अर्थ ते पटवूनच घ्यायला हवे असे गरजेचे नाही. मग भले बहुतांश लोकांचे मत माझ्याविरुद्ध का असेना.

बहुमत जे असते तेच नेहमी बरोबर असते हा काही नियम नाहीये. किंबहुना समाजात सुधारणा नेहमी बहुमतात असलेल्या विचारांना बदलूनच झाली आहे Happy

याचा अर्थ असेही नाही की बहुमत नेहमी चुकीचेच असते. शक्य आहे की माझेही अल्पमत चुकीचे असू शकते. पण मला समोरच्याचे मत पटले तरच मी ते बदलेन, न की केवळ बहुमताच्या दबावाखाली येऊन ..

लोकहो, ईथे प्रॉब्लेम असा झाला आहे की मी हे धकाधकीचे आयुष्य स्लोडाऊन करायला नवराबायको दोघांनी न कमावता एकाने घर सांभाळावे असा विचार करायची गरज आहे असे म्हणताच ती घर सांभाळणारी जोडीदार बायकोच असणार हे गृहीत धरूनच ईथल्या बहुतांश पोस्ट येत आहे.

प्रत्यक्षात माझ्या डोक्यात असला स्त्री-पुरुष भेदच नसल्याने वा कदाचित माझे विचार आसपासच्या समाजाच्या फार पुढे गेल्याने माझ्या डोक्यात हे आलेच नाही.
समाजात आजही बहुतांश पुरुषांमध्ये पुरुषी अहंकारच भरला आहे हे कदाचित मी विसरून गेलो.

माझे आता लग्न झालेय, पण मी बॅचलर असतो तर नक्कीच घरकाम शिकून एका कमावत्या मुलीशी लग्न करायला आणि घर सांभाळायला मला आवडले असते.
अर्थात आताही मी बरेचदा माझ्या बायकोला हा पर्याय देतो, पण सध्या जे सुरळीत चालू आहे त्यात ती खुश आहे.

वा कदाचित माझे विचार आसपासच्या समाजाच्या फार पुढे गेल्याने >>>> फारच पुढे गेले की नो मॅन्स लॅण्ड मधे पोहोचतो आपण. इथे मॅनचा अर्थ मानव (पृथ्वीकर नाही) असा घ्यावा.

ऋन्मेष यांचे बरोबर आहे. एक तर स्त्रीने function at() { [native code] }हवा पुरुषाने कोणीतरी घरी राहीलेच पाहीजे. अन्यथा गरम गरम पोळ्यांना दोघे मुकणार. आणि तो तोटा भयंकर, महाभयंकर आहे.

प्रामाणिकपणाबद्दल धन्यवाद.
कोणताही मार्ग (घरी रहाण्याचा अथवा बाहेर पडण्याचा) स्त्रीने स्वीकारला तरी तिला गिल्टी वाटतेच. आता ते इतर लोकं करवुन देतात की स्त्रीचा मूळ स्वभाव असतो नकळे.
पण असेच पाहीलेले आहे.
तेव्हा प्रत्येकाने आपल्यापुरता मार्ग निवडून त्या गिल्टशी लढा द्यावी हेच उरते Sad
डिसक्लेमर - सर्वांनाच तसे वाटत असेल असे नाही.

पहीली गोष्ट म्हणजे वी (अ‍ॅज इन स्त्रिया) शुड नॉट प्ले द गॅलरी.
आपल्या मनात सुप्त गिल्ट असते आणि आपण आपलाच निर्णय योग्य कसा हे ठसवत बसतो बरं तेही पुरेसं पडत नाही की काय म्हणुन दुसरा पर्याय बडवत बसतो Sad
पुरुष असले धाग्यावर धागे काढून मजा बघतात. त्यांना स्वतःला गिल्ट बिल्ट काही नसते. बाहेर नोकरी करतात. अपण मुले वाढविली नाहीत, आपण गरम अन्न वाढत नाही - असे विचारही त्यांच्या मनाला शिवत नाहीत. हां कधीमधी मुलांशी खेळायला, चहा करायला आवडतं बट दॅट इज नॉट कमिटमेन्ट.
तीच डुक्कर आणि कोंबडीची गोष्ट. डुकराचा जीव पणाला लागलेला असतो. कोंबडी फक्त अंड देण्यापुरता स्वतःची जबाबदारी समजत असते.

डिसक्लेमर - नन व्हॉट सो एव्हर!!!

आताच्या शहरात असणाऱ्या कुटुंब विषयी च बोलूया.
त्या मध्ये पण परत जिथे नवरा बायको दोघे जॉब करतात अशा कुटुंब विषयी..
अशी कुटुंब पण देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत कारण त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात नगण्य च असावी.
आता काही पॉइंट चा विचार करूया.
नवरा आणि बायको ह्यांचे जॉब एकच क्षेत्रात असणार नाहीत .
वेगवेगळ्या क्षेत्रात असणारा म्हणजे ऑफिस च्या वेळा आणि कामाचे तास,प्रवास साठी लागणारा वेळ हे सर्व वेगवेगळे असू शकते.
मग घरकाम ( म्हणजे नक्की कोणते हार्ड काम असते ह्याचा काही उलगडा होत नाही.)
समान वाटता येईल का.
नवरा हा कमी कामाचे तास असणारी नोकरी करत आहे आणि घरापासून जवळ च ऑफिस आहे.
तो लवकर घरी पोचू शकतो.
बायको चे कामाचे तास जास्त आहेत आणि ऑफिस ते घर हा प्रवास पण खूप आहे.
ही पात्र बदलून पण विचार करा.
मग कोणी घरकामाचा जास्त बोजा स्वतःवर घेतला पाहिजे.
इथे स्त्री की पुरुष हा प्रश्न नाही.
जोडीदार असे समतोल नात गृहीत धरा.

पण मी बॅचलर असतो तर नक्कीच घरकाम शिकून एका कमावत्या मुलीशी लग्न करायला आणि घर सांभाळायला मला आवडले असते.
अर्थात आताही मी बरेचदा माझ्या बायकोला हा पर्याय देतो, पण सध्या जे सुरळीत चालू आहे त्यात ती खुश आहे.

Proud

तुझ्या प्रशनाचे उत्तर यातच आहे

तुझी आताची बायको आता असा ऑप्शन स्वीकारत नाही , याचाच अर्थ लग्नाच्या वेळीही इतर कुणी मुलगी असा ऑप्शन स्वीकारणार नाही

खरे तर असे प्रश्न ज्या कुटुंबात पडतात आणि त्याचे गंभीर स्वरूप असलेल्या समस्येत रूपांतर होते त्या कुटुंब ला कुटुंब म्हणतच येणार नाही.
ट्रेन ,बस मध्ये असलेला सह प्रवासी आणि एकच घरात राहणारे स्त्री पुरुष हे एकच कॅटेगरी मध्ये येतात.
जिव्हाळा,प्रेम,आपुलकी नसेल तर त्याला कुटुंब कसे म्हणता येईल.
जिथे प्रेम,जिव्हाळा,आपुलकी आहे तिथे स्वतःच्या मनाने पडेल ते काम केले जाते.
हक्क,अधिकार असले प्रकार तिथे नसतात.
तेच खरे कुटुंब बाकी असेच tp म्हणून लग्न केलेले .

कोणता ही विषय असू ध्या स्त्रिया ह्या पीडित च असतात आणि पुरुष पिडा देणारे.
हा propganda स्त्रिया चालवत असतात.
१) कुटुंब व्यवस्था स्त्रिया पीडित
२) एकत्र कुटुंब व्यवस्था स्त्रिया च पीडित
३)लग्नाच्या बाजारात स्त्रिया च पीडित
४) राजकीय निवडणुकीत स्त्रिया च पीडित.
५) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्त्रिया च पीडित.
६) क्रिमिनल केस मध्ये पण स्त्रिया च पीडित.
स्त्री सर्वात मोठी आरोपी असली तरी ती पीडित च .
७) बस च्या लाईन मध्ये पण त्याच पीडित.
हा propganda स्त्रीवादी ढोंगी लोकांनी मांडला .
ह्या सर्व प्रकारात पुरुष च जास्त पीडित असतात.
स्त्रिया नाहीत.
ट्रेन मध्ये ladies compartment मध्ये पुरुष प्रवास करत नाहीत .
पण खूप गर्दी असताना पण असंख्य स्त्रिया पुरुष compartment मध्ये येवून प्रवास करतात.
भीक मागणाऱ्या स्त्रिया ,छक्के पण स्त्री कंपार्टमेंट भीक मागत नाहीत पुरुषांच्या डब्यात भीक मागतात.

कुटुंबात किती जवळची नाती असतात.
१) नवरा बायको.
२) नणंद भावजय.
३) दिर भावजय.
४) सासू सासरे.
ही झाली कुटुंबातील नाती.
. आता अन्याय विषयी बोलू.
नणंद ही भावजयी वर कुरखोड करत असते आणि भावजय नणंद ह्या व्यक्ती ल पाण्यात बघत असते.
दोन्ही स्त्रिया पुरुषांचा काडी च संबंध नाही.
२) दिर भावजय..
हे नाते दिराचे लग्न होत नाही तोपर्यंत आणि दिर कमावता असे पर्यंत अत्यंत प्रेमळ असते .
दिरचे लग्न झाले की भावजय म्हणजे स्त्री च आणि दिराची बायको म्हणजे पण स्त्री च ह्यांची च भांडणे चालू असतात..इथे पण पुरुषांचा काहीच संबंध नाही.
दोन्ही भावात प्रेम असते.
३) सासू सासरे ..हे परूषाचे आई वडील असतात .
खूप प्रेम असते मुलगा हा आई वडिलांची जबाबदारी कधी च नाकारत नाही.
त्या मध्ये आई ही स्त्री असते तरी मुलाचे आई वर च जास्त प्रेम असते.
जबाबदारी नाकारणारी परत स्त्री च असते सून ह्या अवतारात.
आता विचार करा समस्या नक्की काय आहे.
पुरुषांना वेगळे किंवा एकत्र कोणत्याच कुटुंब पद्धती विषयी काहीच तक्रार नाही.
काम वाटून घेणे पण मान्य आहे.
फालतू स्वतंत्र पण नको आहे.
प्रायव्हेट स्पेस पण नको आहे .
फक्त कुटुंब हवे आहे.
स्त्री नी स्वतः मध्ये बदल करणे आवश्यक आहे .

बाप्रे, कुटुंबाबद्दल किती ज्ञान आहे तुमच्याकडे. पीएचडी केली असावी.
आम्हाला शाळेत नव्हतं यातलं काहीच. तर नाती कशी माहीत असणार ? खरंच तुमच्यामुळे किती माहिती होतेय. मायबोली जगभरात पसरलेली आहे. संपूर्ण जगात ही माहिती पोहोचली असेल.

जुनी कुटुंबपद्धती ही लादलेली/ स्विकारलेली/अंगावर पडलेली असे प्रकार आहेत.
नवीन कुटुंबपद्धती ही घेतलेली असते.
दोन्हींत हाल असतात कुणाचे तरी.
------
मराठी मालिकावाले मात्र जुनी कुटुंबपद्धतीच स्विकारतात. मालिका लांबवता येते.

Pages