जुनी कुटुंबपद्धती विरुद्ध आधुनिक कुटुंबपद्धती?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2021 - 10:25

आज मायबोलीवर आलो आणि दोन धागे नजरेस पडले.
दोन्हींचा सारांश असा होता की,
रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा अमुक तमुक पदार्थच केले जातात कारण त्याने वेळेची बचत होते.

पण ही वेळेची बचत का करावी लागते?

म्हणजे बॅचलर असाल तर ठिक आहे. दिवसभर काम करायचे आणि रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण बनवायचे, मग स्वयंपाकघर आवरायचे, भांडी घासायची, ती जागेवर लावायची वगैरे वगैरे.. आता चांगले कमावत असाल तर काही कामांसाठी मदतनीस ठेऊ शकतोच. पण त्यातही स्वयंपाकासाठी कोणी ठेवायचे म्हटल्यास सतरा अडचणी आणि प्रत्येकाच्या अठरा आवडीनिवडी असतात. त्यामुळे लोकं ईतर धुणीभांडी आणि साफसफाईला मदतनीस ठेवतात, पण स्वयंपाकाचे स्वतःच काहीतरी करण्याकडे कल असतो. त्यात सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धकाधकीच्या आयुष्यात दिवसभर शारीरीक आणि मानसिक थकवा येणारे काम केल्यावर रात्री पुन्हा जाऊन स्वयंपाक करणे जीवावर येतेच.

आता या प्रॉब्लेमवर पूर्वी खूप सोपे सोल्युशन होते. छानपैकी लग्न करावे. जेवणाची चिंता बायकोवर सोडून द्यावी आणि घर चालवायला पैसे कमवायची जबाबदारी नवर्‍याने घ्यावी. दोघांनीही आपापले ईगो न कुरवाळता एकमेकांच्या कामाचा आदर करत मजेत राहावे. थोडक्यात याबाबतीत आपली जुनी कुटुंबपद्धतीच बेस्ट होती.

पण सध्या नवराबायको दोन्ही कमावू लागल्याने हे जेवणाचे हाल सुरू झालेत लोकांचे. दुपारचे एकवेळचे जेवण बाहेरच होते तर रात्रीच्या एकवेळच्या जेवणाला असे शॉर्टकट शोधावे लागतात. संध्याकाळी चहा कोण करणार यावरून मारामार्‍या होतात त्या वेगळ्याच.. रोजच्या पोहे, उपमा, घावणे, ईडल्या वगैरे नाश्त्याची बोंबच, बाहेरूनच वडे समोसे मागवले जातात किंवा पावाच्या दोन तुकड्यामध्ये कच्च्या भाज्या कोंबून काहीतरी पौष्टीक खातोय म्हणून मनाचे समाधान करावे लागते.

तरीही आधुनिकता जपायचीच असेल तर उलटे करावे. पत्नीने कमवायची जबाबदारी घ्यावी आणि पतीने स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा. पण नाही. जो कमावतो त्यालाच या समाजात मान मिळतो अशी काहीशी भावना मनात असल्याने आणि चार बूकं शिकलोय तर ते शिक्षण न कमावता फुकट कसे घालवणार या विचाराने स्त्री किंवा पुरुष कोणीही याबाबत मागे हटायला तयार नसतो आणि मग जेवणखाण्याबाबत कॉम्प्रोमाईज करण्याला पर्याय उरत नाही.

याऊपर जेव्हा दोन माणसे घराबाहेर कमवायला पडतात तेव्हा दुप्पट वा जास्त प्रदूषण करतात, निसर्गाचे जास्त रिसोर्सेस वापरतात ते वेगळेच. पण हे करून मिळते काय? तर दुप्पट कमाई? पण एकवेळच्या जेवणाची घिसाडघाई? कुटुंब वाढल्यावर मुले झाल्यावर हे प्रॉब्लेम्स आणखी वाढतात. आता काय डिटेल देत बसणार. ही तर घर घर की कहाणी आहे.

बघा अगदीच बेसिक आहे.
जसे क्रिकेटच्या संघात बॅटसमन आणि बॉलर दोन्ही आपापले काम चोख बजावणारे असतील तरच त्याला संतुलित संघ म्हणतात. सारेच प्लेअर बॅटींगला हावरे झाले आणि आम्ही रन्स बनवायचे कामच करणार असेच बोलू लागले. तर जगातले सर्वोत्तम अकरा फलंदाज घेऊनही ती टीम कधीच सामना जिंकू शकणार नाही.

आपली कुटुंबपद्धतीही या काळात अशीच होत चालली आहे. म्हणायला आपण म्हणतोय की प्रत्येकाने अष्टपैलू बनावे (कमवायला आणि स्वयंपाक करायला दोन्ही शिकावे), पण प्रत्यक्षात फॅक्ट हे आहे की सर्वांना फलंदाजीची (कमवायची) हाव सुटली आहे, गोलंदाजीची (स्वयंपाकाची) जबाबदारी कोणी खांद्यावर घ्यायला तयार नाही.

जर समाजात जगतानाही आपण आपले धान्य आपण पिकवत नाही, ते काम शेतकर्‍यांवर सोडतो. आपण आपला ईंजिनीअरींगचा जॉब करतो, आपल्या आरोग्याची काळजी करायची जबाबदारी डॉक्टरांवर सोडतो, मुलांना शिकवायची जबाबदारी शिक्षकांवर सोडतो, सार्वजनिक जागांची काळजी घ्यायला प्रशासनाची निवड करतो.... तर मग घर चालवताना, एक कुटुंब म्हणून जगताना अशी विभागणी टाळायचा अट्टाहास का दिसतो..

हो, आता अपवाद असतील. ते दाखवायची चढाओढही लागेल. पण थांबा. शांतपणे विचार करा. आणि प्रामाणिकपणे सांगा. आपली जुनी जीवनपद्धती, जुनी कुटुंबव्यवस्थाच योग्य नव्हती का? दोघांपैकी एकाने कमवावे, आणि एकाने घर सांभाळावे.. आणि आज जे आहे, तो आपला नाईलाज आहे, गोड मानून घ्यावे लागतेय.

तळटीप - धागा कोणीही वैयक्तिक घेऊ नये. कोणावर हे आरोप नाहीत. कोणाला यात दोष द्यायचा हेतू नाही. सध्या आजूबाजूला जे बघतोय आणि जे एकेकाळी जगलोय, त्यातील भेद प्रामाणिकपणे मांडायचा हा एक प्रयत्न आहे ईतकेच.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पाश्चिमात्य माहीत आहेत म्हणुन , मी पुर्वेकदील देशात कधी गेले नाहिये. भरपुर व्यायाम करणारे पाश्चिमात्य आपले रोलमॉडेलस असायला काहीच हरकत नाही.
>>>>

आणि मी पाश्चिमात्य देशात कधी गेलो नाही. मला ते माहीत नाहीत. तर मी त्यांना रोलमॉडेल का बनवू Happy

जोक्स द अपार्ट,
ते व्यायाम करतात, ती माणसे असली तरी शरीराची रचनाही वेगळी असते, त्यांचे हवापाणी वेगळे असते, त्यांच्या अन्नधान्याची क्वालिटी वा पोत वेगळा असतो, त्या हवामानात अन्न शिळे व्हायचे प्रमाण बदलते, त्यांची अन्न पचवायची क्षमता वेगळी होते, ते कामही भारतीयांसारखे मरमर करून करत नाहीत, एन नंबर्स ऑफ फरक सापडतील जे सारे भेद लक्षात न घेता आपण फक्त व्यायाम करून आपल्याईथले बाहेरचे वा फ्रोजन अन्न पचवण्याबद्दल बोलत असू तर ही आपल्याच शरीराशी फसवणूक आहे.

>>>>>पण हे करून मिळते काय? तर दुप्पट कमाई? पण एकवेळच्या जेवणाची घिसाडघाई?
सिरीअसली? जॉबमधून जरी कमाई होत असली तरी जॉब हा फक्त कमाईकरताच केला जातो का? माणसाला एक पर्पझ लागतो. आयुष्याची पोकळी भरुन काढण्याकरता ध्येय लागतं. वेळेचा विनियोग फार महत्वाचा वाटतो. निर्वासित लोकांच्या कॅम्पवरती एक सर्वेक्षण झालेले की - फक्त बसून खा, किंवा काम करुन त्याबदल्यात अन्न कमवा किंवा फक्त काम करा. यामध्ये शेवटच्या २ पर्यायांना जास्त प्रतिसाद मिळाला होता. खूप पूर्वी हा लेख वाचलेला होता. शोधते व सापडला तर देते.

घरच्या स्वयंपाकाच्या स्ट्रेसमुळे स्वयंपाक करणार्‍या व्यक्तीची (बायकांची) वाट लागते.
>>>>

नुसते घरच्या स्वयंपाकाने नाही लागत. जर कोणाला घराची साफसफाई, कपडे धुणे, सुकवणे, भांडी घासणे, रचून ठेवणे, पसारा आवरणे, बाजारहाट करणे, स्वयंपाक करणे अशी बरीच कामे करावी लागली तर पिट्ट्या पडणारच. बदनाम फुकट स्वयंपाक होतोय Happy

ऋन्मेष, तुझ्या जुन्या आणि आधुनिक कुटुंबाच्या बेसिक डेफिनेशन मध्ये खूप घोटाळे आहेत. ते सुधारण्याची जबाबदारी माझ्यावर सुदैवाने नाही. त्यामुळे तुला शुभेच्छा! हाही धागा शतक पार करो.

सर्वेक्षण झालेले की - फक्त बसून खा, किंवा काम करुन त्याबदल्यात अन्न कमवा किंवा फक्त काम करा. यामध्ये शेवटच्या २ पर्यायांना जास्त प्रतिसाद मिळाला होता.
>>>>

सर्वेक्षणापुरते खोटे पर्याय देऊ नका.
फक्त बसून खायचा खरोखर पर्याय द्या ईथे लोकांना मग बघा.

@ मानव पृथ्वीकर,
असे का वाटले दुसर्‍या ठिकाणी एकीने असेल? तो टायपोच असेल असे का समजले?

दोघांपैकी एकाने असेच लिहीले आहे ते.

आपली जुनी पद्धत तू म्हणत होतास तशी, दोघांपैकी एकाने कमवावे, एकाने घर सांभाळावे, यात घर सांभाळण्याचे काम बायकांनीच करावे असे अजिबात नव्हते असे म्हणतो आहेस का?

तशा प्रकारचा एक लेख मिळाला - https://www.weforum.org/agenda/2016/08/refugees-don-t-want-handouts-they...
Refugees don’t want handouts: they want jobs

The falafel stand barely generates any income. “For every 100 sandwiches sold, the net profit will be €3 or €4,” Khaled tells me. He’s making sandwiches, he says, “as a service to people here”. But there’s another reason: working for free is better than the idleness of the long days. “Otherwise, you go crazy,” he says.

पुरूष मदतनीस विश्वासाचे असल्यास कुटूंबातही हायर केले जातात.
>>>
पुरुष मदतनीस हायर करताना विश्वासू हवा. सहमत आहे.
कारण बाहेरच्या पुरुषापासून आपल्या घरच्या महिला सुरक्षित राहाव्यात. सहमत आहे.
मग हाच विचार आपल्या घरच्या महिलांना बाहेरच्या जगात काम करायला पाठवतानाही लोकं करू शकतात. तिला नऊच्या आत घरात यायला सांगू शकतात. कारण बाहेरच्या जगावरचा अविश्वास. पण तेव्हा असे कोणी केले तर त्याला स्त्रियांवर आलेली बंधनांचे लेबल लावले जाईल.

आपली जुनी पद्धत तू म्हणत होतास तशी, दोघांपैकी एकाने कमवावे, एकाने घर सांभाळावे, यात घर सांभाळण्याचे काम बायकांनीच करावे असे अजिबात नव्हते असे म्हणतो आहेस का?
>>>
म्हणजे पुर्ण लेख वाचला नाही. आता दोघांपैकी कोणी कमवावे कोणी घरकाम करावे हे मिळून ठरवा असे लिहिले आहे ना त्यात. पुर्वी स्त्री शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने साहजिकच पुरुष कमवायला जास्त सक्षम होते त्यामुळे चित्र वेगळे होते. आता जर एखाद्या जोडीत स्त्री कमवायला जास्त सक्षम असेल तर तिने कमवायला पुढाकार घ्यायला हरकत नाही.

(एक सूचना आहे. जर प्रतिसाद देणा-यांपुढे नेमका विषय ठेवता आला तर धागा भरकटणार नाही. लेखकानेच धागा भरकटवण्यास सुरूवात केली असल्याने नेमका विषय कोणता आहे हे समजत नाही. ठळक केलेल्या शब्दखुणा तर भलतेच दर्शवताहेत. इंन्स्टंट हा विषय आहे की आधुनिक कुटुंबव्यवस्था ? इटॅलिक मधे असलेला मजकूर हा नव्याने हवा असल्याची सूचना आहे. स्ट्राईथ्रू नको असलेल्या मजकुरासाठी आहे )

ज मायबोलीवर आलो आणि दोन धागे नजरेस पडले.
दोन्हींचा सारांश असा होता की,

रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा अमुक तमुक पदार्थच केले जातात कारण त्याने वेळेची बचत होते.

मायबोलीवर रात्रीच्या स्वयंपाकाला लागणा-या वेळेची बचत कशी होईल हाआ धागा पाहण्यात आला. पण ही वेळेची बचत का करावी लागते?

म्हणजे बॅचलर असाल तर ठिक आहे. दिवसभर काम करायचे आणि रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण बनवायचे, मग स्वयंपाकघर आवरायचे, भांडी घासायची, ती जागेवर लावायची वगैरे वगैरे.. आता चांगले कमावत असाल तर काही कामांसाठी स्वयंपाकासाठी मदतनीस ठेऊ शकतोच. पण त्यातही स्वयंपाकासाठी कोणी ठेवायचे म्हटल्यास सतरा अडचणी आणि प्रत्येकाच्या अठरा आवडीनिवडी असतात. त्यामुळे लोकं ईतर धुणीभांडी आणि साफसफाईला मदतनीस ठेवतात, पण स्वयंपाकाचे स्वतःच काहीतरी करण्याकडे कल असतो. त्यात सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धकाधकीच्या आयुष्यात दिवसभर शारीरीक आणि मानसिक थकवा येणारे काम केल्यावर रात्री पुन्हा जाऊन स्वयंपाक करणे जीवावर येते.

आता या प्रॉब्लेमवर पूर्वी खूप सोपे सोल्युशन होते. छानपैकी लग्न करावे. जेवणाची चिंता बायकोवर सोडून द्यावी आणि घर चालवायला पैसे कमवायची जबाबदारी नवर्‍याने घ्यावी. दोघांनीही आपापले ईगो न कुरवाळता एकमेकांच्या कामाचा आदर करत मजेत राहावे. थोडक्यात याबाबतीत आपली जुनी कुटुंबपद्धतीच बेस्ट होती.

पण सध्या नवराबायको दोन्ही कमावू लागल्याने हे जेवणाचे हाल सुरू झालेत लोकांचे. दुपारचे एकवेळचे जेवण बाहेरच होते तर रात्रीच्या एकवेळच्या जेवणाला असे शॉर्टकट शोधावे लागतात. संध्याकाळी चहा कोण करणार यावरून मारामार्‍या होतात त्या वेगळ्याच.. रोजच्या पोहे, उपमा, घावणे, ईडल्या वगैरे नाश्त्याची बोंबच, बाहेरूनच वडे समोसे मागवले जातात किंवा पावाच्या दोन तुकड्यामध्ये कच्च्या भाज्या कोंबून काहीतरी पौष्टीक खातोय म्हणून मनाचे समाधान करावे लागते.

तरीही आधुनिकता वेळेची बचत हवी असल्यास जपायचीच असेल तर उलटे करावे. पत्नीने कमवायची जबाबदारी घ्यावी आणि पतीने स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा. पण नाही. जो कमावतो त्यालाच या समाजात मान मिळतो अशी काहीशी भावना मनात असल्याने आणि चार बूकं शिकलोय तर ते शिक्षण न कमावता फुकट कसे घालवणार या विचाराने स्त्री किंवा पुरुष कोणीही याबाबत मागे हटायला तयार नसतो आणि मग जेवणखाण्याबाबत कॉम्प्रोमाईज करण्याला पर्याय उरत नाही.

याऊपर जेव्हा दोन माणसे घराबाहेर कमवायला पडतात तेव्हा दुप्पट वा जास्त प्रदूषण करतात, निसर्गाचे जास्त रिसोर्सेस वापरतात ते वेगळेच. पण हे करून मिळते काय? तर दुप्पट कमाई? पण एकवेळच्या जेवणाची घिसाडघाई? कुटुंब वाढल्यावर मुले झाल्यावर हे प्रॉब्लेम्स आणखी वाढतात. आता काय डिटेल देत बसणार. ही तर घर घर की कहाणी आहे.

बघा अगदीच बेसिक आहे.
जसे क्रिकेटच्या संघात बॅटसमन आणि बॉलर दोन्ही आपापले काम चोख बजावणारे असतील तरच त्याला संतुलित संघ म्हणतात. सारेच प्लेअर बॅटींगला हावरे झाले आणि आम्ही रन्स बनवायचे कामच करणार असेच बोलू लागले. तर जगातले सर्वोत्तम अकरा फलंदाज घेऊनही ती टीम कधीच सामना जिंकू शकणार नाही.

आपली कुटुंबपद्धतीही या काळात अशीच होत चालली आहे. म्हणायला आपण म्हणतोय की प्रत्येकाने अष्टपैलू बनावे (कमवायला आणि स्वयंपाक करायला दोन्ही शिकावे), पण प्रत्यक्षात फॅक्ट हे आहे की सर्वांना फलंदाजीची (कमवायची) हाव सुटली आहे, गोलंदाजीची (स्वयंपाकाची) जबाबदारी कोणी खांद्यावर घ्यायला तयार नाही.

जर समाजात जगतानाही आपण आपले धान्य आपण पिकवत नाही, ते काम शेतकर्‍यांवर सोडतो. आपण आपला ईंजिनीअरींगचा जॉब करतो, आपल्या आरोग्याची काळजी करायची जबाबदारी डॉक्टरांवर सोडतो, मुलांना शिकवायची जबाबदारी शिक्षकांवर सोडतो, सार्वजनिक जागांची काळजी घ्यायला प्रशासनाची निवड करतो.... वेगवेगळे व्यवसाय / व्यापार उदीम / धंदा / सेवा वाटून घेतलेल्या असतात तर मग घर चालवताना, एक कुटुंब म्हणून जगताना अशी विभागणी टाळायचा अट्टाहास का दिसतो..

हो, आता अपवाद असतील. ते दाखवायची चढाओढही लागेल. पण थांबा. शांतपणे विचार करा. आणि प्रामाणिकपणे सांगा. आपली जुनी जीवनपद्धती, जुनी कुटुंबव्यवस्थाच योग्य नव्हती का? दोघांपैकी एकाने कमवावे, आणि एकाने घर सांभाळावे.. आणि आज जे आहे, तो आपला नाईलाज आहे, गोड मानून घ्यावे लागतेय.

तळटीप - धागा कोणीही वैयक्तिक घेऊ नये. कोणावर हे आरोप नाहीत. कोणाला यात दोष द्यायचा हेतू नाही. सध्या आजूबाजूला जे बघतोय आणि जे एकेकाळी जगलोय, त्यातील भेद प्रामाणिकपणे मांडायचा हा एक प्रयत्न आहे ईतकेच.
धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: अवांतर
शब्दखुणा: कुटुंबनवरा बायकोझटपट स्वयंपाक

नाही नाही खोटा पर्याय नव्हता. पर्याय दिला होता. शोधते आहे Sad
>>>
अरे देवा, अहो सामो तसे नाही. खोटा पर्याय म्हणजे सर्वेक्षणापुरते नको. खरोखर बसून राहायचे पैसे द्या लोकांना आयुष्यभर. नुसते विचाराल तर सारेच आदर्शवादाचा आव आणूनच उत्तर देणार..

>>>>खोटा पर्याय म्हणजे सर्वेक्षणापुरते नको.
ऋन्मेष होय मला कळलेला तुमचा प्रतिसाद. तेच तर म्हणतेय ना - खरोखर तसा चॉइस दिला गेला होता. बट पीपल रादर ऑप्टेड टु डु सम वर्क.

आयुष्याला पर्पझ लागतो. तो प्रत्येकाला स्वतःचा स्वतःलाच शोधावा लागतो. मग तो जर मुले वाढविणे, घराची काळजी घेणे असेल - तर छानच.
पण जर दोघांचा पर्पझ जॉब करणे असेल तर त्यात गैर काही नाही.

कुटुंबनवरा
बायकोझटपट
हे शब्द असे लिहीण्यामागे काही प्रयोजन आहे काय ?

हा विषय समजून घेण्याचा अथक प्रयत्न करतोय. खालीलप्रमाणे थोडासा समजला आहे. करेक्ट आहे का ? एकदा समजला की मग समजून उमजून प्रतिसाद देता येईल.

धाग्याचा मुख्य विषय - स्वयंपाकाचा कंटाळा. झटपट करण्याचा कल.

पूर्वी स्त्री घर सांभाळायची आणि पुरूष बाहेर पडायचा. शिकार / शेती आणि अन्नधान्य आणून द्यायचे काम त्याचे. त्या जिन्नसांचा उपयोग करून स्वयंपाक बनवण्याचे काम स्त्रीचे असायचे. ही पद्धत असल्याने रूचकर जेवण मिळत होतं. कामाची विभागणी स्पष्ट होती.

आताच्या कुटुंबपद्धतीत स्त्री सुद्धा घराबाहेर पडू लागलेली आहे. त्यामुळे दोघेही बाहेर पडले तर मग घराची जबाबदारी कुणाची हा प्रश्न उभा ठाकतो. दमून तर दोघेही येतात. मग स्वयंपाक कुणी करायचा ? यातून वाद तर होतातच. पण दमून आल्यानंतर स्वयंपाक बनवण्याची एनर्जी शिल्लक नसल्याने बाहेरून आणणे किंवा मग इन्स्टंट पदार्थ बनवण्याकडे कल असतो असे मायबोलीचा एक धागा वाचून समजले आहे.

यावर उपाय म्हणजे पूर्वीची कुटुंब पद्धती. पण फक्त इतकेच लिहीले तर मायबोलीवरचा स्त्री वर्ग मला बदड बदड बदडेल. म्हणून मी हे चाणाक्ष पद्धतीने लिहीतोय की नव-याने स्वयंपाक बनवावा आणि बायकोने बाहेरची कामे करावीत. असे लिहील्याने स्त्रीवर्गाचा रोष मला पत्करावा लागत नाही. कुणी तरी एकाने घरी रहावे.
याला माझ्या मते आधुनिक कुटुंब म्हणत असावेत.

नाहीतर जमत असल्यास घरी कुक ठेवावा.

पण जर दोघांचा पर्पझ जॉब करणे असेल तर त्यात गैर काही नाही.
>>>>>>
गैर काहीच नाही हे मी आधीच म्हटलेय. असे झाल्यास यात चूकही कोणाची नाही असेही म्हटलेय. दोन महत्वाकांक्षी व्यक्ती प्रेमात पडून त्यांनी लग्न केल्यास त्याचेही काही करू शकत नाही. ठरवून लग्न करताना असे टाळता आल्यास उत्तम. पण ते ही न जमल्यास दोष बदलत्या युगालाच दिलाय.

working for free is better than the idleness of the long days. “Otherwise, you go crazy,” he says.
>>>>
हा वेगळा विषय आहे. वेगळी चर्चा होऊ शकते. यात अनेक मुद्दे येतील.

पण मला यात आढळलेला एक रोचक मुद्दा असा आहे की जर मला आज कंपनी म्हणाली की काही काम न करता तुला तुझा पगार आणि दरवर्षीची ईंक्रीमेंट आम्ही देतो तर मी सुरुवातीला खुश होईल. पण कालांतराने मला लक्षात येईल की यात माझी पर्सनल ग्रोथ होत नाहीये. उद्या दहा वर्षांनी कंपनीने पगार द्यायचा थांबवले तर माझे काय होईल. माझे स्किल लेव्हल दहा वर्षांपूर्वीच अडकलेले असल्याने मला नवीन जॉब मिळणे अवघड होईल.
आणि एक्झॅक्टली हेच आज नवराबायकोत होत आहे. एकजण याच कारणासाठी मागे हटायला तयार होणार नाही की त्याला त्याच्यावर ही वेळ येऊ नये ही भिती आहे.
पण प्रत्यक्षात ही भिती राहू नये याचसाठी विभक्त व्हायची वेळ आल्यास त्या दुसर्‍या जोडीदाराला पोटगी मिळायचा कायदा आहे. पण ते अगदीच विभक्त झाल्यावरचे सुरक्षाकवच आहे. एकत्र राहत असताना एकजण कमावता असेल आणि दुसरा घर सांभाळणारा, तर त्या दुसर्‍याच्या मनात तसेच आश्वासक वातावरण तयार करणे हे त्या पहिल्या जोडीदाराचे काम आहे. अन्यथा पर्सनली मला न कमावता झेपेल तेवढी घरकामे करत आनंदाने जगणे आवडेलच Happy

>>>>प्रत्यक्षात ही भिती
जीवनाची शाश्वती नाही. आपण आपल्या पायावर उभे राहीलेले बरे असे मला तरी वाटते. अगदी बक्कळ पैसा असला तरी साचलेले तळे संपू शकते. पैशाचा ओघ रहाणे फार महत्वाचे असते , मानसिक शांतीच्या दृष्टीनेसुद्धा. शिवाय एकाचा जॉब गेला तर दुसरे चाक चालते आहे या आधारावरती गाडी रखडत का होइना काही काळ चालू शकते.
------------------------------------------------
बाकी जॉब करुन सर्वजण अगदी तीर मारतात असे मला म्हणायचे नाही. आपल्यासारख्यांची सामान्यच नोकरी असते पण ते तेल-मीठ घरी आणणंही मानसिक शांती देतं. मी ५ & १/२ वर्षे घरी होते त्या काळात मला फार असुरक्षित वाटे. नवर्‍याने सुरक्षिततेची हमी देण्यात कुठेही मार्जिन सोडलेली नव्हती पण माझाच भित्रा स्वभाव. त्या काळात मला स्वप्नेदेखील फार असुरक्षिततेची पडत.
जरी मी ते ५ & १/२ महीने माझ्या नवजात बाळाब रोबर खूप आनंदाने व्यतित केले तरी कुठेतरी मनात धाकधूक असेच की आता आपण आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहोत. न जाणो .... गॉड फॉर्बिड, ..... वगैरे वगैरे

शेवटी स्वभावावरही असतं.
----------------
हा डायलेमा हे द्वंद्व - भीती/सुरक्षितता-असुरक्षितता - माझ्या एका कथेत मी मांडलेली आहे. आत्ता सापडत नाहीये. सापडली की दुवा देते. - https://www.maayboli.com/node/71659

मला वाटले ते तव्यावरून ताटात म्हणजे अगदी ताजी गरमागरम असे दर्शवायला लिहीतात. >>>>>>
व्हय व्हय, मलाबी तेच म्हणायचं व्हतं.
तसंबी आमी घरात इनमीनदोन माणसं दरडोई दोन म्हंजी चार चपात्या बनवून लगीच दोन ताटांमदी घेतो.कैसेरोलात बी ठिवाव्या लागत न्हाईत.आन् मंग एक दुज्याला भरवत जेवतो.
समजा चुकून माकून एखादी चपाती जरा करपली तर धनी त्याज्याच ताटांमदी घेतो.

मला शिर्षकावरून वाटलं कि एकत्र कुटुंब पध्दती वर्सेस संयुक्त कुंटुंब पध्दती यावर चर्चा करायची आहे.
पण लेखातून आणि प्रतिसादांतूनही नेमके कळेना विषय काय आहे.

त्या काळात मला स्वप्नेदेखील फार असुरक्षिततेची पडत.
>>>>
आपण सुशिक्षित आहोत. कमवायला सक्षम आहोत. तरीही आपण जॉब करत नाही. या विचारांतून येते ती असुरक्षितता.
जर लग्नाआधीच माईंडसेट असा असेल की मी लग्नानंतर जॉब करणारच नाहीये वा अपल्याला तो करायचाच नाहीये तर ती असुरक्षितता मनात शिरकाव करणार नाही.

@ शांत माणूस
पण फक्त इतकेच लिहीले तर मायबोलीवरचा स्त्री वर्ग मला बदड बदड बदडेल.
>>>>
कोणी बदड बदड बदडेल या भितीने धागा काढताना मी क्षणभर विचार करतो असे तुम्हाला वाटत असेल तर ऋन्मेष तुम्हाला कळलाच नाही Happy

मला शिर्षकावरून वाटलं कि एकत्र कुटुंब पध्दती वर्सेस संयुक्त कुंटुंब पध्दती यावर चर्चा करायची आहे.
>>>>>>

एकाने कमावणे आणि एकाने घर सांभाळायची जबाबदारी उचलणे
विरुद्ध दोघांनी कमावणे आणि दोघांनी घर सांभाळणे या बदलत्या कुटुंबपद्धतीबद्दल धागा आहे.
यात दोष कोणालाच नाही, वा चूक की बरोबर कोणच नाही, तरी आपापले मत राहील. जेव्हा चर्चा करू तेव्हाच दोन्ही पद्धतीत ज्या समस्या आहे त्यावर उपाय शोधू शकतो.

>>>>>असुरक्षितता.
कदाचित कर्क राशीची ही असुरक्षितता व भित्रेपणा असेल Happy उपाध्ये एक मस्त उदाहरण देतात - एका कर्क राशीच्याच स्त्रीला काही कारणाने आर्थिक दृष्ट्या असुरक्षितता वाटण्याचे उदाहरण देताना ते म्हणतात - त्या बाई मला सांगत होत्या - मला स्वप्ने पडतात की आपल्या हाता पायाला ही फडकी बांधलीयेत आणि आपण गाड्यावर बसलोय वगैरे वगैरे मग उपाध्ये विचारतात "आणि गाडा कोण ओढत होतं?" तर त्या बाई सांगतात - "आमचे हे! दुसरं कोण" ................. हाहाहा इथे प्रेक्षकवर्गात, हशा पिकतो.
---------------------------
हे उदाहरण अतिरेकी नाहीये. मला त्या काळात अक्षरक्षः स्वप्ने पडत - मी भंगार/पत्रे गोळा करुन मग ते एका दुकानात नेउन विकते आहे.
Lol Lol Lol
हे केव्हा आय आय टी ची डिग्री हाती असताना.
स्वभावाला औषध नसते हेच खरे.

स्वयंपाक करणारी बाई, बाईच का? तीच का? तिनेच का? गरमच का? स्वतः का नाही? हे नेहमीचं वळण लागलंच.

ज्यांचे नवरे / घरातील पुरुष चपात्या करतात त्या ताया इथे माबोवरच पाहिल्या.

आणि गरम चपातीवर काय एवढा रोष? चपाती केली की गरमच असते. जेवणाच्या टायमाला केलीक्षकी गरम खायला मिळते. तसंही 7 ला केलेली चपाती दीडला खावी लागतेय.

ऋ, तुला स्वयंपाक येत नसेल तर नको करु बाबा. चार दिनकी जिंदगीत निदान साधं का होईना पण आवडतं चवीचं जेवण तर जेवायला हवं. तुलाही अन घरच्यांनाही.
मॅगी, भेळ करतोस ते ठीके.

एकाने कमावणे आणि एकाने घर सांभाळायची जबाबदारी उचलणे हा खूप मोठा निर्णय आहे कारण त्या कुटूंबाचा आर्थिक पाया कसा आहे त्यावर अवलंबून आहे. आर्थिक स्थैर्यासाठी मल्टीपल सोर्सेस ऑफ इंकम (आवकीचे अनेक मार्ग असणे) जरूरी आहे. ह्यासाठी सगळ्यात सोपे म्हणजे दोघांनी नोकरी/व्यवसाय करणे व हळूहळू इतर डिव्हीडंड्स/ब्लॉग इ पॅसिव्ह इंकम तयार करणे. असे पॅसिव्ह इंकम उपलब्ध असेल तर एक जोडीदार घरी असण्यानेही आर्थिक पाया भक्कम राहिल. Financial independence retire early (FIRE) मधले काही ब्लॉगर्स अशा पद्धतीने फक्त १० वर्ष नोकरी केली व नंतर मुले सांभाळतो असेही चित्र दिसते. काही जागी बाबा घरी पण आई नोकरी करते असेही चित्र आढळते. पण ह्या निर्णयापर्यंत येण्यासाठी आधी फार परिश्रम घेतलेले असतात. दोन्ही जोडीदारात आयुष्य कशा पद्धतीचे हवे ह्यात एकवाक्यता दिसते. उदा: आज मुलांना गरम ऐवजी गार पोळी मिळाली तरी उद्या ते उच्चशिक्षण घेऊ शकतील. किंवा आज मुलांना गरम पोळी मिळेल आणि उद्या पाहिजे तर त्यांनी लोन करून त्यांचे त्यांचे शिक्षण करावे. दोन्ही पद्धतीमध्ये गैर्/वाईट काही नाही पण एकवाक्यता, सुसूत्रता असणे जरूरी आहे.

केवळ एक जोडीदार (स्त्री असो की पुरूष) नोकरी/व्यवसाय करतो नि इतर काहीही पॅसिव्ह इंकम नाही ही अस्थिर परिस्थिती आहे. त्यामुळे व्यक्तीला असुरक्षित वाटेल न वाटेल हा स्वभावाचा भाग झाला पण परिस्थिती अस्थिर आहे ह्यात दुमत नसावे.

केवळ एक जोडीदार (स्त्री असो की पुरूष) नोकरी/व्यवसाय करतो नि इतर काहीही पॅसिव्ह इंकम नाही ही अस्थिर परिस्थिती आहे.>>> अनुमोदन

कोरोना लॉकडाऊन मध्ये एकच कमावती व्यक्ती असणार्या कुटुंबाची वाईट हालत झाली होती. हे जवळचे उदाहरण आहे.

आर्थिक स्थैर्य तेव्हा डगमगते जेव्हा तुम्ही सेविंग केलेली नसते. वाढत्या उत्पन्नानुसार गरजा वाढवल्या असतात. लाईफस्टाईल हाय सेट केली असते. अन्यथा घरात दोघे कमावणाऱ्यांचेही वांधे झालेले पाहिले आहेत जिथे घर ईतके महाग घेऊन ठेवलेले की एकाच्या पगारामध्ये लोनचे हफ्तेच जात होते.

मुळात आर्थिक मुद्दा फसवा आहे. वाढत्या पगारानुसार गरजा वाढवत नेल्या की आर्थिक स्थैर्य तुम्ही अंबानी झाल्याशिवाय येणे अवघड.

आता समजा नवरा बायको दोघे एक लाख आणि ७५ हजार पगार घेणारे आहेत. एकूण मासिक उत्पन्न झाले एक लाख पंच्याहत्तर हजार. जे मुलांना चांगले शिक्षण द्यायला, छानसे घर घ्यायला, गरजेनुसार गाडी घ्यायला पुरेसे आहे.

तेच त्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये त्याच्यापेक्षा वरच्या पोस्टवर गेलेल्या त्याच्या मित्राचा पगार झाला आहे दोन लाख. म्हणजे पहिल्या मित्राच्या आणि त्याच्या बायकोच्या टोटल ईंकमपेक्षाही जास्त.

आता म्हटले तर तो दोन लाख रुपये पगार घेणारा मित्र पहिल्या मित्रासारखीच लाईफ सहज जगू शकतो. मुलांना तितकेच चांगले शिक्षण देऊ शकतो. तसेच घर तशीच गाडी घेऊ शकतो. अडीअडचणीसाठी सेविंगही करू शकतो.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकटाच कमाऊन गरम पोळीही खाऊ शकतो.

पण या मित्राची पोस्ट मोठी आहे. तर त्या स्टेटसला साजेशी गाडी मोठी हवी. घर मोठे हवे. घरातले फर्निचरही तुलनेत पॉश हवे. मोबाईलचे मॉडेलही लेटेस्ट हवे. एकूणच सारे काही त्याच्या पहिल्या मित्राच्या तुलनेत वरचढ आणि आपल्या वरच्या स्टेटसला साजेसे हवे. किंबहुना त्याच्यासारख्याच वरच्या पोस्टवर असलेल्या कलीग्जना मॅच करणारे हवे.

मग आता त्यासाठी लागणारे एक्स्ट्रा पैसे कुठून येणार. तर यांच्याकडेही दोन माणसे कमावणारी हवीत. तरच हे शक्य आहे.

हे एक उदाहरण दिले. यात कुठलेही आकडे याच प्रमाणात टाका. नवरा कमावणारा दाखवा किंवा बायको कमावणारी दाखवा. पण अल्टीमेटली हेच कॅलक्युलेशन आणि हेच चित्र दिसणार.

जर ईथे पहिल्या मित्राने मुलांना गरम पोळी न देता उच्चशिक्षण देणे महत्वाचे समजले असे म्हणाल. तर दुसऱ्याला दोन्ही देणे शक्य असूनही त्याने मुलांना गरम पोळीपासून वंचित ठेवले म्हणावे का?

बरे हे ईथेच संपत नाही. त्यांचा तीन साडेतीन लाख रुपये पगार घेणाऱ्या तिसऱ्या मित्राच्या घरातही हेच चित्र दिसेल. घर आणि गाडी आणखी मोठी झालेली दिसेल. मोबाईलचे मॉडेल दर वर्षाला बदलताना दिसतील. मुलं तेच शिक्षण श्रीमंतांची मुले शिकतात त्या शाळेत लाखभर जास्त पैसे घेऊन शिकताना दिसतील. जर त्यानेही याच लाईनवर विचार केला तर गरम पोळी तिथेही दिसणार नाही.

कारण मुळातच तसा विचार करणे गरजेचे आहे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची परिस्थिती वेगळी असते. पण ज्यांच्याकडे खाऊन पिऊन सुबत्ता आहे त्यांच्याबाबत हा आर्थिक मुद्दा मला तरी बाद वाटतो.

एक सत्यघटना आठवली. दूरच्या एका ओळखीच्या व्यक्तीची वा लांबच्या मित्राची. अत्यंत हुशार आणि आपल्या कर्तुत्वाच्या जीवावर मजबूत पगार. बायको देखील कमावती. त्यापेक्षा कमी असावा पण तरीही उत्तम पगार. दुर्दैवाने अपघातात गेला. पॉलिसी नव्हती. कदाचित दोघे उत्तम कमावणारे असल्याने हा निष्काळजीपणा झाला असावा. असो जे काही असेल. पण दोन लहान मुले होती. मोठाले घर घेतलेले. त्याच्या लोनचे काही हफ्ते बाकी होते. ते बायकोच्या पगारातून जाणे आता परवडणार नव्हते. आधीच्या स्टेटसला अनुसरून असलेली एकूणच लाईफस्टाईल फार कॉम्प्रोमाईज करणे शक्य नव्हते. म्हणजे सिच्युएशन अशी होती की लोनचा काही हिस्सा बाकी होता ते वगळता खूप महागडे घर नावावर होते. बायकोही उत्तम पगार घेणारी होती. पण तरीही एक प्रकारच्या आर्थिक संकटात होते.
मग शाळा कॉलेजचे मित्र मदतीला धावून आले. आपापल्या खिश्यातून पैसे काढून शिल्लक होमलोन फेडले. त्यांना आर्थिक संकटातून वाचवले. त्यात खारीचा वाटा माझाही होता कारण मी तसा लांबचा मित्र होतो.

पण नंतर कधीतरी विषय निघाला, त्याच्या पश्चात आता त्याच्या फॅमिलीचे सारे कसे सुरळीत चालू आहे. तेव्हा विचार करताना मला जाणवले की त्याला तेव्हा मदत करणाऱ्यांमध्ये काही मित्र असेही होते ज्यांचा पगार त्याच्या दहा-वीस टक्केही नव्हता. काही असेही होते जे एकटेच कमावणारे होते. आणि तो पगारही त्या मित्राच्या बायकोच्या पगारापेक्षा बराच कमी होता. अश्या मित्रांनी त्या अपघातात गेलेल्या मित्राच्या बायकोला मदत केली जेणेकरून त्याच्या मुलांची लाईफस्टाईल अचानक बदलू नये. प्रत्यक्षात ती बदलून खाली आलेली लाईफस्टाईलही मदत केलेल्या बरेच मित्रांच्या वरचढच राहिली असती.

जेव्हा हे घडले तेव्हा एक जवळची व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला त्याचे मित्र मदत करत आहेत हे गेस्चर भावले. पण नंतर निव्वळ त्या आर्थिक मदतीचा विचार करता जाणवले की काही मध्यमवर्गीय फॅमिलीजकडून एका श्रीमंत फॅमिलीला ती सुद्धा मध्यमवर्गीय होऊ नये म्हणून ती मदत केली गेली. ईज ईट फेअर? तेच पैसे या मित्रांनी त्यांच्या ग्रूपमधील सर्वात गरीब मित्राच्या फॅमिलीला देत त्याचे हालाखीचे राहणीमान ऊंचावणे फेअर नसते का ठरले?

त्या बायकोने मदत केलेले पैसे परत नाही दिले? अजबच आहे!
मला गरम पोळी तव्यावरुन ताटात 'इन लिटरल सेन्स' आवडते. बायको करुन देणार असेल तेव्हा मी कुणाचा विचार न करता गरम खायला बसतो. जेव्हा मी करणार असेन तेव्हा मला कोणी गार खाल्लेली आवडत नाही. त्यामुळे बळजबरीने त्यांना गरम खायला घालतो. सगळ्यांचं जेवण झालं की मी मला एक पोळी करतो ती खातो, मग दुसरी करतो ती खातो. असं करत बसतो.

हे लाड अर्थात रोज शक्य नसतात. दोघेही काम करतो म्हणून न्हवे तर इतकी हौस नाही म्हणून, पोळी ही रोज करत नाही आणि खातही नाही. वनडिश मील प्रकार मोस्टली होतात. अनेकदा एकदम आठवड्याच्या पोळ्या करुन आयत्यावेळी गरम करुन खातो. मोस्टली सगळे एकदम जेवायला बसतो. पण ज्या दिवशी गरम पोळी/ पराठा/ भाकरी (ही मला बर्‍यापैकी जमते) असेल तेव्हा मात्र तव्यावरुन ताटातच. एकत्र नाही बसलं तर माणुसकीचा खून करतोय हे मला अजिबात वाटत नाही, बायकोला पूर्वी वाटत असे. पण मी निम्म्यावेळा पोळी करायची तर ती तू गरमच खाल्ली पाहिजे ह्या अटीत ते एकत्रचं फॅड विरुन गेलं.
घरी आजोबा कामावरुन उशिरा यायचे तेव्हा कधी आजी त्यांच्यासाठी जेवायची थांबली नाही. बाबाही उशीरा यायचे त्यांच्यासाठी आई/ आजी कुणी थांबल्या नाहीत. अर्थात वेळेला हजर असेल त्याला/ तिलाच गरम पोळी. पोळ्या करुन झाल्या की झाल्या. गरम मिळण्यासाठी पानावर बसल्यावर करुन देणे हे फाजिल लाड ही कोणी केले नाहीत. सो तेच संस्कार झालेत. जेवणाची वेळ पाळायची. कुणाला उशिर होणार असेल तर एकत्र जेवायला थांबायचं ही सो कॉल्ड माणुसकी अजिबात वाटत नाही. तसंच गरम मिळत असताना ते न खाणे आणि नंतर गारढोण करुन सगळ्यांनी एकत्र गार खाणे यात कसली आल्येय डोंबलाची समानता! तुम्ही गरम खा, करणार्‍याला नंतर तुम्ही गरम गरम वाढा ही समानता. हे असं गरम पोळी टाईप जेवण आठवड्यात एखाददाच असतं अर्थात. आणि ज्याचं जेवण असं आधी गरम खाऊन होईल त्याला/ तिला डिशवॉशर लोड करायला लागतो आणि मागचं आवरावं लागतं. काही कोणाचे लाड होत नाहीत. Proud

Pages