रात्री च्या जेवणासाठी भात आमटी ला सोपे पर्याय सुचवू शकाल का ?

Submitted by शोधक on 14 November, 2021 - 23:12

रात्री च्या जेवण साठी बऱ्याचदा भात आमटी केली जाते ती वेळेची बचत म्हणून आणि दुसरे फार पर्याय माहित नसल्याने.
कोणी थोडे वेगळे आणि सोपे पर्याय सुचवू शकेल का ? (करायला सोपे आणि फार वेळ खाऊ नसलेले)
(उपमा , वरणफळं , खिचडी हे तसे माहित असेलेले पर्याय आहेत पण नवीन पर्यायांच्या शोधात आहे)
शक्य झाल्यास रेसिपी असेल तर उपयुक्त राहील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दोसा चटणी
पराठा
करी आधी बनवून ठेवलेली असल्यास दोन दोन पोळ्या केल्या की काम भागते.
चिकन किंवा फिश मॅरिनेट केलेले असल्यास ते आयत्यावेळी ग्रिल करून घेणे
बरोबर सलाड

दलिया खिचडी
मी रविवारी बिर्याणी करते संध्याका ळी ती सोम वारी रात्री परेन्त पुरते

जास्तीचा भात लावुन ठेवावा डाळी बरोबर.
त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणि देवुन खाता येतो...
नॉन वेज चालत असाल्यास एग् फ्राईड राईस देखिल करता येईल

रेडिमिक्स वा दुकानात वाटलेले पीठ मीळते ते वापरुन डोसा आणि त्या बरोबर Tomato, ईमली, शेजवान Sauce
All time favorite - पोहे (किती तरी प्रकार)
साबुदाणा खिचडी
सोया नगेट्स पुलाव
काबुली चणे पुलाव
मसूर डाळ पुलाव
Chicken mayo / Chicken tomato + chili sauce सँडविच
Boiled egg mayo / Boiled egg tomato + chili sauce सँडविच
Boiled potato mayo / Boiled potato tomato + chili sauce सँडविच
Boiled Chickpeas + Mayo सलाड
Boiled egg mayo सलाड

धुंडो तो हजार और सोचो तो लांखों मिलेंगे ... Happy

थालीपिठ
शेवयांचा उपमा
दडपे पोहे

सारण करुन ठेवून मुळ्याचे, पालकचे किंवा पनीरचे पराठे, मेथीचे ठेपले, दलियाचे डोसे, ऑम्लेट-ब्रेड, भाज्या स्टर फ्राय करुन पास्ता, शेवयांचा उपमा, कुळथाचं/बेसनाचं पिठलं-भात, रवा उतप्पा, ग्रिल्ड वेजिटेबल्स (ज्ये. ना. ना हे जेवण म्हणून चालत नाही)

भाकरी+चिकन रस्सा+ चिकन सुक्कं+भात्+कांदा
भाकरी+मटण रस्सा+मटण सुक्कं+भात्+कांदा
भाकरी+कोणतीही उसळ्+भात्+वरण
भाकरी+सुकी पालेभाजी+भात्+वरण
भाकरी+पिठलं+भात
भाकरी+बटाटा/वांगं/दोडका/फ्लॉवर/पावटा रस्सा+भात
भाकरी् + हिरव्या मिरचीचा ठेचा+दही+भात+वरण
भाकरी+कोणतंही कढण्+भात
भाकरी+पालक्/चाकवत्/चंदनबटवा गरगटं+भात
भाकरी+कढी+मसालेभात
भाकरी+काळ्या हुलग्याची डाळ/तूर डाळ/ऊडिद डाळ/ चवळी चा झणझणीत रस्सा + भात
भाकरी+मटकीचा झणझणीत रस्सा+भात

या पैकी रोज एक केलं तरी १५ दिवसात पुन्हा रिपीट होणार नाही.

भाकरी, मटन - चिकन रस्सा, मटण. - चिकन सुक्क शिवाय भात; हा रात्रीसाठी सोप्पा मेन्यू आहे का? जड नाही होणार? शिवाय आमटी भाताला पर्याय म्हणून पुन्हा भात वरण?तेही अधिकचं?

ओह... पण नुसता आमटी+भात नको म्हणुन मी वरील मेन्यु सांगितले. दणदणीत खायचं अन खणखणीत काम करायचं..!
भात नको असल्यास वगळला तरी चालेल...

एका बर्नरवर कढई चढवून भाजी/गरगटं/डाळ फोडणीला टाकून शिजायला ठेवली अन दुसर्‍या बर्नर वर तवा चढवून दणादणा ५-६ भाकरी केल्या की १५-२० मिनिटांत ४ माणसांचा स्वयपाक तयार.. हवं तर तापल्या तव्यावर पटापटा ४ ऑम्लेटं बनवून घेता येतील....!! है काय अन नै काय Proud

चिवडा बनवून ठेवा. आठवड्यातून एक दोनदा हवा तेवढा चिवडा घेऊन अर्ध्या चिवड्यावर चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओलं खोबरं घालून खा आणि अर्ध्या चिवड्यावर वाटीभर दही घालून खा. वरून किमान मूठ भर सुका मेवा खा.

मेथीची पाणीपोळी- हिरवी मिरची अन भरपुर लसुण , जिरे घालुन पाण्याला फोडणी द्यायची म्हण्जे फोडणी करुन त्यात पाणी ओतायचे. खळखळ उकळु द्यायचे. चवीपुरते मीठ घालाय्चे. त्यात मुठभर मेथीची पाने धुवुन टाकायची. ही फोडणीत आधी या साठी टाकायची नाही की ती तशी टाकली की सुरकुतात. एका जागी येतात. उकळत्या पाण्यात टाकल्यास, पानांचा आकार पसरटच राहातो. पाने टाकली की पुन्हा उकळू द्यायची.
एकिकडे तवा ठेवायचा. पोळ्या लाटायच्या. पोळी तव्यावर दोन्हीकडे शेकली की किंवा एकीकडुन पुर्ण शेकुन त्या पाण्यात अख्खी सोडाय्ची. ती लगेच नरम पडते. तिची त्यातच त्रिकोणी घडी घालाय्ची आणि पाण्यासकट प्लेटमधे घेउन ओरपायची. थंडीच्या दिवसात आम्ही नाश्त्याला असे काही गरमागरम कराय्चो.

पाणघोडा कबाब आणि गेंड्याची चटणी करून बघा.
महिनाभर पुरेल.
अधिक माहिती इथे: https://www.maayboli.com/node/80535

वि. सु.: भारतात असाल तर नका करू. अटक होईल.

गट्टे का साग ( शेवेची भाजी) चवळीची पालेभाजी घालून अधिक पाव/पोळी. आणि कांद्याची कोशिंबीर.

मसाला डोशाची भाजी अधिक पोळी. अधिक केळीरायता

पालकाची पातळ भाजी अळूसारखी. म्हणजे अळूऐवजी पालक घालायचा. आणि गरम भात. आणि पापड.

वांगी/ तोंडली घालून मसाले भात. आणि कढी.

पथ्य नसावं असं गृहीत धरून, वाटण घाटण नसलेले व करायला सोपे पदार्थ सुचवत आहे.

नाचणीची किंवा ज्वारीची ताकातली उकड.
तां. पिठाचं धिरडं
राईस शेवयांचा उपमा
मऊ सांजा
दहीपोहे
शिरा + लिंबाचं लोणचं
कढी भात
सार भात
दहीबुत्ती
लेमन राईस
बिसिबाळीहुळी अन्ना

१.एग ड्रॉप करी- चपाती
२.मसूर किंवा मूग डाळ कांदा-चपाती
३.मूळ्याचे/दुधीचे/बीटाचे/मेथीचे पराठे- किसून डायरेक्ट
गव्हाच्या पीठात मीठ,मिरची मळून केलेले.

अय्या खरंचकी!
मानव Lol
रश्मीताई,सॉरीची गरज नाय ओ. Happy

हेहेहेहेहे मृ तरी बरं मी वाड्यात मेथी चिरु कशी? धुवू कशी? सगळं सांगितलं होतं. बरोबर पकडलं मानवनी

रात्रीच्या जेवणाला हलकेफुलके असा विचार सहसा कधी केलाच नाही. बरेचदा दुपारचेच जास्त उरले तर तेच संपवावे लागते. रात्र जर विकेंडची असेल तर हॉटेलातून मागवले जाते. तरी कधीतरी मी चहा पराठे खाण्यातही धन्यता मानतो, कारण मुळात रात्री चहा पिण्याची आवड. तर ते ट्राय करू शकता. स्पेशली मेथी पराठे तिखट लोणचे आणि चहासोबत मस्त लागतात.

>> मेथी कशी किसायची?

सकाळी मेथी आणून पाण्यात बुडवून काढून ओलसर असतानाच डीपफिजर मध्ये ठेवून द्यायची. संध्याकाळपर्यंत पाणी गोठल्यामुळे ती कडक होईल मग किसता येईल.

झालं
आमच्या सारखे धांदरट यात 100 गोंधळ घालणार. कुठे मेथीच आईस कंपार्टमेंट ला चिकटली,कुठे बर्फ किसताना हात किसणीवर किसला, कुठे डीफ्रॉस्ट करताना नळाखाली वाहूनच गेली,कुठे बर्फ किसताना वितळून जमिनीवर पाणीच सांडलं.

Pages