Submitted by शांत माणूस on 15 November, 2021 - 03:17
मी जिथे जाणार आहे तिथे पाणघोडा आणि गेंडा हे प्राणी भाज्यांपेक्षा मुबलक आहेत. रोज सकाळी, दुपारी, रात्री असे आठवडाभर तर एक प्राणी पुरेल. त्यामुळे रविवारी चेंज म्हणून काही पर्याय सुचवा ही विनंती.
धाग्याचा फायदा सर्वांना.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपास करा रविवारी.
उपास करा रविवारी.
नसेल होत तर उपवासाचे पदार्थ धागे आहेतच.
ती कसली तरी खीर आली आहे बघा
ती कसली तरी खीर आली आहे बघा.
गेंड्याचे पातळ काप
गेंड्याचे पातळ काप पाणघोड्याच्या चटणीसोबत ट्राय करुन पहा. झलंच तर पाणघोड्याचे कबाब पावात घालुन खाउन पहा
प्लिज, पा. कबाब आणि गें.
प्लिज, पा. कबाब आणि गें. चटणीची रेसीपी लिहा ना. या विकेंडला मी पण करून पाहीन. आवडेल असं वाटतं आहे.
रोज उठुन भाजी आणायला जाण्याऐवजी एक पाणघोडा आणि एक गेंडा आणला की महिनाभर मार्केटमध्ये जायला नको.
कुठे जाणार आहात? भारतीय
कुठे जाणार आहात? भारतीय कायद्यानुसार भारतीय पाणघोडा व गेंडा यांची शिकार करणे, मांस खाणे यावर बंदी आहे.
परदेशातुन येताना एक एक घेऊन या मग खाता येईल.
मग गेंडा कबाब आणि पाणघोडा
मग गेंडा कबाब आणि पाणघोडा चटणी करून पहा.
मटार उसळ, कोशिंबीर, चटणी
मटार उसळ, कोशिंबीर, चटणी लोणचं, वरण-भात
मी लहान होतो तेव्हा एकटाच
मी लहान होतो तेव्हा एकटाच जंगलात फिरायला गेलो होतो. चालता चालता माझ्या पायाला चिखल लागला म्हणून मी चिखल साफ करत होतो तर एक गेंडा अचानक माझ्यावर चाल करून आला. तो माझ्या पोटात शिंग खुपसणार होता इतक्यात मी त्याचा शिंग पकडला आणि ताकदीने त्याला मागे ढकलू लागलो. गेंडा आश्चर्यचकित झाला. शेवटी मी त्याला ढकलून दिलं तसा तो गेंडा पळायला लागला. ती गोष्ट जंगलात वणव्यासारखी पसरली. त्यानंतर माझ्या आसपास गेंडे फिरत नाहीत. मागे एकदा केनियाला मसाई मारा जंगलात बिग फाईव्ह बघायला गेलो होतो तेव्हा पण गेंडा सोडून बाकीचे चार दिसले.
बोकलत
बोकलत
मटार उसळ, कोशिंबीर, चटणी लोणचं, वरण-भात>>
जिथे जाणार आहात तिथेच विचारा
जिथे जाणार आहात तिथेच विचारा आणि इथे लिहा.
वडे आणि पाव किती दिवस टिकतात?
वडे आणि पाव किती दिवस टिकतात?
रविवारसाठी क्रंची क्रोकोडाईल
रविवारसाठी क्रंची क्रोकोडाईल अन सुपी गोगलगाय मस्त कॉबिनेशन ठरेल..!!
चेंज म्हणून गेंड्याचे कबाब
चेंज म्हणून गेंड्याचे कबाब आणि पाणघोड्याची चटणी करून बघा.
नर पाणघोडा व मादी गेंडा
नर पाणघोडा व मादी गेंडा यांच्या संकरातून जन्मणार्या पाणगेंडा या प्राण्यापासून बनविलेले Hipporhino ब्रँडचे विविध डबाबंद पदार्थ तुळशीबागेत हल्ली जवळजवळ प्रत्येक दुकानात मिळतात. ते try करा व त्याबद्दलचा feedback याच धाग्यावर द्या. आपण ज्या white dwarf तार्यावर जाणार आहात त्याचे location शेअर करा म्हणजे तिथे उडती भेट देऊ शकेन. Best luck.
धाग्याचा फायदा सर्वांना.
धाग्याचा फायदा सर्वांना.
>>>
हे टाळता आले असते.
कारण ही माझी स्टाईल आहे,
अश्याने हा धागा ज्या धाग्याचे विडंबन आहे तो आयडी सुद्धा माझाच आहे असा लोकांचा गैरसमज होऊ शकतो.
असो, हे टाळता आले असते तर बरे झाले असते ही विनंती आहे फक्त. धुडकवायचा तुमचा हक्क अबाधित आहे
@ धागा
मी स्वतः मांसाहारप्रेमी असल्याने पाणघोडा, गेंडा वगैरे ईतक्या मोठ्या प्राण्यांना मारून खाणे आणि बरेचसे वेस्ट घालवणे पटत नाही. जर वेस्ट घालवत नसाल तर उत्तमच.
तरी चेंज म्हणून गेंड्याचे कबाब आणि पाणघोड्याची चटणीही एके दिवशी करू शकतात. आपल्याइथल्या पाणघोड्यांचे मांस थोडे गोडूस असल्याने चटणी बनवताना त्यात मिरचीचा ठेचा जरा जास्त टाकावा ईतकेच.
पाणघोडे आणि गेंडे मायबोली
पाणघोडे आणि गेंडे मायबोली वाचत असतील तर तुमचं काही खरं नाही.
१. पाणघोड्याला स्वच्छ पाण्यात
१. पाणघोड्याला स्वच्छ पाण्यात स्वच्छ धुवुन घ्या.
२. मिरपुड, समुद्री मीठ त्याच्यावर टाकण्या आधी त्याला याची अॅलर्जी तर नाही नां हे सपष्टपणे विचारुन घ्या. (उगाच शिंकुन शिंकुन बेजार व्हायचा)
३. हातभर लांब धारदार करवत किंवा सुरी घेवुन त्याचे तुम्हाला हवे तसे पातळ (साडी नव्हे हिंदीत पतले) काप कापुन घ्या.
४. कापताना रक्त आले तर बँडेज सोबत असु द्या.
५. हे काप आता तळुन सॉस किंवा चटणी बरोबर खा.
६. उरलेला फ्रीजात ठेवा.
बाकीची सेरेपी नंतर
पाणघोडे आणि गेंडे मायबोली वाचत असतील तर तुमचं काही खरं नाही.
हे बाकी खरय तुमचं आहेत इथे वाचणारे पाणघोडे आणी जाड कातडीचे गेंडे आहेत.
पाणघोडे आणि गेंडे आहेत म्हणजे
पाणघोडे आणि गेंडे आहेत म्हणजे तिथे अजगर पण असतीलच, मग चेंज ऑफ टेस्ट म्हणून अजगर फ्राय किंवा मस्त भाजलेला अजगर ट्राय करू शकता.
पाणघोड्यावरून आठवलं तो
पाणघोड्यावरून आठवलं तो राणीच्या बागेतील पाणघोडा नेहमी पाण्यातच कसा असतो? कधी पण जा हा आपला पाण्यातच. नक्की पाणघोडाच आहे काय तो की पाणघोड्याच्या आकाराचा दगड ठेवलाय तिथे? एकवेळ एलियन्स दिसतील पण तो पाणघोडा या जन्मी तरी पाहायला मिळेल वाटत नाही.
बोकलत, त्याला तुम्ही आल्याचं
बोकलत, त्याला तुम्ही आल्याचं कळलं नसेल.
बादवे, शांमा इज नॉटॅटॉल शांमा.
रविवारी तुरडाळईचं वरण, भात, बटाट्याच्या काचर्या करा आणि खा.
रविवारी पाणघोडा कबाब आणि
रविवारी पाणघोडा कबाब आणि गेंड्याची चटणी या जेवणाला पर्याय >> शनिवारी पाणघोडा कबाब आणि गेंड्याची चटणी हे जेवण
नुकत्याच हाती आलेल्या
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यातल्या गेंडे आणी पाणघोडे ह्यांची युती झालीय आणी ह्या धाग्याचा त्यांन्नी तीव्र निषेध केलाय !
पाणघोडा, गेंडा किसून घ्या.
पाणघोडा, गेंडा किसून घ्या.
दिवसभर डबे, वडे,पाव विकून
दिवसभर डबे, वडे,पाव विकून झाल्यावर शांतपणे विचार करा...उत्तर तुमचे तुम्हाला मिळेल...
पाणघोड्यावरून आठवलं तो
पाणघोड्यावरून आठवलं तो राणीच्या बागेतील पाणघोडा नेहमी पाण्यातच कसा असतो? कधी पण जा हा आपला पाण्यातच. नक्की पाणघोडाच आहे काय तो की पाणघोड्याच्या आकाराचा दगड ठेवलाय तिथे? एकवेळ एलियन्स दिसतील पण तो पाणघोडा या जन्मी तरी पाहायला मिळेल वाटत नाही.
>>>>
माझ्याकडे विडिओ आहे त्याचा. पाण्यातून ऊठून अक्राळविक्राळ तोंड उघडून आळस देत हलतडुलत त्याच्या शेडमध्ये जातानाचा. जर हे द्रुश्य ईतके दुर्मिळ असेल तर लॅपटॉपमध्ये शोधतो आणि युट्यूबवर टाकतो आणि याची लिंक ईथे देतो.
मी मुंबईला असताना विकेंडला मुलीसोबत तिथे पडीकच असायचो तेव्हा काढलेला. आमचे मुंबईचे घर राणीबागेच्या चालत जाता येईल ईतके जवळ आहे. एकेकाळी जेव्हा मुंबईत ट्राफिक कमी होते आणि राणीबागेतही वाघसिंह होते तेव्हा त्यांच्या डरकाळ्या ऐकत झोपायचो. आता तिथे जायचे पंच्याहत्तर रुपये घेतात. आम्ही कंपांऊंडवरून उड्या मारून फुकट जायचो. राणीबागेतल्या आठवणींवर एक वेगळा धागा निघेल.
मीही नुकताच त्या भायखळ्याच्या
मीही नुकताच भायखळ्याच्या त्या उद्यानात जाऊन आलो. उद्यानाचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्द्यान आणि प्राणी संग्रहालय असे सुस्पष्ट अक्षरांत लिहिले होते तर बेस्ट बसच्या फलकावर जिजामाता उद्यान असं स्क्रॉलिंग येत होतं. इथे चर्चेत राणीची बाग असा उल्लेख आहे. नक्की काय प्रकरण आहे हे...? एकाच बागेला ३-३ नावं... त्या नवकै. पुरंद्र्यांनी छत्रपतींची जन्मतिथी वेगवेगळी देण्यामागे जी मानसिकता दाखवली होती तशी याही प्रकरणात वाटतेय.
या उद्यानावर येऊ घातलेल्या धाग्यात उद्यानाचे अधिकृत नाव, ठिकाण, तिथं जाण्यासाठीचे जवळचे स्टेशन, बस स्टॉप यांचा उल्लेख केल्यास तिथं भेट देणार्यांना उपयुक्त होइल.
पुरंद्र्यांनी....... पुरंदरे
नवकै पुरंद्र्यांनी....... पुरंदरे यांनी असे म्हणायचे होते का?
हो ते नवकै हा शब्द टाळायला हवा होता.
आमच्यासाठी राणीबागच
आमच्यासाठी राणीबागच
तसेच सीएसटी आधीची व्हिटी यालाही आम्ही आजही सवयीने बोरीबंदरच बोलतो..
पुरंदरे यांनी असे म्हणायचे
पुरंदरे यांनी असे म्हणायचे होते का?>> हो हो.. पुरंदरे पुरंदरेच. ते नुकतेच स्वर्गवासी झाले म्हणुन अचानक कै. लावावसं वाटत नाही म्हणुन नव कै. लिहिलं..
आमच्यासाठी राणीबागच Happy
आमच्यासाठी राणीबागच Happy
तसेच सीएसटी आधीची व्हिटी यालाही आम्ही आजही सवयीने बोरीबंदरच बोलतो..>> छान. अधिकृत शब्दांऐवजी जुनीच नावे बोलीभाषेत वापरून मुंबईबाहेरच्या माणसाला कोड्यात टाकण्याचं काम वाखाणण्यासारखं आहे..!
Pages