रात्री च्या जेवणासाठी भात आमटी ला सोपे पर्याय सुचवू शकाल का ?

Submitted by शोधक on 14 November, 2021 - 23:12

रात्री च्या जेवण साठी बऱ्याचदा भात आमटी केली जाते ती वेळेची बचत म्हणून आणि दुसरे फार पर्याय माहित नसल्याने.
कोणी थोडे वेगळे आणि सोपे पर्याय सुचवू शकेल का ? (करायला सोपे आणि फार वेळ खाऊ नसलेले)
(उपमा , वरणफळं , खिचडी हे तसे माहित असेलेले पर्याय आहेत पण नवीन पर्यायांच्या शोधात आहे)
शक्य झाल्यास रेसिपी असेल तर उपयुक्त राहील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मेथीची पाणीपोळी छान वाटतेय... मेथी आणली की करून बघेन. Happy
इतरही पर्याय मस्त आहेत.
हा मसाला साधारण अर्धा ते एक कप होईल इतका करून ठेवा. आवडत असेल किंवा वेळ असेल तर दरवेळी फ्रेशही करू शकता.
हा tangy मसाला वापरून चटपटीत पास्ता/ नूडल सूप अगदी पंधरा मिनिटांत तयार होते. यांत ऑरगॅनिक, whole wheat, semolina, multigrain जो अव्हेलेबल असेल तो किंवा आपला आवडता Bucatini, spaghetti, Linguine वा egg noodles असा कुठलाही पास्ता प्रकार वापरू शकता आणि फ्रेश/फ्रोझन/कॅन्ड भाज्या (बेल पेपर्स, गाजर, बीन्स, हि. मटार, पातीचा कांदा, स्वीट कॉर्न ) परतून घालू शकता.
बिझी वीकडेज / विंटर इव्हीनिंग्जला हेल्दी, क्विक डिनरसाठी हा अगदी मस्त पर्याय आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातात. Happy

>>>>आमच्या सारखे धांदरट यात 100 गोंधळ घालणार.
अगं ते सगळं अगदी सगळं प्लस अजुन १० धांदरटपणे सर्वांचेच होतात Happy माझं तर पसार्‍याने डोके फिरते. एक गोष्ट सरळ मार्गी लागत नाही स्वयंपाक करताना. आणि वर स्वयंपाक बंडल होतो तो होतोच. Sad

कॉय हे. वरणाला फोडणी तरी कश्याला द्या? मी तर काल यु ट्यूब वर बघून मस्त पैकी वरण भात केला आणि काल आज खाल्ला. काल रात्री व आज सकाळी घरुन मौ वरण भात तू प खाल्ले. थोडा दहिभात व वेफर्स डब्यात खाल्ले. अजून थोडा डाळ भात शिल्लक आहे. तर आज मूड आला तर फोडणी करीन.

अमा, कशाला कालचा भात आज रात्री फोडणी देऊन का खाता..? त्यापेक्षा फोडणी देऊन ताजा डाळभात करा.

माझं तर पसार्‍याने डोके फिरते. एक गोष्ट सरळ मार्गी लागत नाही स्वयंपाक करताना. आणि वर स्वयंपाक बंडल होतो तो होतोच. >>++१११ !

Pages