चला पृथ्वीवरचे प्रदूषण कमी करूया !

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2021 - 06:02

क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल काहीच माहीत नाही असा मनुष्य विरळाच. येत्या काळात मनुष्यजातच नष्ट होण्यापासून वाचवायची असेल वा किमान तो मृत्यु लांबवायचा असेल तर आपण सर्वांनी आपापल्या परीने यात योगदान देणे गरजेचे.

पण बरेच लोकांना ही एक अशी वैश्विक समस्या वाटते की जी देशांच्या सरकारने धोरणे आणि कायदे करूनच सोडवता येईल. आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यात जे वर्तन करतो त्यातले काय आणि किती प्रदूषणास हातभार लावते आणि ते कसे आणि कुठवर कमी करता येईल हे आपल्यापैकी बरेच जणांना ठाऊक नसते. जसे की फटाके आणि वाहनांपासून प्रदूषण होते हे सर्वांना चटकन कळते. पण मांसाहार देखील कार्बन फूटप्रिंट वाढवतो हे सगळ्यांनाच ठाऊक नसते. मलाही हल्लीहल्लीच कळले. त्यातही मांसाहारच्या तुलनेत मत्स्याहार प्रदूषण वाढीस कमी हातभार लावतो हे कळले. त्यामुळे आता मला मांसाहाराचा पुर्ण त्याग शक्य नसेल तर मी किमान मत्साहाराचा वाटा वाढवू शकतो. एसी हवाच ही माझी बिलकुल गरज नाही तर मी त्याचा वापर माझ्यापुरता तरी पुर्ण बंद करू शकतो. आणि फॅमिलीला समजावू शकतो. गाडीबाबतही हेच लागू. जर आजवर मी गाडीशिवाय पब्लिक ट्रान्सपोर्ट, सायकल आणि देवाने दिलेले हातपाय वापरून जगलो आहे तर पुढेही निव्वळ ऐपत आहे म्हणून स्टेटस दाखवायला गाडी घ्यायचे टाळू शकतो. मुले आज लहान आहेत. त्यांना फटाक्यांची आवड आहे. ते लगेच जोरजबरदस्तीने बंद करणे पटत नाही तर हळूहळू वर्ष दर वर्ष प्रमाण कमी करत ते लवकरच बंद करू शकतो. त्यांना त्याजागी दुसरे पर्याय देऊ शकतो. सोसायटीतील मोठ्यांना विनंती करू शकतो की तुम्हीही फटाके वाजवू नका जेणेकरून लहानांना तो मोह होणार नाही...

अश्याच विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण करायला हा धागा. आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो याची चर्चा करायला हा धागा. आपण याबाबत काय केले आहे हे अनुभव शेअर करायला हा धागा.

सर्वांनाच सारेच जमणार नाही. प्रत्येकाची जीवनशैली आणि आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे अमुकतमुक आम्हाला जमते तर तुम्हाला का नाही असे बोटं ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने सामाजिक भान राखले तरी एकूणात पडणारा फरक मोठा राहील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
माझ्या पूर्वीच्या या धाग्यावर https://www.maayboli.com/node/61740?page=1 लिहिलेले पुन्हा इथे डकवतो.

१. आठवड्यातून एकदा स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही.त्यादिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.

हा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय. प्रदूषणग्रस्त शहरामध्ये राहून प्रदूषणत्रस्त झालेला मी ! गेल्या २५ वर्षात सर्वत्र वाहनजन्य प्रदूषण खूप वाढले.त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागला. असे दिसते की या विषयावर लेखन, चर्चा, परिसंवाद आणि परिषदा अगदी भरपूर होतात पण, सर्वात गरजेची असलेली कृती मात्र अत्यल्प असते. बहुतेक सगळा मामला ‘लोका सांगे...’ असा असतो. अधूनमधून कृतीच्या छोट्या लाटा येतात अन लगेच त्या विरूनही जातात. कधी आपण ‘बस डे’ अनुभवतो, कधी सायकलची प्रभातफेरी पाहतो तर कधी पाच वर्षातून एखाद्याच दिवशी आपले काही मोजके खासदार संसदेत सायकलवरून जाताना फोटोत पाहतो !

पण, माझ्या पाहण्यात काही अपवादात्मक असे लोक आले. त्यापैकी काहीना स्वयंचलित वाहन परवडत असतानाही ते आजन्म सायकलनिष्ठ आहेत. मग मलाही काहीसे अपराधी वाटू लागले. पूर्णपणे स्ववाहनरहित आयुष्य जगणे कठिण होते पण, निर्धार केल्यास काही प्रमाणात स्ववाहन-संयम शक्य होता. मग पहिले पाउल टाकले ते म्हणजे आठवड्यातून एक दिवस फक्त चालत अथवा सायकलचा वापर. सुरवातीस हा शनिवार ठेवला होता जेणेकरून दुखऱ्या पायांना रविवारी विश्रांती मिळावी.

पुढच्या टप्प्यात सुटीच्या दिवशी काही कामे ठरवून दुपारच्या वेळांत बसने जाऊन करणे. तेव्हा आपण बसमध्ये शिरू शकतो! अखेर, विचारपूर्वक माझे वाहन-धोरण असे ठरले: १किमी पर्यंतची कामे चालत, ३ किमी पर्यंतची सायकलने, त्यापुढच्या अंतराची बसने आणि फक्त तातडीची कामे स्वतःच्या वाहनाने करणे. गेल्या २ वर्षात मात्र सायकल सोडावी लागली कारण आसपासच्या २ किमी परिसरातील हवा भरण्याची व तिच्या दुरुस्तीची दुकाने बंद पडली आहेत. तरी सांगायला आनंद वाटतो की आज मी वर्षातले निम्मे दिवस स्वतःचे वाहन रस्त्यावर आणत नाही.

हा निग्रह ( वाहन उपवास) अमलात आणताना बऱ्याचदा असा विचार मनात येतो की मी एकट्याने किंवा अत्यल्प लोकांनी असे करून या वैश्विक प्रश्नाबाबत असा काय फरक पडतो? मग हा निराशाजनक विचार झटकून टाकायला एडमंड बर्क यांचे पुढील वाक्य खूप कामी येते :
‘आपण एकट्याने करून फार काय होणार आहे असे म्हणून जो काहीच करत नाही तो ती सर्वात मोठी चूक करतो’.

२. आठवड्यातून एकदा गार पाण्याने अंघोळ >>>>
हा निग्रह करण्यामागे दोन हेतू. एक म्हणजे वेळप्रसंगी गरम पाण्याची सोय नसल्यास आपले अडले नाही पाहिजे. दुसरे असे की शहरी जीवनात आपण पाणी तापवण्यासाठी इंधन वा विजेचा भरपूर वापर करतो. या दोन्ही संसाधनांच्या बाबतीत आपल्या देशाची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. तेव्हा याची मनाला बोच म्हणून त्यांची थोडी तरी बचत करण्याची सवय लाउन घ्यावी.(अर्थात हे सर्व स्वतःपुरते ठेवायचे.)

या धाग्यावर पण अनाजी पणतू, जावळीचे मोरे, औरंग्या येतीलच. चिंताच नको.
अजितदादा म्हणाले होते "पुणेकर दोनदा अंघोळ करतो "

ग्लोबल वोर्मिंग होणे अत्यावश्यक आहे.

शॉवर , पाऊस , नदी , झरा, ढगफुटी, स्विमिंग पूल , धबधबा हमारे नेरळ मे सबकुछ है

सीर्फ समंदर नही है

छान धागा आहे.
जिथे-तिथे प्लास्टीकच्या पिशव्या वापरल्या जातात. त्याचा वापर कमी केलाय आणि पूर्ण बंद करायचा प्रयत्न करते. भाज्यांसाठी टिकाऊ (रियुजेबल) पिशव्या वापरते. बाजारात जाताना कापडी पिशव्या. घरातून निघताना विसरले किंवा अनियोजीत खरेदी केली तर जवळ असाव्यात म्हणून गाडीतही जास्तीत्या पिशव्या ठेवल्या आहेत.

होम-हवन केल्याने भयंकर वायु प्रदूषण होते..
मंदीरांच्या आजुबाजुला तर नारळाच्या सडलेल्या पाण्यामुळे इतका घाण वास येत असतो की नाक मुठीत ठेवावे लागते.
धूप-अगरबत्त्या यांमुळे भयंकर वायूप्रदुषण होते.
तीर्थक्षेत्रांवर तर नदीच्या पाण्यात फुले, निर्माल्य एवढेच काय मुक्ती मिळण्यासाठी मृतदेह सोडल्यामुळे खूप पाणी प्रदूषण होते.
गणपती अन दूर्गा उत्सवात माती खोदून त्याच्या मुर्त्या बनवून त्यावर रासायनिक रंग लावले जातात जे विसर्जनानंतर पाण्यात अन मातीत मिसळून भयानक पाणी अन जमीन प्रदूषण होते.
दिवाळी मधे भरपूर प्रमाणात फटाके उडवल्याने आवाज अन वायू प्रदुषण होते.
मंदिरातील कर्णे लाऊन आरत्या केल्याने जे भयानक आवाज प्रदुषण होते त्याने आजुबाजुच्या लोकांना खूप त्रास होतो
------------------------------

आता शहाण्या माणसांना हे बुद्धीला पटेल की या सर्व गोष्टींमुळे प्रदुषण होते.. परंतू त्यातले ते अती शहाणे "तुम्हाला याच गोष्टींचा बरा त्रास होतो... त्या गोष्टींचा कसा होत नाही" वगैरे लिहितील. परंतू या प्रदूषणाला आळाअ घालण्याअचे उपाय सांगणार नाहीत.

मी स्वतः सगळं बंद केलं आहे. मी फक्त कधीतरी कूळस्वामीला जाऊन येतो. इतर देवस्थळांना भेटी देणं पूर्ण टाळतो (उगाअच १०० देव करून काय फायदा..?)

देवस्थळी नारळ फोडत नाही. घरी आणुन फोडतो.

गणपती घरीच तयार करून दीडच दिवसाचा बसवतो जेणेकरून निर्माल्याचा खच पडणार नाही अन पैसा अन वेळेचेही प्रदूषण होणार नाही. शिवाय माती अन निर्माल्य कुंडीत टाकून तिथे एक फूलझाड लावतो.

दिवाळीत कमीत कमी फुलबाजे, भुईनुळे, भुईचक्र अन इतर काही बिन आवाजाचे फटाके आणतो.. तेवढेच मुलांसोबत वाजवतो.

१०० देव करून काय फायदा..? >> मायबोलीवर कमी याल Light 1 जोक्स अपार्ट, डीजे...... , आपला गणपतीचा उपक्रम छानच आहे. चितळे का कुठली अ‍ॅड पाहिली होती अशी पण खरचं कुणी असे करत असेल असे वाटले नाही. अभिनंदन.

धर्मस्थाने व अन्य जैविक कचरा करणार्‍या संस्था सर्वांनी असे स्तुत्य उपक्रम करणे जरूरी आहे. तसेच व्यक्तीगत पातळीवर कमी निर्माल्य/रसायने इ होईल असे वागणे चांगले.

प्रदूषण कमी करायच्या बाता सगळेच मारतात. पण त्यासाठी ज्या युक्त्या कराव्या लागतात त्या फक्त नरेंद्रजी मोदी, अमितजी शाह आणि नितीनजी गडकरीजी हेच अनुक्रमे विकासपुरूष, लोहपुरूष आणि रोडपुरूष करू जाणे !
प्रदूषण असं कधीच कमी झालं नसतं. पण मोदींजींच्या दूरदृष्टीने पेट्रोल १२० रूपये आणि डिझेल १०० रू केल्याने लोकांना पर्याय हवाहवासा वाटू लागला. इतक्यात नितीनजींनी लोकांना इलेक्ट्रीक गाड्यांचा मार्ग दाखवला. आता लोक ब्रेक मारत इलेक्ट्रीक च्या गाड्या घेतील. घ्याव्याच लागतील. या उपायाने प्रदूषण कमी होणार म्हणजे होणार.
दीड वर्षे टाळेबंदीमुळे औद्योगिक प्रदूषण सुद्धा कमी झाले.
आदरणिय कंगना ताई जे म्हणाल्या ते हेच. पण अल्पबुद्धी लोकांना ते समजणार नाही.
जय प्रदूषणनिर्मूलन !

मंदीरांच्या आजुबाजुला तर नारळाच्या सडलेल्या पाण्यामुळे इतका घाण वास येत असतो की नाक मुठीत ठेवावे लागते. >> मुळात नारळ वाढवल्यावर त्याचे पाणी मातीत पडू देण्याऐवजी ते एखाद्या भांड्यात जमा करून मंदिरातील भाविकांना तीर्थ म्हणून वाटल्यास हा प्रश्न सुटेल.

तीर्थक्षेत्रांवर तर नदीच्या पाण्यात फुले, निर्माल्य एवढेच काय मुक्ती मिळण्यासाठी मृतदेह सोडल्यामुळे खूप पाणी प्रदूषण होते. >> नदीच्या पाण्यात निर्माल्य न सोडता केवळ शास्त्र म्हणून एखाद्या जाळीच्या पिशवीत निर्माल्य भरून ती पिशवी नदीच्या वाहत्या पाण्यात १-२ वेळा बुडवावी आणि मग बाहेर काढून निर्माल्याचे कंपोस्ट खत करावे आणि ते खत पुन्हा फुलझाडांसाठी वापरावे. मृतदेह नदीच्या पाण्यात न सोडता गंगाजल मृतदेहावर शिंपडून स्मशानभूमीत उपलब्ध असलेल्या व्यवस्थेनुसार (लाकूड / गॅॅस / डिझेल / विद्युतदाहिनी) मृतदेहावर दहनसंस्कार करावेत.

गणपती अन दूर्गा उत्सवात माती खोदून त्याच्या मुर्त्या बनवून त्यावर रासायनिक रंग लावले जातात जे विसर्जनानंतर पाण्यात अन मातीत मिसळून भयानक पाणी अन जमीन प्रदूषण होते. >> नदीकाठच्या मातीपासून मूर्ती बनवून त्यावर नैसर्गिक रंग लावावेत.

दिवाळी मधे भरपूर प्रमाणात फटाके उडवल्याने आवाज अन वायू प्रदुषण होते. >>> प्रबोधन आणि मग हळूहळू बंदी घालावी. (प्रकाश घाटपांडे यांनी काढलेल्या 'फटाकेमुक्त दिवाळी' या धाग्यावर या विषयावर खूप चर्चा झाली आहे.

मंदिरातील कर्णे लाऊन आरत्या केल्याने जे भयानक आवाज प्रदुषण होते त्याने आजुबाजुच्या लोकांना खूप त्रास होतो >>> अशा सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्या विश्वस्तांना भेटून त्यांना कर्णे् न लावण्याबाबत विनंती करावी. न ऐकल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी.

BTW DJ....... (सध्यातरी सात टिंबे!), तुम्ही दीड दिवसांचा गणपती बसवता आणि कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाता हे वाचून खूप बरे वाटले !

विक्षिप्त मुलगा यांनी खरेच छान उपयुक्त उपाय सांगितले आहेत जे सहज अंगिकारता येतील.

बादवे, तुम्ही दीड दिवसांचा गणपती बसवता आणि कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाता हे वाचून खूप बरे वाटले !>> त्यात बरे वाटण्यासारखे काय आहे..? आमच्या घरात नमाज पढत असते तर मीही नमाज पढला असता किंवा चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करत असते तर मीही केलीच असती... ते ही डोळसपणे... आंधळेपणाने नव्हे.

विक्षिप्त मुलगा यांनी खरेच छान उपयुक्त उपाय सांगितले आहेत जे सहज अंगिकारता येतील.>>+१
बाकी कोणत्या नेत्याने, पक्षाने काय केले यावर चर्चा करण्यापेक्षा वैयक्तिकरित्या आपण आपण काय केले/करतोय/ करता येईल यावर चर्चा करून धागा सत्कारणी लावला तर वाचायला आवडेल.

एक विनंती आहे सर्वांना.
सरकार काय करतेय, धार्मिक स्थळी काय चालतेय, रस्त्यावर लोकं काय करताहेत त्यांना आरोप प्रत्यारोप या धाग्यावर प्लीज टाळा.
आपण कोणाकडेही बोट न दाखवता वैयक्तिक पातळीवर दैनंदिन आयुष्यात काय करू शकतो ते अनुभव या धाग्यावर शेअर करा. जेणेकरून कमी प्रतिसादात जास्त उपयुक्त माहीती जमा होईल आणि जास्त लोकं त्याचा फायदा घेऊ शकतील.

जसे वर कुमार सरांच्या पोस्टला पाहून गरम पाण्याच्या आंघोळीचा मुद्दा लक्षात आला. मी लहानपणापासून गरम पाण्यानेच आंघोळ करत आलोय. आताही सर्दीचा भयंकर त्रास असल्याने थंड पाणी बहुतेकदा नकोसेच वाटते. पण तरीही कित्येकदा शक्य असूनही गरम पाण्याने सवयीनेच आंघोळ केली जाते. खूप छान मुद्दा हा माझ्यासाठी. शुभस्य शीघ्रम. वर्क फ्रॉम होम असताना दुपारी वा संध्याकाळी उशीरा आंघोळ होते. ती सर्दीचा त्रास नसणाऱ्या दिवशी थंड पाण्याने वा सोलारच्या कोमट पाण्याने करता येईल. बरेचदा पाण्याचा पाईप ऊन्हातून जात असेल तर त्यातूनही बादलीभर गरम पाणी निघते. जुन्या घरी असे व्हायचे.

पृथ्वीवरचे प्रदूषण, क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग : वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो, आपापल्या परीने सामाजिक भान राखणे इत्यादि....
या विषयाच्या वेगवेगळ्या बाबींची चर्चा -- पर्यावरण या ग्रुपमध्ये अनेक धाग्यांवर झाली आहे.
उदा खालील २, अन्यही आहेत.
https://www.maayboli.com/node/51270
https://www.maayboli.com/node/53442

हो पण धागाकर्त्याला प्रत्येक विषयावर स्वत:चा असा धागा हवा असतो Proud Light 1
विषय चांगला आहे तर होऊ द्या चर्चा! बदल घडणार असेल तर चांगलेच आहे.

हे पर्यावरणप्रेमी वर्षाचे 365 दिवस सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मोक्कार प्रदूषण करत फिरतात. उठले की शॉवर आणि फ्लश वापरून पाण्याचा अपव्यय, तेच पाणी नदी नाल्यात सोडून प्रदूषण, स्वतःच्या गाडीने फिरून प्रदूषण, सिगारेट ओढून(जे ओढत नाहीत त्यांनी ओढवून घेऊ नये) प्रदूषण, प्लॅस्टिक वापरून प्रदूषण, घरी ऑफिसात ac लावून प्रदूषण. आणि मग हे प्रदूषण नका करू कोणाला सांगणार तर रंगपंचमीला रंगाच्या बंदुकीतून पाव लिटर पाणी घेऊन फिरणाऱ्या पोरांना आणि दिवाळीत आपटी बार फोडणाऱ्या पोरांना.

त्या दिवाळीच्या तर धाग्यावर एकाने लिहिलंय फटाके सोडून बाकी सगळ्या प्रदूषण करणाऱ्या गोष्टी जीवनावश्यक आहेत. त्या नसतील तर आपण तडफडू. Lol

देवाच्या हारांमध्ये बहुतांशी झेंडुच्या फुलांचा वापर जास्त असतो. असे हार नदीत सोडण्याऐवजी, अश्या मोकळ्या जागेत पसरवावेत जिथे अनावश्यक गवत होत असेल. यामुळे अश्या जागेत फुलांची रोपटी तयार होऊन जागेची शोभा वाढते. याशिवाय काही झाडांच्या सुकलेल्या बिया मोकळ्या माळरानात पेरल्या तर पक्ष्यांना खाद्य होऊन जाते किंवा उरलेल्या बियांमुळे पावसाळ्यात अश्या माळरानांवर झाडांची वाढ होते. मी झाडांची अशी पेरणी करून जवळपास २५० झाडे तयार केली होती. परंतु कोणीतरी वणवा पेटवून दिला आणि सर्व झाडे होरपळून गेली.

एक पोल्यूशन का सोल्यूशन नावाचा युट्यूब चॅनल आहे. मला वाटतं एका चंदिगढ मधल्या मुलीचा चॅनल आहे. अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगते आणि बरेचसे उपाय करण्याजोगे असतात. मुख्य म्हणजे त्यातली वैज्ञानिक माहिती बरोबर असते. उगीच अवैज्ञानिक चुकीच्या गोष्टी मांडलेल्या मला तरी आढळल्या नाहीएत अजून. एका गृहिणीने इतका सुंदर चॅनल चालवणे हे खूपच कौतुकास्पद आहे. She deserves a million subscribers.

मी पण झेंडू चे हार वाळवून फुलं नीट सोडवून पाकळ्या सोसायटीत रिकाम्या जागी पसरून टाकते.
आम्ही असंच टाकलेल्या(खोचलेल्या) आंब्याच्या कोयी आणि जांभूळ बिया यांची रोपं मोठी झालीत.शक्यतो कोणत्या कुंपणाला, बांधकामाला अगदी लागून टाकणार नाही इतकी काळजी घेतो.

१. २/३ km अंतरासाठी गाडीचा वापर टाळणे. चालत किंवा cycle चा वापर.....
२. Recycle पेपर चा उपयोग जास्तीच जास्त करणे.
३. सोलर लॅम्प्स चा उपयोग. LED based solar lamps मस्त वापरता येतात भारतात.
४. कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न, सोसायटी चा support मिळवणे चालूये, जमलं नाहीये.

अभिनंदन !
या धाग्यातील एक मुद्दा उचलून त्यापासून प्रेरणा घेत मी माझी गरम पाण्याने आंघोळीची सवय मोडून थंड ते कोमट पाण्याने करू लागलोय. जर सर्दीचा त्रास वाढला नाही तर हे ईथून पुढे आयुष्यभर सहज पाळू शकतो असे जाणवले Happy

जिज्ञासा मला वाटतं तू फार व्हिडिओ बघितले नसशील. मी आत्ता एक व्हिडिओ बघितला आणि शेफाली वैद्यला टफ कॉंपिटिशन होईल असा बथ्थड व्हिडिओ दिसला. https://www.youtube.com/watch?v=Up4z0fEHtVo ११:४८ पासून पुढे बघ. त्याच्या आधी ही दिवे ऑक्सिजनची निर्मिती करतात, मंदिराच्या गर्भगृहात दिवे लावून, दारं बंद करुन पुजार्‍याला सफोकेट होत नाही कारण दिवे ऑक्सिजन देतात. मेणबत्ती नाही. हिचा मुलगा आईस्क्रीम, चिप्स खात नाही, एसी वापरत नाही म्हणून तो फटाके डिजर्व करतो. हे लॉजिक अर्थात धागाकर्त्यांना आवडेलच.
पहिल्या व्हिडिओतही मेनस्ट्रुएशन वर जुन्या चादरी वापरा आणि मला कुणी कप्स फुकट दिले तरी मी वापरणार नाही कारण आयुर्वेदात कप्स वापरा सांगितलेलं नाही... ब्ला ब्ला ब्ला. अजिबात फॉलो करू नये असं माझं मत बनलं. तुलाही हे बघितलंस की वेगळं वाटणार नाही याची खात्री आहे.

Pages