चला पृथ्वीवरचे प्रदूषण कमी करूया !

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2021 - 06:02

क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल काहीच माहीत नाही असा मनुष्य विरळाच. येत्या काळात मनुष्यजातच नष्ट होण्यापासून वाचवायची असेल वा किमान तो मृत्यु लांबवायचा असेल तर आपण सर्वांनी आपापल्या परीने यात योगदान देणे गरजेचे.

पण बरेच लोकांना ही एक अशी वैश्विक समस्या वाटते की जी देशांच्या सरकारने धोरणे आणि कायदे करूनच सोडवता येईल. आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यात जे वर्तन करतो त्यातले काय आणि किती प्रदूषणास हातभार लावते आणि ते कसे आणि कुठवर कमी करता येईल हे आपल्यापैकी बरेच जणांना ठाऊक नसते. जसे की फटाके आणि वाहनांपासून प्रदूषण होते हे सर्वांना चटकन कळते. पण मांसाहार देखील कार्बन फूटप्रिंट वाढवतो हे सगळ्यांनाच ठाऊक नसते. मलाही हल्लीहल्लीच कळले. त्यातही मांसाहारच्या तुलनेत मत्स्याहार प्रदूषण वाढीस कमी हातभार लावतो हे कळले. त्यामुळे आता मला मांसाहाराचा पुर्ण त्याग शक्य नसेल तर मी किमान मत्साहाराचा वाटा वाढवू शकतो. एसी हवाच ही माझी बिलकुल गरज नाही तर मी त्याचा वापर माझ्यापुरता तरी पुर्ण बंद करू शकतो. आणि फॅमिलीला समजावू शकतो. गाडीबाबतही हेच लागू. जर आजवर मी गाडीशिवाय पब्लिक ट्रान्सपोर्ट, सायकल आणि देवाने दिलेले हातपाय वापरून जगलो आहे तर पुढेही निव्वळ ऐपत आहे म्हणून स्टेटस दाखवायला गाडी घ्यायचे टाळू शकतो. मुले आज लहान आहेत. त्यांना फटाक्यांची आवड आहे. ते लगेच जोरजबरदस्तीने बंद करणे पटत नाही तर हळूहळू वर्ष दर वर्ष प्रमाण कमी करत ते लवकरच बंद करू शकतो. त्यांना त्याजागी दुसरे पर्याय देऊ शकतो. सोसायटीतील मोठ्यांना विनंती करू शकतो की तुम्हीही फटाके वाजवू नका जेणेकरून लहानांना तो मोह होणार नाही...

अश्याच विचारांची आणि कल्पनांची देवाणघेवाण करायला हा धागा. आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो याची चर्चा करायला हा धागा. आपण याबाबत काय केले आहे हे अनुभव शेअर करायला हा धागा.

सर्वांनाच सारेच जमणार नाही. प्रत्येकाची जीवनशैली आणि आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे अमुकतमुक आम्हाला जमते तर तुम्हाला का नाही असे बोटं ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने सामाजिक भान राखले तरी एकूणात पडणारा फरक मोठा राहील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांगा ना समजून काय विनोद आहे ते?
तिला यान नॉर्थ पोल ला चाललेय कि साऊथ पोल ला, सापो ला शिश पॉईंट लाख चाललेय का हे जाणून घ्यायचे असेल तर?

मुली हुषार असतात. त्यांना चांद्रयान कुठे जाते हे कळते.

मुलांना वाटते पृथ्वी म्हणजे सीएसटीएम आणि चंद्र म्हणजे कर्जत स्टेशन. म्हणुन त्यांना कर्जत लोकल कुठे चाललीय असा प्रश्न पडत नाही तसा चांद्रयान कुठे चालले असा प्रश्न पडत नाही.

ट्राफिक सेन्स वरून मी पण बायकोला हसतो. ती माझी चूक आहे. पण हा आमचा खासगी मामला आहे. पुरूष तर जास्त वाईट चालवतात गाडी. त्याच्या वर विनोद होत नाही.

मुलींबद्दल असे विनोद शेअर करणे हे अर्ध्या लोकसंख्येकडे बुद्धीचा अभाव आहे अशी समजूत असल्याचे लक्षण आहे. 1980 पासून मुली दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षांत मुलांना मागे टाकत गेल्या आहेत.

मायबोलीकर महिला आयडींना उकसावून प्रतिसाद वाढवण्यासाठी केलेली तथाकथित स्मार्ट खेळी असेल तर पास.

सध्या सगळ्या महिला आयडी साखर गुळाविना आणि कांदा लसूणविना अश्या दोन्ही वीणा वादना मध्ये तल्लीन असल्याने उसकण्यास सवड नसल्याचे बातमीपत्र पाहण्यात आहे

For first line
Bon voyage! Have a safe and happy journey...

Second one seems vulgar

मुलींबद्दल असे विनोद शेअर करणे हे अर्ध्या लोकसंख्येकडे बुद्धीचा अभाव आहे अशी समजूत असल्याचे लक्षण आहे. >>>+१

आठवड्यातून एकदा गार पाण्याने अंघोळ >>>>त्यापेक्षा एक दिवस आंघोळ करूच नये जेणेकरून पाण्याची बचत , साबण बचत , अंघोळीमुळे होणार अस्वच्छ पाणी ड्रेनेज ने समुद्रात जाणार नाही

त्यापेक्षा एक दिवस आंघोळ करूच नये
>>>
सध्या मी हेच फॉलो करतोय.
रोज आंघोळ नाही करत
कारण तितके शरीर अस्वच्छ होत नाही.
आता केस वाढवायला घेतले तसे ते देखील दर आंघोळीला धुणार नाही.

अहो आपल्याकडे एक लालबाग एक्सप्रेस आहे. आम्हाला वाटलं येईल आपली चिंचपोकळी पर्यंत म्हणून बसलो! तर ती म्हणे बंगलोरला जाते.
तर हे असेल चांद्रयान पीक अवर संपल्यावर आता मंगळ कारशेडला जाणारं. अंधेरीवरुन ४९६ रात्रीच्यावेळात ठाण्याला येतच नाहीत. मजास आगारलाच जातात तसं. कोणी सांगावं!

Pages