
दिवाळीच्या फराळामध्ये चकली ,करंजी, बेसन लाडू , चिवडा हे जरी मानाचे सरदार असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही आपले चिवड्या बरोबरचे अस्तित्व मानाने टिकवून आहे.
नुसती शेव जरी कमी खाल्ली जात असली तरी पोहे, उपमा, भेळ, चिवडा ह्या पदार्थाना शेव एक प्रकारची परिपूर्णता देते. त्या पदार्थांची लज्जत आणखी वाढवते.
जाडी, बारीक नायलॉन, तिखट, मसाला, प्लेन, लसूणी, भावनगरी असे अनेक प्रकार आहेत शेवेचे. कोणत्या पदार्था बरोबर कोणत्या प्रकारची शेव चांगली लागेल ह्याचे प्रत्येकाचे नुस्के ठरलेले ही असतात. जाड शेवेची चटपटीत शेवभाजी खान्देशात खूप प्रसिद्ध आहे.
अस जरी असलं तरी जनरली शेव कोणी घरी करत नाही. लागेल तसं पॅकेट विकतच आणलं जातं. परंतु दिवाळीच्या फराळाच्या ताटात इतर पदार्थां बरोबर घरी केलेल्या शेवेच फुल (कोणी ह्याला शेवेचा चवंगा ही म्हणतात ) फार शोभून दिसतं. फराळाच ताट भरल्या सारख ही दिसत ह्यामुळे.
शेव करणं चकल्या करण्या एवढं धोकादायक नाहीये. जनरली शेव करणाऱ्याला दगा नाही देणार. कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. घटक पदार्थ ही मोजकेच लागतात शेवेसाठी आणि होते ही खूप पटकन.
दर वर्षी दिवाळीत मी शेव घरीच करते. पितळी सोऱ्यात बारीक जाळी वापरून पाडलेली शेव खूप नाजूक सुंदर दिसते आणि चवीला ही खमंग, कुरकुरीत लागते.
अजून दोन दिवस आहेत दिवाळीला . तर तुम्ही ही करून बघा ह्या वर्षी बारीक शेव घरच्या घरी.
लागणारे साहित्य :
चार वाट्या बेसन ( चाळून घेतलेलं गुठळ्या नकोत )
2) तांदुळाचे पीठ अर्धी वाटी,
३) दोन टी स्पून ओवा वाटून तो अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ते पाणी गाळून घेणे , ह्या बरोवर तुम्ही थोडी लसूण ही वाटू शकता पण मी नाही घातलीय लसूण.
4) हिंग अर्धा चहाचा चमचा मीठ चवीनुसार, पाव चहाचा चमचा हळद आणि तेल.
कृती .
परातीत बेसन ,तांदुळाचे पीठ, मीठ, हिंग, हळद हे सगळं एकत्र करून घ्यावे. त्यात चार चहाचे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ते मोहन सगळ्या पीठाला चांगले चोळून घ्यावे. ओवा गाळून घेतलेलं पाणी त्यात घालावे. नंतर गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट नको थोडं सैलसर च असावे . हे पीठ दहा मिनिटं ठेवून द्यावे. चकलीच्या सोऱ्यात शेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी.
1) बारीक जाळी वापरून शेव छान होते.
2) तेल फार गरम नको मध्यम गरम असावे . शेव घालताना गॅस मोठा व घालून झाली की गॅस मध्यम करावा.
3९ शेव पाडताना बाहेरून आत पडावी. कढईच्या मध्ये जास्त हिट लागते त्यामुळे तिथे शेवट शेव पाडावी.
3) शेव पटकन तळून होते. चकली सारखा शेव तळायला वेळ लागत नाही.
4) फार लालसर काढू नये ,रंग नंतर थोडा चढतो.
5) सोऱ्यात पीठ भरताना जाळी प्रत्येक वेळी धुवून पुसून घ्यावी.
6) ओवा वाटलेले पाणी गाळून घेणे मस्ट आहे. बारीक जाळीत न गाळलेला ओवा अडकून शेव तळणीत पडणार नाही म्हणून.
पण मायबोलीसारख्या व्यासपीठावर
पण मायबोलीसारख्या व्यासपीठावर असे शेरे मारणं टाळून वैयक्तिक आवडींचा आदर करणेच योग्य आहे असे मला वाटते. >>>> कुठले शेरे ? आणि वैयक्तिक आवडींचा अनादर मी कुठे केला आहे हे माझ्या दोन्ही पोस्ट्समध्ये कृपया दाखवून द्या! ह्या प्रमाणाने केलेली चव मला/आम्हांला आवडली नाही, म्हणून आम्ही पुढच्य घाण्यांमध्ये बाकीचे मसाले घातले. ह्यावर्षीही आम्ही तसच करू. ह्यात तुम्ही किंवा बाकीच्यांनी काय करावं किंवा त्यांना काय आवडावं किंवा नावडावं ह्या बद्दल काहीही लिहिलेलं नाही. पण मी केलेल्या शेवेबद्दल लिहिण्याने तुमच्या शेवेत नसलेला मसाला तुम्हांला झोंबला असेल तर मला माहित नाही.
माझ्या सोर्यात ओवा अडकला नाही, तुमच्या अडकला ह्यात let us agree to disagree काय करायचं हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. तुम्ही मागच्यावर्षी विचारलेला प्रश्न हा बाफ वर आला म्हणून आत्ता दिसला मला. त्यावर उत्तर दिलं.
मी स्वतः एक मर्यादा घालून घेतली आहे जिचं उल्लंघन मी करत नाही. >>>> Good for you!
>>>>>> एक कोल्हा आपलं मानव
>>>>>> एक कोल्हा आपलं मानव


मला तर फोटोच दिसत नाहीयेत. काय झालय कॉम्प्युटरला, देवाला माहीत
आणि वैयक्तिक आवडींचा अनादर मी
आणि वैयक्तिक आवडींचा अनादर मी कुठे केला आहे हे माझ्या दोन्ही पोस्ट्समध्ये कृपया दाखवून द्या! >> तुम्हाला वाटत नाहीये तसं म्हणूनच तुम्ही लिहिल्या आहेत दोन पोस्ट्स आणि म्हणून मला दाखवून द्यायला सांगत आहात. पण व्यक्त होण्याची कोणती ही एक प्रमाण भाषा नाही प्रत्येकाची व्यक्त होण्याची भाषा वेगवेगळी असते. एखादे वाक्य एखाद्याला गैर वाटेल , दुसऱ्याला वाटणार नाही किंवा एखादा शब्द बोलणाऱ्याला योग्य वाटेल तर ऐकणाऱ्याला अयोग्य. त्यामुळे हे दाखवून देता येणं अशक्य आहे.
माझ्या सोर्यात ओवा अडकला नाही, तुमच्या अडकला ह्यात let us agree to disagree काय करायचं हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे >> तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय ओवा अडकला नाही, आणि मी ही पुन्हा पुन्हा सांगतेय ओवा अडकतो ह्यावर फक्त अडकत नाही.. अडकतो हेच होणार, त्यामुळे लिहिलं हे. तुमचा अनुभव तुमच्या पाशी माझा माझ्या जवळ. आणखी फोड करून सांगता येणार नाही.
पण मी केलेल्या शेवेबद्दल लिहिण्याने तुमच्या शेवेत नसलेला मसाला तुम्हांला झोंबला असेल तर मला माहित नाही. >> ह्यासाठी मी वैदेही ने एका वेगळ्याच रेसिपीने केलेली शेव इथे दाखवली आहे, त्यावरचा माझा प्रतिसाद बघा .

ही माझी ह्या वरची शेवटची पोस्ट. गेल्या वर्षी रवा लाडूवर फटाके फुटले होते दिवाळीच्या आधी ह्या वर्षी शेवेवर फोडा.
दाखवून देता येणं अशक्य आहे >>
दाखवून देता येणं अशक्य आहे >>>
करून सांगता येणार नाही. >>>> ओके म्हणजे दोन्ही मुद्द्यांवर ठोस सांगण्यासारखं काहीच नाहीये तर. म्हणजे मी म्हटलं तसं नसलेला मसालाच झोंबलेला दिसतोय!
गेल्या वर्षी रवा लाडूवर फटाके फुटले होते दिवाळीच्या आधी ह्या वर्षी शेवेवर फोडा >>>> रवा लाडू बाफबद्दल माहीत/लक्षात नव्हतं. आता बघितलं. एकूण फटाके फुटण्यामध्ये तुमचं
पाकृलिखाण हा लसावी दिसतो आहे!गेल्या वर्षी रवा लाडूवर फटाके
गेल्या वर्षी रवा लाडूवर फटाके फुटले होते दिवाळीच्या आधी ह्या वर्षी शेवेवर फोडा>>> हो मलाही तेच आठवले.
काही असो. मला दोन्ही पाकृ भयंकर आवडतात. मी करणार सर्व टिप्स सकट
शेवेचा फोटो छान आहे.
शेवेचा फोटो छान आहे.
नेहमीची साधी शेव खायचा कंटाळा आला म्हणुन एका वर्षी लसुण वाटुन घातला आणि ती शेव घरात इतकी आवडली की नंतर साधी शेव कधी केलीच नाही. कित्येक वर्षे आईच्या हाताखाली दिवाळी पदार्थ केल्यामुळे दिवाळीत चकली शेव केली नाही तर चुकल्याचुकल्यासारखे वाटे. मुलीला शेव आधी हवी, बाकी गोड नसले तरी चालते. त्यामुळे दिवाळीला अजुनही शेव बनतेच. मी चकली व शेव एकाच वेळी बनवते. चकली झाली की लगेच त्याच कढईत शेव.
लसुण वाटुन घेऊन गाळुन घ्यायचा कंटाळा केला की तो कितीही बारीक वाटला तरी जाळीवर अडकतोच. आणि गाळुन घेतला तरी त्याचे बारिक दोरे अडकतात. तेव्हा जाळीवर सुरी आडवी फिरवुन तो काढलाय. जाळी धुवा, पुसा इत्यादी खटाटोप माझ्याने कधी झाले नाहीत
आमच्याकडे दिवाळीत शेव कधी
आमच्याकडे दिवाळीत शेव कधी केली गेली नाही की कधी विकत आणली गेली नाही. जणू ती आमच्या फराळाचा भागच नव्हती. यावर्षी मी गार्लिक शेव ऑर्डर केली आहे. बघू कशी वाटतेय चवीला.
ओ माय गॉड… आमच्याकडे आधी
ओ माय गॉड… आमच्याकडे आधी शेव
मी फराळ घेऊन सासरी गेले की सासुचा पहिला प्रश्न हाच असायचा, तुझी फेमस शेव आणलीस ना?? त्यांना जाऊन १२ वर्षे झाली पण प्रत्येक दिवाळीला त्यांची आठव्वण शेवेमुळे येते.
बरेच जण शेव करत नाही हा
बरेच जण शेव करत नाही हा गैरसमज कसा काय आहे माहित नाही.
आमच्याकडे करंजीचा कुटाणा आधी आटपला की आई मग चकली आणि शेव करायचीच. कारण मला शेव आणि चकली हवीच असायची.
आई तरी मस्त ओवा कुटुन उकळवून गाळून घ्यायची. ती मटकीची शेव सुद्धा करायची .. तो एक कुटाणा असायचा. मटकी धुवून वाळवून दळून ... गुजराती शेजार असल्याने तो एक प्रभाव होता.
आता कोण करतय इतका कुटाणा.. पण फराळात चकली, शेव मस्ट आहे (बाहेरून फराळ आणला तरी).
मटकीची शेव..पहिल्यांदा ऐकले
मटकीची शेव..पहिल्यांदा ऐकले हे प्रकरण!
पण एवढा कुटाणा कोण करणार..
सुटसुटीत रेसिपी आहे मनीमोहोर.
सुटसुटीत रेसिपी आहे मनीमोहोर. पहिल्यांदाच घरी शेव करणाऱ्यालासुद्धा confidence देणारी.
काल अहो आईंनी केली, आज डब्याने तळ गाठलासुद्धा.
चवंगाचा फोटो मात्र राहिलाच. इंशागोविंदा, नेस्ट टाइम.
@ मटकीची शेव
@ मटकीची शेव
आमच्याकडेसुद्धा करतात कधीकधी. थोडी higher spice level वाली. कुटाणा जास्त असतो हे बरोबर.
नवीन प्रतिसाद देणाऱ्या
नवीन प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मटकीची शेव , तिचा कुटाणा आणि तिची अप्रतिम चव ह्या सगळ्यांबद्दल फक्त ऐकूनच आहे.
साधना जाळीवर सुरी फिरवून ती साफ करण्याची आयडिया आवडली आहे.
मला दोन्ही पाकृ भयंकर आवडतात. मी करणार सर्व टिप्स सकट >> थँक्यु आशू.
यावर्षी मी गार्लिक शेव ऑर्डर केली आहे. बघू कशी वाटतेय चवीला. >> होप तुला आवडेल सायो
झंपी, ओव्याच पाणी पुन्हा करीन शेव तेव्हा उकळवून घेईन . ओव्याचा अर्क नक्कीच अधिक उतरेल पाण्यात.
अनिंद्य शेव फारच tempting दिसतेय.
सर्वांना शुभ दीपावली .. छान आनंदात साजरी करा दिवाळी.
ममो! यावेळेस परत केली मागल्या
ममो! यावेळेस परत केली मागल्या वर्शी पेक्षा चान्गली झाली चविला खुटखुटित-खुसखुशित झाली आहे पण शेवच फुल काहि राहिल नाही..आणी शेव तुमच्या शेवइतकी नाजुक-साजुक पण नाहि दिसत आहे...सुधारणेला वाव आहे.
फुल जमल नाहि कारण बहुधा माझी कढईच छोटी आहे आणी बारिक जाळी लावली तरी शेव पाडल्यावर फुलुन जरा मोठीच दिसतेय..तुमची शेवेची ताटली एकदम मायक्रो बारिक भोकाची असावी.
बारिक जाळी लावली तरी शेव
बारिक जाळी लावली तरी शेव पाडल्यावर फुलुन जरा मोठीच दिसतेय.>>>>>>>हो
शेव पाडताना शेव कट कशी करायची
मी पाडताना शेवेचे धागे चिकटून शेवटी जाड झाले आहे
ममोच्या शेवेसारखे फूल नाही झाले
मी पाडताना शेवेचे धागे चिकटून
मी पाडताना शेवेचे धागे चिकटून शेवटी जाड झाले आहे>>> सेम सेम ! तो एक शेवेचा जुडगाच झाला मग उलट पालट मधे त्याला कापुन बाहेर काढला शेव तळल्यावर परत असे दोन जुडगे तळले..द्राविडी प्राणायम!!
हवी तितकी पाडुन झाल्यावर सोर्
हवी तितकी पाडुन झाल्यावर सोर्याच्या बुडाला सुरी फिरवा.
मी कधी सुरीने केले नाही पण हा प्रश्नही कधी पडला नाही. मी बहुतेक एक सोर्या एक फुल असे करत असणार.
या वेळेस पण successful .
या वेळेस पण successful . Thank you मनीमोहोर.
ह्या रेसिपीने केलेली शेव.
ह्या रेसिपीने केलेली शेव.

अगदी मस्त झाली.
शेव पाडताना शेव कट कशी करायची
शेव पाडताना शेव कट कशी करायची....
मी हवी तेवढी शेव पाडून झाल्यावर सोर्या (हे कसं लिहायचं? माझा कीबोर्ड अर्ध्या र ला या जोडल्यावर त्याचा रफार करतो आहे) अजून खाली धरून जाळीचा भाग तेलाच्या अगदी जवळ धरतो, मग बाहेर आलेले पीठ (शेव) आपोआप सुटून तेलात पडतात.
Anagha _gokhale , ऋतुराज शेव
Anagha _gokhale , ऋतुराज शेव फारच छान झाली आहे.
विक्षिप्त मुलगा म्हणतायत त्याला अनुमोदन. सोऱ्या जेवढा वर धराल तेवढं जास्त पीठ कढईत पडतं आणि ते गठ्ठ्या सारख पडत. त्यामुळे पीठ कट करताना शक्य तेवढा सोऱ्या कढईजवळ /तेला जवळ नेऊन कट केलं की गठ्ठे पडत नाहीत. अर्थात तेल, कढई दोन्ही भरपूर गरम असतं त्यामुळे हे अंदाज घेऊनच करा, सेफ्टी फर्स्ट.
Pages