क्रॅनबेरीजचे लोणचे

Submitted by सीमा on 19 October, 2021 - 18:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ताज्या क्रॅनबेरीज : १ कप (भारतात या ऐवजी करवंद वापरता येईल. )
हळद चवीनुसार
साखर १ टी स्पुन.
लाल मिरची पावडर १ टे स्पुन
मीठ चवीनुसार
तेल, जीरे,मोहरी,मेथीदाणे -५/६

क्रमवार पाककृती: 

क्रॅनबेरीज स्वच्छ धुवून निथळत ठेवाव्यात. एकदम कोरड्या झाल्या पाहिजेत. त्यातल्या टणक निवडून घ्याव्यात.(मऊ चटणी साठी ठेवल्या) आणि अर्ध्या अर्ध्या कापून घ्याव्या. आता त्यात हळद, मीठ, लाल तिखट, साखर घालून मिक्स करावे.
तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, मेथीदाणा टाकावा.
हे तेल गार करून क्रॅनबेरीजच्या मिश्रणावर ओतावे. मिक्स करून बरणीत भरावे.
लोणचे करकरीतच चांगले लागते. त्यामुळ शक्यतो लगेच संपवावे.

वाढणी/प्रमाण: 
-
माहितीचा स्रोत: 
आत्याने करवंदाचे लोणचे दिले होते ते संपले. मग त्यावरून क्रॅनबरीजचे करून बघितले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे क्रुती !
माझ्याकडे केप्रचा लोणच मसाला शिल्लक आहे तो घालुन पण छान होइल अस वाटतय.