मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ब्रेकच्या आधी काय गाणं लावलेलं जय आणि स्नेहा एकमेकांना बघत होते वगैरे. ब्रेकनंतर तसं काहीच नाही. >>>>>>>> दाखवल ना. स्विट ड्रीम्स, झोप गुपचूप अश्या टाईपच फ्लर्टिन्ग चालू होत.

आता कळल विशाल काल तोण्डात पाणी घेऊन खाली बसला होता. मला वाटल, त्याच्या पोटाला काही लागल बिगल की काय. मस्त आयडिया, पण विकास उगाच भाण्डला त्याच्याशी.

विकास- विशाल भाण्डत असताना जय उगाचच अन्गावर येत होता विकासच्या. दोघान्चे भाण्डत होत असताना ह्याच काय काम?

विशालने जरी विकासशी पॅचअप केले असले तरीही विकास हे पुढच्यावेळी लक्षात ठेवेल. नाही माफ करणार त्याला. विशाल त्याला मिठी मारत असताना त्याचा चेहरा कोरा होता. कसलेच एक्सप्रेशन्स नव्हते.

गायत्रीला हिची स्ट्रॅटेजी पटत नव्हती तर तिला चक्क म्हंटली कि तू जरा बाहेर जा बरं , गायत्री चक्क गेली >>>>>>> अगदी अगदी. नन्तर ती तिच्या टिमला सान्गत होती की गायत्रीला डोकच नाही. हिला काहीच कळत नाही टास्कमधल. खर बोलली ती. हा हा हा!

2 3 दिवसा आधिच्या भागात बेड वर झोपून सोनाली आणि मिनल बोलत होत्या गायत्री बद्दल की कशी ती जय जिम करायला गेला की स्विमिंग करायला जाते. >>>>>> काय उपयोग झाला? स्नेहाने उडवून नेल जयला.

फळे गोळा करण्याच्या टास्कमध्ये गायत्री स्विमिन्ग कॉस्च्युम का उभी होती? ती तर नाही उतरली पाण्यात.

बिग बॉसचा फोन आल्यावर तर ती सगळ्यांना एका लाईन मध्ये उभे रहा असे सांगून गेली. >>>>>>>> स्वत:ला बिग बॉस समजते का ही?

बाकी मला टास्क्स बघायला मजा येते आहे.>>> +++++++++ ११११११११

विकास- विशाल भाण्डत असताना जय उगाचच अन्गावर येत होता विकासच्या. दोघान्चे भाण्डत होत असताना ह्याच काय काम?>> जय आणि मीरा मागे बोलत होते की जेव्हा संधी मिळेल तेव्हा विशाल-विकासला इतके डिवचायचे कि त्यांचा हात उठला पाहिजे(म्हणजे ते गेमच्या बाहेर जातील).

हिंदी बिग बॉसच्या सुरुवातीच्या सीझन्समध्ये साप्ताहिक कार्य सगळ्यांना मिळून दिले जाई. त्यातल्या कामगिरीवर त्यांचे लक्झरी बजेट ठरे.
दोन टीममधल्या स्पर्धेपेक्षा मला ते जास्त आवडले.
--
हो. जयने अनेकदा फुशारकी मारली आहे की दुसऱ्याला चुकवून त्याचा तोल बिघडवणे ही त्यांची strategy आहे. त्याचा स्वतः:चा हात कधीही उचलला जाणार नाही याची त्याला खात्री आहे

विकास- विशाल भाण्डत असताना जय उगाचच अन्गावर येत होता विकासच्या. >> खरच ..किती आरडाओरडा करतो जय.. जंगली तारझन..ओ ओ ओ...

विशालने जरी विकासशी पॅचअप केले असले तरीही विकास हे पुढच्यावेळी लक्षात ठेवेल. नाही माफ करणार त्याला. विशाल त्याला मिठी मारत असताना त्याचा चेहरा कोरा होता. कसलेच एक्सप्रेशन्स नव्हते.>> कारण टास्क आणि भांडणा नंतर जेव्हा विकास सोफ्या वर जाऊन बसला तेव्हा विशाल ने त्याला टोकल की तू फर्नीचर चा वापर कसा करतो आहेस..खाली बस ..कारण आधिच्या टास्क मध्ये हरले होते... ते विकास च्या डोक्यात गेल.. अनवधानाने तो बसला होता..विरोधी टीम मधू न कोणी बोललं असत तर ठिक होत..आपलाच मित्र आता या अशा गोष्टी हाय लाईट करतोय ते त्याला नाही आवडलं..तो मिनल ला म्हणाला की हे लक्षात ठे वेन..टास्क मध्ये काही झालं ते समजू शकतो...मला सध्या फक्त विकास आणि मिनल च बरे वाटत आहेत

फळे गोळा करण्याच्या टास्कमध्ये गायत्री स्विमिन्ग कॉस्च्युम का उभी होती? ती तर नाही उतरली पाण्यात>>तिला करायचा होता टास्क ..मग सगळे म्हणाले उंची मूळे प्रोब्लेम होईल.. अविष्कार म्हणाला मी करतो.. बाकी ज्येष्ठांना काही टास्क करायचे नाहीच आहेत का.. सगळ पळापळी चा टास्क असले की गृहित धरून चालतात की जय,विशाल,विकास करणार.. कशाला..

आविष्कार मस्त खेळला.गायत्रीला तर पाण्याची भीती वाटते ना,मागे स्विमिंग पुल मध्ये ढकलण्याच्या टास्क वेळी किती नाटक केली होती.विकास दादुस चे चालू होते तेव्हा जयने उगीच मुद्दा वळवला,बापाच्या वयाचा आहे वगैरे वगैरे.आणि मग विकासचे संस्कार , खानदान काढले पण विकासने त्याला पूर्ण दुर्लक्षित केले . जय जाम शिव्या खातोय तो सोमिवर मीनल त्याच्यातल माकड बाहेर काढते खर.विकास,विशाल,मीनल,सोनाली जिकडे खेळतात तिकडे जिद्दीने खेळले उलट उत्कर्ष,मीरा,गायत्री passion ने नाही खेळले.

एकंदरीत कालचा भाग नीट बघायला हवा असं दिसतंय.

ते वर विशालचं मीम आहे, खरंच जय त्याला गडी म्हणाला का, नोकर या अर्थाने.

सासु सुना मीम्स भारी, हाहाहा.

सोनाली ने विशाल ला छान समजावलं. टास्क च्या वेळेस तू कर विकास ला विरोध पण टास्क नंतर नको .

सोनाली ने विशाल ला छान समजावलं.>>+१
कार्याच्या दरम्यान जय विकासला खानदानावरून काहीबाही बडबडत होता तेव्हा विशाल त्याला समजावत होता कि त्याला काय बोलायचे ते बोल पण खानदान वगैरे काही बोलू नकोस.
मीनलने सोनालीच्या हाताला नव्हते मारले तर फक्त वाडग्यावर हात मारून पाणी सांडले होते. पण जय आणि मीरा सोनालीलाच तुझ्या हातावर मारले म्हणून ओरडत होते.

मला सध्यातरी विकास-विशाल-मीनल-सोनालीचा ग्रूप आवडतोय..... त्यांच्यातही कुरबुरी चालू असतात पण बऱ्याचदा त्या लटक्या असतात!
मीनलने तो ग्रूप बांधून ठेवलाय.... कालच्या राड्यानंतर ती विकासला छान समजावत होती.... सोनालीही वेळोवेळी विशालला समजावत असते...... एक इमोशनल बॉंड जाणवतो त्यांच्यात; त्यामानाने जय-मीरावाली टीम एकदम कोरडी वाटते.... कोई किसीका नही टाइप्स!!

स्नेहा दिवसेंदिवस अजुन अजुन गोड दिसतेय!!

जयला किती तो सुपीरियरिटी कॉंप्लेक्स आहे..... एकतर तो अजुन स्प्लिट्सव्हिला मोडमधून बाहेरच आलेला नाहिये आणि ज्याच्याशी भांडतो त्याच्याशी फारच तुसडेपणाने बोलतो..... काल विकासबद्दल पण म्हणाला की हा आपल्या ग्रूपमधून तिकडे गेलेला कचरा आहे की असेच काहितरी!!
तो खुप सेल्फ ओब्सेसड वाटतो

अक्षय काही सुधारणा करायचे मनावर घेत नाहिये..... काल एखादा टास्क करु शकला असता तो!

अविष्कार एकदाचा दिसला टास्कमध्ये आणि बरे परफॉर्म केले त्याने!

तो कोड्यांचा गेम चांगला होता सोपा होता जरा पण चांगला होता.... असे अजुन टास्क असले पाहिजेत.

आता कॅप्टन कोण होतय बघायचे!

काल पण मजा आली टास्क मधे. विकास उगीच खुसपट काढून भांडत होता. खर तर तोंडात पाणी ही एक चांगली युक्ती होती पण असं किती पाणी मावलं असेल तोंडात.
सोनाली आणि मीनल डॅमेज कन्ट्रोल चांगले करत होत्या Happy
फळांचा टास्क पण मस्त होता. जय प्रॉपर स्पोर्ट्स शूज घालून फुल तयारीने ( तेही फ्लॅट, बोलिंग ला वगैरे इनडोअर साठि वापरतात तसले) तर विकास आधी चक्क चप्पल आणि मग अनवाणी होता. भारी झाले ते टास्क. घरवाले बिचारे रात्री पावणेदोन पर्यन्त टास्क खेळत होते! एवढे करून कॅप्टनशिप च्या उमेदवारावर एकमत झालेच नाही Happy खर तर पर्फॉर्म जय आणि विशाल नेच केलेय पण या आठवड्यात नॉमिनेट असल्यामुळे दादुस - तृप्ती ला संधी द्यायला हरकत नव्हती. आयताच त्या अक्षय चा पत्ता कट करायची संधी होती!

खरेच त्रुप्ती दादुस ला कॅप्टन करायला काहीच हरकत नव्हती . एव्हडे स्ट्राँग समजतात ना स्वतःला,मग इनिशियल वीक्समधे नॉमिनेट व्हायला काय हरकत होती?
जय किती फिजिकल होतो टास्क खेळताना. त्या विकासला चिर्डुन टाकेल की काय असे वाटले, तरी बर विकासच लांब रहात होता घाबरुन. आविष्कार आणि विकास हरुनदेखील जिंकले माझ्यासाठी.

फळांचा टास्क पण मस्त होता. जय प्रॉपर स्पोर्ट्स शूज घालून फुल तयारीने ( तेही फ्लॅट, बोलिंग ला वगैरे इनडोअर साठि वापरतात तसले) तर विकास आधी चक्क चप्पल आणि मग अनवाणी होता.
<<<
हाहाहा .. लगान मधली ब्रिटिश टिम वि. भुवन टिम आठवली Proud
फिजिकल टास्क्स मधे खरच जय आणि विशालला काहीच काँपिटिशन नाहीये !
काल एकदाचा बिचार्‍या अविष्कारला संधी मिळाली आणि केलं त्यानी परफॉर्म !
विकास उगीच रुसला , ३ इडियट्स मधली ह्युमन सायकॉलॉजी , मित्रं फेल होण्यापेक्षा पहिला येण्याचे दु:ख जास्त Wink
जय स्नेहा काय बळच फ्लर्टिंग चाल्लय.. ती खरच काहीही करत नाही, वेड्यासारखे पायघोळ ड्रेस सावरत टास्क मधे उभे रहाणे आणि उरलेल्या वेळात जय बरोबर टीपी, तेवढ्या एका कारणाने ती दिसेल अशी तिची स्ट्रॅटेजी असावी !

ती मेघाची मैत्रीण म्हणून तिला वोटींग चांगलं आहे. त्यावर पुढे जाईल. बोअर आहे.

मला सध्यातरी विकास-विशाल-मीनल-सोनालीचा ग्रूप आवडतोय... >>> मलाही.

कॅप्टन्सी टास्क रद्द झाल्यानंतर जय आणि विशालच्या रिॲक्शन त्यांच्याबद्दल बरेच काही सांगतात!
विशाल सुरेखाताईना समजून घेताना दिसला तर तिकडे जय आणि टीमचे प्लॅनिंग चालू होते की आता दादूस आणि तृप्तीना आपल्या ग्रूपमध्ये बसून द्यायचे नाही!

Vishal is clear winner for me!

मेघाची मैत्रीण म्हणून काही पब्लिक वोट्स देणार नाही, बिगबॉसने काहीतरी मिनिमम गॅरँटी देऊन आणले असावे तिला, म्हणून अविष्कार रिलेटेड /जय बरोबर दाखवून घेत आहेत तिला नाहीतर तिच्या बोलण्यात /टास्क्स मधे काहीच चमक नाहीये !

ती मेघाची मैत्रीण म्हणून तिला वोटींग चांगलं आहे. त्यावर पुढे जाईल. बोअर आहे.
>>>कोण मेघा??तेंव्हा मीपण वोट दिले होते पण सिझन वन संपून आता जमाना झाला, तिला आता कुत्रं विचारत नाही...

स्नेहाला वाटतं कि ती दीपिका पदुकोण सारखी दिसते Biggrin , एक्स्ट्रॉ तडका मधे ती आणि जय बोलत होते यावर.
btw जयचा फेस किंचित ऋषिकेश रानडे सारखा आहे Rofl
विशाल थोडा सुशान्तसिंग राजपुत सारखा !

Pages