प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

मला त्या रंगीबेरंगी इअररिंगच्या खाली ब्लॅक पिंक छोटूसं काहीतरी आहे ते आवडलं.
छन्दिफन्दी >>> टोपाझ सेट मस्त.
अनू >>>पेंडंट मस्त. सेमीप्रेशस स्टोनचे आहे का?
माझापण निळा झब्बूIMG_7028.jpegIMG_7025.jpeg

चालू आहे का हा धागा अजून

काय जबर्दस्त सुन्दर आहेत सगळे दागिने!!!

लेकीची एक मैत्रिण चांदीत दागिने बनवते. तिच्या स्वतःच्या कल्पना असतात, अपल्याला हवे तेही बनवते. लेकिने कॅला लिलीचे ब्रेसलेट व कानातले बनवुन घेतले. ही आसामी मुलगी अफाट फुड स्टायलिस्ट व फोटोग्राफर आहे , बेकिंगही अफाट करते. honeyandsorrel हे तिचे इन्स्टा हँडल पाहणे केवळ नयनसुख.. त्यावरचे सगळे पदार्थ तिने केलेले आहेत. (सॉरी, जाहिरात करणे हा हेतु नाहीय पण राहावले नाही इत्स्की गुणी पोरगी आहे)

66998F48-CEE4-4C70-96BE-28640B5F4FE0.jpeg

honeyandsorrel
मस्त आहे page
Follow केलं

कल्पक आहेत कानातले अणि ब्रेसलेट. ऑर्डर्स कशी घेते ती? Insta वर तिचे फूड फोटोग्राफी पोस्ट्स जास्त दिसले

Insta वर तिचे फूड फोटोग्राफी पोस्ट्स जास्त दिसले
>>> मलाही फूड पोस्ट्स दिसल्या. ज्वेलरीचा फक्त एक व्हिडीओ दिसला.

ती सध्या हिमाचल प्रदेशात मॅकलोडगंजला राहते. या कामासाठी तिला चांदी आणावी लागते आणि मशिन्स वापरुन काम करावे लागते ते सगळे काम बर्फामुळे बंद आहे. ती नव्या ऑर्डर्स मार्च नंतर घेऊ शकते. तिच्या insta वर तिला DM करता येते. तिच्या कामात बरीच सफाई आहे, वरचा दागिना तिने सुरवातीला बनवलाहोता, तेव्हा तितकी सफाई नव्हती.

सर्वांचे फोटो सुरेख.

IMG-20231229-WA0021.jpg

हे मी मागे मायबोलीकर साक्षी राऊतकडून घेतले, ती करते, मला तिचा आयडी आठवत नाहीये.

मी मला, बहिणीला आणि भाचीला घेतले हे.

IMG-20240415-WA0006.jpg
Oxidized jewellary
काल आवरताना photo काढला आणि ह्या धाग्याची आठवण झाली

वाह!! मस्त आहेत दांडिया ऑक्सिडाईज्ड दागिने.मोडल सिल्क किंवा खण साडी वर पण चांगले दिसत असतील.

हे कॅरटलेन शाया कलेक्शन मधले कानातले.जितके कॅटलॉग मध्ये क्युट दिसतात तितके वापरायला अजिबात सोयीचे नाहीत.कानातून निघतात सारखे.दुसऱ्या एखाद्या कानातल्याचा प्लास्टिक स्टॉपर पण घातला मागच्या बाजूला तर जास्त सुरक्षित होईल.
IMG_20240415_093608.jpg

ऑक्सिडाईज्ड दागिने >>> फारच सुरेख. तो मोरपीसवाला बाजूबंद आहे का?

मी_अनु >>>> हे कानातले माझ्या लिस्टमध्ये होते. बरे झाले तुझा अनुभव सांगितलास. आता चुकूनही घेणार नाही.

माझी अलिकडची खरेदी…
IMG_7307.jpeg

Pages