माबो गंमतगूढ : आपणच ओळखू आपल्याला !

Submitted by कुमार१ on 5 September, 2021 - 02:58

आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !

खाली ६ शोधसूत्रे दिलेली आहेत. ती शास्त्रशुद्ध गूढ प्रकारची नसून एक प्रकारे गंमतगूढ आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.

तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत.

शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.

हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी.

ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात कुठेही अंक नाहीत.

सूत्रे :

१. हाताची बोटे मोजून अधिकार गाजवतो (५)

२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)

३. तिथे भरारी मारल्यानंतर पावित्र्य मिळाले (५)

४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५)

५. भटक्याने आडनाव लावले (५)

६. आवेशात पलंगावर टेकला
(५
)
......
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.

ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल. मात्र तुमचे उत्तर हे इथले सदस्य नाम हवेच

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋषी वाटलं होतं पण ते बेला काही माहीत नव्हतं. ऋषी वरून दुसरे एक नाव आठवले पण ते नियमात बसत नव्हते

पुणेकर
हरकत नाही
तुम्ही छान खेळलात.

आवाहन:
आता गणेशोत्सवाचे खेळ खेळायला आपण उत्सुक आहोत. तोपर्यंत इथे कडी लावून ठेवू. पुढच्या महिन्यात या खेळाचा एक वेगळा प्रकार विचारात घेता येईल.
तो मी अन्यत्र देऊन झाला आहे. त्यातील जे काही अनुभव आले त्यानुसार तुमची मते जाणून घ्यायला आवडेल. म्हणून सावकाश विचार करून ठेवा.

१. खेळ असा आहे की शोधसूत्रांवरून मायबोलीवरील धाग्यांची शीर्षके ओळखणे.
२. आता इथे पहिला महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे धाग्यांची प्रचंड संख्या (? काही लाख वगैरे).

३. त्यामुळे यावर उपाय असा काढला की गेल्या एक किंवा दोन वर्षातीलच धागे घ्यायचे. तरीसुद्धा ती संख्या खूप राहतेच.
४. मग यावर एकाने खेळ चालू झाल्यावर संगणकीय युक्त्या वापरून चाळणी लावली. त्यातून अपेक्षित उत्तरांची संख्या वीस-पंचवीस पर्यंत मोजकी राहते. मग पुढे भाषिक तर्क वगैरे लावायचा.

५. आता मुद्दा असा आहे, की शब्दखेळ सोडविताना संगणकीय युक्त्या वापरल्या जाऊ नयेत. आपले भाषाज्ञान, सारासार विचार, तर्क यावरच उत्तर आल्यास जास्त मजा आहे.

म्हणून 'शोधसूत्रांवरून शीर्षके ओळखा' या प्रस्तावित खेळासंबंधी आपापले विचार सवडीने इथे मांडावेत.

>>खेळ असा आहे की शोधसूत्रांवरून मायबोलीवरील धाग्यांची शीर्षके ओळखणे.

हा असाच (किंवा थोडेफार याच धर्तीचा) खेळ होता की एका गणेशोत्सवात..... उंदीरमामांची टोपी हरवली!

रंगतदार झाला खेळ.
ज्या कुणी आयडी घेतलाय ऋषिबेला त्या आयडीने पण कदाचित एवढं डोकं खाजवलं नसेल आयडी घेताना. सहज मनात विचार आला हा.
बेला चा हा अर्थ माहीत नव्हता.>>>>+११ वर्णिता. मजा आली.

हा घ्या तो धागा: (तुमचे शोधायचे कष्ट थोडे वाचवतो)
https://www.maayboli.com/node/55584

बाकी हा धागा मस्त होता..... मला एकही ओळखता आले नाही पण उत्तरे वाचल्यावर "अरेच्चा! हो की" असे झाले हेच या गंमतखेळाचे यश आहे!

स्वरुप धन्यवाद
बघितला तो धागा
तिथे स्पर्धे सारखं वातावरण असून विजेते जाहीर केलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे की आता मायबोलीला पंचवीस वर्ष झाल्याने धागे संख्या प्रचंड आहे.
तेव्हा असा खेळ द्यायचा झाल्यास फार मर्यादित कालावधी (सहा महिने वगैरे) देऊन खेळ द्यावा लागेल .

इतरांच्या सूचनांची वाट पाहत आहे.

नवे एकच सदस्यनाम देतो ओळखायला:

सात अक्षरी व त्यातली दोन जोडाक्षरे

सूत्र :
देवाचा मदतनीस व देवता एकत्र आले की आनंद देतात

वा!

Pages