माबो गंमतगूढ : आपणच ओळखू आपल्याला !

Submitted by कुमार१ on 5 September, 2021 - 02:58

आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !

खाली ६ शोधसूत्रे दिलेली आहेत. ती शास्त्रशुद्ध गूढ प्रकारची नसून एक प्रकारे गंमतगूढ आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.

तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत.

शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.

हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी.

ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात कुठेही अंक नाहीत.

सूत्रे :

१. हाताची बोटे मोजून अधिकार गाजवतो (५)

२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)

३. तिथे भरारी मारल्यानंतर पावित्र्य मिळाले (५)

४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५)

५. भटक्याने आडनाव लावले (५)

६. आवेशात पलंगावर टेकला
(५
)
......
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.

ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल. मात्र तुमचे उत्तर हे इथले सदस्य नाम हवेच

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविन
तुमच्याच चार पैकी एक पर्याय निवडा बरं

तुमच्याच चार पैकी एक पर्याय निवडा बरं??>>>> ऋशिबेला अस नाव मिळतय पण बेला आणि कोरणे जुळत नाहीये

मगाशी पण मी कोरणेवरुन टॅन्जन्ट मारला होता. मला वाटल होत नाव कोरणे वगैरे असेल Lol

ऋशिबेला
अगदी बरोबर
कृष्णा
तुम्हाला हे यश मिळालेले बघून
मला आनंद होत आहे

तुम्हाला हे यश मिळालेले बघून
मला आनंद होत आहे>>>
हा सांघिक विजय आहे मी बराच वेळ नॉन स्ट्रायकर एंडला आणि मधुनच एखादा चेंडू तटवत होतो. फक्त विजयी फटका मारायचे भाग्य आले! Happy

ऋशिबेला असा आयडी आहे हेच माहिती नव्हतं.
करवंटीला 'बेली' असापण शब्द आहे.
करवंटी हा शब्द जरा अभद्र वाटतो (हाती करवंटी आली वगैरे, म्हणजे भिकेची वेळ आली याअर्थी) त्यामुळे लहानपणी आजी 'बेली' म्हणायचा आग्रह धरायची असं आठवतंय. अर्थात हा समज सगळीकडे नसेल, कारण नंतर करवंटी हाच शब्द सर्रास ऐकलाय/ वाचलाय.

मला करवटे म्हणजे करवंट्या वाटायचं. आणि ते रात्रभर करवंट्या का बदलत बसलेत असा प्रश्न पडायचा गाणं ऐकून.

सर्व उत्तरे एकत्र:
१. घातल्यावर आराम. काढल्यावर तो गायब करतो (५).... चप्पलचोर

२. आजोबा बाळंत होत आहेत ! (४)... नानाकळा

३. मुक्त असलेला हल्ला करतो तरीपण त्याला सौम्य समजतात ! (५)... अजातशत्रू

४. एक मुलगा आकाशाला शोभा देतो (५)... नितीनचंद्र

५. अशुद्ध साधकाने कोरून केले पात्र (४).. ऋशिबेला
…….

श्रवु्
दिलाय ना मगाशी वर दुवा
सर्वांचे करवंटी पुराण छान

तसा एकूण आकडा कदाचित साठ हजारच्या वर ही असावा
तिथे जाऊन शोध नाही लावायचाय
आधी शोध सूत्रावरून मनात एक-दोन नाव (शब्द) आली पाहिजेत. मग तिथे जाऊन फक्त खात्री करायची

रंगतदार झाला खेळ.
ज्या कुणी आयडी घेतलाय ऋषिबेला त्या आयडीने पण कदाचित एवढं डोकं खाजवलं नसेल आयडी घेताना. सहज मनात विचार आला हा.
बेला चा हा अर्थ माहीत नव्हता.

वर्णिता
तुमचे हे उत्तर प्रलंबित ठेवले होते.
३. विचारजंत
अपेक्षित उत्तर आणि यातील फरक आता लक्षात यावा.
अर्थात तेव्हा मूळ शोध सूत्र थोडे वेगळे होते. त्यादृष्टीने तुमचा विचार चांगला होता !

बेली/बेल असा शब्दच माहीत नव्हता. बरं झालं कळला ते.
इतका छान खेळ पेशंटली खेळवुन घेतल्या बद्दल, कुमार यांचे धन्यवाद.

इतका छान खेळ पेशंटली खेळवुन घेतल्या बद्दल, कुमार यांचे धन्यवाद.
शेवटी ते एक खुपच छान डॉक्टर आहेत.

जेम्स,
Bw
छान.
सगळे संपून गेल्यावर आलात.

सगळे संपून गेल्यावर आलात.
हो त्याचं दु:ख तर आहेच. पुढच्या वेळेस जोमात असेन. Happy
तुमच्या कल्पकतेला दाद.

खेळ छान झाला. सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार.

या प्रकारच्या खेळाचे वेगळेपण लक्षात घ्यावे. नियतकालिकांमधून नेहमीच्या प्रकारचे शब्दखेळ प्रकाशित होत असतात. ते मुक्त अशा प्रकारचे असतात. त्यामध्ये आपल्याला संपूर्ण भाषेमधले शब्दपर्याय उपलब्ध असतात.

हा खेळ मुद्दामच जरा वेगळा रचला. याचा परिघ मायबोली संस्थळ आहे. म्हणून त्यातलीच नावे ओळखायला ठेवली. इथे आपल्याला भाषिक ज्ञान, तर्क आणि आपला या संस्थळावरील वावर व निरीक्षण या सर्वांचा संगम करून खेळायचे आहे. नवख्या माबोकरासाठी हा खेळ उपयोगाचा नाही. थोडी गम्मत आणि थोडी गूढता हा यामागचा हेतू आहे.
सर्व सहभागी मंडळींच्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल.

बेला m A cocoanut hollowed to serve as a vessel.

पु. नारळ, बेलफळ इ॰ आंतून कोरून तयार केलेलें पात्रं >>>
बेला शब्द माहीत नव्हता.

मजा आली पण शोधाशोध करताना.

मेघना
तुम्ही जेव्हा मुनी शब्द लिहिलात तेव्हा एकदम हायसे झाले सर्वांना.
ऋषी मुनी हे आपण जोडीने लहानपणापासून ऐकतो. मला आश्चर्य वाटत होते की बाबा आणि साधू च्या पलीकडे कोणीच का शब्द काढत नाहीये !
असे करत अखेर आपण ऋशि पर्यंत पोचलो.

तुम्ही दिलेल्या सदस्यनामांच्या लिंकवर ऋ टाईप केला तर थोडीफार नावं आली. सर्वच येत नाही.

होय सस्मित थोडीच येतात. तुम्हाला त्या त्या पानावर जावे लागते मग सर्व त्या त्या अक्षरानुसार सुरु होणारी नावे वाचता येतात.

सस्मित
बरोबर .म्हणूनच म्हटले की तसा शब्दशोध घेता येणार नाही. आपल्या मनात एखादे नाव पक्के झाले की मग ते असल्याची किंवा नसल्याची खात्री करण्यासाठी ते पूर्णपणे तिथे टाईप करावे लागेल.
ही शोध सुविधा गुगल दर्जाची नसावी असे आपले माझे मत.
....
खेळ चालू असताना जेव्हा काही अनपेक्षित किंवा पर्यायी बरोबर वाटणारी उत्तरे आली तेव्हा मी देखील तिथे जाऊन संबंधित नाव पूर्णपणे टाईप केले आणि मग मला हो का नाही ते उत्तर मिळाले

Pages