माबो गंमतगूढ : आपणच ओळखू आपल्याला !

Submitted by कुमार१ on 5 September, 2021 - 02:58

आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !

खाली ६ शोधसूत्रे दिलेली आहेत. ती शास्त्रशुद्ध गूढ प्रकारची नसून एक प्रकारे गंमतगूढ आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.

तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत.

शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.

हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी.

ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात कुठेही अंक नाहीत.

सूत्रे :

१. हाताची बोटे मोजून अधिकार गाजवतो (५)

२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)

३. तिथे भरारी मारल्यानंतर पावित्र्य मिळाले (५)

४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५)

५. भटक्याने आडनाव लावले (५)

६. आवेशात पलंगावर टेकला
(५
)
......
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.

ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल. मात्र तुमचे उत्तर हे इथले सदस्य नाम हवेच

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगि/मुनी/मुनि

मेघना यांच्यासारखाच अजून एक शब्द शोधा
जमेल तुम्हाला
....
चला आता मी जेऊन येतो
तुम्ही पण जरा ऊर्जा भरा....

वरील सर्व नाही
चार अक्षरी आहे
......
साधनेच्या बाबतीत आपली थोर परंपरा.
आपली भाषाही किती समृद्ध.
मग तो दोन अक्षरी शब्द जवळ येऊनही आपल्याकडून का हुकतोय !
मेघना जवळपास पोचत होत्या ना....

जरबेरा नाही
स्पष्टीकरण?
साधक +पात्र ?

विजयी चौकारासाठी रोमहर्षक झुंज...
आता आपण एक तासाची मुदत ठेवू आणि समारोप करू.
सर्वांचे प्रयत्न आणि शोधयात्रा उत्तम
हेच महत्त्वाचे आहे..

भिक्षापात्र
करपात्र
दानपात्र
ही सदस्यनामं असतील अशी शंकापण नाही Lol

मानव
आता त्या दोन पैकी एक शब्द पकडा आणि मग माबोसूचीचा अंदाज घेत त्याला एक कोरलेले पात्र जोडा

ठीक आहे ,आता मी ही तुमच्या बरोबर मैदानात उतरलो आहे
अर्थात जाहीर केलेले बक्षीस रद्द झालेले आहे हे सांगणे न लगे !
आधी पहिली दोन अक्षरे जी पक्की होत आलीच आहेत ती करू या आणि मग ते पात्र कोरून काढूया

Pages