आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !
खाली ६ शोधसूत्रे दिलेली आहेत. ती शास्त्रशुद्ध गूढ प्रकारची नसून एक प्रकारे गंमतगूढ आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.
तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत.
शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.
हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी.
ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात कुठेही अंक नाहीत.
सूत्रे :
१. हाताची बोटे मोजून अधिकार गाजवतो (५)
२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)
३. (५) तिथे भरारी मारल्यानंतर पावित्र्य मिळाले
४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५)
५. भटक्याने आडनाव लावले (५)
६. आवेशात पलंगावर टेकला)
(५
......
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.
ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल. मात्र तुमचे उत्तर हे इथले सदस्य नाम हवेच
टप्पू हे आडनाव
टप्पू हे आडनाव
.....
संपूर्ण शोधसूत्राचा एकाच शब्दात भावार्थ काढू नका
एव्हाना सूत्रांची रचना तुमच्या लक्षात आली असेल.
एका शब्दासाठी काही भिन्न कल्पना एकत्र केल्या आहेत
एवढेच राहिले:
एवढेच राहिले:
२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)
४.
जोडीने यात्रा करताय का राजे !(५)४. सहजराव?
२. संयोजक सं(-त) + योजक
४. सहजराव?
४. सहजराव
४. सहजराव
अगदी बरोबर मानव
स +हज + राव
२. संयोजक हेही बरोबर
२. संयोजक हेही बरोबर
छान विजयी चौकार.!
सं(-त) + योजक
छान कोडं आणि उत्तम प्रतिसाद,
छान कोडं आणि उत्तम प्रतिसाद, वर्णिता आणि मानव.
सर्व उत्तरे एकत्र
सर्व उत्तरे एकत्र
१. हाताची बोटे मोजून अधिकार गाजवतो (५).... पाचपाटील
२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४).... संयोजक
३. तिथे भरारी मारल्यानंतर पावित्र्य मिळाले (५)... आकाशगंगा
४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५).... सहजराव
५. भटक्याने आडनाव लावले (५)... उनाडटप्पू
६. आवेशात पलंगावर टेकला (५).... धडाकेबाज
…..
सर्व सहभागी व यशस्वी सभासदांचे अभिनंदन !
मस्त होतं कोडं.
मस्त होतं कोडं.
भारी कोड होत कुमार सर..मस्त च
भारी कोड होत कुमार सर..मस्त च.
धन्यवाद
धन्यवाद
तुम्ही मंडळी येईपर्यंत संपून गेलं !
सॉलिड!!!
सॉलिड!!!
भारी कोड होत कुमार सर..मस्त च
भारी कोड होत कुमार सर..मस्त च.
+१११
तुम्ही मंडळी येईपर्यंत संपून
तुम्ही मंडळी येईपर्यंत संपून गेलं>>>>हो ना..आज सुट्टी म्हणून इकडे येणं झालं नाही..
मजा आली, छान च होतं कोडं
मजा आली, छान च होतं कोडं
अरे वा!
अरे वा!
मजा आली, छान च होतं कोडं >> +1
आपण हा खेळ कंटिन्यू करू शकतो
आपण हा खेळ कंटिन्यू करू शकतो की इथेच...कुणीही कोडं घाला..आणि इतरांनी ते सोडवायचा प्रयत्न करा.....
वर्णिता छान खेळलीस
वर्णिता छान खेळलीस
धन्यवाद.
धन्यवाद.
*कुणीही कोडं घाला..आणि इतरांनी ते सोडवायचा प्रयत्न करा..... >>> +१
कोणी देत असेल तर सांगून ठेवा
कोणी देत असेल तर सांगून ठेवा
मागच्या वेळेस ज्यांना भाग घेता आला नाही त्यांच्यासाठी मी तयार करतोय .
देऊ शकतो.
नवी शोधसूत्रे :
नवी शोधसूत्रे :
(नव्या खेळाडुंनी वर धाग्यातील माहिती आधी पूर्ण वाचावी).
१. घातल्यावर आराम. काढल्यावर गायब (५)
२. आजोबा कधी बाळंत होतात ? (४)
३. मुक्त असलेला हल्ला करतो (५)
४. एक मुलगा आकाशात जाऊन बसतो (५)
५. अशुद्ध गुरुने कोरून केले पात्र (४)

…….
कोणीही सोडवू शकता.
आज एकच सोडवायचा प्रयत्न करते.
आज एकच सोडवायचा प्रयत्न करते.
3 ... विचारजंत ??
३. विचारजंत
३. विचारजंत
हे अपेक्षित उत्तर नाही .
तूर्त प्रलंबित ठेवतो
अन्य कोणी उत्तर दिल्यावर अधिक विचार करू.
छान प्रयत्न.
सदस्यनामाची यादी पहावी लागेल.
सदस्यनामाची यादी पहावी लागेल. प्रचंड मोठी आहे.
मानव
मानव
यादी बघुन इकडे नाही यायचं !
मी सांगतो कसं करायचं ते .
आधी तुम्ही सूत्रावरून एखादे तुमचे उत्तर तयार करायचे. आणि मग सूची- शोध सुविधेत ते नाव टाकून बघायचे
.मग व्यवस्थित जमते
.....
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.
ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल.
(सदस्य यादी भरपूर असल्याने ही शक्यता गृहीत धरलेली आहे)
कुमार सर, सूत्रावरून काही
कुमार सर, सूत्रावरून काही लक्षात येते, अंदाज बांधतो. त्यावरून मग ते जुळते की नाही यासाठी ते सदस्यनाम आहे की नाही हे पडताळून पहावे लागते, किंवा ते सदस्यनाम लक्षात असायला हवे. सदस्यनाम हे अर्थपूर्ण शब्द असतीलच असे नाही. उदा. उनाडटप्पू, विचारजंत इत्यादि कधी न ऐकलेले शब्द असू शकतात.
म्हणुन म्हणालो.
बरोबर.
बरोबर.
हा खेळ नेहमीच्या मुक्त शब्दखेळापेक्षा थोडा वेगळाच आहे .
काल वर्णिता आणि तुम्ही छान सोडवलेत की.
ज्यांचा पुरेसा वावर येथे आहे त्यांना फायदा मिळणार हे उघड आहे.
आज जी नवी पाच सूत्रे दिली
आज जी नवी पाच सूत्रे दिली आहेत त्यापैकी चारांची उत्तरे ही नेहमीचे मराठी शब्दच आहेत.
त्यामुळे अडचण येऊ नये असे वाटते
...
वर्णिता
तुम्ही कालच तुमचा अनुभव सांगू शकता.
म्हणजे सोडवायला खूप कठीण वाटले कि ठीक वाटले असा.
म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल.
हा प्रयोग आहे. सर्वांच्या सूचनामधून त्याचा विकास करता येईल
३ भटका कुत्रा
३ भटका कुत्रा
कृष्णा,
कृष्णा,
३ चूक.
हे सदस्य नाम नाही आणि सर्व अपेक्षित उत्तरे वर माहिती दिल्या नुसार सलग शब्द आहेत.
तुमचे उत्तर या दुव्यावर जाऊन सदस्यनाम असल्याची खात्री करता येईल
https://www.maayboli.com/maaybolikar?uid=%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%...
हे सदस्य नाम नाही आणि सर्व
हे सदस्य नाम नाही आणि सर्व अपेक्षित उत्तरे वर माहिती दिल्या नुसार सलग शब्द आहेत.>>
सॉरी सदस्य नाम भटक्या कुत्रा असे आहे!! -- https://www.maayboli.com/user/67505
पण सलग आहे म्हटल्यावर हे चुकीचेच!
Pages