कबीर सिंग - बहुधा २०१९ चा चित्रपट..
मग आज त्यावर का लिहावेसे वाटले?
.. कारण मी आज पाहिला. अगदी आता पाहिला.
तेव्हा का नाही पाहिला?
.. चित्रपट बघायची फार आवड नाही, वेळ नाही. कधी कानावर आले एखादा चित्रपट भारी आहे वा त्यात शाहरूख आहे वा मराठी आहे तरच बघायचे.
या चित्रपटाबद्दल कोणाकडून कळले?
.. मागे लॉकडाऊनमध्ये केस दाढी तुफान वाढवलेली. गॉगल काढून घराच्याच खिडकीत उभे राहून दोनचार फोटो काढलेले. दोन चार मित्रांनी कॉमेंट दिली, अरे हा तर कबीर सिंग. तेव्हा या चित्रपटाबद्दल पहिल्यांदा कळले.
मग आज का बघितला?
.. गाणी ! वेड लावणारी गाणी!
सहजच एक गाणे कानावर पडले. आवडले. कुठल्या चित्रपटातील आहे हे शोधताना कबीर सिंगचा अल्बम हाती लागला. एखादा अपवाद वगळता अख्खाच्या अख्खा अल्बम आवडला. रिपीट मोडवर ऐकू लागलो. माझ्यामते गेल्या तीन चार वर्षातील सर्वोत्तम म्युजिक अल्बम. फील येण्यासाठी मग यूट्यूबवर त्याचे विडिओ बघू लागलो. त्या गाण्यांच्या विडीओत जे प्रेमाचे उत्कट चित्रण दिसत होते त्यामुळे उत्सुकता वाढत होती. पण शाहरूखचा चाहता असल्याने एखादे यशस्वी न झालेले, दुख दर्द भरे, आणि कदाचित तसेच सॅड एंण्डींग असलेला चित्रपट बघायची हिंमत नव्हती.
बर्र मग? आज आली का ती हिंमत?
.. आली नाही केली. म्हटले जे काही आहे ते बघूया, अनुभवूया. कारण चित्रपट बघितल्यावर त्यातली गाणी आणखी आत उतरतात असा आजवरचा अनुभव आहे. जर यातली गाणी आधीच हृदयाला हात घालणारी असतील तर असेना एखादा काळीज पिळवटून टाकणारा चित्रपट, बघूया म्हटले.
मग काय बघितले? कसा वाटला चित्रपट?
.. ते नेमक्या शब्दात नाही सांगता येणार. मी काही चित्रपट समीक्षक नाही. पण जे पाहिले ते आयुष्यभर मनावर ठसून राहावे असे आहे.
काय आवडले? एका टपोरी, गुंडागर्दी करणार्या मवाली मुलाची लव्हस्टोरी?
.. का, टपोरी मुलांना प्रेम करायचा अधिकार नसतो का? कॉलेजात भाईगिरी करणार्या मुलांना पुढे आयुष्यात सुधारायचा अधिकार नसतो का? माझ्या शाळेतला याच कॅटेगरीतला एक अख्खा ग्रूप आज चांगले शिक्षण घेऊन सेटल झालाय. तर तेव्हा पुस्तकी किडे असणारे आज शाळेच्या व्हॉटसपग्रूपवर दर विकेंडला दारूच्या ग्लासांचे फोटो टाकत राहतात.
मग यात काय वेगळे केलेय? ते व्यसनांचे उदात्तीकरण नाही का?
.. वाटत नाही. वाईट काळात त्याने व्यसनांना जवळ केले. पण पुढे कुटुंबाच्या आणि स्वतःच्या प्रेमासाठी सुधारला तेव्हा व्यसनांना दूर सारले. याचा अर्थ व्यसने वाईट काळाचे सोबती असतात हाच संदेश दिलाय.
आणि बाहेरख्यालीपणा?
.. कोणावर जबरदस्ती तर नाही ना करत? प्रेयसीला विसरायला ईतर मुलींशी त्यांच्या मर्जीने शारीरीक संबंध ठेवायचा मार्ग निवडतो. पण अखेरीस प्रेमाची जागा ते घेऊ शकत नाही हेच त्याला समजते.
आणि ते दारू पिऊन सर्जरी करणे?
.. हे असे खरेच शक्य आहे की नाही कल्पना नाही. म्हणजे दारू पिऊन सर्जरी करणे, आणि त्याला सहकार्यांनी तसे करू देणे. शक्य नसल्यास त्याला दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य समजूया. पण जेव्हा एका अपघाताने त्याच्यावर केस पडते तेव्हा तो जे वागतो ते पाहता काय योग्य आणि काय अयोग्य हा संदेश प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोच.
म्हणजे चित्रपटात दाखवलेला सारा वाह्यातपणा योग्यच आहे का?
.. बिलकुल नाही. तो वाह्यातपणा म्हणूनच स्विकारायचा. पण अश्या व्यक्तीलाही प्रेम काय आणि किती सुधरवू शकते हे बघावे. बाकी वाह्यात ईथे कोण नाहीये? पर्रफेक्ट पुरुषोत्तम ईथे कोण आहे? छे, उत्तराची अपेक्षा नाहीये. येऊ द्या तुमचा पुढचा प्रश्न!
रागावला की कसाही वागतो तो. कोणालाही मारतो तो. प्रेयसी असो, वा तिचे बाबा, वा आपलेच मित्र, आपलाच भाऊ .... ??
.. अच्छा म्हणजे शॉर्ट टेंपर, शीघ्रकोपी. झाल्यास विक्षिप्तही म्हणा. स्वभावाचा भाग आहे हा. अनुभवावरून सांगू शकतो. जे खरेच आपलेच असतात तेच अश्यांशी डील करू शकतात. थोडी लोकं दुखावली जातात, थोडी नाती दुरावतात. जवळची म्हणावी अशी माणसे कमीच उरतात आयुष्यात. पण ती माणसे मात्र जीवापाड प्रेम करणारी भेटतात. कारण म्हणूनच टिकली असतात. मित्र बघितला ना कसा भेटतो त्याला. चित्रपटाचे नाव कबीर सिंग नसते तर कदाचित मी ते विसरलो असतो, पण त्या शिवाला विसरणार नाही कधी.
म्हणून मग अश्या स्वभावाचे उदात्तीकरण?
.. छे, पुन्हा तोच शब्द. उदात्तीकरण कुठे दिसले यात. त्याचीच फळे तर भोगतो.
हो, फळे भोगतो. पण शेवटी तर फळे चाखतोच. शेवट गोडच केलाय त्याच्यासाठी
.. बिलकुल! त्याचसाठी तर चित्रपट आवडला. तेव्हाच तर डोळ्यात पाणी आले. त्याचे वाईट झालेलेच दाखवायला हवे होते असे जे तुम्हाला वाटत होते त्यालाच अनुसरून चित्रपटाचा शेवट असणार याची खात्री होती मला. ती मनाची तयारीही केली होती. असेना कोणी वाह्यात, कोणाचे वाईट झालेले नाही आवडत मला. कारण परीस्थिती बदलते तशी माणसे बदलतात हा विश्वास आहे मला. लोकांच्या आयुष्यात चांगले घडले तर ती सुद्धा चांगली वागतात असा माझा समज आहे.
बर्र ते जाऊ द्या, शेवटी हा पिक्चर आहे. कोणी किती सिरीअसली घ्यायचे ते ज्याच्या त्याच्यावर सोडूया
.. बरं सोडले, तुम्हीच धरून होता एवढावेळ
मला सांगा एक कलाकृती म्हणून काही मूल्य आहे की नाही?
.. काय मूल्य हवे.
तांत्रिकदृष्ट्या तर हल्लीचे सारेच चित्रपट सरस असतात. पण पटकथा आणि तिची एडीटींग अशी आहे की चित्रपटात एक क्षण बोअर होत नाही. सतत दुसर्या क्षणाला काय होणार याची उत्सुकता वाटून राहते.
अभिनयात म्हणाल तर शाहीद कपूरने निव्वळ राडा केला आहे. आता ईथून दहा वर्षे तरी मला शाहीद कपूर म्हटले की कबीर सिंगच आठवणार हे नक्की!
हिरोईनला अभिनय येतो की नाही कल्पना नाही पण तिच्या एक्स्प्रेशनलेस चेहर्याचा ईतका उत्तम वापर करून घेतला आहे की जेव्हा अखेरीस तिच्या चेहर्यावर काही एक्स्प्रेशन दिसतात ते बघूनच काळीज गलबलून येते.
आणि गाणी तर फक्त आणि फक्त चुम्मा आहेत!!!
हे घ्या यूट्यूबवर जाऊन ऐकून या सारी. लिंक देतो गाण्यांची. चित्रपट आपला आपण शोधून बघायचा.
https://www.youtube.com/watch?v=BDlNjOc3wiQ
- ऋन्मेष
Swag, attitude, style, x
Swag, attitude, style, x-factor इत्यादी गोष्टी टीनेजरचे लक्ष वेधून घेणे आणि आकर्षित करणे हे स्वाभाविक आहे.
परंतु हे सर्व व्यसने आणि दुर्गुणांमधूनच येतात हा गैरसमज आहे.
उलट वाईट मार्गाला न लागता हे गुण दाखवता आले तर ती कमाल. ते जास्त आकर्षित करते.
टिनेज असताना ही मला पोलाईट
टिनेज असताना ही मला पोलाईट बोलणारा विनोदबुद्धी वालाच मुलगा आवडेल जो इतरांच्या मताचा आदर करेल मग त्याने दारू/सिगारेट काहीही करोत! वरण भात खाओ का मटण हाणो.
यावर कोणीतरी वेगळा धागा
यावर कोणीतरी वेगळा धागा काढायला हवा
का? तीचं सावरलेलं नशिब परत
का? तीचं सावरलेलं नशिब परत फुटतं म्हणून का? >>>> आशु
ऋन्मेष वेगळा धाग्याची गरज नाही. धाग्याचे नाव आठवत नाही, पण ' परिचित ' ने असा धागा काढला आहे ( why women / girls like bad guys )
why women / girls like bad
why women / girls like bad guys
>>>
हा थेट निष्कर्ष झाला.
हे खरे असते तर भारतीय महिलांना पडद्यावरचा शाहरुख आवडला नसता..
धागा असावा की नेमकी कशा प्रकारची मुले आवडतात. वेगवेगळ्या वयात...
हे परिचित वाल्याच धाग्यात पण
हे परिचित वाल्याच धाग्यात पण डिस्कस करता येईल. पण लग्न झालेल्यांनी त्यांच्या मुली मुलांसाठी म्हणून हा विचार चालला असावा असा मी स्वत:चा समज करून घेते.
चिकवा धाग्यावरून प्रतिसाद
चिकवा धाग्यावरून प्रतिसाद कॉपीपेस्ट
--------------------------------------------------
कथेच्या नायकात बरेच दुर्गुण दाखवले होते. पण त्यामुळे त्याची कशी वाताहत होते हेच दाखवले होते.
म्हणजेच दुर्गुणांचे उदात्तीकरण नव्हते.
अन्यथा चित्रपटात हिरो स्टाईल म्हणून ऐटीत दारू सिगारेट पिताना दाखवतात ते मला उदात्तीकरण वाटते. त्याने पब्लिक इंप्रेस होत अनुकरण करते.
मी सुद्धा कबीरसिंग बद्दल वाईट साईट ऐकून बराच लेट पाहिला.
पण जेव्हा बघितला तेव्हा त्यावर धागा काढलेला.
म्हणजे मला तरी तो चित्रपट बघितल्यावर आयुष्यात, किंवा नात्यात कसे वागू नये हे समजले होते. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.
बॉलीवूडमध्ये जुने कैक चित्रपट आहेत ज्यात हिरो हिरोईनचा पाठलाग करतो, ज्याला ईंग्रजीत stalking असे म्हणतात, अशी मवाल्यासारखीच हरकत आधी स्वता करून मग इतर मवाल्यांना मारून हिरोईन पटवतो, जे फार कूल आहे असे दाखवले जायचे. त्या हिरोला स्विकारणारी देखील जनता माझ्या मागच्या पिढीत होती.
त्याच्याशी कम्पेअर करता कबीर सिंग हा आव न आणता ग्रे शेड मध्येच रंगवला आहे म्हणून प्रामाणिक वाटला. ज्यात त्याच्यातील गुणांना गुण आणि दुर्गुणांना दुर्गुण म्हणूनच दाखवले आहे.
बाई दवे,
कबीर सिंग गाण्यांचा एक सेपरेट फॅन बेस आहे.
प्रेमाचे, विरहाचे, सारे रंग त्यात दिसतात... कम्प्लीट लव्हस्टोरी अल्बम आहे.. यावर एक स्वतंत्र धागा काढता येईल.
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2023 - 14:15
बाई दवे, ऋन्मेष, त्याच
बाई दवे, ऋन्मेष, त्याच दिग्दर्शकाचा अॅनिमल पाहिला का?
सोमीवर सॉलिड शिव्या पडतायेत.
अजून कोणी धागा कसा काढला नाही अॅनिमलवर?
ऍनिमल वाह्यात बनवला असेल.
ऍनिमल वाह्यात बनवला असेल. त्यावरून कबीर सिंग बद्दलचे माझे मत बदलत नाही मी.
किंबहुना कालच मी एका रिव्ह्यूमध्ये वाचले की कबीर सिंग मध्ये जसे कॅरेक्टर डेव्हलप केले होते तसे यामध्ये झाले नाही. खूप उथळ बनवला आहे.
मला तर ट्रेलर बघूनच भडक आणि नॉट माय टाईप वाटला होता..
साडेतीन तास वेळ आहे. ओटीटी वर तरी बघेल की नाही शंका.. पण चर्चा होत आहे तर उत्सुकता म्हणून बघेन वाटते.
बाई दवे,
शाहीद कपूर सुद्धा कधी उथळ चित्रपटात काम करणार नाही असे वाटते. याबाबतीत त्याच्यावर देखील मला विश्वास आहे. पंकज कपूरचा मुलगा असल्याने देखील आहे.
शाहीद कपूर सुद्धा कधी उथळ
शाहीद कपूर सुद्धा कधी उथळ चित्रपटात काम करणार नाही असे वाटते. >> उथळ उदाहरण दिले असते पण मग तू म्हणशील कि मला तो सिनेमा उथळ वाटत नाही त्यात कॅरॅक्टर डेव्हलप केले गेले आहे किंवा गाणी चांगली आहेत वगैरे
खुद्द पंकज कपूर ने बरीच पाट्या टाकणारी नि उथळ कामे केलेली आहेत तेंव्हा फक्त त्याचा मुलगा ह्या क्वालीफिकेशन्स वर विश्वास ठेवणे धाडसी आहे. शाहीद जनरली चांगले रोल्स असलेले सिनेमे करतो असे मी म्हणेन.
द्या उथळ उदाहरणं.. पटले तर
द्या उथळ उदाहरणं.. पटले तर ओके बोलेन. कदाचित मी तो चित्रपट पाहिला नसल्याने माझ्या मताला धक्का लागला नसेल.. पण याबाबत ठाम मत असे काही नाही.
बाकी मला उथळ म्हणजे वाह्यात बीभत्स अश्या अर्थाने अभिप्रेत आहे..
बरेचदा समांतर किंवा कलात्मक चित्रपट म्हणतात त्यात बोल्ड विषय हाताळले जातात.. पण तो पैसा किंवा प्रसिद्धीसाठी केलेला वाह्यातपणा नसतो.
चिकवा धाग्यावर जे शाहरूख
चिकवा धाग्यावर जे शाहरूख बद्दल लिहिले तेच सलमानला सुद्धा लागू होते. भले त्याची रीअल इमेज आणि त्याचे प्रत्यक्षातले वागणे कसेही असो, पण त्याचेही चित्रपट फॅमिली ऑडीयंससाठी असतात. यामागे कमर्शिअल गणित असेलही पण सोबत नक्कीच वडील सलीम खान यांचे संस्कार असणार.. ग्रेट माणूस!
बाकी मला उथळ म्हणजे वाह्यात
बाकी मला उथळ म्हणजे वाह्यात बीभत्स अश्या अर्थाने अभिप्रेत आहे.. >> तो नेहमीप्रमाणे गोलपोस्ट बदलणे सुरू केलेस बघ
वाह्यात नि बीभत्स ह्यामधे भली मोठी गॅप आहे. फक्त सेक्स्युअली असणे जरुरी नाही.
वाह्यात नि बीभत्स ह्यामधे भली
वाह्यात नि बीभत्स ह्यामधे भली मोठी गॅप आहे. फक्त सेक्स्युअली असणे जरुरी नाही.
.....
हो माहीत आहे. दोन्ही शब्द वेगळे आहेत आणि मी वेगळे अर्थानेच वापरले आहेत. माझा दोन्हींवर आक्षेप आहे.
उथळ हा शब्द बरेच अर्थाने वापरला जाऊ शकतो. म्हणून क्लिअर केले..
तो हड्डी नामक भडक सिनेमा
तो हड्डी नामक भडक सिनेमा पाहील्यापासून .... भीतीच बसलीये. कोणी एखादा सिनेमा भडक आहे म्हटलं की हड्डी सिनेमाच आठवतो मला.
हड्डी नाव मी पहिल्यांदा ऐकले.
हड्डी नाव मी पहिल्यांदा ऐकले..
नावच किती तामसी आहे..
गूगल केले नवाझुद्दीन दिसला.. अनुराग कश्यप नाव आले..
मी हड्डी बघायला घेतला होता
मी हड्डी बघायला घेतला होता नवाझुद्दीन बघून पण सुरवात काही विशेष वाटली नाही, किंबहुना काहीच रस वाटला नाही म्हणुन सोडून दिला, म्हटले नंतर रिव्ह्यूज वाचून रेको असेल तर बघावा.
नवाझुद्दीन बघून कधी पिक्चर
नवाझुद्दीन बघून कधी पिक्चर बघायचा निर्णय घेऊ नये. बरेच आचरट चित्रपट करतो तो..
नवाझुद्दीन बघून कधी पिक्चर
नवाझुद्दीन बघून कधी पिक्चर बघायचा निर्णय घेऊ नये. बरेच आचरट चित्रपट करतो तो..
Pages