कबीर सिंग - बहुधा २०१९ चा चित्रपट..
मग आज त्यावर का लिहावेसे वाटले?
.. कारण मी आज पाहिला. अगदी आता पाहिला.
तेव्हा का नाही पाहिला?
.. चित्रपट बघायची फार आवड नाही, वेळ नाही. कधी कानावर आले एखादा चित्रपट भारी आहे वा त्यात शाहरूख आहे वा मराठी आहे तरच बघायचे.
या चित्रपटाबद्दल कोणाकडून कळले?
.. मागे लॉकडाऊनमध्ये केस दाढी तुफान वाढवलेली. गॉगल काढून घराच्याच खिडकीत उभे राहून दोनचार फोटो काढलेले. दोन चार मित्रांनी कॉमेंट दिली, अरे हा तर कबीर सिंग. तेव्हा या चित्रपटाबद्दल पहिल्यांदा कळले.
मग आज का बघितला?
.. गाणी ! वेड लावणारी गाणी!
सहजच एक गाणे कानावर पडले. आवडले. कुठल्या चित्रपटातील आहे हे शोधताना कबीर सिंगचा अल्बम हाती लागला. एखादा अपवाद वगळता अख्खाच्या अख्खा अल्बम आवडला. रिपीट मोडवर ऐकू लागलो. माझ्यामते गेल्या तीन चार वर्षातील सर्वोत्तम म्युजिक अल्बम. फील येण्यासाठी मग यूट्यूबवर त्याचे विडिओ बघू लागलो. त्या गाण्यांच्या विडीओत जे प्रेमाचे उत्कट चित्रण दिसत होते त्यामुळे उत्सुकता वाढत होती. पण शाहरूखचा चाहता असल्याने एखादे यशस्वी न झालेले, दुख दर्द भरे, आणि कदाचित तसेच सॅड एंण्डींग असलेला चित्रपट बघायची हिंमत नव्हती.
बर्र मग? आज आली का ती हिंमत?
.. आली नाही केली. म्हटले जे काही आहे ते बघूया, अनुभवूया. कारण चित्रपट बघितल्यावर त्यातली गाणी आणखी आत उतरतात असा आजवरचा अनुभव आहे. जर यातली गाणी आधीच हृदयाला हात घालणारी असतील तर असेना एखादा काळीज पिळवटून टाकणारा चित्रपट, बघूया म्हटले.
मग काय बघितले? कसा वाटला चित्रपट?
.. ते नेमक्या शब्दात नाही सांगता येणार. मी काही चित्रपट समीक्षक नाही. पण जे पाहिले ते आयुष्यभर मनावर ठसून राहावे असे आहे.
काय आवडले? एका टपोरी, गुंडागर्दी करणार्या मवाली मुलाची लव्हस्टोरी?
.. का, टपोरी मुलांना प्रेम करायचा अधिकार नसतो का? कॉलेजात भाईगिरी करणार्या मुलांना पुढे आयुष्यात सुधारायचा अधिकार नसतो का? माझ्या शाळेतला याच कॅटेगरीतला एक अख्खा ग्रूप आज चांगले शिक्षण घेऊन सेटल झालाय. तर तेव्हा पुस्तकी किडे असणारे आज शाळेच्या व्हॉटसपग्रूपवर दर विकेंडला दारूच्या ग्लासांचे फोटो टाकत राहतात.
मग यात काय वेगळे केलेय? ते व्यसनांचे उदात्तीकरण नाही का?
.. वाटत नाही. वाईट काळात त्याने व्यसनांना जवळ केले. पण पुढे कुटुंबाच्या आणि स्वतःच्या प्रेमासाठी सुधारला तेव्हा व्यसनांना दूर सारले. याचा अर्थ व्यसने वाईट काळाचे सोबती असतात हाच संदेश दिलाय.
आणि बाहेरख्यालीपणा?
.. कोणावर जबरदस्ती तर नाही ना करत? प्रेयसीला विसरायला ईतर मुलींशी त्यांच्या मर्जीने शारीरीक संबंध ठेवायचा मार्ग निवडतो. पण अखेरीस प्रेमाची जागा ते घेऊ शकत नाही हेच त्याला समजते.
आणि ते दारू पिऊन सर्जरी करणे?
.. हे असे खरेच शक्य आहे की नाही कल्पना नाही. म्हणजे दारू पिऊन सर्जरी करणे, आणि त्याला सहकार्यांनी तसे करू देणे. शक्य नसल्यास त्याला दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य समजूया. पण जेव्हा एका अपघाताने त्याच्यावर केस पडते तेव्हा तो जे वागतो ते पाहता काय योग्य आणि काय अयोग्य हा संदेश प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोच.
म्हणजे चित्रपटात दाखवलेला सारा वाह्यातपणा योग्यच आहे का?
.. बिलकुल नाही. तो वाह्यातपणा म्हणूनच स्विकारायचा. पण अश्या व्यक्तीलाही प्रेम काय आणि किती सुधरवू शकते हे बघावे. बाकी वाह्यात ईथे कोण नाहीये? पर्रफेक्ट पुरुषोत्तम ईथे कोण आहे? छे, उत्तराची अपेक्षा नाहीये. येऊ द्या तुमचा पुढचा प्रश्न!
रागावला की कसाही वागतो तो. कोणालाही मारतो तो. प्रेयसी असो, वा तिचे बाबा, वा आपलेच मित्र, आपलाच भाऊ .... ??
.. अच्छा म्हणजे शॉर्ट टेंपर, शीघ्रकोपी. झाल्यास विक्षिप्तही म्हणा. स्वभावाचा भाग आहे हा. अनुभवावरून सांगू शकतो. जे खरेच आपलेच असतात तेच अश्यांशी डील करू शकतात. थोडी लोकं दुखावली जातात, थोडी नाती दुरावतात. जवळची म्हणावी अशी माणसे कमीच उरतात आयुष्यात. पण ती माणसे मात्र जीवापाड प्रेम करणारी भेटतात. कारण म्हणूनच टिकली असतात. मित्र बघितला ना कसा भेटतो त्याला. चित्रपटाचे नाव कबीर सिंग नसते तर कदाचित मी ते विसरलो असतो, पण त्या शिवाला विसरणार नाही कधी.
म्हणून मग अश्या स्वभावाचे उदात्तीकरण?
.. छे, पुन्हा तोच शब्द. उदात्तीकरण कुठे दिसले यात. त्याचीच फळे तर भोगतो.
हो, फळे भोगतो. पण शेवटी तर फळे चाखतोच. शेवट गोडच केलाय त्याच्यासाठी
.. बिलकुल! त्याचसाठी तर चित्रपट आवडला. तेव्हाच तर डोळ्यात पाणी आले. त्याचे वाईट झालेलेच दाखवायला हवे होते असे जे तुम्हाला वाटत होते त्यालाच अनुसरून चित्रपटाचा शेवट असणार याची खात्री होती मला. ती मनाची तयारीही केली होती. असेना कोणी वाह्यात, कोणाचे वाईट झालेले नाही आवडत मला. कारण परीस्थिती बदलते तशी माणसे बदलतात हा विश्वास आहे मला. लोकांच्या आयुष्यात चांगले घडले तर ती सुद्धा चांगली वागतात असा माझा समज आहे.
बर्र ते जाऊ द्या, शेवटी हा पिक्चर आहे. कोणी किती सिरीअसली घ्यायचे ते ज्याच्या त्याच्यावर सोडूया
.. बरं सोडले, तुम्हीच धरून होता एवढावेळ
मला सांगा एक कलाकृती म्हणून काही मूल्य आहे की नाही?
.. काय मूल्य हवे.
तांत्रिकदृष्ट्या तर हल्लीचे सारेच चित्रपट सरस असतात. पण पटकथा आणि तिची एडीटींग अशी आहे की चित्रपटात एक क्षण बोअर होत नाही. सतत दुसर्या क्षणाला काय होणार याची उत्सुकता वाटून राहते.
अभिनयात म्हणाल तर शाहीद कपूरने निव्वळ राडा केला आहे. आता ईथून दहा वर्षे तरी मला शाहीद कपूर म्हटले की कबीर सिंगच आठवणार हे नक्की!
हिरोईनला अभिनय येतो की नाही कल्पना नाही पण तिच्या एक्स्प्रेशनलेस चेहर्याचा ईतका उत्तम वापर करून घेतला आहे की जेव्हा अखेरीस तिच्या चेहर्यावर काही एक्स्प्रेशन दिसतात ते बघूनच काळीज गलबलून येते.
आणि गाणी तर फक्त आणि फक्त चुम्मा आहेत!!!
हे घ्या यूट्यूबवर जाऊन ऐकून या सारी. लिंक देतो गाण्यांची. चित्रपट आपला आपण शोधून बघायचा.
https://www.youtube.com/watch?v=BDlNjOc3wiQ
- ऋन्मेष
गाणी आणि शाहिद अभिनय उत्तम.
गाणी आणि शाहिद अभिनय उत्तम. बाकी सर्व घाण, किळस येते आणि संताप पण येतो.
मेरी बंदी म्हणणे नॅचरल आहे? अर्रे, त्या बंदी ने अप्रूव्ह केलय का आधी? तिच्या मख्ख तोंडातून एक शब्द बाहेर पडत नाही, आणि हा उसकी चुप्पीमे उसकी हा होगी समजून तिला किस करतो. तिनी कोण मैत्रिण निवडावी ते हा सांगतो, वाह!
काहिहि चित्रपट... भिकार
The film was theatrically
The film was theatrically released in India on 21 June 2019 and received mixed reviews with criticism directed at it, though Kapoor's performance was praised. Grossing over 380 crore, it became the third highest grossing Bollywood film of 2019.
Wiki
चित्रपटाला चित्रपटा सारखे घ्या... इतके डोके का लावता?
चित्रपटाला चित्रपटा सारखे
चित्रपटाला चित्रपटा सारखे घ्या... इतके डोके का लावता? > चालायचंच. प्रत्येकजण आपले मत मांडतोय. मी नाही पाहिला अजून पण बघेन वेळ मिळाल्यावर.
'वो मेरी बंदी है' हे (किंवा
'वो मेरी बंदी है' हे (किंवा अशा अर्थाचं) आपण कुणीच कधीच आपल्या आजुबाजूला आजवर ऐकलेलं नाही काय? आजुबाजूला दिसू देत, पण पडद्यावर नको- या आग्रहाचं काय करायचं मग..
कबीर सिग हे 'पात्र' आहे. आणि ते तसंच आहे. त्याच्या प्रेमात तमाम सगळ्यांनी पडावं- असा सिनेमा बनवणार्यांचा हेतू आणि इच्छा नाहीच मुळात. लोकांना धक्का बसावा, आश्चर्य वाटावं (कुणाला तर राग आणि चीडही यावी) असंच ते पात्र वागतं. कबीर सिंग आणि मूळ सिनेम्याच्या दिग्दर्शकांच्या मुलाखती बघितल्या तर हे जास्त नीट कळेल कदाचित..
तिनी कोण मैत्रिण निवडावी ते
तिनी कोण मैत्रिण निवडावी ते हा सांगतो, वाह!
>>> अच्छा हे असेही दाखवलेले का? मिसले वाटते मी, आज पुन्हा बघायला हवा चित्रपट
पण हे माझी गर्लफ्रेंड वा माझी बायको मला आजही सांगते. हे सुद्धा कॉमन आहे फार. फक्त आजवर कुठल्या सिनेमात हे दाखवले नसेल. आजूबाजूला दिसते मात्र हे.
अॅक्चुअली आपला प्रॉब्लेम काय होतो माहीतेय, जे आजूबाजूला घडतेय ते सारेच आपल्याला पडद्यावर बघायला नको. भले मग ते चुकीचे आहे या आशयातून दाखवले तरी ते नकोय.
हाच लेख जसाच्या तसा मी माझ्या
हाच लेख जसाच्या तसा मी माझ्या शाळेच्या व्हॉटसपग्रूपवर टाकला.
तिथला प्रतिसाद बघा,
माझ्या वर्गातही एक टपोरी मुलांचा ग्रूप होता जो हुशारही असल्याने आता छान सेटल झालाय, सुधारलाय. त्यांना तो कबीर सिंग भावला.
पण त्याचवेळी शाळेत सिन्सिअर वा साधी मुले समजणारी जी मुले होती ती मात्र आता दर विकेंडला दारूच्या ग्लासांचे फोटो ग्रूपवर टाकत असतात. म्हणजेच घरातच पोराबाळांसमोर पित असतात. त्यांना मात्र हा कबीर सिंग पिक्चर बघून आपल्या पोराबाळांवर चुकीचे संस्कार होतील याची चिंता लागून राहिलेली दिसली
अॅक्चुअली आपला प्रॉब्लेम काय
अॅक्चुअली आपला प्रॉब्लेम काय होतो माहीतेय, जे आजूबाजूला घडतेय ते सारेच आपल्याला पडद्यावर बघायला नको. भले मग ते चुकीचे आहे या आशयातून दाखवले तरी ते नकोय.>>> राँग कनक्लुजन. बुद्धी कमी असलेले लोक त्याचा आदर्श मानत त्याचे अनुकरण करतात हे चूक आहे. तुझी बायको तुला कोण मैत्रिण निवडावी सांगते??? म्हणजे ती सांगणार आणि तू मान डोलवणार?? लॉल.
साजिरांचे म्हणणे पटले, एक भुमिका आहे ती, कुणाला आवडावी किंवा पटावी यासाठी काहिही नाहिये ह्यातले.
मला अगदी पिक्चर मध्ये साने
मला अगदी पिक्चर मध्ये साने गुरुजी कथा किंवा धर्मोपदेश असावा असे म्हणायचे नाहीये.
पण हिंसा, मिसोजिनी, चाईल्ड अब्युस असे विषय मुद्दाम रंगवून तिखट मीठ मारुन डिटेल मध्ये दाखवले जाऊ नये. पिक्चर वरुन चोरीच्या, दरोड्याच्या, एखाद्या अत्यंत हीन गुन्ह्याच्या, बलात्काराच्या आयडीया घेतलेलेही बरेच आहेत.
तुम्ही आम्ही आणि आजूबाजूचे लोक सिनेमांना आदर्श न मानण्याइतके सूज्ञ असले तरी दरभंगा जिल्ह्यातले एखादे टोळके नक्की नसू शकेल.
पूर्वी चित्रपटात लव्ह किंवा बेड सीन सेन्सर होतात म्हणून वाटेल ते दाखवायची लिबर्टी रेप सीन्स दाखवून घेणारेही बरेच चित्रपट प्रोफेशनल होते.
वाईट मुद्दाम त्यातले डिटेल्स समाजात सहज कॉपी करता येतील असे रंगवून रंगवून न दाखवता सिम्बॉलिकली दाखवा, वाईट पात्राला 'ही डझ नॉट गेट अवे विथ इट' आणि त्याला शिक्षा (भावनिक आणि शारीरीक) मिळते इतके तरी किमान दाखवा.
(फॅमिली मॅन २ मध्ये राजीवर सैनिकांनी अत्याचार केले हे असंच अतिशय सिम्बॉलिकली दाखवलं आहे.आपल्याला कथेतला तो भाग तोवर माहित नसतो आणि तरीही कळतं नक्की काय झालंय.)
चांगले वागणारी रोल मॉडेल पात्रे असली त्यांचे वागणे डिटेल मध्ये दाखवा.त्यांना काही न काही मार्गाने (प्रेम/पैसा/प्रसिद्धी/समाधान) वागण्याचे रिटर्न्स मिळालेले दाखवा.
(फार भाबडे आणि आदर्शवादी बोलत असेन तर मूर्ख म्हणून सोडून द्या.)
पण बाबांचा विचार करून सोडले
पण बाबांचा विचार करून सोडले असल्यास त्यात कुठलाही त्याग नाही
बाबा पहिले, प्रियकर सारे नंतर >>>> हे वाक्य ओळखीचं वाटतंय मला
पण इथल्या हीरवीणीला लागू नाहीये , बरोबर ना ऋ ?
पण हिंसा, मिसोजिनी, चाईल्ड
पण हिंसा, मिसोजिनी, चाईल्ड अब्युस असे विषय मुद्दाम रंगवून तिखट मीठ मारुन डिटेल मध्ये दाखवले जाऊ नये
>>>>
यातही बरेच संभाव्य सीन टाळले आहेत.
जसे की अश्लील बेडसीन नाहीयेत. अन्यथा कथेनुसार बरेच सीन सहज खपले असते जे टाळले आहेत.
शिव्यांचा ओवरडोस नाहीये. जिथे गरज आहे तिथेच संताप दाखवायला एखादी दाखवली आहे. उगाच गुंडा कॅरेक्टर ऊभे करायला हिरोच्या तोंडी बेछूट शिव्या दाखवल्या नाहीयेत. अर्थात काही हातवारे दाखवले आहेत. समजेल त्याला समजेल. पण हिरोचा मित्रांचा ग्रूपही आपसात कसलीही अर्वाच्य भाषा न वापरता बोलतात.
हिरोईनची छेड काढायला काही पोरे तिला रंग लावतात ते दृश्य दाखवलेच नाहीये. थेट असे झाले असा उल्लेख आहे.
हिंसाचार दाखवताना कुठेही रक्ताळलेले चेहरे, विकृतपणे केलेली मारामारी, हिंस्त्रपणे दगड उचलून डोक्यात घालणे वगैरे प्रकार टाळले आहेत. शाहीदचे शॉर्ट टेंपर असणे हा जो कथेचा आत्मा आहे त्याला गरजेचे आहे तेवढेच दाखवले आहे असे मला तरी वाटते. अर्थात प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात याबाबत त्यामुळे मतमतांतरे असू शकतात.
तुझी बायको तुला कोण मैत्रिण
तुझी बायको तुला कोण मैत्रिण निवडावी सांगते??? म्हणजे ती सांगणार आणि तू मान डोलवणार?? लॉल.
>>>>
लॉल कश्याला? आपल्या जोडीदाराने कोणाबरोबर संगत करावी वा नाही याबाबत मत राखण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्ती राखून आहे. आणि मी तिच्या या मताचा आदर करतो.
जर तिला वाटले की माझा एखादा मित्र बेवडा आहे, मलाही नादाला लावेल. आणि तिच्या संसारात दारू प्रवेश करेल तर ती मला त्याची संगत टाळायला सांगू शकतेच.
जर तिला वाटले माझ्या एखाद्या मैत्रीणीची नियत ठिक नाही. ती माझ्यावर डोरे टाकू शकते आणि एखाद्या नाजूक क्षणी माझाही पाय घसरू शकतो तर संभाव्य तिढा टाळायला ती मला त्या मैत्रीणीपासून दूर राहायचा सल्ला देऊ शकते.
त्यानंतर तो सल्ला नुसती मान डोलावून मानायचा की सारासार विचार करून मानायचा, धुडकवायचा, काय निर्णय घ्यायचा हे पुढे माझ्यावर आहे. पण तिचा सल्ला द्यायचा हक्क अबाधित आहेच.
पण इथल्या हीरवीणीला लागू
पण इथल्या हीरवीणीला लागू नाहीये , बरोबर ना ऋ ?
>>>>
बिलकुल लागू आहे. पण तो निर्णय तिचा स्वत:चा हवा ना. जेव्हा तिने पसंद केलेला मुलगा बाबांना पसंद नसेल आणि निर्णय घ्यायची वेळ येईल तेव्हा प्रियकरासोबत जावे की बाबांसोबत राहावे हा निर्णय तिचा स्वत:चा हवा ना आणि जे घेईल तो दोघांना मान्य हवा.
अवांतर : ऋन्मेष सर,
अवांतर : ऋन्मेष,
एक कन्नड सिनेमा आहे DIA , खू प च सुंदर, डिसेंट पण ट्रैजिडी लव स्टोरी सिनेमा.. प्राईमवर.. तुम्हाला जमलं तर पाहा सबटायटल्स आहेत आणि जमलं तर त्या सिनेमावर लिहा ना...
आम्ही तो सिनेमा पाहिल्यावर आठवडाभर तरी त्यातून बाहेर पडलो नव्हतो.
तेवढे माझ्या नावासमोरचे सर
तेवढे माझ्या नावासमोरचे सर पहिले काढा. तुमचा हेतू माहीत नाही पण मला उगाच ते टिंगल उडवल्यासारखे वाटते
सिनेमे मी कमीच बघतो. या विकेंडला तर पिकनिकला जात असल्याने शक्य नाही. पुढच्या विकेंडला सिनेमा बघायचा मूड आला तर हाच बघेन. त्यावर लिहावे की नाही हे पुढे मूडवर आहे. पण बघण्यासाठी एक चांगला सिनेमा सुचवलात याबद्दल धन्यवाद _/\_ जे पिक्चर विचार करायला लावतात, ते आवडतातच.
काढले बरं सर
काढले बरं सर
दिया सिनेमा मागच्या वर्षी
दिया सिनेमा मागच्या वर्षी पाहिलेला. खरोखर भारी आहे.
Engaeyum Eppothum नावाचा एक टॉपक्लास तमिळ सिनेमा आहे. ती पण अशीच एक ट्रॅजिक लव्ह स्टोरी आहे.
Engaeyum Eppothum नावाचा एक
Engaeyum Eppothum नावाचा एक टॉपक्लास तमिळ सिनेमा आहे.>>>>>>>>
हा सिनेमा मी तेलुगु मधे पाहिला होता journey नावाने.
जबरदस्त सिनेमा....गाणी पण श्रवणीय..
हा सिनेमा मी तेलुगु मधे
हा सिनेमा मी तेलुगु मधे पाहिला होता journey नावाने.>>> मराठीतल्या हॅपी जर्नी सारखा आहे का?
नाही...
नाही...
वेगळाच आहे.. ह्रदयस्पर्शी..पैरलली तीन चार गोष्टी चाललेल्या असतात आणि शेवटी ट्रेजिकली एकत्र येतात.
प्रेक्षकांना रडवतील हे मात्र खरं.मी पाहून बरीच वर्षे झाली पण लक्षात आहे अजूनही व्यवस्थित
BDW हैप्पी जर्नी म्हणजे
BDW हैप्पी जर्नी म्हणजे प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णीचा ना?
यूटुबवर त्याचे हिंदी डब
यूटुबवर त्याचे हिंदी डब व्हर्जन मिळेल. २०११ चा आहे आणि मला पाहून पाच-सहा वर्षे झाली असतील पण भारी असल्याने लक्षात राहिला. मला जनरली रडवणारे सिनेमे फार आवडतात.
आमला पॉलचा मैना आणि विक्रमचा सेथु ज्यावर तेरे नाम बनला होता हे सुद्धा भारी ट्रॅजिक एन्ड सिनेमे आहेत. दक्षिणेतील मी पाहिलेला सगळ्यात भयानक स्याड सिनेमा म्हणजे २००८ चा सुब्रमणिपुरम ज्यावर अनुराग कश्यपने गॅंग ऑफ वासेपूर बनवला होता.
सिनेमाचा पुरेपूर आनंद घ्यायचा
सिनेमाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर ओरिजिनल भाषेत पाहावा(वीथ सबटायटल्स)..डबमधे गाणी,बैकग्राऊंड म्युझिक मिस होतं.
96 मी डबमधे पाहिला होता..नंतर गाणी ऐकली..इतकी आवडली गाणी कि...वाईट वाटलं हा सिनेमा तमिळ मधे का नाही पाहिला..मग जानू-तेलुगु आणि 99-कन्नड पण पाहून टाकला.
मी शक्य तिथे मूळभाषेतच पाहतो
मी शक्य तिथे मूळभाषेतच पाहतो पण याचे सबटायटलवाले व्हर्जन नाही सापडले म्हणून हिंदी सुचवला. सबटायटल नसेल तर मात्र मी डबिंगवाले पाहतो. ते डबिंग जनरली भयंकर विनोदी आवाजात असते. अपवाद म्हणून मल्याळम आणि बंगाली भाषिक चित्रपट त्या भाषेमुळे पाहण्याबरोबर ऐकायला फार आवडतात भले काही कळत नाही. असो बरेच अवांतर झाले आता.
मुंगारू मले... एके काळी फार
मुंगारू मले... एके काळी फार आवडला होता..
मुंगारू मले... >>>>> येस्स.
मुंगारू मले... >>>>> येस्स..जबरदस्त actor गणेश.
मुंगारु माले मधिल कुनिदू कुणी
मुंगारु माले मधिल कुनिदू कुणी दुबारे मला अजुनही आवडते गाणे
कबीर सिंग एक माणुस आहे. तो
कबीर सिंग एक माणुस आहे. तो वाईट वागतो. चिडतो. संतापतो. मारामार्या करतो. प्रेम करतो. खपुन अभ्यास करतो.
एवढं रीयल रेखाटलेलं पात्र मी आजवर पाहिलेलं नाही.
त्याने असं वागायला नको. हे चुक ते बरोबर!!!
त्याने चांगलंच वागायलाच पाहिजेच हा हट्ट कसा? का? अशी माणसं आपल्या आजुबाजुला कुणी पाहिलीच नसतील?
आहे हे असं आहे हे समजुन एखादी कथा सिनेमा कधी बघणार आपण? कबीर सिंग चं पात्र आवडलंच पाहिजे
, तो समाजाला दिशा देणार आहे असं काही आहे का? ती एक कथा आहे त्याच्या आयुष्याची. ज्यात त्याच्या चुकांचे परिणाम भोगतो. बहकतो. सावरतो. कोलमडतो. एक असंअसं घडलं त्याच्या आयुष्यात टाईप कथा. ज्यात मला तरी कबीरच्या कुठल्याही क्रृतीचं समर्थन, उदात्तीकरण दिसलं नाही.
संजू सिनेमा आवडीने बघणारे आणि हिरहिरीने बाजू मांडणारे लोक बघुन मी अवाक झाले होते.
अनुकरण तर स्मगलिंग करणार्या, भुरटा गुंड झालेल्या सुपरस्टार बच्चन पासुन रोड स्टाकिंग करणार्णया अक्षय कुमार ते अर्रधवट शिक्षण सोडून लग्न करणार्या सैराटचं , टाईमपास सारख्या सिनेमाचं पण होईल.
प्रितीच्या घरचं स्ट्रीक्ट वातावरण पाहता ती सहज कबीरच्या प्रेमात पडणं, तिला त्याचं हक्क दाखवणं, पँपर करणं आवडणं कळतं.
ऋ, ही इज अ सर्जन. नॉट अ ब्लडी मवाली गुंडा.
आणि तु जाती चे डीटेल मिस केलेस. श्रीमंत सर्जन मुलाला नाकारण्याचं कारण जात असेल.
कॉलेजमधे तिचे वडील भेटायला येतात तेव्हा टॉप केलेल्या
कबीरला विचारतात की तु कोट्यातुन आलास का इथे.
सस्मित छान पोस्ट
सस्मित छान पोस्ट
हो मी ते वाक्य ऐकलेले. पण मला त्यामागचा जातीचा संदर्भ कळला नसावा. मला वाटले त्यांना तो हुशार वाटला नसावा म्हणून कुठल्यातरी कोट्यातून आला असे म्हणाले असावेत.
सस्मित पोस्ट आवडली.
सस्मित पोस्ट आवडली.
संजू सिनेमा आवडीने बघणारे आणि
संजू सिनेमा आवडीने बघणारे आणि हिरहिरीने बाजू मांडणारे लोक बघुन मी अवाक झाले होते.
>>>>
तो सिनेमा रीअल कॅरेक्टरवर असल्याने त्यात उदात्तीकरण हाच हेतू असणार हे साहजिक आहे.
मी तो सिनेमा पाहिलाही नाही आणि पाहणारही नाही. कधी त्याचे गाणे लागले तरी मी बदलतो.
हेच मी त्या अझरुद्दीनवर निघालेल्या पिक्चरबाबतही करतो.
Pages