कबीर सिंग - बहुधा २०१९ चा चित्रपट..
मग आज त्यावर का लिहावेसे वाटले?
.. कारण मी आज पाहिला. अगदी आता पाहिला.
तेव्हा का नाही पाहिला?
.. चित्रपट बघायची फार आवड नाही, वेळ नाही. कधी कानावर आले एखादा चित्रपट भारी आहे वा त्यात शाहरूख आहे वा मराठी आहे तरच बघायचे.
या चित्रपटाबद्दल कोणाकडून कळले?
.. मागे लॉकडाऊनमध्ये केस दाढी तुफान वाढवलेली. गॉगल काढून घराच्याच खिडकीत उभे राहून दोनचार फोटो काढलेले. दोन चार मित्रांनी कॉमेंट दिली, अरे हा तर कबीर सिंग. तेव्हा या चित्रपटाबद्दल पहिल्यांदा कळले.
मग आज का बघितला?
.. गाणी ! वेड लावणारी गाणी!
सहजच एक गाणे कानावर पडले. आवडले. कुठल्या चित्रपटातील आहे हे शोधताना कबीर सिंगचा अल्बम हाती लागला. एखादा अपवाद वगळता अख्खाच्या अख्खा अल्बम आवडला. रिपीट मोडवर ऐकू लागलो. माझ्यामते गेल्या तीन चार वर्षातील सर्वोत्तम म्युजिक अल्बम. फील येण्यासाठी मग यूट्यूबवर त्याचे विडिओ बघू लागलो. त्या गाण्यांच्या विडीओत जे प्रेमाचे उत्कट चित्रण दिसत होते त्यामुळे उत्सुकता वाढत होती. पण शाहरूखचा चाहता असल्याने एखादे यशस्वी न झालेले, दुख दर्द भरे, आणि कदाचित तसेच सॅड एंण्डींग असलेला चित्रपट बघायची हिंमत नव्हती.
बर्र मग? आज आली का ती हिंमत?
.. आली नाही केली. म्हटले जे काही आहे ते बघूया, अनुभवूया. कारण चित्रपट बघितल्यावर त्यातली गाणी आणखी आत उतरतात असा आजवरचा अनुभव आहे. जर यातली गाणी आधीच हृदयाला हात घालणारी असतील तर असेना एखादा काळीज पिळवटून टाकणारा चित्रपट, बघूया म्हटले.
मग काय बघितले? कसा वाटला चित्रपट?
.. ते नेमक्या शब्दात नाही सांगता येणार. मी काही चित्रपट समीक्षक नाही. पण जे पाहिले ते आयुष्यभर मनावर ठसून राहावे असे आहे.
काय आवडले? एका टपोरी, गुंडागर्दी करणार्या मवाली मुलाची लव्हस्टोरी?
.. का, टपोरी मुलांना प्रेम करायचा अधिकार नसतो का? कॉलेजात भाईगिरी करणार्या मुलांना पुढे आयुष्यात सुधारायचा अधिकार नसतो का? माझ्या शाळेतला याच कॅटेगरीतला एक अख्खा ग्रूप आज चांगले शिक्षण घेऊन सेटल झालाय. तर तेव्हा पुस्तकी किडे असणारे आज शाळेच्या व्हॉटसपग्रूपवर दर विकेंडला दारूच्या ग्लासांचे फोटो टाकत राहतात.
मग यात काय वेगळे केलेय? ते व्यसनांचे उदात्तीकरण नाही का?
.. वाटत नाही. वाईट काळात त्याने व्यसनांना जवळ केले. पण पुढे कुटुंबाच्या आणि स्वतःच्या प्रेमासाठी सुधारला तेव्हा व्यसनांना दूर सारले. याचा अर्थ व्यसने वाईट काळाचे सोबती असतात हाच संदेश दिलाय.
आणि बाहेरख्यालीपणा?
.. कोणावर जबरदस्ती तर नाही ना करत? प्रेयसीला विसरायला ईतर मुलींशी त्यांच्या मर्जीने शारीरीक संबंध ठेवायचा मार्ग निवडतो. पण अखेरीस प्रेमाची जागा ते घेऊ शकत नाही हेच त्याला समजते.
आणि ते दारू पिऊन सर्जरी करणे?
.. हे असे खरेच शक्य आहे की नाही कल्पना नाही. म्हणजे दारू पिऊन सर्जरी करणे, आणि त्याला सहकार्यांनी तसे करू देणे. शक्य नसल्यास त्याला दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य समजूया. पण जेव्हा एका अपघाताने त्याच्यावर केस पडते तेव्हा तो जे वागतो ते पाहता काय योग्य आणि काय अयोग्य हा संदेश प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोच.
म्हणजे चित्रपटात दाखवलेला सारा वाह्यातपणा योग्यच आहे का?
.. बिलकुल नाही. तो वाह्यातपणा म्हणूनच स्विकारायचा. पण अश्या व्यक्तीलाही प्रेम काय आणि किती सुधरवू शकते हे बघावे. बाकी वाह्यात ईथे कोण नाहीये? पर्रफेक्ट पुरुषोत्तम ईथे कोण आहे? छे, उत्तराची अपेक्षा नाहीये. येऊ द्या तुमचा पुढचा प्रश्न!
रागावला की कसाही वागतो तो. कोणालाही मारतो तो. प्रेयसी असो, वा तिचे बाबा, वा आपलेच मित्र, आपलाच भाऊ .... ??
.. अच्छा म्हणजे शॉर्ट टेंपर, शीघ्रकोपी. झाल्यास विक्षिप्तही म्हणा. स्वभावाचा भाग आहे हा. अनुभवावरून सांगू शकतो. जे खरेच आपलेच असतात तेच अश्यांशी डील करू शकतात. थोडी लोकं दुखावली जातात, थोडी नाती दुरावतात. जवळची म्हणावी अशी माणसे कमीच उरतात आयुष्यात. पण ती माणसे मात्र जीवापाड प्रेम करणारी भेटतात. कारण म्हणूनच टिकली असतात. मित्र बघितला ना कसा भेटतो त्याला. चित्रपटाचे नाव कबीर सिंग नसते तर कदाचित मी ते विसरलो असतो, पण त्या शिवाला विसरणार नाही कधी.
म्हणून मग अश्या स्वभावाचे उदात्तीकरण?
.. छे, पुन्हा तोच शब्द. उदात्तीकरण कुठे दिसले यात. त्याचीच फळे तर भोगतो.
हो, फळे भोगतो. पण शेवटी तर फळे चाखतोच. शेवट गोडच केलाय त्याच्यासाठी
.. बिलकुल! त्याचसाठी तर चित्रपट आवडला. तेव्हाच तर डोळ्यात पाणी आले. त्याचे वाईट झालेलेच दाखवायला हवे होते असे जे तुम्हाला वाटत होते त्यालाच अनुसरून चित्रपटाचा शेवट असणार याची खात्री होती मला. ती मनाची तयारीही केली होती. असेना कोणी वाह्यात, कोणाचे वाईट झालेले नाही आवडत मला. कारण परीस्थिती बदलते तशी माणसे बदलतात हा विश्वास आहे मला. लोकांच्या आयुष्यात चांगले घडले तर ती सुद्धा चांगली वागतात असा माझा समज आहे.
बर्र ते जाऊ द्या, शेवटी हा पिक्चर आहे. कोणी किती सिरीअसली घ्यायचे ते ज्याच्या त्याच्यावर सोडूया
.. बरं सोडले, तुम्हीच धरून होता एवढावेळ
मला सांगा एक कलाकृती म्हणून काही मूल्य आहे की नाही?
.. काय मूल्य हवे.
तांत्रिकदृष्ट्या तर हल्लीचे सारेच चित्रपट सरस असतात. पण पटकथा आणि तिची एडीटींग अशी आहे की चित्रपटात एक क्षण बोअर होत नाही. सतत दुसर्या क्षणाला काय होणार याची उत्सुकता वाटून राहते.
अभिनयात म्हणाल तर शाहीद कपूरने निव्वळ राडा केला आहे. आता ईथून दहा वर्षे तरी मला शाहीद कपूर म्हटले की कबीर सिंगच आठवणार हे नक्की!
हिरोईनला अभिनय येतो की नाही कल्पना नाही पण तिच्या एक्स्प्रेशनलेस चेहर्याचा ईतका उत्तम वापर करून घेतला आहे की जेव्हा अखेरीस तिच्या चेहर्यावर काही एक्स्प्रेशन दिसतात ते बघूनच काळीज गलबलून येते.
आणि गाणी तर फक्त आणि फक्त चुम्मा आहेत!!!
हे घ्या यूट्यूबवर जाऊन ऐकून या सारी. लिंक देतो गाण्यांची. चित्रपट आपला आपण शोधून बघायचा.
https://www.youtube.com/watch?v=BDlNjOc3wiQ
- ऋन्मेष
मला नाही आवडलेला हा सिनेमा.
मला नाही आवडलेला हा सिनेमा. प्रचंड डिस्टर्बिंग आहे. शेवट ओढूनताणून गोड केल्यासारखा वाटतो. इतका शीघ्रकोपी आणि त्याहीपेक्षा विक्षिप्त बॉयफ्रेंड कुणाला आवडेल? सतत हातात कोलित घेऊन फिरल्यासारखं. दिसेल त्याला अपमानित करणारा, व्यसनी, सनकी माणूस आसपास सहन करणंही फार कठीण आहे.
हिरोईनला सुरूवातीपासूनच स्वत:चं काही मत आहे असं वाटत नाही. तसंही जसं सिनेमात दाखवतात तशी लोकं १८० अ्ंशात बदलत नाहीत.
भिकार सिनेमा
भिकार सिनेमा
नवीन Submitted by जिद्दु on 7 July, 2021 - 02:29
>>>>>>>>>> १००% स ह म त.
माझा मूव्ही बघतानाचा साधा सरळ
माझा मूव्ही बघतानाचा साधा सरळ फंडा आहे की जे आपल्या आयुष्यात आपल्याला करणे शक्य नसते वा आवडत नसते अथवा अतिशयोक्तीपूर्ण आशय असलेल्या गोष्टी पाहून जर मनोरंजन होत असेल तर तो चित्रपट आवडला हे गणित. मग ते झाड्यांच्या मागे गाणे गात फिरणे असो किंवा कबीर सिंग सारखा विक्षिप्त बॉयफ्रेंड असो.
मला आवडला कबीर सिंग. गाणी तर सुपरहिट आहेतच शाहिद पण मस्त. जब वी मेट मधला समंजस प्रेमी ते इथला आक्रमक प्रेमी दोन्ही पात्र छान रंगवली आहेत त्याने.
शेवटचं मेरे सोणीयो गाणं माझं फेवरेट.
मैं बारिश की बोली
मैं बारिश की बोली
समझता नहीं था
हवाओं से मैं यूँ
उलझता नहीं था
है सीने में दिल भी
कहाँ थी मुझे ये खबर
कहीं पे हो रातें
कहीं पे सवेरा
आवारगी ही रही साथ मेरे
ठहर जा ठहर जा ये कहती है तेरी नज़र
क्या हाल हो गया है
ये मेरा
आखें मेरी हर जगह
ढूंढे तुझे बेवजह
ये मैं हूँ या कोई और है
मेरी तरह
कैसे हुआ कैसे हुआ
तू इतना ज़रूरी कैसे हुआ
कैसे हुआ कैसे हुआ
तू इतना ज़रूरी कैसे हुआ
माझ्या मते हे अल्बम मधले बेस्ट गाणे आहे...
चित्रपट छान आहे. आवडला.
चित्रपट छान आहे. आवडला.
मी हा सिनेमा पाहिलेला नाही पण
मी हा सिनेमा पाहिलेला नाही पण जितके वाचले आहे त्यावरून जिद्दू यांच्याशी सहमत आहे.
उत्कट ची नक्की व्याख्या काय ? एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला प्रपोज केले आणी तिने नकार दिला, मग त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला तर उत्कट म्हणणार का? किंवा तिला रॉकेल टाकून जाळले व आत्महत्या केली तर उत्कट म्हणणार का ?
या toxic masculinity चे प्रदर्शन बर्याच हिंदी सिनेमात होत असते. "पहेले इन्कार फिर प्यार", "लडकी की ना मेही उसकी हां छुपी होती है" असल्या वाक्यांमुळे अनेक मुलांच्या मनात नको तितका आत्मविश्वास वगैरे येतो. असल्या गोष्टीचे दुर्दैवे परिणाम मी जवळून पाहिले आहेत. तीसेक वर्षापूर्वी मिरजेत असताना पश्चिम महाराष्ट्रात अशीच एकतर्फी प्रेमाची लाट आली होती. मिरजेतच जेमतेम दहावी शिकलेल्या एका मुलाचे एका मुलीवर "उत्कट प्रेम" बसले, तिने अर्थातच नकार दिला. याने तिला रस्त्यावरच पेट्रोल टाकून जाळले.
>बाकी तिच्या पोटातील मुलगा त्याचा दाखवला नसता आणि ती मनाविरुद्ध लग्न झालेल्या नवर्याबरोबर खुश नाही म्हणून त्याला सोडून याच्याकडे परत आलेली दाखवली असते तरी चालले असते. तिला अनटच म्हणजेच सो कॉल्ड पवित्र दाखवायचा अट्टाहास करायची गरज नव्हती. तिथे थोडे धाडस कमी पडले.
थोडेसे नाही, तिथेच धाडस नाही असे सिद्ध झाले. यालाच म्हणतात Toxic masculinity. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुला झालेले बाळ, मग ते माझे का नसेना, मी आनंदाने स्वीकारेन, हे खरे उत्कट प्रेम. असे दाखवले असते तर मग त्याच्या "सुधारण्याला" काही तरी अर्थ होता. इथे मात्र योनिशुचितेच्या त्याच जुनाट कल्पना कुरवाळण्यात आल्या, आणी म्हणे धाडसी !
विकु, अगदी अगदी.
विकु, अगदी अगदी.
उल्हासनगर मधले रिंकू पाटील हत्याकांड काही जणांना आठवत असेल.
मुंबईला परिक्षा द्यायला निघालेली आणि शेजारच्या मुलाने एकतर्फी प्रेमातून अॅसिड टाकून मृत्यूमुखी पडलेली २२ वर्षांची मुलगीही आठवत असेल.
मला कबिर सिंग,रांझणा हे पिक्चर गाणी चांगली असली तरी आवडत नसल्याने इथे लिहीणार नव्हते. पण लिहीलं.
ते 'उत्कट प्रेम' वगैरे कोणत्या लेव्हल ला जाईल हा मुद्दा विचार करण्यातला आहे.
(आणि योनिशुचितेचा मुद्दा तर इतका उचललाय सगळीकडे की रेप व्हिक्टीम असली नायिका पिक्चर मध्ये तर तिने आत्महत्या केली पाहिजे/व्हिलन चा सूड घेताना मेलंच पाहिजे असा अलिखीत नियम असतो.)
विजय कुलकर्णी आपला मुद्दा
विजय कुलकर्णी आपला मुद्दा बरोबर आहे, पण तसा तंतोतंत या सिनेमाला लागू होत नाही. अर्थात आपण हा चित्रपट पाहिला नाहीये त्यामुळे ईटस ओके. पण ते थोडे क्लीअर करू ईच्छितो.
शेवटी मूल त्या नवर्याचे आहे हे दाखवायला बिलकुल हरकत नव्हती हे मी वर म्हटले आहेच,
पण तरी त्या आधी हे सुद्धा दाखवले होते की याने त्याला काही फरक पडत नव्हता. ना तिच्या मुलामुळे ना तिचे तिच्या नवर्याशी प्रस्थापित झालेल्या संबंधांमुळे. तो तिला आहे तसे स्विकारायलाच तिच्याकडे आलेला असतो. त्यामुळे आपण जे लिहिलेय ते योनिशुचितेच्या त्याच जुनाट कल्पना, ईथे बिलकुल कुरवाळण्यात आल्या नाहीयेत. किंबहुना त्या कल्पनांना फाट्यावर मारणारे संवाद त्याआधीही त्याच्या तोंडी दाखवले आहेत.
आणखी दुसरे म्हणजे ब्रेक अप झाल्यावरही शेवटपर्यंत हा जे काही हाल करतो ते आपल्या जीवाचे करतो. तिच्यावर खुन्नस ठेवत नाही. तिच्या संसारात काडी करायलाही जात नाही की तिला पळवायला जात नाही. तुझी मर्जी असेल तर आताही आपण एक होऊ शकतो हेच सांगतो, जग दुनिया समाज यांना मी बघून घेईन, तुझ्या घरच्यांशीही मी बोलतो अशीच त्याची भाषा असते. आणि यावर ती काही बोलत नसते तेव्हा गप तिथून निघूनही जातही असतो.
मधल्या काळातही त्याचा तिच्यावर बिलकुल राग नसून जे झाले त्याला आपलाच शॉर्ट टेंपर स्वभाव जबाबदार आहे हे समजूनच तो जगत असतो.
एक सीन आहे त्यात, मधल्या काळात एक मुलगी त्याच्या प्रेमात पडते. त्याचे कपडे वगैरे ईस्त्री करायला लागते. तर तो म्हणतो की मला हे तिचे असे माझ्यासाठी काम करणे बिलकुल आवडत नाहीये. हे मला माझ्या हिरोईनसाठी करायला आवडायचे.
आता ज्यात हिरो अश्या विचारांचा दाखवला आहे की आपल्या प्रेमात पडलेल्या मुलीकडून कामे करून घेणे ज्याला रुचत नाही, आणि स्वतः मात्र आपल्या प्रेयसीसाठी कसलाही कमीपणाचा विचार न करता आवडीने तिचे कामे करतो. तर एकूणच यात त्या हिरोला आपल्या पौरुषत्वाचा अहंकार दाखवला आहे असे मला वाटत नाही.
सुरुवातीलाही तो तिच्या घरच्यांशी आदरानेच बोलत असतो. जेव्हा ते लग्नाला विरोध करतात, त्याला हिणवतात वा हाडतूड करतात तेव्हा मात्र याला आपल्या रागाला आवर घालता येत नाही आणि तो हार्ड रिअॅक्शन देतो. आता याला तुम्ही सणकी म्हणा वा शीघ्रकोपी म्हणा, अश्या स्वभावाच्या एका मुलाची प्रेमकहाणी आहे. एवढेच!
आता एखादा त्यावेळी शांत बसला असता आणि रात्री येऊन मुलीला पळवून नेले असते तर तेच शांत सुस्वभावी मुलाची प्रेमकहाणी म्हणून खपले गेले असते
अगदी शारीरिक नुकसान नाही झाले
अगदी शारीरिक नुकसान नाही झाले तरी मानसिक त्रास देणारी बरीच मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. ब्रेकअप झाल्यानंतर अनेक वर्षांनी आलेल्या प्रत्येक स्थळाचे कान भरून मुलीचे लग्न न जमू देणारा प्रेमवीर आमच्या कॉलनीत होता. त्या मुलीबरोबर तिचे आख्खे घर काही वर्षे डिप्रेशनमध्ये गेले होते. लग्नानन्तरही हा काही करतोय का ही भीती असायची त्यांना.
उत्तरप्रदेश मध्ये गेल्यावर्षी काही कोटींची शिष्यवृत्ती मिळवलेली सुदीक्षा छेड काढणाऱ्यांना बळी पडली
https://www.indiatoday.in/india/story/us-scholar-girl-sudeeksha-bhaati-k...
आणि हो, एकतर्फी प्रेमातून
आणि हो, एकतर्फी प्रेमातून मुलाने अॅसिड टाकून प्रेयसीची केलेली हत्या हे या चित्रपटाबाबत मला तरी गैरलागू वाटते.
ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही अश्यांची दिशाभूल होऊ शकते.
किंबहुना दुतर्फी असलेल्या प्रेमातील ब्रेकअप मध्येही जोडीदारासोबत कसे वागावे याचे हा चित्रपट चांगले उदाहरण वाटले.
जिद्दू आणि विकू+७८६.
जिद्दू आणि विकू+७८६. रूनम्याला योग्य अयोग्य गोष्टींचे काही पडलेले नसते. रेटून आपले तेवढे म्हणणे खरे करायचे हा एकमेव ध्यास असतो त्याचा.
शेवटचं मेरे सोणीयो गाणं माझं
शेवटचं मेरे सोणीयो गाणं माझं फेवरेट.
Submitted by निल्सन on 7 July, 2021 - 17:50
>>>
माझे या चित्रपटातील फेव्हरेट गाणी दर दिवसाला बदलत आहेत. आधी या सोनियो गाण्याचा नंबर फार मागे होता. पण चित्रपट पाहिल्यावर त्याने फार पुढे उडी घेतली.
तरी नंबर वनला सध्या माझे तेरा बन जाऊंगा आहे.
कारण त्याची सुरुवात, मेरी राहे तेरे तक है, तुझ पे हि तो मेरा हक है, ईश्क मेरा तू बेशक है, तुझ पे हि तो मेरा हक है.....
मला या ओळी फार मेलोडियस वाटतात. आणि मेलोडियस गाणी दिर्घकाळ आवडतात.
गाणी सगळी छान आहेत.
गाणी सगळी छान आहेत.
किंबहुना दुतर्फी असलेल्या प्रेमातील ब्रेकअप मध्येही जोडीदारासोबत कसे वागावे याचे हा चित्रपट चांगले उदाहरण>>> कशावरून खरोखर
दुतर्फीच आहे ? तो सनकी , गुंडागर्दी करणारा असतो त्याला घाबरून पण होकार दिला असेल सुरवातीला, तीच शक्यता जास्ती आहे. असंही तीला तिचं असं काही मत नसतंच त्यात नंतर आकर्षण वगैरे हे मुद्दे वेगळे. पण कोणत्याही समंजस मुलीला असा सायको आणि डॉमिनेटींग प्रियकर मुळीच आवडणार नाही , मूव्हीमधे काहीही होऊ शकतं. आपलं प्रेम दुसऱ्यावर जबरदस्ती थोपवू बघणे हीच विक्षिप्तपणाची सुरवात आहे. आता माझी नजर हीच्यावर पडली आता ही माझी , बात खतम, असा ॲटीट्यूड दिसला मला तरी. आणि ते त्यात अजून ते दुपट्टा ठिक करो असा काहीतरी सीन आहे तो पण डोक्यात जातो. त्यामुळे हो, हा चित्रपट सायको लोकांना आणखी चुकीचा मॅसेज देतो असं म्हणता येईल.
जिद्दू, विकु, भाग्यश्री१२३,
जिद्दू, विकु, भाग्यश्री१२३, अनु आणि इतर +१
डोक्यात जाणारा मूव्ही आहे हा. पटकथेची बांधणी, अभिनय आणि गाणी उत्तम आहेत पण प्रचंड टॉक्सिक विचारांना खतपाणी देणारा आहे. नकळत्या वयातल्या मुलांना तर अजिबात दाखवू नये असा आहे. बघाताना हृदयावर दडपण वाढताना जाणवत रहाते. आपलाच श्वास कोंडतोय की काय वाटते. त्याचे हाल हाल होऊन त्याचा शेवट व्हावा वाटते. थोडक्यात अत्यंत चुकीच्या गोष्टींची भलामण करुन व्हाईट वॉश करणारा चित्रपट आहे हा.
थोड्या मोठ्या हायस्कूल/ कॉलेजच्या मुलांना केस स्टडी म्हणून शाळेत जरुन दाखवावा, आणि नंतर काय वाटतं असं डिस्कशन करावं. सेक्स एज्युकेशन मध्ये कंसेट, लिमिट्स, सीमा समजावण्यासाठी एक उत्तम रिसोर्स आहे हा. डोळ्यात अंजन घालणारा ठरेल.
>> किंबहुना दुतर्फी असलेल्या
>> किंबहुना दुतर्फी असलेल्या प्रेमातील ब्रेकअप मध्येही जोडीदारासोबत कसे वागावे याचे हा चित्रपट चांगले उदाहरण.
दुतर्फी ? मी पाहिलेल्या ट्रेलर मध्ये तो एका वर्गात घुसतो व "ये मेरी बंदी है" असे काहिसे सांगतो, "ही माझी सयकल आहे, हात लावू नका" च्या चालीवर.
प्रोमो बघुनच या मूवी ची
प्रोमो बघुनच या मूवी ची स्टोरी न आवडल्या ने मूवी बघितला नाही. पण गाणी सगळी छान आहेत.
शाहिद कपूर चा अभिनय मस्त झाला आहे पण.
गाणी आणी शाहिद कपूर चा अभिनय या चित्रपटा चे प्लस पॉईंट आहेत.
बाकी जिद्दू, विकु, भाग्यश्री१२३, अनु ,अमितव च्या प्रतिसादांशी मी पण सहमत आहे.
हा चित्रपट किंबहूना बरेच हिन्दी चित्रपट चुकीचे संदेश देतात. सगळे च लोक चित्रपटा कडे केवळ मनोरंजन म्हणून बघत नाही काही लोक त्यातून प्रेरणा घेउन चुकीचे वागतात.
गाणी आणी शाहिद कपूर >>>>> +
गाणी आणी शाहिद कपूर >>>>> + १००००० .
केवळ त्यासाठी पळवत बघितला.
शाहिद भलताच hot दिसतो. तिच्या लग्नात formals मध्ये कसला भारी दिसतो.
बाकी सणकी प्रियकर आणि एकंदरीत चित्रपट आवडेल असं काही न वाटल्यामुळे काट.
वरचं गाणं एकदम गोड आणि ती heroin ही
"ये मेरी बंदी है" असे काहिसे
"ये मेरी बंदी है" असे काहिसे सांगतो, "ही माझी सयकल आहे, हात लावू नका" च्या चालीवर.>>>> तेच तर. आणि जिथे अशी मुलं जर खरंच मुलींना आवडत असतील तर त्या मुलीही सायको असण्याची शक्यता आहे . आणि अशी जोडपी डॉक्टर म्हणून कुणाला ट्रिट करणार असतील तर कल्याणच आहे _/\_
सुरवातीला जरी हिरोने एकतर्फी
सुरवातीला जरी हिरोने एकतर्फी प्रेमातून माझी बंदी म्हणून प्रेम लादलय हिरोईन वर पण त्यात जबरदस्ती नाही दिसली कुठे कारण हिरोईन सुद्धा त्याला सपोर्ट करत होतीच. हां आता तिच्या चेहऱ्यावर काही एक्स्प्रेशन येतच नव्हते त्यामुळे नक्की काय ते समजत नाही. पण जेव्हा शाहीद पुढच्या शिक्षणासाठी लांब जातो तेव्हा त्याच्यामागून हिरोईन पण तिथे पोहचते कारण तीसुद्धा प्रेम करत असते म्हणूनच ना.
बाकी ऋन्मेशने या आधीच्या प्रतिसादात व्यवस्थित क्लिअर केलेत मुद्दे. त्यामुळे acid वैगरे वाला मुद्दा इथे लागू होत नाही.
माझे या चित्रपटातील फेव्हरेट
माझे या चित्रपटातील फेव्हरेट गाणी दर दिवसाला बदलत आहेत. >>>>> हे तर माझेही होते. जसा मूड असेल तसे गाणे.
ये मेरी बंदी है सांगणे मला
ये मेरी बंदी है सांगणे मला वाटते या आधीपासूनही खूप कॉमन आहे. म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून बघत आलोय की आपल्याला एखादी मुलगी आवडली तर ते आपल्या ग्रूपच्या मित्रांना याच टोनमध्ये सांगितले जाते. हा कॉलेजचा भाई दाखवल्याने कॉलेजभर सांगतो.
पण यात अजूनही एक ॲंगल आहे तो असा की ते कॉलेज रॅगिंगसाठी फेमस दाखवलेय. पोरीही पोरींची रॅगिंग घेणारया दाखवल्या आहेत. तिच्यासोबत रॅगिंग होण्याची भितीही त्याला असेलच. त्याच्या या मेरी बंदी है डिक्लेरेशनने तो ती शक्यता मोडीत काढतो.
बाकी आपण कितीही डिक्लेअर केले मेरी बंदी है तरी काही वा सर्वजण त्याचा सन्मान ठेऊन मध्ये टांग घालत नाहीत. मात्र समोरची मुलगी आपल्या प्रेमात पडणे गरजेचे असतेच. तिला तू मेरी बंदी है सांगून ती काही लगेच आपल्याला हो म्हणत नाही. वा आपल्या प्रेमात पडत नाही. आणि त्यात मला कुठे जबरदस्ती दिसली नाही.
आणि जिथे अशी मुलं जर खरंच
आणि जिथे अशी मुलं जर खरंच मुलींना आवडत असतील तर त्या मुलीही सायको असण्याची शक्यता आहे.
>>>
एक वेळ जरा मी त्या मुलीच्या बाजूने विचार करून बघतो तिला काय आवडले असेल?
१. तो देखणा आहे. किंबहुना फारच सुंदर आहे. किंबहुना चक्क शाहीद कपूर आहे

२. अभ्यासात हुशार दाखवलाय
३. स्पोर्टसमध्ये चॅम्पियन दाखवलाय
४. कॉलेजम्ध्ये त्याचे वजन दाखवलेय
५. पैसेवाला आहे
६. तो तिच्यावर प्रेम करतोय.
७. त्याचे ना ईतर कुठल्याही मुलीशी जोडले गेले नाहीये. वा ऊठसूठ आवडली मुलगी नि गेला तिच्या मागे असा वासू कॅटेगरी नाहीये.
८. हळूहळू तिला त्याच्या स्वभावातील तिच्याप्रती केअरींग असणे हा गुण लक्षात येतोय. वरचे सगळे असले आणि आणखी ७० गुण असले मुलात पण हा क्रमांक ८ नसला ना तर त्या नात्याचे काय भविष्य असते हे सांगायला नको.
९. नॉट शुअर पण दोघे एकाच जातीचे दाखवले आहेत का? प्लीज कन्फर्म
अर्थात आता अशी कोणी त्याच्यातील दोषांची लिस्ट बनवली तरी हरकत नाही. पण त्या मुलीने काय बघून त्याच्या प्रेमात पडली हे क्लीअर करायला ईतके पुरेसे आहे.
हे तर माझेही होते. जसा मूड
हे तर माझेही होते. जसा मूड असेल तसे गाणे >>>> हो, लव्हस्टोरीतील सर्व टप्यांवर एकेक गाणी आहेत. त्या त्या गाण्याचा मूड सिच्युएशनला सूट होणारा आहे हे विशेष आवडले त्या अल्बमचे.
'कबीर सिंग' नावाच्या पात्रावर
'कबीर सिंग' नावाच्या पात्रावर समाजसुधारणेची जबाबदारी टाकणं म्हणजे जरा अन्याय होतोय असं वाटतं. तो बिचारा आधीच त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे परेशान होता. आपल्याला ही अशी सवय शेकडो वर्षांपासून पडली आहे, हे ठीकच आहे; पण त्याने वैतागून 'कबीरसिंग रिटर्न्स' काढला तर पंचाईत. पाहावाच लागणार. पण मग गुणमेलन होत नाही. मग आपण चडफडतो. नेहेमीचंच.
वाह साजिरा! मस्तच
वाह साजिरा! मस्तच
जाऊदेत ऋ. तू बुलाता है डिबेट
जाऊदेत ऋ. तू बुलाता है डिबेट करनेको मगर जानेका नहीं
.
किंबहुना चक्क शाहीद कपूर आहे Happy > >>> हा ऑप्शन आम्हा तमाम शाळकरी मुलींना इश्क विश्क च्या वेळी लागू होता. आईशप्पथ काय दिसतो, omg वगैरे वगैरे , चक्क वेड्या होतो सगळ्या तेव्हा त्याला पाहीले की
मलाही तेव्हा तो फार आवडायचा.
मलाही तेव्हा तो फार आवडायचा. म्हणजे शाहरूखला आणखी एक पर्याय मिळाला असे वाटलेले. पण बहुधा शाहरूख आणि तो एकत्र कुठल्या चित्रपटात आलेच नाहीत. एका ॲवार्ड शोमध्ये दोघांना एकत्र ॲंकरींग करताना पाहिले होते तेवढेच. ते सुद्धा एवढ्यासाठीच आठवतेय की त्या स्कीटमध्ये शाहीद कपूर शाहरूखला कॉपी करतो असा त्यांच्या तोंडी उल्लेखही होता. जे खरेही होते. पण तेव्हा मला त्याच्यासाठी वाईट वाटायचे. कारण त्याची स्वत:ची वेगळी ओळख बनवायची क्षमता होती. गेल्या काही वर्षात त्याने ती बनवली देखील हे फार आवडले.
कुठे बघायला मिळेल, नेटफ्लिक्स
कुठे बघायला मिळेल, नेटफ्लिक्स सोडून.
नेटफ्लिक्स सोडले तर मग
नेटफ्लिक्स सोडले तर मग यूट्यूबवर आहे. थोडा हल्लेडुल्ले आहे. पण सवय होते बघत जाऊ तसे.
https://youtu.be/ohAbjh1Do1U
ह्म्म. मी पण हिरोच्या संतापी
ह्म्म. मी पण हिरोच्या संतापी पात्राबद्दलच वाचल्याने सिनेमा पाहिला नाही, अगदी नंतर सुधारलेला दाखवला असला तरी. मनोरंजनाकरता असले तरी पहावसं वाटलं नाही. शाहिद कपूर आवडतो. गाणी ऐकते.
जिद्दुने दिलेली बातमी पाहून खूप वाईट वाटले.
Pages