कबीर सिंग - बहुधा २०१९ चा चित्रपट..
मग आज त्यावर का लिहावेसे वाटले?
.. कारण मी आज पाहिला. अगदी आता पाहिला.
तेव्हा का नाही पाहिला?
.. चित्रपट बघायची फार आवड नाही, वेळ नाही. कधी कानावर आले एखादा चित्रपट भारी आहे वा त्यात शाहरूख आहे वा मराठी आहे तरच बघायचे.
या चित्रपटाबद्दल कोणाकडून कळले?
.. मागे लॉकडाऊनमध्ये केस दाढी तुफान वाढवलेली. गॉगल काढून घराच्याच खिडकीत उभे राहून दोनचार फोटो काढलेले. दोन चार मित्रांनी कॉमेंट दिली, अरे हा तर कबीर सिंग. तेव्हा या चित्रपटाबद्दल पहिल्यांदा कळले.
मग आज का बघितला?
.. गाणी ! वेड लावणारी गाणी!
सहजच एक गाणे कानावर पडले. आवडले. कुठल्या चित्रपटातील आहे हे शोधताना कबीर सिंगचा अल्बम हाती लागला. एखादा अपवाद वगळता अख्खाच्या अख्खा अल्बम आवडला. रिपीट मोडवर ऐकू लागलो. माझ्यामते गेल्या तीन चार वर्षातील सर्वोत्तम म्युजिक अल्बम. फील येण्यासाठी मग यूट्यूबवर त्याचे विडिओ बघू लागलो. त्या गाण्यांच्या विडीओत जे प्रेमाचे उत्कट चित्रण दिसत होते त्यामुळे उत्सुकता वाढत होती. पण शाहरूखचा चाहता असल्याने एखादे यशस्वी न झालेले, दुख दर्द भरे, आणि कदाचित तसेच सॅड एंण्डींग असलेला चित्रपट बघायची हिंमत नव्हती.
बर्र मग? आज आली का ती हिंमत?
.. आली नाही केली. म्हटले जे काही आहे ते बघूया, अनुभवूया. कारण चित्रपट बघितल्यावर त्यातली गाणी आणखी आत उतरतात असा आजवरचा अनुभव आहे. जर यातली गाणी आधीच हृदयाला हात घालणारी असतील तर असेना एखादा काळीज पिळवटून टाकणारा चित्रपट, बघूया म्हटले.
मग काय बघितले? कसा वाटला चित्रपट?
.. ते नेमक्या शब्दात नाही सांगता येणार. मी काही चित्रपट समीक्षक नाही. पण जे पाहिले ते आयुष्यभर मनावर ठसून राहावे असे आहे.
काय आवडले? एका टपोरी, गुंडागर्दी करणार्या मवाली मुलाची लव्हस्टोरी?
.. का, टपोरी मुलांना प्रेम करायचा अधिकार नसतो का? कॉलेजात भाईगिरी करणार्या मुलांना पुढे आयुष्यात सुधारायचा अधिकार नसतो का? माझ्या शाळेतला याच कॅटेगरीतला एक अख्खा ग्रूप आज चांगले शिक्षण घेऊन सेटल झालाय. तर तेव्हा पुस्तकी किडे असणारे आज शाळेच्या व्हॉटसपग्रूपवर दर विकेंडला दारूच्या ग्लासांचे फोटो टाकत राहतात.
मग यात काय वेगळे केलेय? ते व्यसनांचे उदात्तीकरण नाही का?
.. वाटत नाही. वाईट काळात त्याने व्यसनांना जवळ केले. पण पुढे कुटुंबाच्या आणि स्वतःच्या प्रेमासाठी सुधारला तेव्हा व्यसनांना दूर सारले. याचा अर्थ व्यसने वाईट काळाचे सोबती असतात हाच संदेश दिलाय.
आणि बाहेरख्यालीपणा?
.. कोणावर जबरदस्ती तर नाही ना करत? प्रेयसीला विसरायला ईतर मुलींशी त्यांच्या मर्जीने शारीरीक संबंध ठेवायचा मार्ग निवडतो. पण अखेरीस प्रेमाची जागा ते घेऊ शकत नाही हेच त्याला समजते.
आणि ते दारू पिऊन सर्जरी करणे?
.. हे असे खरेच शक्य आहे की नाही कल्पना नाही. म्हणजे दारू पिऊन सर्जरी करणे, आणि त्याला सहकार्यांनी तसे करू देणे. शक्य नसल्यास त्याला दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य समजूया. पण जेव्हा एका अपघाताने त्याच्यावर केस पडते तेव्हा तो जे वागतो ते पाहता काय योग्य आणि काय अयोग्य हा संदेश प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोच.
म्हणजे चित्रपटात दाखवलेला सारा वाह्यातपणा योग्यच आहे का?
.. बिलकुल नाही. तो वाह्यातपणा म्हणूनच स्विकारायचा. पण अश्या व्यक्तीलाही प्रेम काय आणि किती सुधरवू शकते हे बघावे. बाकी वाह्यात ईथे कोण नाहीये? पर्रफेक्ट पुरुषोत्तम ईथे कोण आहे? छे, उत्तराची अपेक्षा नाहीये. येऊ द्या तुमचा पुढचा प्रश्न!
रागावला की कसाही वागतो तो. कोणालाही मारतो तो. प्रेयसी असो, वा तिचे बाबा, वा आपलेच मित्र, आपलाच भाऊ .... ??
.. अच्छा म्हणजे शॉर्ट टेंपर, शीघ्रकोपी. झाल्यास विक्षिप्तही म्हणा. स्वभावाचा भाग आहे हा. अनुभवावरून सांगू शकतो. जे खरेच आपलेच असतात तेच अश्यांशी डील करू शकतात. थोडी लोकं दुखावली जातात, थोडी नाती दुरावतात. जवळची म्हणावी अशी माणसे कमीच उरतात आयुष्यात. पण ती माणसे मात्र जीवापाड प्रेम करणारी भेटतात. कारण म्हणूनच टिकली असतात. मित्र बघितला ना कसा भेटतो त्याला. चित्रपटाचे नाव कबीर सिंग नसते तर कदाचित मी ते विसरलो असतो, पण त्या शिवाला विसरणार नाही कधी.
म्हणून मग अश्या स्वभावाचे उदात्तीकरण?
.. छे, पुन्हा तोच शब्द. उदात्तीकरण कुठे दिसले यात. त्याचीच फळे तर भोगतो.
हो, फळे भोगतो. पण शेवटी तर फळे चाखतोच. शेवट गोडच केलाय त्याच्यासाठी
.. बिलकुल! त्याचसाठी तर चित्रपट आवडला. तेव्हाच तर डोळ्यात पाणी आले. त्याचे वाईट झालेलेच दाखवायला हवे होते असे जे तुम्हाला वाटत होते त्यालाच अनुसरून चित्रपटाचा शेवट असणार याची खात्री होती मला. ती मनाची तयारीही केली होती. असेना कोणी वाह्यात, कोणाचे वाईट झालेले नाही आवडत मला. कारण परीस्थिती बदलते तशी माणसे बदलतात हा विश्वास आहे मला. लोकांच्या आयुष्यात चांगले घडले तर ती सुद्धा चांगली वागतात असा माझा समज आहे.
बर्र ते जाऊ द्या, शेवटी हा पिक्चर आहे. कोणी किती सिरीअसली घ्यायचे ते ज्याच्या त्याच्यावर सोडूया
.. बरं सोडले, तुम्हीच धरून होता एवढावेळ
मला सांगा एक कलाकृती म्हणून काही मूल्य आहे की नाही?
.. काय मूल्य हवे.
तांत्रिकदृष्ट्या तर हल्लीचे सारेच चित्रपट सरस असतात. पण पटकथा आणि तिची एडीटींग अशी आहे की चित्रपटात एक क्षण बोअर होत नाही. सतत दुसर्या क्षणाला काय होणार याची उत्सुकता वाटून राहते.
अभिनयात म्हणाल तर शाहीद कपूरने निव्वळ राडा केला आहे. आता ईथून दहा वर्षे तरी मला शाहीद कपूर म्हटले की कबीर सिंगच आठवणार हे नक्की!
हिरोईनला अभिनय येतो की नाही कल्पना नाही पण तिच्या एक्स्प्रेशनलेस चेहर्याचा ईतका उत्तम वापर करून घेतला आहे की जेव्हा अखेरीस तिच्या चेहर्यावर काही एक्स्प्रेशन दिसतात ते बघूनच काळीज गलबलून येते.
आणि गाणी तर फक्त आणि फक्त चुम्मा आहेत!!!
हे घ्या यूट्यूबवर जाऊन ऐकून या सारी. लिंक देतो गाण्यांची. चित्रपट आपला आपण शोधून बघायचा.
https://www.youtube.com/watch?v=BDlNjOc3wiQ
- ऋन्मेष
BDW हैप्पी जर्नी म्हणजे
BDW हैप्पी जर्नी म्हणजे प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णीचा ना?>>हो
सस्मित पोस्ट आवडली.>>+१
BDW हैप्पी जर्नी म्हणजे
BDW हैप्पी जर्नी म्हणजे प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णीचा ना?>>
एक नंबर फालतू चित्रपट...
एक नंबर फालतू चित्रपट...>>>>>
एक नंबर फालतू चित्रपट...>>>>>>> +111
मला तर तो चित्रपट आठवत सुद्धा
मला तर तो चित्रपट आठवत सुद्धा नाही, फक्त नाव आठवले.
मूळ चित्रपट बघायचा प्रयत्न
मूळ चित्रपट बघायचा प्रयत्न केला. पण नाही जमले. शाहीदचा ओवरहँग उतरेल तर ना
मूळ चित्रपट मीदेखील बघायचा
मूळ चित्रपट मीदेखील बघायचा प्रयत्न केला.. तो हिरो नक्कीच शाहिद पेक्षा जास्त क्युट आहे..
अभिनय देखील प्रचंड जबरदस्त...
मात्र लँग्वेज कळत नसल्याने इम्पॅक्ट येत नव्हता...
सस्मित, प्रतिसाद आवडला.
सस्मित, प्रतिसाद आवडला.
अर्जुन रेड्डी मी पण नंतर
अर्जुन रेड्डी मी पण नंतर पाहिला. डब. पण तितका भिडला नाही.
माझी लेक विजय देवाराकोंडाची फॅन आहे. शाहिद कपूरपेक्षा हा भारी आहे, क्युट आहे, हॅन्डसम आहे असं चालू होतं. मी कुठे मानणार आहे.
खरंतर आहे तो छान. पण उगीच तुलना कशाला.
त्यातली हिरोइन पण एवढी खास नाही वाटली.
हीरा, मला तुमचे अभ्मासपुर्ण
हीरा, मला तुमचे अभ्यासपुर्ण आणि संयत प्रतिसाद नेहमीच आवडतात. पण कधी मेंशन केलं नाही
१००
१००
बॉलिवुड ला सर्जनशीलता राहिलीच
बॉलिवुड ला सर्जनशीलता राहिलीच नाही. ९०% चित्रपट इतर भाषेतून घेतलेले असतात.
आणि गाणी तर विचारूच नका,बहुतेक संगीतकारांना जुने चित्रपट बघायला सांगून गाणी उचलायला सांगत असावेत.
मला चित्रपट अजिबात आवडला नाही
मला चित्रपट अजिबात आवडला नाही. पण गाणी आवडली.
बॉलिवुड ला सर्जनशीलता राहिलीच
बॉलिवुड ला सर्जनशीलता राहिलीच नाही. ९०% चित्रपट इतर भाषेतून घेतलेले असतात.
>>>>
सहमत आहे, पण हा व्यवसाय आहे. जिथे खात्रीने पैसा मिळेल ते पहिला बघितले जाते.
याचा एक फायदाही आहे, ईतर भाषेतले चांगले चित्रपट आपल्याला कळणार्या भाषेत आणि ओळखीच्या चेहर्यात बघता येतात.
पण गाणी आवडली. >> कोणी असे
पण गाणी आवडली. >> कोणी असे असेल का या भूतलावर ज्याला गाणी आवडली नसतील
काल पिकनिकच्या दमछाकवर उतारा
काल पिकनिकच्या दमछाकवर उतारा म्हणून कबीरसिंग पुन्हा पाहिला.
एक वेगळा अर्थ लागला.
शेवटी त्या हिरोईनचे मूल कबीरसिंगचे दाखवले ते मला अधाडसी वाटले होते.
पण काल पुन्हा विचार केला, एवढा धाडसी चित्रपट बनवणार्यांनी ईथे कच का खाल्ली असावी बरे??
तर उत्तर मिळाले की आपण तो चित्रपट फक्त कबीर सिंगच्या नजरेतूनच बघत होतो. प्रितीच्या नजरेतून कोणी पाहिलाच नाही. तसे केले असते तर याचे उत्तर मिळाले असते
सविस्तर नंतर लिहितो .............
काय योगायोग...
काय योगायोग...
परवा शुक्रवारी म्हणजे 14 जुलै 2023 ला सकाळी मी पुन्हा कबीर सिंग पूर्ण पाहिला... हे लिहायला आलो तर त्याच तारखेला माझी आधीची पोस्ट. लास्ट सीन ने डोळ्यातून पुन्हा पाणी काढले ..
लास्ट सीन ने डोळ्यातून पुन्हा
लास्ट सीन ने डोळ्यातून पुन्हा पाणी काढले>>>> का? तीचं सावरलेलं नशिब परत फुटतं म्हणून का?
तीचं सावरलेलं नशिब ??
तीचं सावरलेलं नशिब ??
>>>>
तिच्याकडे बघून वाटले तर नाही तसे...
मला वाटले की व्हाट्सअप सारखे
मला वाटले की व्हाट्सअप सारखे आता मायबोलीवरती सुद्धा लास्ट सीन दिसण्याची सोय उपलब्ध झालीय.
मागे मी dia कन्नड सिनेमा बघा
मागे मी dia कन्नड सिनेमा बघा म्हटलं होतं..त्याचा हा मराठी रिमेक... https://youtu.be/KHfyDPN96t8 कुठे सापडला तर बघा..मास्टरपीस सिनेमा आहे...
मुळ कन्नड हिंदी डब पण आहे युट्यूब वर.
https://youtu.be/Jlchsj8D_08
तिच्याकडे बघून वाटले तर नाही
तिच्याकडे बघून वाटले तर नाही तसे>>> दाखवले नाहिये ते.. कबिर सारखा भडक डोक्या परत लाईफ मधे आला.. फुटलंच नशिब.
भडक डोक्याच्या लोकांची
भडक डोक्याच्या लोकांची लव्हस्टोरी.. येस! यातच कबीर सिंगचे सार सामावले आहे.
प्रत्येक स्वभावाच्या व्यक्तीसाठी जगात एक व्यक्ती अश्या स्वभावाची बनली असते जी तिला सांभाळून घेईल. नशिबानेच मिळते अशी व्यक्ती. आणि ती आयुष्यातून गेल्यावर तिची खरी किंमत कळते. आणि मग चुका सुधारल्या जातात. भावना कंट्रोल केल्या जातात. पण त्या व्यक्तीला आयुष्यातून जाऊ दिले जात नाही..
भडक डोक्याच्या लोकांची
भडक डोक्याच्या लोकांची लव्हस्टोरी..>>>>>
आता पुष्पा फेम अल्लू अर्जुन चे आर्या १ आणि आर्या २ पण बघा..हिंदीत सापडतील... (एक्झाटली भडक डोक्याचे नाही पण तसेच काहीतरी)
साऊथ मधे तुम्हाला भडक डोक्याच्या लोकांची लव्हस्टोरी..सिनेमे खूप सापडतील..आठवून सांगते.. आता लगेच आठवेना..
साऊथमध्ये बरेचदा अश्या
साऊथमध्ये बरेचदा अश्या स्वभावाचे आणि वृत्तीचे उदात्तीकरण करतात. ते खटकते. यात चुकीला चूक म्हणून दाखवले आहे. ते पटले. म्हणून एक चित्रपट म्हणून कबीर सिंग आवडला.
चुकीला चूक म्हणून दाखवणारे पण
चुकीला चूक म्हणून दाखवणारे पण सिनेमे असतात..आठवून सांगते.
Nowdays गर्ल्स लाईक टॉक्सिक
Nowdays गर्ल्स लाईक टॉक्सिक रिलेशनशिप... नवीन फॅड आहे.. पण सत्य आहे... गर्ल्स लव्ह बॅड बॉईज ...
इमॅजिन करा तुम्ही टीनएज मुलगी आहात-
1. वरण भात भाजी खाणारा एक मुलगा... ना अटीट्युड ना कोणाशी भांडण... सर्वांशी प्रेमाने वागणारा...
2. अटीट्युड असणारा...सुट्टा ओढणारा... पब मध्ये स्टाईल ने दारू पिणारा...एक दोघांना सर्वांसमोर तुडवणारा...
सांगा कोणत्या मुलाबद्धल आकर्षण वाटेल....
वरण भात भाजी खाणारा एक मुलगा
वरण भात भाजी खाणारा एक मुलगा
अटीट्युड असणारा...सुट्टा
अटीट्युड असणारा...सुट्टा ओढणारा... पब मध्ये स्टाईल ने दारू पिणारा...एक दोघांना सर्वांसमोर तुडवणारा...>>> हे असं cartoon कोणत्या मुलीला आवडेल ?!
इमॅजिन करा ती टीनएज मुलगी
इमॅजिन करा ती टीनएज मुलगी तुमची मुलगी आहे..
Swag, attitude, style, x
Swag, attitude, style, x-factor इत्यादी गोष्टी टीनेजरचे लक्ष वेधून घेणे आणि आकर्षित करणे हे स्वाभाविक आहे.
परंतु हे सर्व व्यसने आणि दुर्गुणांमधूनच येतात हा गैरसमज आहे.
उलट वाईट मार्गाला न लागता हे गुण दाखवता आले तर ती कमाल. ते जास्त आकर्षित करते.
Pages