सारस शुभेच्छा

Submitted by Barcelona on 23 June, 2021 - 17:22
सारस शुभेच्छा

[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]

सारस शुभेच्छा

शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.

खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.

म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!

आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.

कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.

असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.

धाग्याचे नियम काय -

शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.

शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही Happy

(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Cranes.

सारस शुभेच्छा
आजचं चित्र पण मस्त. मामी लेकीने झकास काढलंय चित्र.

सीतैचे सारस पाहून मलाही आज बनवावासा वाटला.यू ट्यूबचा आधार घेत घेत काहीतरी केलेय(खरंतर गंडलय).पण आज हा मनोभावे केलेला सारस इथे ठेऊन जाते.
रच्याकने,सारस उर्फ रोहित = फ्लेमिंगो ना?

छान उपक्रम आहे सीमंतिनी, आवडला.
मनःपूर्वक शुभेच्छा सगळ्यांना, अडथळे आणि प्रतिकूलता नेटाने पार करण्यासाठी.....

जमला करायला तर मीही करेन एखादा.
शोधण्यासाठी शंका ही की सारस = crane, stork, flamingo, चित्रबलाक वगैरे कोणीही लंबूटांग पक्षी की craneच?
crane तर कुठला..... माहिती वाचली पण antigone antigone आणि इतर crane मध्ये गोंधळ झाला.

Happy अवांतर --- कृती एकच असताना..... ती = कटकटेश्वरी आणि तो = मायक्रोमॅनेजेश ?!

वाह देवकी! मस्त.. हुकूमावरूनची घाई काय आहे Wink ... ९०० दिवसाचा उपक्रम आहे आता तर पहिलाच आठवडा आहे. लिंक बरोबर आहे. दुसरी एखादी शोधून ठेवते. मृ ताई, पुन्हा कौतुक...
माझ्या आयुष्यात कटकटेश्वरी हा क्लायंटचा एक प्रकार आहे. (ते पुरूषही असू शकतात. मराठीत लिंगनिरपेक्ष देवांची नावे आठवली नाहीत म्हणून ती कटकटेश्वरी!!) हे अतिशय क्ल्यूलेस क्लायंट असतात. म्हणजे चौथ पाऊल अगदी स्पष्ट दिसत असतं त्यांना. अरे पण पहिल्या तीनाचं काय??!! ह्यांच्या मनातले ओळखेपर्यंत आपण दमून जातो. त्यांचं त्यांना ही नीट माहिती नसतं. कटकटेश्वरी नातेवाईक, शेजारी इ इ असं कुणीही असू शकतं. मायक्रोमॅनेजेश बद्दल पुढच्या शुभेच्छात लिहीते.

दिवस १०३: सर्वांना धन्यवाद!!
origamipeacecrane.jpeg (credit: Origami peace crane) कटकटेश्वरी आणि मायक्रोमॅनेजेश हे अगदी विरूद्ध टोकाचे असतात. मायक्रोमॅनेजेश "सारसाचा आरश्यावर फोटो काढ" सांगून थांबत नाही. तर शेपटी व प्रतिबिंबातील शेपटी यात किती सेंटीमीटर अंतर हवे असल्या काही अचाट रिक्वायरमेंट्स देतात. They know numbers to the fourth decimal... हे कुठल्याही स्वरूपात तुमच्या जीवनात येऊ शकतात - क्लायंट, बॉस, नातेवाईक, शेजारी... असला कुणी मायक्रोमॅनेजेश तर त्याच्याशी जरा खेळीमेळीचा दिवस जावो ह्यासाठी शुभेच्छा!!

दिवस १०४ चित्र १२
lucaDiGiorgiFlickr.jpeg (क्रेडीटः ल्यूका डी गिओर्जी) सर्फसाईड, फ्लोरिडा इथे एक इमारत धसली आणि १५० लोक मलब्यात अडकले असा अंदाज आहे. दोन दिवस रेस्क्यू वर्कर्स लोकांना बाहेर काढायचे प्रयत्न करत आहेत. भग्न इमारती बरोबर भग्न शरीरांचे अवशेष हाती येत आहेत. नातेवाईकांचे डीएनए मॅच करून ओळख पटवण्याचा प्रयत्न चालू आहे. तिथल्या प्रमुखाला काय मदत हवी विचारले तर तो We are not resource light, we are luck-light म्हणाला. कारण वेळेशी शर्यत चालू आहे. सगळे लवकर सुखरूप सापडो यासाठी शुभेच्छा.

सगळे लवकर सुखरूप सापडो यासाठी शुभेच्छा.>>>> माझ्याकडून पण शुभेच्छा!>>माझ्या कडून पण.
सारस शुभेच्छा.आजचा सारस मस्त सी आणि श्रवु

दिवसः १०५ चित्र १४ : सर्वांना खूप धन्यवाद. श्रवु, मस्तच चित्रे असतात.
An Mai Dollar Origami.jpeg (credit: An Mai Dollar Origami) दिवस १०४ मधले घड्याळ भलते महागडे निघाले की. हॅमिल्टन घड्याळं. १९१७ मध्ये रेल्वेचे वेळापत्रक जुळण्यासाठी जे स्टँडर्ड घड्याळ लागते त्यानुसार ही अमेरिकन कंपनी मनगटी घड्याळे बनवू लागली. आता स्वित्झर्लंडमध्ये घड्याळे बनवतात. सध्या ह्यांची डॉलरमधील किंमत चार आकड्यात आहे. म्हणून आज डॉलर सारस. मनासारखे घड्याळ असू दे ह्यासाठी सगळ्यांना (मी सहित) शुभेच्छा!!

Pages