लक्षवेधी ..कोथिंबीर सूप...

Submitted by MSL on 15 June, 2021 - 11:31
kothimbir soup
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

..
साधारण 1 लहान जुडी कोथिंबीर,
10 पाकळ्या लसूण
1 कांदा
1 तुकडा आले किसून
2 हिरवी मिरची
2 चमचे लोणी
चवीनुसार मीठ साखर
1 चमचा मिरपूड
2 चमचे लिंबू रस
2 लहान चमचे तांदूळ पीठ / कॉर्नफ्लोअर ( थिकनेस साठी हवे असल्यास )

क्रमवार पाककृती: 

1. 4 वाटी पाणी उकळत ठेवावे..
2. कोथिंबीर स्वच्छ धुवून , देठा सहित या उकळत्या पाण्यात टाकायची..
3. 5 मिनिट उकळून घेऊन गॅस बंद करायचा..
4.एका पातेल्यात हे मिश्रण गाळून घ्यावे..खाली पाणी येईल ते ठेवून द्यावे, आणि गाळण्यावर जी कोथिंबीर राहते, ती मिक्सर ला बारीक लावून घेणे..
5.लसूण चे बारीक तुकडे,मिरची चे तुकडे, कांदा तुकडे करून घेणे..मिरपूड तयार करून घेणे..
6. कढई गॅसवर ठेवा..त्यात लोणी घालायचं..ते वितळल की लसूण तुकडे,कांदा , आले ,मिरची घालून 2 ते 3 मिनिट परतून घेणे...त्यावर , गाळून उरलेले पाणी ( कृती क्र 4 मध्ये केले आहे) घालायचे...त्यातच मिक्सर वर फिरवून घेतलेली कोथिंबीर ची पेस्ट घालावी...
7. चांगले ढवळून घ्यावे..जर जास्त पातळ वाटले,तर दाटपणा येण्यासाठी, 1ते 2 चमचे तांदूळ पीठ पाण्यात पेस्ट करून ,यात घालावे...
8. चवीनुसार मीठ, साखर घालायची..
9.4 ते 5 मिनिट उकळून घ्यावे..
10. वरून लोणी मिरपूड घालून गरमच सर्व्ह करा..
Healthy tasty yummy soup ready!!

वाढणी/प्रमाण: 
4 ते 5
अधिक टिपा: 

..
## कोथिंबीर सहज उपलब्ध होते..त्यामुळे करायला जमेल आणि लहान मुले , वयस्कर व्यक्ती याकरिता चविष्ट पदार्थ..

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया लिंक द्यावी...

जनरली आपण सगळ्या पदार्थात कोथिंबीर वापरतोच...
त्याच संदर्भाने , इथे सूप ची रेसिपी दिलीये...
Submitted by MSL on 16 June, 2021 - 22:28

<<

कृपया लिंक द्यावी..

कसली बोडक्याची लिंक द्यावी?

अभ्यास करा. घंटाभर लिंका आहेत गूगलवर कोथिंबीर कशी चांगलि ते सांगणार्‍या. सगळा तद्दन मुर्खपणा असलेल्या. तुमच्या ज्ञानाच्या फील्डमधे गूगल करताना जे निकष वापरून शोध घेता, ते वापरा. किमान गूगल स्कॉलर वापरून शोधा.

मी यामध्ये कुठल्या आजारासाठी हे सूप प्या आणि बरे व्हा..किंवा या प्रकारचा सल्ला दिलेला ,मला तरी रेसिपी मध्ये दिसत नाहीये...किंवा नावात सुध्धा असे काही लिहिले नाहीये...

आपण रोज खातो त्या गोष्टी चांगल्याच असतात असं नाही.

उदा. सोन्या चांदीचा वर्ख लावलेली वस्तू अमेरिक/युरोपियनांना खायला देऊन बघा अन मग हेवी मेटल पॉयझनिंग बद्दल काय ज्ञान मिळतं ते बघा. अर्थात आपल्याला बाळघुटीत सोनं उगाळून दिलेलं छान हे शिकवलेलं असल्याने ते छानच वाटतं ते अलाहिदा.

https://www.youtube.com/watch?v=BZLeKhwKOb0
आरारा तुमची डॉक्टरकीची डिग्री कागदावर भली मोठी असेलही कदाचित पण डॉक्टरकी पेशातल्या कंपॅशनच्या मूल भावनेला तुम्ही केव्हाच हरताळ फासलेला आहे हे पदोपदी जाणवते.
आपल्यासारखा दशकांपूर्वी खर्डेघाशी करून मिळवलेल्या पुस्तकी ज्ञानाचा टेंभा मिरवणारा डॉक्टर आता मागास (ज्ञानाने) समजला जातो. जसे कॉप्युटर कोडिंग हे मायक्रोसॉफ्ट, सन , आयबीएम ह्यांची मक्तेदारी राहिली नाही तसे वैद्यकीय ज्ञान ह्या जमान्यात डॉक्टरकी डिग्रीचे मिंधे राहिलेले नाही.
माय्बोलीबाहेर कोणी शेंबडे पोर तुम्हाला डॉक्टर म्हणून मान देत नसेल म्हणून जिथे तिथे टकळी सोडून तो मान मिळवायला तुम्ही बघत असाल तर आधी नाव,गाव, डिग्री सांगा साहेब, मग आपल्या ज्ञानाच्या गमजा मारा.
आता डॉ बर्ग कोण आहे ते विचाराल तर तुम्ही खरच डॉक्टर म्हणून झक मारली असे म्हणावे लागेल.

आणि हो जिथे तिथे लहान मुलांसारखे टँट्रम सोडून अटेंशन, रिस्पेक्ट मिळावयाचा असा तुमचा एकंदर पावित्रा असेल तर तुमच्या टेंट्र्म्सला माझ्याकडून ऊत्तर मिळणार नाही.

किंवा नावात सुध्धा असे काही लिहिले नाहीये...
नवीन Submitted by MSL on 16 June, 2021 - 22:43
<<

ताई,

इम्युनिटी बूस्टर?

म्हणजे काय?

नाव बदला की धाग्याचं? नाही तर इम्युनिटी वगैरे भंकस लिहूच नका?

I was trying NOT to get personal. What the hell are you trying to defend here? Please accept the fact that you don't have medical knowledge about coriander/parsley and leave it at that. I am not questioning your cooking skills, mam. I am questioning the title which says "immunity booster".

येते का लक्षात?

MSL, नावात इम्युनिटी बूस्टर म्हटलं आहेत आणि अधिक टिपांमध्ये कोविड काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असंही म्हणताय. जर तुम्हांला स्वतःला कोथिंबीरीने इम्युनिटी वाढते हे खात्रीलायक माहिती नसेल तर कशाकरता दिशाभूल करताय?

तसे वैद्यकीय ज्ञान ह्या जमान्यात डॉक्टरकी डिग्रीचे मिंधे राहिलेले नाही.
<<
हसू का? @ मी अश्विनि

CME म्हणजे काय हे माहिती आहे का?

अन हो. तो यूट्युबर ना? बर्ग?

असो Rofl

>>
आणि हो जिथे तिथे लहान मुलांसारखे टँट्रम सोडून अटेंशन, रिस्पेक्ट मिळावयाचा असा तुमचा एकंदर पावित्रा असेल तर तुमच्या टेंट्र्म्सला माझ्याकडून ऊत्तर मिळणार नाही.
नवीन Submitted by मी अश्विनी on 16 June, 2021 - 22:50
<<

शोनुल्या,
मी तुझ्याकले अतेन्शन कदि मागिल्लं ले?

या धाग्याचा अन तुमचा संबंध काय व कसा? तुम्ही ना पाक्रु लिहिली, ना काही ऑथेंटिक विदा दिला? किंवा कधी कुथे काही इंटेलिजंट लिहिले?

कोथिंबिरीच्या फायद्यांचे हजारो मुर्ख धागे अन यूट्यूब व्हिडिओ आहेत. अमेरिकन लोकांचे कोव्हिड किंवा इतरही वॅक्सिन विरुद्धचे लिखाण आहे. इंटरनेट म्हणजे "ज्ञान" नव्हे.

न मागता उत्तर लिहून "तुमच्या टेंट्र्म्सला माझ्याकडून ऊत्तर मिळणार नाही." हे म्हणायची नक्की कोणती मजबूरी आहे भाऊ?

Please accept the fact that you don't have medical knowledge about coriander/parsley and leave it at that. ..
---- हे मी वर दिले आहे आधीच...
---- आपण सर्व वैद्यकीय जाणकार मंडळी...
---- ****रेसिपी चे नाव सुद्धा बदलता येईल**** ...
--- पण वर दिलेल्या लिंक मध्ये discussion आणि सल्ले, उपाय असे सापडले...
---"" नुकसानदायक कोथिंबीर "" किंवा तिचे तोटे ...असे काही नाही दिसले...
....

रेसिपी करून बघायला आवडेल त्यांनी करा..बाकी नी करू नका...नुकसान होईल असे वाटून दुसरे सूप करा...हे नाही केले तरी चालेल...

...

रच्याकने. इब्लिस ही माझी मागच्याच्या मगच्याच्या मागल्या जन्मातली आयडि आहे. साती या देखिल एमडी मेडिसिन अ‍ॅलोपथिक "अँटि नॅशनल" लुटारू/दुष्ट वगैरे आहेत. सुबोध खरे हे रेडिऑलॉजिस्ट आहेत. इत्यादि. >>>>

हा प्रतिसाद माझ्यासाठी आहे? तुमच्या इतक्या प्रतिसादांमधले माझ्या प्रश्नावर उत्तर असणारा प्रतिसाद सापडला नाही. त्या धाग्यामधेही कोथिंबीरीचे दुष्परीणाम यावर काही वाचनात आलं नाही. किडनी स्टोनवर धने/ कोथिंबीर उपयुक्त असे कुठलाही शास्त्रीय पुरावा नसलेले दावे आहेत. कुठ्ल्याही किडनीच्या विकारावर कोथिंबीरीचे पाणी अथवा धन्याचे पाणी हा उपाय नाही किंवा हे विकार सताना उपाय म्हणूण या पदार्थांचं सेवन केलं असता दुष्परीणाम होतात्/होऊ शकतात ही माहिती मिळाली. आणि ती बरोबर आहे.

या धाग्याबद्दल बोलायचे झाले तर 'इम्युनिटी बूस्टर' या शब्दाला तुमचा आक्षेप आहे. आणि तो बरोबर आहे. त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण कोथिंबीर शरीराला घातक आहे असं तुम्ही जे म्हणत आहात, मी त्याबद्दल विचारत आहे. भारतीय जेवणात कोथिंबीरीचा मुबलक प्रमाणात वापर होतो. मी थोडी जास्तच वापरते आवडते म्हणून. कोथिंबीरीची चटणी वगैरे नित्य जेवणात असतात. ती घातक असेल तर वापर कमी किंवा थांबवायला हवा. पण त्याबद्दल सविस्तर माहिती मिळत नाहीये. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला.

माझे मोठे काका डॉक्टर आहेत. दोन चुलत भाऊ, त्यांच्या बायका, नवर्‍याचा जीवश्च-कंठश्च मित्र-त्याची बायको डॉक्टर आहे. पण त्यांच्याकडूनही कधी कोथिंबीर वाईट असते असं ऐकलं नव्हतं त्यामुळे आश्चर्य वाटलं.

आणि वरच्या प्रतिसादात "साती या देखिल एमडी मेडिसिन अ‍ॅलोपथिक "अँटि नॅशनल" लुटारू/दुष्ट वगैरे आहेत. सुबोध खरे हे रेडिऑलॉजिस्ट आहेत. " या शब्दांचा उद्देश कळला नाही. ना मी सातीला (मायबोलीशिवाय) ओळखते, ना मी कधी तिला 'अँटि नॅशनल" लुटारू/दुष्ट वगैरे' आहे असं म्हटलं, ना मला सुबोध खरे वैयक्तिक रीत्या माहित आहेत. पण विषयांतर होइल म्हणून चर्चा नको.

कोथिंबीर चे सुप केले असल्यामुळे सुपचा रंग हिरवा अपेक्षित होता फोटो त दाखवलेल्या सुपचा रंग असा कशामुळे आला?

हा प्रतिसाद माझ्यासाठी आहे?
<<
नाही.
***

क्रिअ‍ॅट लेव्हल ११ प्लस कोथिंबीर काढा = मृत्यू असा सातीचा प्रतिसाद वाचला नाही, तर मग जाउच द्या.

ना मी कधी तिला 'अँटि नॅशनल" लुटारू/दुष्ट वगैरे' आहे असं म्हटलं
<<
मूळ प्रतिसाद तुमच्यासाठी अजीबातच नाही. सांगितलं ना आधीच? क्षमस्व.

आय मीन,
>>
जनरली आपण सगळ्या पदार्थात कोथिंबीर वापरतोच...
त्याच संदर्भाने , इथे सूप ची रेसिपी दिलीये...
Submitted by MSL on 16 June, 2021 - 22:28

https://www.maayboli.com/node/48273
https://www.maayboli.com/node/46932

रच्याकने. इब्लिस ही माझी मागच्याच्या मगच्याच्या मागल्या जन्मातली आयडि आहे. साती या देखिल एमडी मेडिसिन अ‍ॅलोपथिक "अँटि नॅशनल" लुटारू/दुष्ट वगैरे आहेत. सुबोध खरे हे रेडिऑलॉजिस्ट आहेत. इत्यादि.
Submitted by आ.रा.रा. on 16 June, 2021 - 22:33

संपादन (4 hours left)

आरारांशी सहमत. नुसतं चविष्ट कोथिंबीर सूप वगैरे म्हणा की.
<<

हे काँटेक्स्ट पाहूनही, तुमच्या प्रतिसादाखाली नसूनही, व तुमचा नामोल्लेखही नस्तान्ना माझा प्रतिसाद तुमच्यासाठी आहे असे कसे वाटले ते ध्यानी येत नाहिये. Sad

हा प्रतिसाद माझ्यासाठी आहे?
<<
नाही.>>> ओके.

माझ्या "https://www.maayboli.com/node/48273 ही एक सापडली. पण यात कोथिंबीर घातक असल्याची माहीती मिळाली नाही.
किडनी स्टोन अथवा किडनीच्या विकारांवर कोथिंबिरीचे पाणी उपयोगी पडते अशा कुठलाही शात्रीय, मेडीकल आधार नसलेली माहिती आहे त्या धाग्यात." या प्रतिसादानंतर तुम्ही लिंक्स दिल्या त्यामुळे मला तो प्रतिसाद माझ्यासाठी आहे असं वाटलं.
असो. तर मूळ विषयानुसार किडनीचे विकार असणार्‍या पेशंटसनी कोथिंबीर्चे उपाय करू नयेत. पण नॉर्मल लोकांच्या जेवणात कोथिंबीर असल्याने काही दुष्परीणाम नसावेत, असा निष्कर्ष काढत आहे. (म्हणजे माझ्या कोथिंबीरीच्या चटणीवर गदा यायला नको!).

आताच्या नावात काही आक्षेप असल्यास पुन्हा चर्चा करू शकता..I mean प्रतिसाद...
....कोथिंबीर चे सुप केले असल्यामुळे सुपचा रंग हिरवा अपेक्षित होता फोटो त दाखवलेल्या सुपचा रंग असा कशामुळे आला?
@@@@ त्यामध्ये तांदूळ पीठ वापरले आहे दाटपणा साठी..आणि लोणी...

कोथिंबीर शरीरास अपायकारक ही माहिती दिल्याबद्धल धन्यवाद...
आता दारुसोबत चकना म्हणून सुकी भेळ खाताना त्यात कोथिंबीर टाकणे बंद करायला हवे...

parsley चं काय ते? घटकपदार्थांमध्ये दिसत नाहीये.

आता दारुसोबत चकना म्हणून सुकी भेळ खाताना त्यात कोथिंबीर टाकणे बंद करायला हवे...
>>>>

आहो च्रप्स, सर्वात पहिले ती दारू शरीराला घातक ना?
@ आरारा, प्लीज कन्फर्म कराल का?
सिरीअसली विचारतोय, प्लीज यावर आपले प्रामाणिक उत्तर हवेय.

आताचे नाव छान आहे. माझे लक्षही या लक्षवेधीनेच वेधले. अन्यथा मी पाकृचे धागे सहसा ऊघडत नाही. उघडले तरी फोटो बघून मिटतो. ईथे प्रतिसादांत गोंधळ दिसल्याने डोकावलो. वाद चालायचाच. पण कोथींबीर चांगली की वाईट वा त्याचे फायदे तोटे यावर काही माहीतीपर पोस्टही यायला हव्या होत्या प्रतिसादात. कारण आमच्याकडे सूप करत नसले तरी कोथींबीरची चटणी. कोथींबीरच्या वड्या, पोह्याच्या प्लेटवर अगदी फुलांनी कबर झाकून टाकावी तशी कोथींबीर गार्निशिंग असे प्रकार फार चालतात.

आता विषय निघालाच आहे म्हणुन,
मी ही कोथिंबीर नक्की का घातक आहे ते शोधले धाग्यांवर पण कोथिंबीरीचे जास्त पाणी त्या रुग्णाला दिल्यास तो मरेल इतकेच दिसले. काही प्रश्न मनात आले.
काहीतरी त्या कोथिंबीरीत असेल त्यामुळे रुग्णाला चालत नसेल?
अंजलीने लिहिले तसे निरोगी लोकांना को.च्या अतीसेवनाची भिती नाही?
रुग्णांनी अजिबातच कोथिंबीर खाऊ नये की थोडी चालते की कोथिंबिरीचे पाणी खूपखूप पिऊ नये की अजिबातच पिऊ नये की पाणीच कमी प्यावे? (एकातुन अनेक प्रश्न आलेत यात).

आमच्याकडेही पोहे , रस्सा, मिसळ , भेळ आणि असे अनेक पदार्थ ज्यामध्ये 1 ,1 वाटी बारीक चिरून कोथंबीर घालतो अम्ही...चटणी ..आणि आता हे सूप पण प्यायलो..कितीवेळा..
....
त्याचा आजुन तरी त्रास नाही बघितला...
त्याची अधिक माहिती असल्यास प्रतिसाद द्यावा..

कोथिंबीर सूप immunity बुस्टर वाचून प्रतिसाद द्यावासा वाटला नाही. आज एवढे प्रतिसाद पाहून डोकावले. टॉयलेट क्लीनर ते खायप्यायच्या गोष्टी immunity booster च्या जाहीराती पाहून वीट आलाय. अशी एका दिवसात किंवा अमुक तमुक केल्याने maggi / instant immunity वाढणार आहे का?
MSL शिर्षक बदलले चांगले केलेत.

चारपाच बोल प्रमाणास दोन चमचे लिंबूरस जास्ती नाही हे बरोबर आहे. मला म्हणायचं होतं की थोडासा लिंबाचा आंबटपणा आणल्याने सूप चांगले लागते का? कारण असं करून पाहिलं नव्हतं. टोमॅटोचा वापर केला तर आंबटपणा येतोच इतर सुपात.
रेसपी आवडली.

सर्दी झाली की मी गरम सूप पितो. खूप बरं वाटतं.
या सुपात फ्लावर,गाजर,फरसबी शेंगा,कांदापात,कोबी,मक्याचे दाणे,पालक पाने, टोमॅटो चिरून टाकतो. गाळत नाही, सर्व पितो.

काही दिवसांपूर्वी हे नाव वाचलं तेव्हा खटकलं होतं. बाकी हे तर नेहमीचं कोरिऍन्डर लेमन सूप. हे केलं जातं आणि पावसाळी हवेत आवडतं. आमच्याकडे यात एकच घटक पदार्थ वेगळा वापरला जातो. राईस/कॉर्नफ्लोर ऐवजी शिजवलेली मुगडाळ. मुगडाळ अगदी पेस्ट मऊ शिजते त्यामुळे थिकनेस साठी कार्ब्जस ऐवजी प्रोटीन वापरल्याचं समाधान. आम्हाला मुगडाळीमुळे आलेलं सूपचं टेक्स्चर आणि चव कॉर्नफ्लोअरपेक्षा जास्त चांगलं वाटतं.

या सुपात फ्लावर,गाजर,फरसबी शेंगा,कांदापात,कोबी,मक्याचे दाणे,पालक पाने, टोमॅटो चिरून टाकतो. गाळत नाही, सर्व पितो....
#@@@ मी मक्याचे दाणे आणि दुधी चे तुकडे असे घातले होते एकदा...पालक पाने ,टोमॅटो ट्राय नाही केलाय...करून बघेन ..

Pages