लक्षवेधी ..कोथिंबीर सूप...

Submitted by MSL on 15 June, 2021 - 11:31
kothimbir soup
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

..
साधारण 1 लहान जुडी कोथिंबीर,
10 पाकळ्या लसूण
1 कांदा
1 तुकडा आले किसून
2 हिरवी मिरची
2 चमचे लोणी
चवीनुसार मीठ साखर
1 चमचा मिरपूड
2 चमचे लिंबू रस
2 लहान चमचे तांदूळ पीठ / कॉर्नफ्लोअर ( थिकनेस साठी हवे असल्यास )

क्रमवार पाककृती: 

1. 4 वाटी पाणी उकळत ठेवावे..
2. कोथिंबीर स्वच्छ धुवून , देठा सहित या उकळत्या पाण्यात टाकायची..
3. 5 मिनिट उकळून घेऊन गॅस बंद करायचा..
4.एका पातेल्यात हे मिश्रण गाळून घ्यावे..खाली पाणी येईल ते ठेवून द्यावे, आणि गाळण्यावर जी कोथिंबीर राहते, ती मिक्सर ला बारीक लावून घेणे..
5.लसूण चे बारीक तुकडे,मिरची चे तुकडे, कांदा तुकडे करून घेणे..मिरपूड तयार करून घेणे..
6. कढई गॅसवर ठेवा..त्यात लोणी घालायचं..ते वितळल की लसूण तुकडे,कांदा , आले ,मिरची घालून 2 ते 3 मिनिट परतून घेणे...त्यावर , गाळून उरलेले पाणी ( कृती क्र 4 मध्ये केले आहे) घालायचे...त्यातच मिक्सर वर फिरवून घेतलेली कोथिंबीर ची पेस्ट घालावी...
7. चांगले ढवळून घ्यावे..जर जास्त पातळ वाटले,तर दाटपणा येण्यासाठी, 1ते 2 चमचे तांदूळ पीठ पाण्यात पेस्ट करून ,यात घालावे...
8. चवीनुसार मीठ, साखर घालायची..
9.4 ते 5 मिनिट उकळून घ्यावे..
10. वरून लोणी मिरपूड घालून गरमच सर्व्ह करा..
Healthy tasty yummy soup ready!!

वाढणी/प्रमाण: 
4 ते 5
अधिक टिपा: 

..
## कोथिंबीर सहज उपलब्ध होते..त्यामुळे करायला जमेल आणि लहान मुले , वयस्कर व्यक्ती याकरिता चविष्ट पदार्थ..

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MSL शिर्षक बदलले चांगले केलेत.

....@@ धन्यवाद..
काही दिवसांपूर्वी हे नाव वाचलं तेव्हा खटकलं होतं

@@@ आता बदलले आहे...खटकणार नाही तुम्हाला..
तुमची मुगडाळ घालून बघायला हवी..
...

आम्ही घरात रोज जे पदार्थ करतो, त्यांच्या रेसिपीज मी पोस्ट करते...आता जरासे variation करून मी हे करते..
काहींना त्यात नवीन काहीच नसेल,कारण की त्यांच्या कडेही असेच रोज होत असेल...
काहींना नवीन समजेल..करून बघावस वाटेल..
त्यासाठी ही सोय...
कारण की मी पण या साईट वर वाचून काय काय छान करून बघितलंय..आता ते नेहमीचेच होते पदार्थ..पण केले नव्हते..
प्रतिसाद वाचून बारकावे समजतात..बदल समजतात..
...सगळ्यांनीच रेसिपी चे नाव वाचून ,ती पूर्ण बघावी आणि करावी , हा हेतू नाही..

आणि शीर्षक बद्दल, जसे दूध हळद, सुका मेवा हे आरोग्यास चांगले, असे वाचनात आहे...त्याच प्रमाणे हे दिलेले होते..
आता काही लोकांना दूध नाही पचत..त्रास होतो..सुका मेवा नाही आवडत..मग त्यांनी ते घेऊ नये..
दूध हळदीला ,कीव सुका मेवा ला नावे ठेवू नयेत...आरोग्यास हानिकारक म्हणून नये...
..at last..
लक्षवेधी झालं हे सूप...

कितीतरी रेसीपीत , किलोभर साखर टाकून , फक्त गव्हाचा बनवला म्हणून पौष्टिक लिहिणारे महाभाग आहेत इथे...
इतकं नावावरून थयथयाट कशाला तो?

तुनळीवर तर खच्चून, असल्या टॅगखाली ह्यांव पौष्टीक, त्यांव पौष्टीक विडिओ.. असतात.

मायबोली इथली रेसीपी वाचणारे लोकं ( ते पण फक्त इथेच येणारी चार टाळकी) काय इतकी डब्बू नाहियेत लगेच मनावर घ्यायला..

उलट कितीतरी डॉक लोकं, सब खाओ.. कुछ नही होता असले मधुमेहींना पण सल्ले देताना पाहिलेत. मुर्ख लोकं अश्या डॉक, देव मानत असतात.
आजकाल, सोशल मिडीयावरील प्रत्येक माहितीवर, इतका कोणी विश्वास ठेवत असेल, तर बघायला नकोच. साधं पाणी पण विष असते काही आजारात. लोकं अशी मुर्खासारखी, टाईटल वाचून करणारे असतील तर सलाम त्यांना. मग त्यांनी, "सब कुच खाओ" अश्या मुर्ख डॉक जावे.

---------------
न्युट्रिशन आणि लाईफस्टाईल ईन्ड्युस्ड डिसीज हा व असा वगैरे सविस्तर विषयच नसतो मेडिकलच्या(एम्बीबीएस) चार वर्षात. बरं का? Wink
खास त्या विषयात पुढची पदविका घेताल्याशिवाय.. ते हि अगदी अलीकडेच... कन्वेशन मेडिसीन ईज नॉट फोकस्ड ओन न्युट्रीशन... सॅड ट्रूथ)

म्हणजे या सूप मध्ये इम्युनिटि बूस्टर असं काही नाही हे तुम्हांला मान्य आहे तर.
मग तेवढंच वगळायला सांगितलं तर काय चुकलं?
लोक मूर्ख असतात. लिंबाचा रस डोळ्यांत घालून आंधळे होतात. असे लोक मायबोलवर नसतीलच याची खात्री कशी देता येईल?

ही रेसिपी आणि प्रतिसादांत ल्या दोन लिंक मिळून तिघांनी कोथिंबीर जादुई औषध असल्याचे दावे केलेत आणि ते तिघेही मायबोलीकर आहेतच. एका ताईंचं तर बीपी शूट झालेलं दिसतंय.

की लोक फक्त असं सांगतात, प्रत्यक्षात कोणी करत नाही, वेळ आली की मॉडर्न मेडिसिनच्याच आश्रयाला जातात असं म्हणताय? Wink

तुम्ही तुमच्या पद्धतीने अर्थ काढताय. अपेक्षितच होते.
पण मी लिहिलेलं तुम्हाला कळलं असतं तर, तुमचं जर तर झालं नसतं.

पुर्ण पोस्ट नीट वाचा. नाही वाचली तरी हरकत न्हवती. पण उगाच घाई नको. तुम्हाला अशी लिहिलीच न्हवती. ...

तुम्ही तुमचं नेहमीचं गिऱ्हाईक पाहून लिहीत असाल.
पण तसं करताना सूप इम्युनिटी बूस्टर , तेही करोना बाबत अशा दाव्याकडे दुर्लक्ष करताय किंवा त्यांचं अप्रत्यक्ष समर्थन करताय.

MSL,
सूप च्या immunity बद्दल फारशी कल्पना नाही.

मात्र तुमची शांत , संयत आणि सौम्य शब्दात आपले विचार मांडण्याची पद्धत आवडली. मला वाटते ती आरोग्याला नक्कीच फायदेकारक आहे.

>>>>मुगडाळ अगदी पेस्ट मऊ शिजते त्यामुळे थिकनेस साठी कार्ब्जस ऐवजी प्रोटीन वापरल्याचं समाधान. >> कार्ब ऐवजी नाही तर कार्बसह प्रोटीन. पाव कप कोरडी मूगडाळ असेल तर त्यात ३२ ग्रॅम कार्ब्ज आणि १२ ग्रॅम प्रोटिन्स.

इथे कोथिंबीरी अपायकारक आहे का वरुन चर्चा सुरु आहे तर - आमच्या घनिष्ट संबंधातील आजीबाईंना डॉक्टरांनी ब्लड थिनर औषधं सांगितली होती तर तेव्हा ड्रग इंटरअ‍ॅक्शन होवू नये म्हणून के विटॅमिन वाल्या भाज्यांची यादी दिली होती आणि काहीतरी प्रमाण ठरवून दिले होते कमी खाण्यासाठी. पेशंट देशी अहे म्हणून त्या यादीत त्यांनी आवर्जून कोथिंबीरही समाविष्ट केली होती. ही घटना बरीच जुनी आहे. आत्ता काही नवी औषधे आहेत त्यांना तशी ड्रग इंटरअ‍ॅक्शन होत नाही असे कळले.

खरंतर मग असा कोणताही खाद्यप्रकार नसेल ज्याच्या अतिरेकाने माणसाला त्रास होत नसेल वा काही रोगात थोडा खाऊन पण त्रास होत असेल. मग कोणत्याच पाककृतीवर सरसकट पौष्टिक लिहिता येणार नाही की. माझ्या मैत्रिणीला ढबु मिरच्या शरिराला सहन होत नाहीत. डोळे सुजतात. आता तिला माहिती झाले म्हणून नाहीतर बिचारी त्रास सहन करत राहिली असती. (रंगीत ढबु मिरच्या ज्यांना आपण उत्कृष्ट Antioxidants म्हणतो). त्यामुळे कशावरच पौष्टिक लिहु नये.

कोणत्याही भाषेतला पाककृती एपिसोड पाहा. त्यात मुलांसाठी पौष्टीक सांगत असतात.
बच्चों के लिए
बाळकोमाटे
कुट्टिकळगळ
..
..
असो.

कोणत्याही भाषेतला पाककृती एपिसोड पाहा. त्यात मुलांसाठी पौष्टीक सांगत असतात.
>>>तिथे मायबोलीवरचा कराउड नसेल...

उगाच इम्युनिटी बूस्टर पौष्टिक ही नावे नकोत हे मान्य.

पण आता कोथिंबीर अपायकारक आहे का ही चर्चा?

मग प्रत्येक पाककृती धाग्यात आधी डिस्क्लेमर द्यावा:
" या पाकृतील एक वा अनेक घटक कदाचीत तुमच्या आरोग्यास अपायकारक असू शकतील. कृपया पाकृ करण्यापूर्वी जे कुणी खाणार आहेत त्या सर्वांच्या डॉक्टरांचा यातील घटकांची यादी दाखवून सल्ला घ्या"

मीठ चवी नुसार असे नका लिहू, मीठ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असे लिहा. तेला बाबतपण तेच.

दारूचे धागे मात्र कसलेही डिस्क्लेमर न टाकता बिनधास्त चालू द्या.

कुठल्याही रेसिपीवर एवढी चर्चा पहिल्यांदाच बघितली इथे. एवढं करण्याची काय गरज? इथे "इम्युनिटी बुस्टर" असं लिहिलंय म्हणून सगळे वाचक फक्त हेच सूप पिऊन आरोग्याची स्वप्न बघतील असं नाहीये. धाग्याला काय नाव द्यावं किंवा काय नाव देऊ नये या बाबतीत सुचना आहेत का माबोवर? वाचणारा तेवढा सूज्ञ असणारच. जशा बाकीच्या रेसिपीज् असतात तशीच ही एक असं बोलून पुढे जायला हरकत नाही. एवढा कीस उगीच पाडला आहे असं मला वाटतं.

भरत, तुमची भाषा जरा सुधारा. नीट बोलता येत नसेल तर बोलु नका.
तुमच्या विचारांचे व संस्कार प्रदर्शन कमी करा व सगळेच तुमच्याप्रमाणे नसतात. ह्यापुढे काही बरळणार नाही ह्याची ताकिद समजा.

ऑं?
भाषेबद्दल तुमच्याकडून धडे घेण्याएवढी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही.

तुमचा सल्ला/ उपदेश/ धमकी विनाआभार परत.

अगदी, तुम्हाला शोभेल असाच अपेक्षित प्रतिसाद आहे. तुमच्यासारख्या कडून आणखी काय अपेक्षित असणार म्हणा.
मूळची पोस्ट तुम्हाला उद्देशूनच न्हवती. मग स्वतःच्या टिचभर अकलेने , त्यातले सोयिस्कर अर्थ काढत, नीच पातळीची भाषा वापरत प्रतिसाद दिलात काहीच गरज नसताना. त्या भाषेवरूनच तुमचे संस्कार दिसले.
आणखी फालतुपणा कराल तर तो तुमच्यकडेच ठेवा व ह्यापुढे मला कुठलेही दिलेले प्रतिसाद , एका मुर्ख अक्कल्शुन्य व संस्कारशुन्य आयडीचे आहेत हे समजून दुर्लक्ष करेन.
आता, बसा बरळत आणि गरळ काढत.

तुमची शांत , संयत आणि सौम्य शब्दात आपले विचार मांडण्याची पद्धत आवडली. मला वाटते ती आरोग्याला नक्कीच फायदेकारक आहे.@>> +111

kiti charcha! yevadhya velat soup zale asate. Happy

Lol

माझ्या प्रतिसादातल्या कोणत्याही शब्दाचा तुम्हांला वावगा अर्थ लागत असेल तर तो तुमच्या विचारांचा आणि संस्कारांचा दोष.

ओपन फोरमवर कोणा एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून पोस्ट कशी लिहावी ते शिकून घ्या.

आणि विशिष्ट व्यक्तींना विरोध करण्याच्या नादात तुम्ही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करताय हे अजूनही कळत नाही आणि मला अक्कलशून्य म्हणताय? तुमची इतरही विशेषणं तुम्हांलाच लागू पडताहेत की नाही ते तपासून पहा.

तुमच्या पहिल्या प्रतिसादातल्या थयथयाट शब्दाचं उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखवल्याबद्दल अभिनंदन.

लोकहो कोथींबीराचे शरबत प्या लिंबू पिळून आणि शांत व्हा Happy
धाग्यावर चर्चा झाली की काही माहीतीपर पोस्ट येतात. मात्र ईथे कोथींबीरचे फायदे तोटे तितके अजून आले नाहीत. चर्चा शीर्षकाभोवतीच घुटमळत राहिली.
कोणीतरी ते दिल्यास या वादाचा वाचकांनाही फायदा होईल Happy

तसेच हा वाद एखाद्या दारूच्या धाग्यावर झाल्यासही आवडेल. कारण आधी मला वाटायचे की दारू वाईट आहे हे दारू पिणाऱ्यांनाही ठाऊक आहे. पण नंतर हा गैरसमज दूर झाला. हवे तर यावर आपण वेगळा धागा काढू..

मग प्रत्येक पाककृती धाग्यात आधी डिस्क्लेमर द्यावा:
" या पाकृतील एक वा अनेक घटक कदाचीत तुमच्या आरोग्यास अपायकारक असू शकतील. कृपया पाकृ करण्यापूर्वी जे कुणी खाणार आहेत त्या सर्वांच्या डॉक्टरांचा यातील घटकांची यादी दाखवून सल्ला घ्या"
<<

चर्चा, ही 'इम्युनिटी बूस्टर' + करोना वगैरे लिहिल्याबद्दल होती. हे क्वॅकरी सदराखाली येते. आपल्या देशात "घरगुती" "मेडिसिन" सांगणे, अन वाट्टेल ते उपाय करणे ही नॉर्म आहे. उच्चशिक्षित व अतीशिक्षित लोकही हेच करीत असतात. बिन्धास्त ठोकून देणे. त्याबद्दल तोफांड मांडले होते.

माझ्या वरील एका प्रतिसादात मी लिहिलंय, चवीबद्दल बोला, पाकृ सुंदर आहे. इम्युनिटी, करोना वगैरे भंकस, नो. ए ना चॉलबे.

तेव्हा धागा टायटल एडिटल्याबद्दल प्लस अधिक टीपांत करोना गायब केल्याबद्दल धन्नेवाद. धन्स. धन्यू वगैरे.

बाकी नेहेमी प्रमाणे रुनुझुनु बाळाने येऊन दारूचे टुमणे वाजवलं आहेच.

त्याला उत्तर,

"रुन्म्या तू पितोस तितकी दारू तब्येतीला चांगली नाही. मी पितो तितकी चांगली असते. दुसरे, भारतात मिळते ती "आयेमेफेल" उर्फ इन्ड्यन मेड फारेन लिकर पित जाऊ नकोस. ती उसाच्या मळीच्या अल्कोल्होल ला फक्त रंग देऊन बनवलेली असते. चांगली दारू अगदी देशी देखिल प्याली तरी चालेल. ती त्रासदायक नसते. चांगल्या दारूत अल्कोहोल सोबत इतरही घटक असतात, जे पदार्थ आंबवताना तयार झालेले असतात, उदा. वाईनमधील अँटीऑक्सिडंट्स इत्यादि. अन मुख्य म्हणजे विदेशी सिनेमा/सिरियल्स मधे ते लोक दारू कशी अर्धा अर्धा थेम्ब पितात ते नीट पहा. तशी अन तितकीच प्यायची असते."

धन्यवाद

***
कृपया पाकृ करण्यापूर्वी जे कुणी खाणार आहेत त्या सर्वांच्या डॉक्टरांचा यातील घटकांची यादी दाखवून सल्ला घ्या"
<<
हे एका दृष्टीने १००% बरोबर आहे. डायबेटीस, किडनी, थायरॉईड, अल्सर, अ‍ॅसिड पेप्टिक डिसीज, अनेक. अहो, 'पथ्य काय' हा प्रश्न किती भक्तीभावाने विचारता ना? डॉक्टर, भात खाल्ल्याने जखम पिचडणार नाही ना हे कसे येडपटपणे विचारता?

अशा गोष्टींमुळेच मॅगीच्या जाहिरातीत 'हेल्थ भी' टेस्ट भी, असले डायलॉग पाहून मज्जा येते. माझ्या स्वयंपाकाची चव पहा. कदाचित त्यामुळे तुमचा जीव जाईल, हे शक्य आहे, आणी म्हणूनच मी माझी कोणतीही पाककृती 'हेल्दी/इम्ह्युनिटी बुस्टर' वगैरे मी म्हणणार नाही. हा अन इतकाच मुद्दा आहे व होता.

Pages