किडनविकारावर उपचार

Submitted by kaavya on 23 December, 2013 - 07:38

क्रुपया काहि आयर्यवएदिक अथवा होमिथइ उपचार सागावे.खात्रइशिर उपचार कलवावे खउप गरज आहए

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किडनी विकार? Uhoh म्हणजे नक्की काय होतंय?
आणि असं इथे सल्ला विचारण्यापेक्षा ओळखित एखादे वैद्य असतील तर त्यांना दाखवा.

वय ३२आहए आठवडयातउन दोन्दा डायलिसिस करावे लागते क्रिटैनाइन ११ आहे डायलिसिस कमि करन्यासाठै काहि उपचार माहित असल्यास सागावे

काव्या, आपण कोणत्या शहरात आहात. आयुर्वेद /होमिओपॅथी मधे सध्या तरी यावर खात्रीशीर उपाय नाहीत.
आपण तज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट गाठावे. आपण संपर्कातुन कळविल्यास मदत करु शकते.

मी कुठेतरी वाचलेली ही माहिती आहे, त्याचा पडताळा घेतलेला नाही पण करून पहायला काहीच हरकत नाही कारण यात घातक काहीच नाही...

CLEAN YOUR KIDNEYS IN Rs. 1.00 OR EVEN LESS

Years pass by and our kidneys are filtering the blood by removing salt, poison and any unwanted entering our body. With time, the salt accumulates and this needs to undergo cleaning treatments and how are we going to overcome this?

It is very easy, first take a bunch of parsley (MALLI Leaves) KOTHIMBIR (DHANIYA)and wash it clean
Then cut it in small pieces and put it in a pot and pour clean water and boil it for ten minutes and let it cool down and then filter it and pour in a clean bottle and keep it inside refrigerator to cool.

Drink one glass daily and you will notice all salt and other accumulated poison coming out of your kidney by urination also you will be able to notice the difference which you never felt before.

Parsley is known as best cleaning treatment for kidneys and it is natural!

मी कुठेतरी वाचलेली ही माहिती आहे, त्याचा पडताळा घेतलेला नाही पण करून पहायला काहीच हरकत नाही कारण यात घातक काहीच नाही..
<<
एक शंका विचारू?
बाकी बाबतीत तुम्ही शुअर नाही आहात.
पण,
"यात घातक काहीच नाही.."
हे कशाच्या जोरावर म्हणताहात? काही पडताळा/रिसर्च/वाचन/पुरावा/विदा इत्यादी?

माझ्या मैत्रिणीच्या सासर्यांना ह्याबाबतीत बालाजी तांब्याच्या औषधाचा गुण आला .

असं इथे सल्ला विचारण्यापेक्षा ओळखित एखादे वैद्य असतील तर त्यांना दाखवा.>>> १००%

प्रसाद काळे,
वॉटर रिटेन्शनसाठी वाचत असताना parsley (MALLI Leaves) KOTHIMBIR (DHANIYA) च्या रसाची आहारात समावेश करण्याबाबत उल्लेख वाचला.पोटॅशियम जास्त असलेले अन्न अभिप्रेत आहे.

इब्लिस. तुम्हाला विदा देऊ का?
Wink
११ क्रिअ‍ॅट असलेल्या माणूस दररोज एक ग्लास पार्स्लेचा काढ प्यायला की विदा द्यायला जीवंत रहाणारच नाही.
दोन तीन दिवसांत हायपरकॅलेमियाने मरून जाईल.

सातीअम्मा,
विदा देऊनही लोकांच्या विचारसरणीत फरक पडेल असे वाटत नाही. लोकांनी जिवाशी खेळू नये म्हणून काही बोलले, तर आपण डॉ. मंडळी आयुर्वेद द्वेष्टे आहोत, इतकेच इथल्यांच्या डोक्यात शिरते.
यांना १ रुपयांत किडन्या 'साफ' करून घ्यायच्यात फक्त.
करोत बापडे! आपण कोण सांगणार?

Sad

प्रसाद काळे,
वर डॉ. साती यांनी काय लिहिलंय ते समजतंय का तुम्हाला?
सिरम क्रिअ‍ॅटिनिन लेव्हल ११ असलेल्या पेशंटला, (उदा. आपले धागाकर्ते, ज्यांना अठवड्यात २ वेळा डायलिसिस लागते,), तुम्ही सांगितलेला काढा पाजला तर तो पेशंट २-३ दिवसात नक्की मरेल. याचा अर्थ लक्षात आला का?
असा सांगोवांगीचा सल्ला तुम्ही दिला, अन त्यांनी ऐकला, व काही घडलेच, तर नैतिक जबाबदारी कुणी घ्यायची??

यावर कादाचित असे तिरकस शेरे मारण्यापेक्षा मूळात नीट उत्तरे इथले वैद्यकशास्त्री का देत नाहीत हा प्रश्न येईलच.
तर किडनीविकारावर उपाय ही अत्यंत व्हेग टर्म आहे.
यावर कुठलाही मॉडर्न मेडिसीनचा डॉक्टर उत्तर देऊच शकणार नाही(आमची कमतरता समजा Wink )
त्यापुढे जेव्हा कळले की अकरा क्रिअ‍ॅट आणि आठवड्यातून दोनदा डायलिसीस मग आमच्या मते उत्तम उपाय चालू आहेत.
किडनी ट्रान्सप्लान्टच्या ऑप्शनविषयी तर त्या रुग्णाच्या डॉक्टरांनी नक्की सांगितले असेलच.

माझ्या वडीलाना सान्गन्यात आलेले काहि अचाट आणि अतर्‍क्य उपाय....

१. गुरु चि महादशा असल्याने पुखराज खडा वापरा. (गुरु हा किडनी चा कारक की सारक कि काहितरि आहे...चु.भु. द्या.घ्या.

२. गोमुत्र + काहि वनौशधि घालुन रोज १ ग्लास

३. स्वमुत्र रोज १ ग्लास (आजचे साठवुन उद्या वापरावे)

४. वर दिलेला काढा रोज १ ग्लास

आणि गम्मत म्हनजे एलोपथि च्या डॉक्तरानी मात्र त्यान्च्या शरिरात दिवस्भरात सगळे मिळुन जास्तिजास्त १ ग्लास पाणिच जाईल याचि काळजी घ्यायला सान्गितलि होती.

क्रिअ‍ॅटिनिन असेच ११ होते आणि ३ वेळा आठवड्यातून डायलिसीस.

अर्थात आमच्या घरचे सगळे ठार नास्तिक आणि आयुर्वेद / होमियो द्वेष्टे असल्यामुळे वरील्पैकी काहिच केले नाहि.

अवान्तरः त्यानी देहदान केले होते, त्यामुळे त्यान्च्याच इछेनुसार काहिहि शान्ति, तेरावा ई. केले नाहित. पण आमच्यापासुन १००० किमि वर रहणार्या एका चुलत काकानी मात्र 'ते रोज स्वप्नात येतात, त्यान्चा आत्मा फिरतोय' असे म्हणत शान्त करविली.

माझ्या वडिलांचे क्रिअ‍ॅटिनिन ७ झाले म्हणून october पासून dialysis सुरु केले आहे तेही आठवड्यातून २ वेळा . ते स्वत doctor आहेत त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मरेपर्यंत dialysis करावे लागते . इतर उपचारांचा काही फायदा नाही. आम्ही मुले दुसऱ्या आणखी एखाद्या पॅथीची औषधे घ्या म्हणून मागे लागलो आहे पण ते काही ऐकत नाहीत.

renal transplant is th only other option..
but patients age is also important in that.