"पती-पत्नीच्या नात्यातील पारदर्शकता!"

Submitted by चंद्रमा on 9 June, 2021 - 04:33

........नात्यांमध्ये पारदर्शकता असावी कारण पारदर्शक नातीच प्रदीर्घ काळ जिवंत राहतात. एकदा का त्या नात्यांमध्ये अस्पष्टता आली की ती नाती निर्जीव आणि निस्तेज होत जातात.
'भांडण' हा शब्द पुर्वानुकालापासून आपल्या कानावर ऐकायला येतो. आपल्या घरी असणारे 'आजी-आजोबा', 'आई-बाबा', 'काका-काकू' आपल्याला भांडताना दिसतात. चार चौघांकडून सुद्धा हेच ऐकायला मिळतं जिथे चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच! अशी भांडणाऱ्याची समजूत घालतात. समाजातील जनमानसाकडून आपल्या मनःपटलावर हे बिंबवले जाते की 'नवरा-बायको' एकत्र असतील तर त्यांच्यामध्ये 'तंटा' होणारच ! हा मनोग्रह धरून आपण वाढतो. त्यामुळे भांडणाची प्रवृत्ती आपल्याला समाजातूनच देणगी स्वरुपात मिळाली आहे.
......नवरा बायकोचे नाते कसे असावे? हे कित्येकांना कळलेलेच नाही. आजही कुठे-कुठे आपला पौरूषी रोब झाडणारे बिनचुके दिसतात पण त्यांचा संसार सुरू होण्याआधीच संपतो पण फार पूर्वी आणि अगदी आमच्या पिढीच्या तरुणपणातही बायको ही 'क्षणाची पत्नी' आणि 'अनंत काळाची मोलकरीण' हा समज दृढ होता. "नवरा-बायको ही संसार रथाची दोन चाके आहेत." ही कल्पना आता कालबाह्य होत चालली आहे तर मुळ मुद्दा बाजुलाच राहला तर 'भांडण' का होतात? तर त्यासाठी तुम्हाला एक सुंदर दाखला देतो.

.....दोन मित्र जॉगिंगला सकाळी भेटतात. रमेशची तक्रार असते की त्याचे त्याच्या बायको सोबत रोज भांडणं होतात. सुरेशला तो यावर काही सोल्युशन आहे का म्हणून विचारतो. 'रमेश' या विषयावर आपण घरी जाऊन बोलू. असे म्हणून सुरेश रमेशला आपल्या घरी घेऊन येतो. सकाळचा स्वच्छ सुंदर प्रकाश खिडकीतून पाझरत असतो तरी पण श्रीमान श्रीमतीला दिवसा लाईट लावायला सांगतात. पत्नी काही न बोलता दिवा लावते त्यानंतर पत्नी दोघांसाठी चहा घेऊन येते. रमेश चहाचा कप तोंडाला लावतो तर चहा त्याला कडवट लागतो. चहा बाजूला ठेवून देतो पण सुरेश चहा दोन घोटात संपवतो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो. रमेशला आश्चर्य वाटते चहामध्ये साखर नसून मीठ असतानासुद्धा हा आपल्या बायकोला काहीही बोलला नाही. बाहेर पडताना 'रमेश' त्याला याचं कारण विचारतो तर 'सुरेश' बोलतो, "पहा मी सकाळी आल्यानंतर गरज नसताना सुद्धा लाईट लावायला सांगितले तर बायकोने काही न बोलता आत गपचूप दिवा लावला आणि मी पण चहात साखरेऐवजी मीठ असताना सुद्धा तिला काही बोललो नाही अर्थातच हे तिने काही जाणून केले नाही पण मला न बोलताच कळाले." यासारख्या लहान-सहान बाबींना आपण समजून घेतलं तर दोघांमध्ये वाद-विवाद होत नाही. या सुरेशच्या संभाषणाने रमेशला सुखी आणि आनंदी राहण्याचा मंत्र मिळाला. मनावरचे दडपण हलके झाल्यासारखे वाटले आणि तो हसत मुखाने घरी परतला.

......आयुष्यात आपण जसे इतरांना आदर देतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. कोणी आपल्यासाठी काही केलं तर लगेच 'धन्यवाद'! 'थँक यू!' म्हणतो तसं लहान सहान गोष्टींसाठी आपल्या पत्नीचे आभार व्यक्त करा. तिला जवळ घ्या. प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवा आणि मग बघा आनंदाचे मोती कसे तिच्या गालावर तरळतात.
.....शब्द हे तीष्ण अग्निबाणाप्रमाणे असतात जेव्हा भात्यातून या अग्निबाणांचा वर्षाव होतो तेव्हा मौनरूपी जलबिंदूचा वर्षाव करून त्याची दाहकता कमी करायला हवी.
"जेव्हा राग आला तेव्हा थोडं थांबलं आणि चुकलं तेव्हा थोडं नमलं"तर हा जीवन प्रवास कसा आनंदात निघून गेला हे कळणार सुद्धा नाही. "पतीचे प्रेम हे पत्नीच्या हृदयातील अमृत तर पत्नीचे प्रेम हे पतीकरीता संजीवनीच!"
आयुष्यात एकमेव जिवलग मैत्रीण ही बायकोच होऊ शकते आणि जिवलग मित्र हा नवराच! हे नातं सुंदर आणि सुदृढ असलं की जीवनातले कुठलेही चढ-उतार आपण सहज पार करु शकतो.

(आपले या विषयावर काही मनोगत असतील तर कृपया मायबोलीकरांनी व्यक्त करावे ही नम्र विनंती!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पा आ Lol "त्यांच्या हडळींच्या समस्या" Biggrin
नामोहरम नामोहरण नामोबोकड
आता फक्त बोकोहराम चा उल्लेख राहिला

पारदर्शक पती पत्नी म्हणजे मला लहानपणीच्या पुस्तकातलं अमावास्येच्या काळोख्या रात्री वडा-पिंपळाच्या झाडावर लटकणाऱ्या किंवा शेंड्याभोवती विहरणाऱ्या भुतांचं चित्र डोळ्यासमोर येतं..

Lol
'मायबोलीकरांनो व्यक्त व्हा' हे इथून पुढे कोणीही म्हणू नये हा धडा मी घेतलायं. धागा विरंगुळामधे जायची वेळ आली.... Biggrin

How To Make Kashmiri Salt Tea

Ingredients
• 1/4 Tea spoon Tea leaves.
• 1 pinch meetha soda (sodium bicarbonate).
• Salt to taste.
• 1 table spoon malai (fresh Cream).
• 1 elaichi (Cardamom).
• 3g crushed fresh adrak (Ginger).
• 1 steel patila.

METHOD:
• Put tea leaves and meetha soda in a steel patila and add two cups of water.
• Keep it on a low flame for 20-25 minutes till the colour is blakish red.
• Add 1/2 cup water, 1/2 cup milk, ginger, salt and crushed cardamom.
• Boil it on a medium flame.
• Pour in a cup, add cream and enjoy the taste and heavenly freshness.

'>> मायबोलीकरांनो व्यक्त व्हा' हे इथून पुढे कोणीही म्हणू नये हा धडा मी घेतलायं
असं काही नाही हो. चर्चा करताना थोडे हलके फुलके हवेच की. शिनेमात नाही का अधूनमधून कॉमेडी गाणी घालतात. मग पुन्हा हिरो नी मंडळी मूळ विषयाला धरून कथानक पुढे ढकलतात. (पूर्वीच्या काळात ह्या गाणे कॉमेडी टाईम चा उपयोग लोकं शॉर्ट ब्रेक घेण्यासाठी करायचे :D)

वीरू खरच हां तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही उदयोन्मुख लेखकाल संधी देता! कारण एखादा नवखा खेळाडू अष्टपैलू क्रिकेटरसोबत खेळत असेल तर तो नामवंत खेळाडू नवख्या खेळाडूला बॅटींग करू देतो फक्त त्याला मनसोक्त फटकेबाजी करता यावी म्हणून! मोठ्या खेळाडूचा हाच गुण त्याला आणखी मोठा करीतो‌!

शरदजी आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.प्रतिसांदाची संख्या वाढवण्याचा माझा काही नेम नाही बस मायबोलीकरांसोबत चर्चेत सहभागी व्हायला संधी मिळते ऐवढाच आपलेपणा त्यातून मिळतो याहून दुसरे काय?

आदू काही का असेना पण आपला प्रतिसाद हा एक वास्तवाची जाणीव करून देतो! धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी!

रश्मीजी आपण प्रतिसादांचे केलेले अवलोकन खरच प्रशंसनीय आहे! आपल्या मतांच्या अनेक छटा हे रंग उधळण्यात कारकच असतात!
धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी!

'जिद्दु' आपल्या अनमोल प्रतिसादासाठी उपकृत आहे!
आपल्यासारख्या दिलदार मनाच्या माणसांनीच या पामराला पाठबळ मिळतं! नाहीतर या साहित्याच्या सागरात रत्नांकरांची कमी थोडीच आहे.या मोत्यांमध्ये आम्हा पामरांची काय बिसाद!

खरतर ऋन्मेशजी आपले मायबोलीकर फार चाहते आहेत!
म्हणूनच ते लहान-सहान बाबींशी तुमचा सबंध जोडतात!
प्रत्यक्षात ते तुमच्यावरचे मायबोलीकरांचे निस्सीम प्रेम आणि श्रद्धा आहे! त्यांचे तुमच्यावरचे प्रतिसाद याची साक्ष पटवून देतात!

मोरोबा काही का असेना पण आपण आपल्या काश्मिरी लवणी चहाची रेसेपी सांगून चर्चेमध्ये हास्याची एक लकेर उमटवली! आभारी आहे!

चंद्रमा खरे तर सगळ्यांनी तुमचेच आभार मानले पाहिजेत. या कठीण काळात तुम्ही हसु फुलवले. धन्यवाद.

Pages