"पती-पत्नीच्या नात्यातील पारदर्शकता!"

Submitted by चंद्रमा on 9 June, 2021 - 04:33

........नात्यांमध्ये पारदर्शकता असावी कारण पारदर्शक नातीच प्रदीर्घ काळ जिवंत राहतात. एकदा का त्या नात्यांमध्ये अस्पष्टता आली की ती नाती निर्जीव आणि निस्तेज होत जातात.
'भांडण' हा शब्द पुर्वानुकालापासून आपल्या कानावर ऐकायला येतो. आपल्या घरी असणारे 'आजी-आजोबा', 'आई-बाबा', 'काका-काकू' आपल्याला भांडताना दिसतात. चार चौघांकडून सुद्धा हेच ऐकायला मिळतं जिथे चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच! अशी भांडणाऱ्याची समजूत घालतात. समाजातील जनमानसाकडून आपल्या मनःपटलावर हे बिंबवले जाते की 'नवरा-बायको' एकत्र असतील तर त्यांच्यामध्ये 'तंटा' होणारच ! हा मनोग्रह धरून आपण वाढतो. त्यामुळे भांडणाची प्रवृत्ती आपल्याला समाजातूनच देणगी स्वरुपात मिळाली आहे.
......नवरा बायकोचे नाते कसे असावे? हे कित्येकांना कळलेलेच नाही. आजही कुठे-कुठे आपला पौरूषी रोब झाडणारे बिनचुके दिसतात पण त्यांचा संसार सुरू होण्याआधीच संपतो पण फार पूर्वी आणि अगदी आमच्या पिढीच्या तरुणपणातही बायको ही 'क्षणाची पत्नी' आणि 'अनंत काळाची मोलकरीण' हा समज दृढ होता. "नवरा-बायको ही संसार रथाची दोन चाके आहेत." ही कल्पना आता कालबाह्य होत चालली आहे तर मुळ मुद्दा बाजुलाच राहला तर 'भांडण' का होतात? तर त्यासाठी तुम्हाला एक सुंदर दाखला देतो.

.....दोन मित्र जॉगिंगला सकाळी भेटतात. रमेशची तक्रार असते की त्याचे त्याच्या बायको सोबत रोज भांडणं होतात. सुरेशला तो यावर काही सोल्युशन आहे का म्हणून विचारतो. 'रमेश' या विषयावर आपण घरी जाऊन बोलू. असे म्हणून सुरेश रमेशला आपल्या घरी घेऊन येतो. सकाळचा स्वच्छ सुंदर प्रकाश खिडकीतून पाझरत असतो तरी पण श्रीमान श्रीमतीला दिवसा लाईट लावायला सांगतात. पत्नी काही न बोलता दिवा लावते त्यानंतर पत्नी दोघांसाठी चहा घेऊन येते. रमेश चहाचा कप तोंडाला लावतो तर चहा त्याला कडवट लागतो. चहा बाजूला ठेवून देतो पण सुरेश चहा दोन घोटात संपवतो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो. रमेशला आश्चर्य वाटते चहामध्ये साखर नसून मीठ असतानासुद्धा हा आपल्या बायकोला काहीही बोलला नाही. बाहेर पडताना 'रमेश' त्याला याचं कारण विचारतो तर 'सुरेश' बोलतो, "पहा मी सकाळी आल्यानंतर गरज नसताना सुद्धा लाईट लावायला सांगितले तर बायकोने काही न बोलता आत गपचूप दिवा लावला आणि मी पण चहात साखरेऐवजी मीठ असताना सुद्धा तिला काही बोललो नाही अर्थातच हे तिने काही जाणून केले नाही पण मला न बोलताच कळाले." यासारख्या लहान-सहान बाबींना आपण समजून घेतलं तर दोघांमध्ये वाद-विवाद होत नाही. या सुरेशच्या संभाषणाने रमेशला सुखी आणि आनंदी राहण्याचा मंत्र मिळाला. मनावरचे दडपण हलके झाल्यासारखे वाटले आणि तो हसत मुखाने घरी परतला.

......आयुष्यात आपण जसे इतरांना आदर देतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. कोणी आपल्यासाठी काही केलं तर लगेच 'धन्यवाद'! 'थँक यू!' म्हणतो तसं लहान सहान गोष्टींसाठी आपल्या पत्नीचे आभार व्यक्त करा. तिला जवळ घ्या. प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवा आणि मग बघा आनंदाचे मोती कसे तिच्या गालावर तरळतात.
.....शब्द हे तीष्ण अग्निबाणाप्रमाणे असतात जेव्हा भात्यातून या अग्निबाणांचा वर्षाव होतो तेव्हा मौनरूपी जलबिंदूचा वर्षाव करून त्याची दाहकता कमी करायला हवी.
"जेव्हा राग आला तेव्हा थोडं थांबलं आणि चुकलं तेव्हा थोडं नमलं"तर हा जीवन प्रवास कसा आनंदात निघून गेला हे कळणार सुद्धा नाही. "पतीचे प्रेम हे पत्नीच्या हृदयातील अमृत तर पत्नीचे प्रेम हे पतीकरीता संजीवनीच!"
आयुष्यात एकमेव जिवलग मैत्रीण ही बायकोच होऊ शकते आणि जिवलग मित्र हा नवराच! हे नातं सुंदर आणि सुदृढ असलं की जीवनातले कुठलेही चढ-उतार आपण सहज पार करु शकतो.

(आपले या विषयावर काही मनोगत असतील तर कृपया मायबोलीकरांनी व्यक्त करावे ही नम्र विनंती!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रमाजी, तुमचे कौतुक करावे तितके कमीच वाटते. माबोवर पदार्पण करताच आपण माबोकरांमध्ये दडलेल्या लेखकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि आता इतका संवेदशील विषय तुमच्या हलक्याफुलक्या शैलीत मांडला. आपण केवळ लेख लिहुन थांबला नाहीत. तर प्रतिसाद देणाऱ्यांवर नम्रपणे शब्दरुपी फुले उधळुन त्यांना प्रोत्साहित केले. जणुकाही आपण माबोकरांमध्ये दडलेला लेखक शोधु पहात होता.

आमच्याकडे नवऱ्याने भर उजेडी लाईट लाव म्हणलं असत तर मागच्या 4 महिन्याची लाईट बिलं धडाधड ओपन करून दाखवली असती आधी आणि मग नवऱ्याने घाबरून चालू असलेला फॅन पण बंद केला असता
चहा जेव्हा केव्हा बनतो आमच्याकडे तेव्हा सगळ्यांसाठी बनतो,सो मीठ टाकायचं कॅन्सल,त्यात पण चहा बेचव च बनवायचा असेल तर थोडी साखर चहा इकडे तिकडे करेन मी पण डायरेक्ट झिंगल्यासारखं मीठ नै टाकणार

म्हणजे आमचं नातं पारदर्शी नसणार बहुतेक

हे ऋन्मेषचे भाऊ आहेत की ऋन्मेषच आहे हा आय डी. Uhoh प्रत्येक प्रतीसादाला जातीने प्रतीसाद देऊन धागा वर ठेवण्याचे कसब त्याचेच.

आदू .. आमच्याकडे पण आजपर्यत कधीच चहात मीठ नाही पडले.. चहात साखरच नाही घातली.. किंवा कमी जास्त.. पण मीठ कधीच नाही.. म्हणजे बहुतेक आमच्या नात्यात पण पारदर्शकता नसेल.. पण थ्रिल नक्कीच आहे..कधी शब्दांचे वाग्बाण .. तोफगोळे ..

हे ऋन्मेषचे भाऊ आहेत की ऋन्मेषच आहे हा आय डी. Uhoh प्रत्येक प्रतीसादाला जातीने प्रतीसाद देऊन धागा वर ठेवण्याचे कसब त्याचेच.
नवीन Submitted by रश्मी. on 11 June, 2021 - 15:36
>>>>>

छे हा, मी आभार प्रदर्शन वगैरे करून कधीच शंभर पोस्ट केल्या नाहीत.
मी प्रतिसादांना उत्तरे देतो.

कोणी नवीन आयडी मायबोलीवर येऊन काही चांगले लिहीत असेल तर त्याला कोणाचातरी डु आयडी ठरवून प्लीज नामोहरण करू नका.

ैमलाही हातभार लावायचा होता खरंतर ......
अमाचे आभार मानलेत *त्यांनी*
तो *चंद्रमा* ती चंद्रमा अमांना का वाटले बरे
बाकी भरपूर मनोरंजन झाले.......

म्हणजे आमचं नातं पारदर्शी नसणार बहुतेक
ओ तै जरा दोघांमधे काच ठेवुन बघा नां. कदाचित नातं पारदर्शी होवु शकेल.

तो *चंद्रमा* ती चंद्रमा अमांना का वाटले बरे
>>>>>>
मलाही आधी ते नाव स्त्रीलिंगीच वाटलेले. बौधा आकारांत नावे तशी वाटत असावीत. पण मग नंतर आधा है चंद्रमा रात आधी हे गाणे गाऊन बघितले.

कोणाचातरी डु आयडी ठरवून प्लीज नामोहरण करू नका.>>>>
'नामोहरण' कसं करायचं मलाही शिकवा. मी करायला जाते तेव्हा नामोहत्ती, नामोजिराफ, नामोगेंडा असे मोठेमोठे प्राणीच होतात.
@ऋ , नामोहरमचं चुकून नामोहरण झालेयं .. Happy गंमत केली.

नामोहरण असाच शब्द आहे ना. माझे मराठी भारी नाहीये म्हणून खात्री नाहीये.
पण महाभारतामुळे वस्त्रहरण हा शब्द माहीत आहे.
रामायणामुळे अपहरण हा शब्द माहीत आहे.
थोडक्यात हरण करणे म्हणजे हिराऊन घेणे ..
तुम्ही एखाद्यावर डु आयडी असल्याचा आरोप करतात तेव्हा त्याचे स्वतःचे नाम त्याच्यापासून हिरावतात म्हणून ते नामोहरण झाले ना..

आपल्या टवणे सरांच्या शब्दात सांगायचे तर संसार हा करंजीसारखा असतो. नवरा म्हणजे वरचे आवरण , व पत्नी म्हणजे आतले सारण !
नवरा तापलेले तेल सहन करतो पण आतल्या सारणाला सुरक्षित ठेवतो.

असेल असेल. ! नाहीतरी आजकाल अशी वाक्ये आजकाल आईन्स्टाईन पासून विश्वास नांगरे पाटील , कुणाच्याही नावाने फिरत असतात.

माझा मित्र म्हणाला कि बायको नेहमी संशय घेते. फोन चेक करते. त्यामुळे नेहमी भांडणे होतात. काय करता येईल ?
तेव्हां मी त्याला घरी घेऊन गेलो.

माझा अनलॉक केलेला फोन त्याच्या समोर बायकोच्या हाती देत म्हणालो "चष्मा सापडत नाही, कुणाचा फोन आलेला पाहतेस का ?"
ती म्हणाली तुमच्या मैत्रिणीचाच होता. आणि इतर मैत्रिणींचे मेसेजेस पण आलेत.
हे पाहून मित्र एकदम आश्चर्याने बघू लागला.
तेव्हां बायकोच म्हणाली " त्यांच्या मैत्रिणींच्या समस्या वाचून मला डोकं भणाणून घ्यायचे नाही. माझे पती आणि त्यांच्या मैत्रिणी आपसात सोडवतील त्या "

तिचा शांतपणा पाहून मित्राने हे कसे जमवले विचारले. तेव्हां मी त्याला सांगितलं की फोनच्या बाबत कधिच लपवा छपवी करू नकोस आणि मैत्रिणी गुप्त ठेवू नकोस. एकदा का सीक्रेटच माहीत झालं की बायकोचं डिटेक्टिव्ह होण्यातलं थ्रिलच संपून जातं. नव-याने सांगूनच टाकलं म्हटल्यावर सगळे प्रश्नच निकालात निघतात. आणि संसार सुखाचा होतो.

असा धागा मी आत्मलोक सोसायटीच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर काढला होता. तिथे मला सर्वांनी बदड बदड बदडले.
मग मी म्हणालो " चर्चा व्हावी म्हणून मीच मुद्दाम तसं लिहीलं होतं "
किती हुषार ना मी ? हे वाक्य एडीट केलं. पण तो टोन मी कु ऋ यांच्याकडून घेतला आहे. चंद्रमा यांनी कुणाकडून घेतला कल्पना नाही. त्यांनी ते जाहीर करून व्यक्तीच्या नामाचे नामोबोकड करावे.

Pages