खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग्ग खत्रा आहेत वड्या.. आता मी कालची शिल्लक चि. बिर्याणी संपवणार होतो. पण हे बघून वड्या आणि सोबत आंबट वरण भात खावेसे वाटतेय. हे माझ्या फार आवडीचे कॉम्बिनेशन,

तुमी पाहू शकता या ठिकाणी, आज मी अप्पे पात्रात दहीवडे बनवले आहेत, एकदम झक्कास झालेत..
तुमी पाहू शकता या ठिकाणी,तळलेत का भाजलेत हे कळू नये म्हणून जरा जास्तच दही ओतलंय,
तुमी पाहू शकता या टिकाणी, हि मूळ कल्पना माझी नाही..आज एकिची रेसिपि पाहून प्रात्यक्षिक केलंय

मन तृप्त तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची
तू कर रे गड्या एक्सपरिमेंट तुला भिती कशाची :)08947E47-5CBE-4E93-9C00-F6AF87CFB44F.jpeg

वाह दहीवडे भारी दिसताहेत..
हा घ्या घरगुती खाकरा.. मीच बनवलेला Happy

आदल्या रात्रीचा मेथी पराठा तव्यावर भाजून कडक पापड करून..
माझ्या वाटणीच्या शिळ्या चपात्या मी अश्याच संपवतो. कुडूम कुडूम चहासोबत मस्त लागतात Happy

1638948843658.jpg

आधी gross anatomy चा अर्थ शोधावा लागला
जरा cut section पण दाखवा >> cut section ची गरजच पडली नाही..दहीवडे अप्पे पात्रात बनवलेले.. घरच्यांनी पाणीपुरीसारखे अख्खेच्या अख्खे तोंडात टाकले

घरच्यांनी पाणीपुरीसारखे अख्खेच्या अख्खे तोंडात टाकले>>> मी पाणीपुरी खाताना बरेचदा विसरतो की ती पाणीपुरी आहे आणि दही-रगडा-पुरीसारखे अर्धवट खातो आणि पाणी हातावरून ओघळवून घेतो. याचसाठी बायकोच्या नेहमी शिव्याही खातो. ... असो Sad

हो, बरेच जण तशीच खातात. पणा त्यात सहा पुर्‍या सहा घासात संपतात. असे चटकन सहा घासात खेळ खल्लास, पोट गच्च आणि पस्तीस रुपये देत निघूनच जायचे याने माझ्या मध्यमवर्गीय मनाला टाचणी लागते. म्हणून मी एक पुरी तीन घासात खातो. जे थोडेफार ओघळते ते ताटातच पडेल याची काळजी घेतो. चव घेत घेत खातो... एकदम तोंड भरले की पुर्ण चव एंजॉय न करताच बरेचसे गिळले जाते ते वेगळेच.

चला शुभरात्री.. तुमच्या स्वप्नात येवो पाणीपुरी..

महाबळेश्वर hangover

IMG_20211209_091511.jpg

काल ती 1्00 माणसांच्या हिशोबानेची पावभाजी पण बनवली होती . (मी 20 लोकांसाठीच्या मापाने बनवली) पण फोटो काढायचा राहिला.

स्वस्ति ..मस्त दिसतंय स्ट्रॉबेरी क्रीम. वीस माणसं म्हणजे पण खूप झाली पा भा साठी.

मी आज खूप दिवस करायचं म्हणत होते ती फिरनी केली होती. छान झाली होती. सेट ही मस्तच झाली होती. मँगो फिरनी

20211209_130520~2.jpg

वॅाव, शेंगोळे मस्तच.
कुळथाच्या पिठाच्या शेंगोळ्या आणि पिठी, दोन्ही माझे फेवरेट आहेत.. पण कुळथाच्या पिठामुळे रंगही थोडा वेगळा येतो

Pages