खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Piku , केक्स जबरदस्त!

मागील काही दिवसातले मेनू-
पिठलं भात.. सकाळचा किंवा रात्रीचा उरलेला भात, त्यातच बेसनाचे पीठ, थोडंसं पाणी आणि मीठ कालवायचं. पोळ्या झाल्या की लोखंडी तव्यावर थोड्या तेलात कढीलिंब मिरचीची चरचरीत फोडणी करायची आणि त्यावर हे मिश्रण ओतायचं... गरम गरम पिठलं भात तयार पाच मिनिटात.

Screenshot_20210825-093401.jpg
ऑल टाईम फेवरेट इडली सांबर!

Screenshot_20210825-093346.jpg

मटार -स्वीट कॉर्न चे दाणे आणि बारीक चिरलेले गाजर घालून केलेला ट्राय कलर पुलाव

Screenshot_20210825-093420__01.jpg

धन्यवाद .. Happy
विक्रमसिंह.. हाहा...Yes.. पुण्यातच आहे.. Lol
ईडली सांबार आॉ.टा.फे.. मस्त दिसतीये डिश.. आणि पुलाव पण..

SAVE_20210827_145008.jpeg

श्रावण शाकाहारी पार्टी

भाकरी , वांग्याचे भरीत , तीळकूट, शेंगदाण्याची चटणी

लाडू मात्र विकतचे

सगळा स्वयंपाक करणारा आमचा एक टीजी तृतीयपंथी पेशंट आहे.

सगळ्यांचे फोटो आणी मेन्यु झकास ! मस्त ! पिकु केक मस्त. प्राजक्ता इडली सांबार भारी. पिठले भात बद्दल थँक्यु.

माऊचे ताट फार यम्मी आहे. माऊ शें चटणीची कृती लिहा.

पिकु केक यम्मी.
प्राजक्ता ट्राय कलर पुलाव मस्त.
ब्लॅककॅट भाकरीचा बेत अगदी मस्त.
श्रद्धा तवा पुलाव का? झणझणीत दिसतोय.

गेल्या आठवड्यात सुंदल केले होते.

E43C8C2D-1DE8-4A66-9D72-FD07F39E8EAB.jpeg

IMG_20210828_140127.jpg

कालच्या भाकरीचा काला

जगातील सर्वात चवदार पदार्थ , शिळ्या भाकरीचा काला आणि फोडणी भाकरी

1. सध्या ताटात फक्त भाकरी काला आहे.

https://www.betterbutter.in/recipe/1480/bhakricha-kala-spiced-bhakri-in-...

भाकरीचा कुचकरा करून त्यात दही ताक व मीठ घातले

मी कांदा घातला नाही,

कांदा घालून ह्याला लसणीची फोडणी दिली की अजून मस्त लागतो.

2. फोडणी भाकरी करायला भरपूर तेलाची फोडणी करून त्यात कांदा , टोमॅटो , लसूण , कोथिंबीर इ परतून त्यात भाकरीचे तुकडे घालून परतणे . इडली फ्राय किंवा कांदापोहे करतो अगदी तसेच करायचे.

https://www.betterbutter.in/mr/recipe/119102/phodnichi-bhakri-in-marathi
असे शिळ्या चपातीचेही होते.

दोन्ही पदार्थ फक्त शिळ्या भाकरीचेच होतात , ताज्या भाकरीचे होत नाहीत

भाकरी काला मस्त.
माझी आजी खुप छान फोडणीची भाकरी करायची. तशी कुणाला जमत नाही घरात.

श्रद्धा मटकी पुलाव ची रेसिपी टाका. झणझणीत दिसतोय!

कुरडई ची भाजी
Screenshot_20210901-172544.jpg

अंबाडी ची भाजी
Screenshot_20210901-172614.jpg

लेकीच्या (वय वर्षे ४.५) शाळेतली ऍक्टिव्हिटी -बटाट्याची भाजी बरीचशी तीने केली..

Screenshot_20210901-172558.jpg

गोपाल काला

Screenshot_20210901-173057.jpgScreenshot_20210901-172652.jpg

श्रद्धा मटकी पुलाव ची रेसिपी टाका. झणझणीत दिसतोय!>>
मटकी पुलाव :
मोड आलेली मटकी धुवून थोड्या तेलात परतुन घ्यायची मग प्लेट मधुन काढुन ठेवायची.
कुकर मध्ये तेलात जिरे, तेजपान+दोन मोठे कांदे बारीक चिरून (जास्त कांदा छान लागतो) लालसर होईपर्यंत परतायचा +1 छोटा टोमॅटो +परतलेली मटकी+हळद +लाल मिरची पावडर 1 चमचा+धना पावडर 1/2 च. +1च. बिर्याणी मसाला +मीठ...
थोडावेळ मसाले परतुन धुतलेले तांदूळ add karayche 5मी. परतुन पाणी टाकुन 2 शिट्या काढायच्या.
वरुन कोथिंबीर टाकु शकता.
मटकी तांदळाच्या दुप्पट घ्यायची थोडी जास्त घेतली तरी छानच लागते.

मस्त, वन डिश मिल आहे.
कृपया पाकृ विभागात वेगळा पाकृचा धागा काढून लिहा.

हो, मुलांसाठी केली होती मॅगीची replacement म्हणून. जरा फिकी केली.

मटकी पुलाव छान च! नक्की करून बघेन.

मी पहिल्यांदाच ऐकली कुरडयाची भाजी.
तुम्हाला एवढ्या रिसीपीज विचारल्या पण अजून एकही करून नाही पाहिली, म्हणुन आता विचारत नाही, आधीचा बॅकलॉग क्लिअर करायचा आहे. Happy

मानव lolz..
कुरडया ३/४ तास भिजत घालायच्या. पाणी निथळून घ्यायचं . कढीलिंब, मिरची घालून चरचरीत फोडणी करायची. मी कांदा आणि टोमॅटो घालते. जरा परतलं की मीठ , साखर, तिखट घालायचं. मग भिजलेल्या आणि निथळलेल्या कुरडया घालायच्या. व्यवस्थित एकत्र करून एक वाफ काढायची. झाली भाजी. डिशभर नुसती खातात मुलं.

मराठवाड्यातील famous प्रकार. पाऊस कमी त्यामुळे भाज्या फारशा नाहीत तेव्हा कुरडया ची भाजी, साडग्यांचे विविध प्रकार - मिरची चे, भेंडी चे, भोपळ्याचे , कारल्याचे हे तिथे सर्रास चालते. हे जरा पूर्वीचं. आता मात्र सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात.

Pages