संवेदना होती नवी... (गझल) (देवप्रिया/कालगंगा)

Submitted by गणक on 21 April, 2021 - 01:25

गझलेत काही कमतरता , चुका असल्यास
नक्की सांगा. त्यांचे स्वागतच असेल .
<
संवेदना होती नवी....

वृत्त : देवप्रिया / कालगंगा
गालगागा गालगागा गालगागा गालगा

याचकाची भंगलेली साधना होती नवी !
घाव तो होता जुना अन् वेदना होती नवी !

मी तुझी नाही सखी पण छान माझा मित्र हो,
त्याच दुःखाला भुलाया सांत्वना होती नवी !

ते विषारी बोलती मी मुंगुसासम धाडसी,
पण मनाला दंशण्याची कल्पना होती नवी !

सागराने त्या उन्हाशी सापळा रचला जरी,
श्रावणाला धाडण्याची प्रेरणा होती नवी !

भुंजकाला आज वाटे फूल का ते वेगळे,
काम त्याचे रोजचे पण वासना होती नवी !

कैक मोर्चे दंगली आंदोलने चिरडायची,
मागणी आहे जुनी पण शासना होती नवी !

वर्तमानाला अता नाही कशाचे मागणे,
भूतकाळी थांबण्याची कामना होती नवी !

ज्या सुगंधातून पेटे ही "सवारी" लाकडी,
आग माझ्या ओळखीची चंदना होती नवी !

मी स्वतःला भेटलो ते साल ना मज् आठवे,
"मी"पणाच्या आतली संवेदना होती नवी !

......अविनाश उबाळे

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद माउ .
पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेल .