४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटल स्वतःचे च्यानल काढणार असेल अर्णब सारखं पण नाही, सरळ उचलबांगडी झालेली दिसतेय Rofl

CNN वरचा डॉन लेमन पण उडाला. कुणाला फार आनंद किंवा दुःख होईल असे वाटत नाही खरे ह्यामुळे.

डोमिनियन सेटलमेंट मध्ये जोरात फटका बसल्याने असेल का ? जर असेल तर hannity पण जाऊ शकतो.

>>वरील हेडर्स वाचून असा समज होईल की ट्रांसजेंडर्स ना बंदीच घातली आहे. वास्तव तसे नाही.<<
याच बाफवर शेंडेनक्षत्र पोटतिडकिने हा मुद्दा मांडत होते. परंतु तुमच्या कंपुने त्यावेळेस हसण्यावारी नेलं. शॅलो बिहेवियर, नथिंग एल्स. पण कालांतराने तुमची प्रगती होत आहे हे वाचुन आनंद झाला. किप अप द गुड वर्क...

आणि अजून एक कंपनी आहे तशीच ! त्यांना सुध्दा तितकेच अपेक्षित आहेत. >>> कॉमी, हो मी माझ्या पोस्टमधेही उल्लेख केला होता स्मार्टमॅटिकचा. त्यांची बेसलाइनच आता ७८० मिलियन असेल. त्यांचा वकील ऑलरेडी माफीबद्दल आणि फॉक्सने त्यांच्या चॅनेल वर खुलासा करण्याबद्दल बोलतोय. पण तो सगळी पोश्चरिंगचा भाग असेल. हे खटले फॉक्स वि. युएसए असते तर माफी व खुलासा जास्त महत्त्वाचा ठरला असता. पण हे खटले फॉक्स वि. डॉमिनियन व फॉस वि स्मार्टमॅटिक असे आहेत - त्यामुळे नुकसानभरपाई ची किंमत एका लेव्हलच्या वर गेली, की त्यांचे बोर्डमेम्बर्स, शेअरहोल्डर्स त्यांना ते स्वीकारायला भाग पाडतील. वरकरणी जरी यात सत्य, लोकशाही वगैरे शब्द हे लोक पेरत असले तरी शेवटी पब्लिक कंपन्यांचा मुख्य हेतू शेअरहोल्डर व्हॅल्यू हाच असतो आणि तो इतर सर्वांवर कडी करून जाईल.

फॉक्सला अजून एक तिसरा खटला फेस करावा लागेल असे दिसते. त्यांनी त्यांच्या फायनान्शिअल रिपोर्ट्स मधे यात त्यांना फारसे एक्स्पोजर नाही असे काहीतरी सांगितले होते व त्यामुळे त्यांचे शेअरहोल्डर्स क्लास अ‍ॅक्शन सूट दाखल करतील असेही ऐकले. तो ही बराच मोठा असेल रकमेच्या बाबतीत.

सीएनएनने डॉमिनियनच्या सीईओ ची नंतर घेतलेली मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=OQxNnKvc_tE

टॅपर त्याला खोदून खोदून विचारत आहे पण तो सफाईने नॉन-आन्सर्स देत आहे Happy एकदा सेटल केल्यावर तो यातले काहीही स्पष्ट बोलू शकणार नाही. त्यामुळे यातील स्टेकहोल्डर्सना मान्य असलेली नुकसानभरपाईची रक्कम सोडली तर बाकी कशालाही त्यांच्या दृष्टीने इतके महत्त्व नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यातील सत्याचा आग्रह वगैरे बीएस आहे. तसे असते तर त्यांनी तो क्लॉज मागे घेतला नसता - फॉक्सने स्वतःच्या चॅनेलवर खुलासा करण्याचा.

House approves trans athlete ban for girls and women’s teams>>>
हे दुर्दैवी आहे.
आता एखादा अमेरिकन महावीर फोगट म्हणेल 'म्हारो ट्रान्स किसी छोरी से कम है के?' Proud

डॉन लिंबू हा Nikki Haley आणि एकूणच ५० वयापुढच्या बायकांबद्दल जे बोलला ते त्याला fire करायला पुरेसं होतं. पण हा काळा त्यात समलिंगी. म्हणजे दोन दोन प्रतिनिधित्व इश्यूज. त्यामुळे तेव्हा टिकून राहिला.

आता या रामस्वामी प्रकरणात खरं तर लिंबूची काही चुकी नव्हती. कोणे तो रामस्वामी सायको वाटला मला NRA च्या बाजूने बोलतो म्हणून. टेक्ससमध्ये ती लहान मुलं मारली त्याला वर्ष होईल आता पुढच्या महिन्यात. रामस्वामी पाषाणहृदयी आणि स्वार्थी दिसतो. त्यामुळे लिंबूने त्याला "तू काय मला ब्लॅक लोकांच्या बद्दल सांगतोस- "whatever ethnicity you are"- असं म्हणणं मलातरी खटकलं नाही.

बाकी निक्की आणि रामस्वामी दोघे इंडियन अमेरिकन. लय डोळ्यात येऊ लागणार आपण लोक आता सगळ्यांच्या.

रामस्वामी हा सिरियस क्यांदिडेत वाटत नाही, म्हणजे अँटी वोक खेरीज त्याचे इतर काही व्यक्तिमत्व, पॉलिसी आहेत का माहीत नाही. निकी हेली VP साठी नेम धरून आहे असे वाटते, जो कोणी रीपबलिकन नॉमिनी असेल. तिचे सुध्दा फार सिरियस कॅम्पेन वाटत नाही.
भारतीय नेते जोरात आहेत हे खरेच. कमला बाई आहेत की आधीच.

इंडियन अमेरिकन सगळ्यातच अगदी आघाडीवर आहेत. म्हणजे राष्ट्रपतीपदाची रेस ते टेक सीईओज ते शाबास सूनबाई प्रियंका चोप्रा जोनस ते ट्रान्स चळवळ.
हे इंडियन अमेरिकन नररत्न सध्या भारतात व्हायरल झालंय.
FucxMSeakAUVILb.jpeg

(मी माबोवर लिहिलं होतं ट्रान्सना वेगळ्या जास्त आलिशान बाथरूम्स द्या तर तुम्ही "सेपरेट बट इकवल" अशी सेग्रेगेशनचीच भाषा बोलताय म्हणून माबो ट्रान्स लॉबी धावून आली होती.)

पोल्स नुसार -PF_16.09.28_ReligiousLiberty_US_transgender420px.png

वरील माणसाचे विचार घाणेरडे आहेत हे खरे.

फारेंड, अमितचा तो लेख वाचण्यात आला नव्हता पण त्यालाही ट्रंपच्या गुन्ह्यांची वाढती यादी वाचुन शिशुपालाचीच उपमा सुचली होती कारण ती उपमा ट्रंपला चपखल लागु पडते Proud

फॉक्स विरुद्ध डोमिनिअन खटला होउनच जायला हवा होता. फॉक्सचा ( म्हणनेच टकर कार्ल्सन- शॉन हॅनीटी यांचा) सगळा खोटारडेपणा न्यायालयात चव्हाट्यावर आला असता. त्या खटल्यामुळे जे त्या दोघांबद्दल बाहेर आले त्यामुळे टकर कार्ल्सनच्या पार्श्वभागावर सणसणीत लाथ घालुन मरडॉक फॅमीलीने त्या खोटारड्या भंपक माणसाला हाकलुन दिले. आता तो फॉक्सवरचा दुसरा नग शॉन हॅनीटी किती दिवस तग धरुन राहतोय ते बघायचे.

तरी मी इथे हॅनीटी- टकर किती भंपक व खोटारडे आहेत हे त्या दोघांचे शब्द इथे व्हर बेटम उगाळणार्‍यांना व त्यांच्या विचारांनी ब्रेन वॉश झालेल्यांना वारंवार सांगत होतो. आता झाले ना पितळ उघडे त्यांचे? सारासार बुद्धी वेशीवर टांगुन टकर कार्ल्सन- शॉन हॅनीटीच्या चमच्या चमच्यातुन त्यांचे विचार बिनदिक्कत , न विचार करता , तसेच्या तसे ढोसुन काय पदरी पडले?

तिकडे न्युयॉर्कमधे जिन केरल विरुद्ध ट्रंप खटल्यात काय ट्रंपच्या अब्रुची लक्तरे उडत आहेत! धन्य! हा माणुस परत एकदा( सो कॉल्ड कंझरव्हेटिव्ह!)रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्षिय उमेदवार होण्याची दाट शक्यता आहे. काय दिवस आले आहेत अमेरिकेत! खासकरुन रिपब्लिकन पार्टीच्या मॉरल कंपासची एवढी अधोगती बघुन मन विषण्ण होते!

ट्रांसजेंडर बिलाबाबत विजय कुलकर्णी यांच्याशी सहमत. या असल्या पुरुषी दाणगट ट्रांसजेंडर्सनी महिलांच्या स्पर्धांना जोक करुन टाकले आहे. हे दाणगट शरिरयष्टीचे ट्रांसजेंडर स्विमिंग मधे, धावण्यामधे वगैरे सर्रास ( खर्‍या) मुलींना प्रचंड मोठ्या फरकाने हरवत आहेत.

१९७० च्या दशकात झेकोस्लोव्होकियाची ( की झेकोस्लोव्होकियाचा?) अशीच( असाच?) एक ( ट्रांसजेंडर?) अ‍ॅथलिट महिलांच्या सगळ्या धावण्याच्या शर्यती प्रचंड मोठ्या फरकाने जिंकत होती( होता?). मी लहान होतो पण मला तेव्हाही ती बाब खटकली होती की हा बाप्या काय करतोय मुलींच्या शर्यतीत?आणी मुलींच्या शर्यती किती सहज जिंकतोय हा बाप्या?

त्या बाप्याचे नाव होते जर्मिला क्रोटोचविलोव्हा! ( इच्छुकांनी हे नाव गुगल इमेजेस मधे क्रुपया सर्च करुन या बापीचे (का बाप्याचे?) जरुर दर्शन घ्या! . त्या केसाळ, दाढी मिशी असलेल्या मस्क्युलर ट्रांसजेंडर बाप्याचे दर्शन घेतल्यावर तसल्या ट्रांसजेंडर बाप्यांनी मुलींच्या खेळात भाग घेउ नये हे तुम्हालाही जरुर पटेल!)

न्युयॉर्कमधे जिन केरल विरुद्ध ट्रंप खटल्यात काय ट्रंपच्या अब्रुची लक्तरे उडत आहेत >> त्याला एक धड डिफेंस अ‍ॅटर्नी मिळू नये!
Trump Lawyer Joe Tacopina’s Terrible Cross-Examination Gets Even Worse

<<<तरी मी इथे हॅनीटी- टकर किती भंपक व खोटारडे आहेत>>>
ते शेंडेनक्षत्र कुठे गेले? त्यांची मते जाणून घेणे आवडेल. खरे तर त्यांचेहि ऐकलेच पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजू विचारात घेऊन मत बनवता येईल.
<<ट्रंपच्या अब्रुची>>
आँ! त्रंपला अब्रू आहे? कोण म्हणतं?

जिओपी रणरागिणीचा एक व्हिडिओ पाहिला. परिचय करून द्यायलाच हवा.
मिट कँडीस टेलर, जॉर्जिया डिस्ट्रिक्ट चेअर, जॉर्जिया.

१. बाईंनी २०२२ गव्हर्नर प्रायमरी मध्ये सहभाग घेतला. फक्त ३.४% मतं मिळूनसुद्दा आपण निवडणूक हारलो हे मान्य करायला तयार नाहीत. टाळ्या. असे असूनही डिस्ट्रिक्ट चेअर म्हणून पक्षाने नेमणूक केली. टाळ्यांचा कडकडाट व्हावा.

२. नुकत्याच आपल्या पॉडकास्ट वर फ्लॅट अर्थ बद्दल अतिशय सुंदर चर्चा त्यांनी घेतली. त्यात त्यांनी आपले एक्स्पर्ट मत दिले, की सगळीकडून ग्लोब पृथ्वीचा प्रोपोगंडा होतो आहे म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरते आहे. त्यांचे दोन पाहुणे वक्ते ठामपणे पृथ्वी सपाट आहे असा दावा करत होते.

३. आपल्या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये जॉर्जिया मधले एक "शैतानी" स्थळ आपण जिंकल्यावर पाडणार असे त्यांनी जाहीर केलेले. खेदाची बाब आहे की त्या हरल्या. पण, एका true patriot ने ती जागा स्वतः पुढाकार घेऊन उडवून टाकली.

ट्रम्पवरचे दुसरे आरोपपत्र गंभीर दिसते आहे. पुरावे सुध्दा सबळ दिसतात.
त्यामुळे, आता त्याने निवडणुकीतून माघार घेऊन जो कोणी त्याला पार्डन देईल त्याला पाठिंबा देईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आता त्याने निवडणुकीतून माघार घेऊन जो कोणी त्याला पार्डन देईल त्याला पाठिंबा देईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. >> ड्रीम ऑन. उलट मला कसे फसवले आहे ह्याचा कांगावा सुरू झाला आहे. त्याचे पाठीराखठीआधीच त्यावर सोल्ड आहेत.

इतक्यात होईल असे नाही. होईलच असेही नाही. एक शक्यता. जेल मध्ये जाण्यापासून वाचायचे असेल तर काहीतरी करावे लागेल. जर प्रायमरी मध्ये दंगा जास्त केला, मत स्प्लिट झाले तर डेमॉक्रॅटिक पक्षच पुन्हा जिंकेल अशी शक्यता आहे. मग पार्डण मिळणे आणखी unlikely होते. ते टाळायचे असेल तर सौदा हा पर्याय स्वीकारू शकतो तात्या.

<<<ट्रम्पवरचे दुसरे आरोपपत्र गंभीर दिसते आहे. पुरावे सुध्दा सबळ दिसतात.>>>
काSSही होणार नाही. या खटल्याची जज्ज बाई त्रम्प्याने नेमलेली आहे आणि ती कट्टर त्रम्पि आहे. तो निर्दॉष सुटेल.
<<<सौदा हा पर्याय स्वीकारू शकतो तात्या.>>> नक्कीच.
पैसे दिले की अमेरिकेत कायदा वगैर महत्वाचा नाही. शिवाय त्याचे भक्त त्याला भरपूर पैसे देतील.

सध्यातरी फक्त ख्रिस्ती ने पार्टीलाइनच्या विरोधात प्रतिक्रिया दिलेली दिसते. बाकी सगळे रिपब्लिकन कॅण्डिडेट्स मागा वोटर्स गमावू नयेत म्हणून ट्रम्पच्या विरोधात बोलत नाहीयेत.

कॉमी, तात्या ला फिल्टर नाहिये हे आतापर्यंत उघड झालेले आहे. लाँग टर्म प्लॅनिंग वगैरे गोष्टी त्याच्या शब्दकोषाच्या बाहेर आहेत. नार्सिसिस्ट असल्यामूळे 'मी माघार घेणे' ह्या इथेच त्याची गाडी अडकून राहील. रच्याकाने फा म्हणातोय तसे पेन्स ने "जगबुडी आली हो" सुरू केले आहे . ह्या कोल्हेकुई ला हळू हळू जोर येईल.

तात्याचा फॉक्सवरचा इंटरव्यू पाहिलात का? कागदपत्रे ने देण्याचे कारण "मी बिझी होतो", "ती कागदपत्रे इतर माझ्या वैयक्तिक गोष्टीत मिक्स केलेली होती" वगैरे वगैरे.

त्याच्यावरचे सर्व खटले पॉज करून सरकारी वकील म्हणतील त्याला फक्त फॉक्सवर मुलाखती देउ द्या. सर्व पुरावे आपोआप बाहेर येतील Happy

Pages