हरबर्‍याच्या पानांची भाजी

Submitted by तृप्ती आवटी on 16 May, 2009 - 15:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी हरबर्‍याची पाने (घाटे फुटायच्या आधी हरबर्‍याची कोवळी पाने तोडुन वाळवतात, ती वाळवलेली पाने), १ डाव ह. डाळ पीठ, अर्धा गड्डा लसूण, १-२ चिंचेची बुटकं, २ वाट्या पाणी, फोडणीला तेल, हळद, हिंग, तिखट.

क्रमवार पाककृती: 

हरबर्‍यातल्या बारीक काड्या काढुन टाकाव्यात. ही पाने, डाळीचे पीठ पाण्यात कालवुन घ्यावे. त्यात चिंचेची बुटकं धुवुन आणि शिरा काढून घालावीत. पीठाच्या गुठळ्या राहु देऊ नयेत.

१ डाव तेलात हळद हिंगाची फोडणी करुन लसूण चांगला लाल होऊ द्यावा. त्यातच तिखट घालावे. तिखट घातल्या घातल्या वरील मिश्रण त्यात ओतावे. १-२ उकळ्या आल्या की भाजी चांगली शिजते. गरम भाकरीबरोबर खावी.

वाढणी/प्रमाण: 
दोन
अधिक टिपा: 

भाजी जशी पातळ/घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करावे.
सकाळी केलेली भाजी संध्याकाळी खायला अधिक रुचकर लागते. त्यावर मोठा चमचाभर कच्चे तेल घालुन मस्त लागते.
भारतातला गावराण लसूण असेल तर अर्धा गड्डा लागतो. पाकळी मोठी असेल तर ५-६ पाकळ्या पुरे.

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईला जी नाशिकची भाजी मिळते हरभर्‍याची पाने(उन्हाळ्यात)ती सुद्धा सुकीच असते. ती भाजी सुद्धा ओळेखीच्या भाजीवाली कडून अगदी विचारणा केली तरच मिळते. फार्मर्स मार्केट प्रमाणे फक्त शनिवारी का रविवारी बसत. त्यात कुठली कुठली आंबट चिंबट बोरं,ताजे सोललेले हरभरे,सोललेले वाटाणे, काही सुक्या भाज्या, काही ताज्या पालेभाज्या(ज्या रोज नाहि मिळत) असे. सगळेच काही नाशिकचे नसे पण उगीच ज्यास्त भाव असे ह्या भाज्यांचा.पण उन्हाळ्यात नाशिकच्या पालेभाज्या म्हणून त्यांची खास जागा असायची बसायची . Happy आणि दिनेश म्हणतात तसे तो सुकलेला कचराच वाटतो जो मुंबईत मिळतो तो. पण काही बायका अगदी विचारून विचारून घेत असत तो चरबट पाला. Happy

अरुणिमा.ते हरभरे शेकोटित भाजतात ना...त्याला हुळ्ळा म्हणतात्..हुरडा खायला शेतात गेले..कि त्याबरोबर हा हि मिळतो...

छान

फक्त लसणीच्या फोडणीवर कांदा ,ओली मिरची परतून चण्याची भिजवलेली डाळ आणि हरभर्‍याची चिरलेली पाने घालायची .शिजल्यावर मीठ,ओले खोबरे घालावे.किंचित आंबटसर चव असते ह्या भाजीला.
मी पाने धूवूनच घेते.

काल मार्केटात एका बाईकडे हरभ-याची ओली पाने दिसली. दिसायला कोवळी वाटली म्हणुन ३० रुपये पाव किलो भावाने आणली. आज रात्री भोगीच्या भाजीत घालेन नाहीतर उद्या वेगळी भाजी करेन.

पण तृप्तीची रेसिपी ओल्या भाजीला चालणार नाही असे वाटतेय. वर देवकीने सुचवल्याप्रमाणे करुन बघते. ही भाजी ब-याच वर्षांपुर्वी खाल्ल्याने आता नेमकी कशी केली होती ते आठवत नाहीय.

रच्याकने, त्या बाईकडे चिवळीची भाजीही होती. ह्या रेसिपीत दाखवलेल्या पहिल्या फोटोतली भाजी. गव्हासारखी पाने असलेली. http://www.maayboli.com/node/12187. उद्या परबा ही भाजी पण आणेन Happy

Pages