कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलीचं लव्ह मॅरेज आणि मुलाचं लव्ह मॅरेज नसलं तरी त्यानी ठरवलं आणि मगच आम्ही मुलगी पाहिली. आमच्या पसंती चा प्रश्नच नव्हता. मुलाना पसंत म्हणजे आम्हाला ही पसंत हे जणुं ठरलेलंच होतं.

दोन्ही वेळेस मी आमची औपचारिक भेट झाली तेव्हा आपली कां पो ची प्रथा म्हणून कांदे पोहे आणि शिरा असा बेत केला होता. मुलगी पहाण्याचे कांदे पोहे आणि पसंतीचा शिरा अस एकदमच !

फक्त मुलीने नेण्या ऐवजी मीच ट्रे घेऊन गेले होते.

त्यातले बाबा अगदीच भोचक होते. त्यांनी घरातले दोन्ही संडास उघडून पाहिले. नुसतेच Uhoh वर म्हणाले की मी कोणाच्याही घरी जातो तेव्हा त्यांच्या घरातले संडास पाहतो कसे आहेत ते.>>>>> गांधीजी म्हणायचे की ज्यांच्या घरातील संडास स्वच्छ असतात ती माणसे सभ्य समजायला हरकत नाही. - संदर्भ गांधी भवनातील गांधीजींवरील लेक्चर

मी अनेकानेक वर्षांपूर्वी परदेशी प्रवासवर्णन असलेल्या पुस्तकात (हे बहुतेक प्रसिद्ध पुस्तक असावे. पण आता कोणते ते आठवत नाही) वाचले होते "जपानी लोक घरी पाहुणे आले कि त्यांना घर दाखवताना टॉयलेट बाथरूम सुद्धा आवर्जून दाखवतात" आणि लेखकाने पुढे असेही लिहिले होते कि "ते ती दाखवतात कारण ती दाखवण्यासारखी स्वच्छ व छान मेंटेन केलेली असतात"

स्वच्छ असावी, तो निकष असावा हे सर्व मान्य. पण ती स्वतः वॉशरुम ला जाण्याच्या निमित्ताने तपासावी. Happy अक्षय कुमार किंवा तो एम टिव्ही व्हिजे जाऊन लोकांची थेट टॉयलेट बघतो आणी आपल्याला दाखवतो हार्पिक जाहीरातीत तसे थेट नको Happy

आणि मुलगा मुलगी त्यांचे जमू शकणारे लग्न हा विषय टाळून कांपो कर्यक्रमात toilet वरून चर्चासत्र नको!

Mi anu +३४५६७६५४

मला अजून एक किस्सा आठवला.
आम्ही पहिल्यांदा मध्यप्रदेशात चाललो होतो माझं होणारं सासर बघायला. तेव्हा आई धुळ्यापर्यंत गाढ झोपली होती. आणि मग तिनं ठरवलं आपणच की आता आपण हिंदी बोललं पाहिजे. वेटर तिला काजू करी सजेस्त करू लागला तेव्हा "ऐसा महाग महाग मत खपवावो" असं म्हणाली. तेव्हा तोच म्हणाला आंटी मला मराठी येते.

माझ्या नवऱ्याशी ती मन लावून हिंदी बोलायची सुरुवातीला. तेव्हा तोसुद्धा तिला म्हणाला की आपण मराठीत बोलूया. पण नवऱ्याचे मराठी काय किंवा आईचे हिंदी. दोन्ही ऐकून अत्याचारच व्हायचे कानांवर.

काय भारी किस्से आहेत एक एक.. हसून हसून पुरेवाट.. मला सुद्धा आता माझा पहिला कांदेपोहे कार्यक्रम कधी होतो आणि मी कधी इथे लीहते असं झालंय..माझ्या कोतबो धाग्यावरून इतका भारी विषय मिळेल याची कल्पना नव्हती. भारी वाटलं..
आमच्याकडे आता साडी खरेदी चालू आहे. 7 8 दिवस झाले सगळ्या ऑनलाइन साईट्स धुंडाळून पाहिल्या पण एक सुद्धा फायनल होत नाही. काकू म्हणते ही अशीच घे चोपून चापून बसेल. आई म्हणते साधी सुधी प्लेन घे मग मधेच ताई म्हणते थोडी fancy आणि मॉडर्न घेऊ या आणि बाबा तर म्हंटले, तिला comfortable वाटतं नसेल तर कशाला हवी साडी वगैरे.. पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती वगैरे घे.
पण मलाच साडी नेसायला फार आवडत असल्याने मी आपली अजूनही साडी शोध मोहिमेवर आहे. घरातल्या सगळ्यांचे सगळे suggestions ऐकून या महिन्यात तरी साडी फायनल होईल अस वाटत नाही..पण मज्या येतेय नवीन काहीतरी experince येईल आणि इथले किस्से ऐकून माझ्या कापो प्रोग्राम मधे मला हसू अनावर होईल मग..

आता मुलगा/मुलगी बघणाऱ्यांनी कांदेपोहे कार्यक्रम करण्यापूर्वी समोरच्या पार्टीला आधी हा धागा वाचून मग या असे सांगा. Wink

अमृता
लग्नासाठी साडीखरेदी, साडी कशी नेसायची असा असे धागे असतील तर उपयोगी पडतील.

दिवसातून दहा बारा वेळा इथे येऊन नवीन किस्से आलेत का ते पहायचा छंद लागलाय हल्ली... Stress buster + addicted आहे हा धागा ...

>> ऐसा महाग महाग मत खपवावो
Lol
माझ्या नात्यात एक काकू आहे तिला सुद्धा हिंदी येत नाही. तिच्या शेजारी उत्तर प्रदेशातून एक कुटुंब राहायला आले होते. त्यांना अर्थातच मराठी येत नव्हते. एक दिवस त्या कुटुंबातील दहा अकरा वर्षाची मुलगी छोट्या बाळाला काखेत घेऊन काकूकडे आली आणि बोलत उभी राहिली. मोडक्यातोडक्या भाषेत दोघींचा संवाद सुरु होता. थोड्या वेळाने काकू त्या बाळाकडे बोट दाखवून मुलीला म्हणाली, "गिरा उसको, नीचे गिरा उसको, आधी गिरा नीचे" Lol अचानक असे ऐकल्यावर ती मुलगी बिचारी घाबरली, काकू असे का म्हणत आहे? तिला कळेना. तितक्यात काकूची कॉलेजात जाणारी मुलगी तिथे आली. तिने विचारले, "आई काय झाले? असे का सांगत आहेस तिला?" तर काकू म्हणाली, "अगं बराच वेळ झाला. बाळ हातात धरून उभी आहे. हात अवघडला असेल पोरीचा. बाळाला खाली ठेव म्हणून मी सांगत आहे" Lol अखेर काकुच्या मुलीने त्यांच्यात दुभाषकाचे काम केले. तिने नंतर जेंव्हा "गिरा" चा अर्थ काकूला सांगितला तेंव्हा काकू स्वत:च यावर प्रचंड हसली.

असो.

ह्या धाग्यासंदर्भातला हा एक छोटुसा किस्सा. काही मुलांचे किती बारकाईने निरीक्षण असते हे सांगणारा. नात्यातल्याच एका मुलासाठी सध्या मुली पहायचे सुरु आहे. परवा अशाच एका कांपो कार्यक्रमात, खाणे पिणे सर्व काही झाल्यावर मुलगी समोर येऊन बसली. मुलाला सांगण्यात आले तुला काही तिला विचारायचं असेल तर विचार. तर याने विचारले,

"पिवळा रंग आवडीचा आहे का?"
"असे काही नाही. का?" मुलगी म्हणाली
"फोटोतल्या साडीचा पिवळा रंग आहे, आता सुद्धा पिवळीच साडी नेसली आहे म्हणून विचारले"
"हो. हि फोटो मधलीच साडी आहे. फोटो पेक्षा वेगळे वाटू नये म्हणून नेसली आहे" मुलगीने सांगितले.
तर मुलगा म्हणतो कसा,
"नाही. हि फोटोमधली नाही. फोटोतल्या साडीचे काठ वेगळे आहेत, या साडीचे काठ वेगळे आहेत"

मुलगा रॉक्स. मुलगी आणि इतर सगळे शॉक्स Lol

वर वाचलेल्या ऊंची तल्या फरकातल्या गोष्टीवरून मला माझा किस्सा आठवला
रोहिणी मध्ये नाव नोंदवल्या नोंदवल्या पहिल्यांदाच एका स्थळा कडून संपर्क झाला होता- मुलगा अमेरिकेत होता पण त्याच्या आई-वडिलांना मुलगी आधी बघून घ्यायची होती. मला ही कल्पना फारशी आवडली नव्हती पण बाबा म्हणाले "काय हरकत आहे ?आपल्याला ही घराविषयी चौकशी करायला वेळ मिळेल."
म्हणून शेवटी कांद्या पोह्याचा कार्यक्रम मुलाच्या घरी करायचं ठरलं. मुलाच्या आणि माझ्या उंचीत जवळ जवळ फुट भराचं अंतर होतं,मला काहीच फरक पडत नव्हता पण मुलाकडच्यांना असू शकेल म्हणून माझ्या आईने त्याविषयी आधीच बोलून खात्री करून घेतली होती, तेव्हा मुलाची आई म्हणे "अहो उंचीने काय फरक पडतो जया अमिताभ बच्चन उदाहरण माहितीये की आपल्याला"
कार्यक्रमानंतर त्यांना म्हणे मुलगी भलतीच आवडली होती आणि मुलाने न बघताच होकार द्यायला तयार होते! पण माझी मुलगी असा होकार देणार नाही असं माझ्या बाबांनी सांगितल्यावर " चालेल की मुलगा आल्यानंतर भेटू पण आमच्याकडून पक्क समजा" असा निरोप मिळाला. मुलगा पण पंधरा वीस दिवसात अमेरिकेतून कायमचा परत येणार होता.

चार दिवसात काय बदललं कुणास ठाऊक पण माझ्या बाबांना त्याच्या वडिलांचा फोन आला, "अहो, मुलगी आम्हाला खरंच पसंत आहे पण तिच्या उंचीच काय करायचं?" ....."असं बघा, माझ्या मुलीची उंची आता या नंतर काही बदलणार नाही... उंचीचा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा वाटतोय तर आपण इथेच थांबू" असं सांगून शेवटी बाबांनी विषय संपवला Happy

हा दुसरा किस्सा माझ्या बहिणीच्या लग्नातला आहे, ओळखीतून एक स्थळ आलं होतं. मुलाचं शिक्षण आणि करिअर अनुरूप न वाटल्यामुळे माझ्या वडिलांनी आधीच "हा योग जुळून येण्यातला नाही" असं कळवून टाकलं होतं.. काही महिन्यांनी बहिणीचं लग्न ठरलं, साखरपुडा सुद्धा झाला त्यानंतर या आधीच्या मुलाच्या आईचा माझ्या बाबांना परत फोन आला "अहो आता माझ्या मुलाचा पगार वाढला आहे, त्याला प्रमोशन मिळाले आहे, आपण परत विचार करायचा का?" ...बहिणीचा साखरपुडा झालाय असा म्हटल्यानंतर ती बाई म्हणे, "अहो साखरपुडाच झालाय ना लग्न तर नाही?"......

हो ना रानभुली..कुणीतरी काढावा तसा पण धागा..मीच काढू का?
सगळ्या होणाऱ्या नवरी नवरदेव साठी ड्रेसिंग, मेकअप आणि बाकीच्या इतर गोष्टी जसे की आपली वागणूक किंवा इतर साध्या गोष्टी ज्या वेळेवर लक्षात येत नाही experienced lok चांगल सांगू शकतील.

काढलाय मी धागा..पण धागा काढायची ही पहिलीच वेळ असल्याने काय select करावे means विषय काही समजला नाही..
चुकलं असेल तर सांगा मी बदलवेल मग

आपण परत विचार करायचा का?" ...>> हे आमच्या चिरंजिवांच्या बाबतीत घडल होत. . एक स्थळ आल होत मध्यस्ता मार्फत आमच्या मुलासाठी. मुलाची चौकशी वगेरे केल्यावर काकूंना काय झाल कोणास ठाउक. त्यास्वतःहून योग नाही म्हणाल्या. ठिक आहे म्हणल. काही महिन्यांनी मुलाच लग्न ठरल, साखरपुडा झाला. त्यानंतर आश्चर्य म्हणजे त्या मुलीचा आमच्या मुलाला फोन आला. अरे आईने घोळ घातला, मला न विचारताच नाही सांगितल. मी तुला ओळखते. (बहुतेक एकाच कॉलेजचे ). मला तुझ्याशीच लग्न करायचय. मुलाने परिस्थिती सांगितली. त्यावर मॅडमचे सेम उत्तर. साखरपुडाच झालाय ना. ...

मी पुण्यात कॉट बेसिसवर रहायचे तिथल्या काकूंच्या मुलाचं असंच झालं होतं. सुरुवातीला एक मुलगी सांगून आली, पण तेव्हा ती तशी लहान वाटली. कॉलेजच्या लास्ट इयरला होती वगैरे. म्हणून यांनी नको म्हटलं. मग पुढे एकदोन वर्षांनी या काकूंना ती दोन तीन वेळा लक्ष्मी रोड, तुळशीबाग वगैरे ठिकाणी दिसली आणि ती यांच्याकडे बघून ओळखीचं हसली. यांनीही तिला ओळखलं आणि यांना वाटलं, आपण नकार देऊनही ही आपल्याला ओळख देते म्हणजे ही मुलगी चांगली आहे. Happy तोपर्यंत नाही तरी मुलाचं लग्न ठरलेलंच नव्हतं. मग परत एकदा बघण्याचा कार्यक्रम झाला.( कारण मुलाला काही ती आठवत नव्हती) आणि जमलं लग्न!

दिवसातून दहा बारा वेळा इथे येऊन नवीन किस्से आलेत का ते पहायचा छंद लागलाय हल्ली.. >> होय.
मी स्वतः कांदेपोह्यांचा एकही कार्यक्रम बघितलेला नाही. इथे येऊन वाचायला मजा येतेय.

घर दाखवणे ह्यात पाहुण्यांना आपले आर्थीक स्तर (लाईफ स्टाईल कशी आहे ) किती आहे ह्याचा अंदाज देणे.

ह्यात : -
बाथरुम मधले जकुझी दाखवणे (असणार साधं बाथ टब, पण जकुझी म्हणुन ब्रँडिंग)
घरात (बंगल्यात) छोटी जिम असणे (त्यात ट्रेड मिल, पंच बॅग इत्यादि दाखवणे)
लिविंग रुम मध्ये मराठी वर्तमान पत्रा बरोबर टाईम्स ऑफ इंडिया आणि इकोनॉमिक टाईम्स ठेवणे (हे म्हणजे हापिस लुक)
महागडे कटलरी ठेवणे
भु भु ला विंग्रजीत लाड करणे किंवा डाफरणे (लाडिक)
कॉफी बरोबर कुकीज (बिस्कुट आय मीन बिस्कीट) चा आग्रह करणे
फ्लॉवर बट्टु च्या भाजी ला कुरमा म्हणणे (इट्स ओके)
हे जरा कंवेकशन मध्ये गरम करुन आण गं (मा वे किंवा चुलीवर / गॅस शेगडी वर नाही)
पाहुणे आलेत कि कि लगेच ए सी मध्ये सुगंधी फ्रेशनर मारणे (इट्स ओके), मग दर अर्धा पाऊण तासांनतर परत फ्रेशनर मारणे
मेड पण एकदम टाप टिप असणे (आपल्यालाच कॉम्प्लेक्स यावं)

अ‍ॅन्ड लास्ट बट नॉट लीस्ट
सोन्यात मढवुन बसणे

हे सगळं दोन्ही कडे होऊ शकतं, मुला कडे किंवा मुली कडे सुद्धा.

मुला कडचे दाखवत असणार तर मुली कडच्याना पहिल्या पासुन आपले डाम डौल दाखवायला आणि जर मुलीकडचे दाखवत असणार तर आम्ही काही कमी नाही आहोत, तुमच्या मुलाला आमचा घर जावई करुन घेण्याचे ऐपत आहे (आहात कुठे)

diva.gif Take It Lightly

माझ्या ताई च्या पहिल्या कापो वेळी मी 17 18 वर्षाची होती. पहिल्यांदाच असा कार्यक्रम पाहणार होती म्हणून ताई पेक्षा मीच जास्त excited होती. घर एकदम नीटनेटक करून सगळी मंडळी छान awrun सावरून बसली होती. त्यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत येतो अस सांगितलेलं पण 2 वाजून गेले तरी त्यांचा काही पता नव्हता एकतर त्या दिवशी मी अभ्यास वगैरे सगळ्यांना सुट्टी दिली होती. मग कुठल्या पण गाडी चा आवाज आला की मी सारखी बाहेर जाऊन पहायची आले का आले का म्हणून..अस जवळ जवळ 7 8 वेळा झालं..ताई पण बिचारी किती वेळची साडी नेसून बसून होती. आई ने 2 वेळा मोटर लाऊन पाणी सुद्धा भरून घेतल. संध्याकाळ होत आली पण त्यांचं काही पता नव्हता मग माझा सगळा मूड ऑफ झाला चिडचिड व्हायला लागली.. एकतर कधी नव्हे ते मी सुध्दा पंजाबी ड्रेस घातला होता. मग मी बाबांना म्हंटले त्यांना सांगून द्या येऊ नका म्हणून..ज्यांना वेळेची किंमत नाही तसे लोकच नको आपल्याला वगैरे..आमची ताई बिचारी शांत होती. मी मात्र खूप हुशार असल्यासारखी सगळ्यांसमोर त्यांच्याबद्दल वाईट बोलत होती. असे फालतू लोक असतात वेळेची किंमत नाही आम्ही काय रिकामे बसलोय का वगैरे वगैरे तोंडाचा पट्टा चालू होता आणि तेवढ्यात 6 च्या दरम्यान ते लोक आले..गाडी पंक्चर झाली होती म्हणे गावाच्या बाहेर आणि लवकर मेकॅनिक पण भेटला नाही असं त्यांनी सांगितलं.
सगळे convince झाले मी मात्र अजून पण खूप चिडून होती त्यात बाबांनी मला आणि लहान भावाला बाहेर बोलावून ओळख करून दिली. मला म्हंटले, तुला काही बोलायचं असेल तर बोल. मी तर संधीच शोधत होती मी लगेच त्यांना म्हंटले, तुम्ही खूप उशिरा आल्यामुळे काय बोलायचं होत ते विसरलं. पुढच्या वेळी वेळेवर या म्हणजे बोलेल.
त्यांनी हसून गोष्ट टाळून दिली पण पाहुणे गेल्यावर माझी चांगलीच फजिती झाली. बाबा काही बोलले नाही पण आई मात्र खूप रागवली.
पण शेवटी त्यांच्यासोबतच ताई च लग्न झालय आणि एकदम सुखाचा संसार चालू आहे.

सोन्यात मढवुन बसणे > मी नाय जात स्वतः कापोसाठी पण घरचे जातात तेव्हा बऱ्याचवेळा सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्ये खाद्यपदार्थ समोर येतात. No Kidding

मी पण सकाळी १० चा वेळ देऊन दुपारी २ वा. पोहचलो होतो. वाट पाहुन पाहुन मुलीकडचे पेंगायला लागले होते.

माझ्या कापो कार्यक्रमाची काही गंमत नाही. दोघांचंही पहिलंच स्थळ होतं. दोन्ही कुटुंबातले काही घटक एकमेकांना ओळखत होते. आम्ही आधी भेटलो नव्हतो. १९९३ सालीसुद्धा साडीच नेसली पाहिजे, असं काही प्रेशर नव्हतं. मी चांगलासा सलवार-कमीज घातला होता. सासरच्या मंडळींनी सापुच्या कार्यक्रमात मला साडीत बघितलं. त्यामुळे ह्या जमान्यात तर तसं प्रेशर नकोच घ्यायला.

गंमती झाल्या त्या भाचीच्या वेळी. ती पुण्यात होती पण तिचे आई-वडील बाहेरगावी राहायचे. मग पुण्यातली स्थळं असली तर एकतर आम्ही दोघं तिच्याबरोबर जायचो किंवा आमच्या घरी बोलवायचो. ह्या कार्यक्रमांचा एक स्टॅंडर्ड पॅटर्न असतो. आधी ओळखी-पाळखी, मग कोणीतरी मुला-मुलीला बाजूला बोलायला जा, असं सुचवणार आणि थोडं चहा-पाणी की झालं काम. मला आणि ह्या भाचीला फालतू विनोदांवर हसायची वाईट खोड. परक्या लोकांपुढे असं हसायला नको, म्हणून आम्ही एकमेकींशी आय कॉन्टॅक्ट होणार नाही, अशा जागा पकडायचो. चेष्टा-मस्करी नंतर भरपूर करायचो.

एकदा असेच एक आई-बाबा-मुलगा येणार होते. आम्ही घर आवरून वेळेवर तयार होऊन बसलो. मंडळी अर्धा-पाऊण तास उशीर करून आली. आल्याआल्या बाबांनी ‘काय हो पुण्याचा ट्रॉफीक’ असं वाक्य टाकलं. आमच्याकडे सर्व मंडळी भाषाशुद्धी मंडळाचे अध्यक्ष असल्यासारखी वागतात. त्यामुळे पहिल्या वाक्यातच अशुद्ध भाषेबद्दल पाच मार्क कापले गेले! मग पॅटर्नप्रमाणे भाची आणि तो मुलगा गच्चीत बोलायला गेले. राहिलो आम्ही दोघं आणि ते दोघं. ही वेळ फार विचित्र असते. धड ओळख नाही, पुन्हा कधी भेटू अशीही खात्री नाही आणि नाहीच भेटणार अशीही नाही, काही चुकीचं बोललं जायला नको ह्याचं दडपण. उगा कडेकडेनी गप्पा मारत होतो तेवढ्यात बारावीत शिकणारा आमचा मुलगा क्लासहून घरी आला. नवीन आणि सुरक्षित विषय सापडल्याच्या आनंदात मी त्याची ओळख करून दिली. पण ते काका आम्हाला म्हणाले,’ एकच मुलगा का? अजून होऊ द्यायचं होतं हो एखादं’!!!!
‘एक मूल-सौख्य विपुल’ वाल्या मंडळींना हा प्रसंग नवीन नाही. पण मुलगा जवळपास अठरा वर्षांचा झाल्यावर हे वाक्य अगदीच अनपेक्षित होतं. पुन्हा ओळख ना देख. इतक्या कमी ओळखीवर काकांनी ही सिक्सर मारली,की आम्ही हतबुद्धच झालो. पण मला ते सगळं इतकं विनोदी वाटलं की मी त्या काकांना मोठ्या मनाने माफ केलं! भाचीला तो मुलगा आवडला नाही. त्यामुळे त्या कुटुंबाशी पुन्हा संपर्क आला नाही.

हा प्रसंग कांपो कार्यक्रमाचा एक पाऊल आधी , मध्यस्त येऊन घर बघुन जाणार .. असा आहे.. माझ्या मैत्रिणीचा भाऊ लग्नाचा.
मुलीचा मामा (मध्यस्त ) घर बघायला आलेला.. घरी माझी मैत्रिण, तिचा लग्नाळू भाऊ, तिचे आई वडील व मुलीचा मामा...
थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर मुलीच्या मामाने मुलीची स्तुती करायला सुरूवात केली...
एक दोन वाक्यानंतर त्याने चक्क, 'आमची भाची म्हणजे एकदम उफाड्याची आहे', असे आंगीक अभिनय करून वर्णन करायला सुरूवात केली.
आता हसावे, चेष्टा करावी, लाजावे,बोलावे , गप्प बसावे की काय करावे हे कुणालाच कळेना.. बरं तो माणूस परत परत हाच शब्दप्रयोग करतोय.
घरातले कोणीच कुणाला नजर देऊ शकले नाहीत.. सगळे तिसरी कडे बघताहेत. शेवटी मुलाच्या वडीलांनी 'यंदा कर्तव्य नाही' असे सांगून त्या मामाभागाला घराबाहेर काढले..

साखरपुडाच झालाय ना >>> हे एपिक आहे! Lol बाकी किस्से पण भारी आहेत.

मुलीने घातलेल्या कपड्यांवरून तिला जज करणं अजूनही चालू असेल असं नव्हतं वाटलं. एका कांपोच्या वेळी मी त्या मुलाला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा चुडीदार घातला होता, टिकली वगैरे लावली होती. त्याला भेटून तिथून निघेपर्यंत त्याला मी पसंत आहे असं एकूण माझं मत झालं. आणि अपेक्षेप्रमाणे त्याचा पुन्हा भेटूया असा कॉल पण आला त्यापुढच्या आठवड्यात. गंमत अशी झाली की दुसरी भेट त्याने वीकडे मधे ठरवली होती. मी ऑफिसला जाता जाता थोडा वेळ काढून त्याला भेटायचे ठरवले. आणि यावेळी मी त्याला शर्ट-पँट अश्या फॉर्मल पेहरावात भेटले. तर पठ्ठ्या धड बोललाच नाही या भेटीत. मला कळेना की या माणसाने ही भेट ठरवली तरी का आहे? मग एक कॉफी पिऊन तिथून निघाले. २ दिवसांत नकार आला त्याच्याकडून.

मित्राचा एक किस्सा...

तो होता पुण्याचा पण मुंबईला नोकरी करायचा. त्यावेळी पुण्याला एक कांदेपोहे कार्यक्रम झाला व ती मुलगी त्याला खूपच आवडली. पण त्यांच्याकडून एकाच गोष्टीमुळे नकार आला की मुलीला मुंबईत यायचे नाही. पुणे सोडून तिला कुठे जायचे नव्हते. तिची नोकरी पुण्यात होती व आई बाबांच्याच शहरात रहायचे होते. (अमेरिका मात्र चालले असते त्यासाठी नोकरी सोडायची तयारी होती). पण एवढ्याच कारणाने नकार आला. याने त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण ते लोकं बधले नाहीत. मुलीकडच्या लोकांनी तर तुम्ही पुण्यात नोकरी करत असता तर आम्ही पुढची बोलणी केली असती असे स्पष्ट सांगितले. (त्यांनी मुलगा मुंबईला नोकरीला आहे तरी ह्यांच्याबरोबर कांदेपोह्याचा कार्यक्रम का ठरवला कोणास ठावूक)

याला जळी स्थळी तिच दिसत होती. याने नंतर पुण्यात नोकरी बघीतली व तीन-चार महिन्यात पुण्याला परत गेला. मधल्या काळात तिच्याशी काहीच संपर्क नव्हता. परत तिच्याशी बोलता यावे व आता पुढील विचार करता येईल का म्हणून ती जिथे नोकरी करायची तिथे फोन केला तर त्याला कळले की तिचे लग्न चार पाच दिवसांवर असल्याने ती सध्या सुट्टीवर आहे.

ओह
इतकी आवडली?मग नीट सेटिंग लावून ठेवायला हवे होते मी पुण्यात नोकरी बघतो, तोवर माझ्यासाठी थांब म्हणून Happy

Pages