काय करू?

Submitted by फलक से जुदा on 12 March, 2021 - 06:06

मी सध्याचा जॉब सोडतोय. सहा वर्ष झाली इथे.
दोन मोबाईल सांभाळणे शक्य होत नव्हते आणि कंपनी जॉब सोडून देताना त्यांनी दिलेले सिम पर्सनल वर कन्व्हर्ट करू देते त्यामुळे फक्त कंपनीचं सिम वापरत होतो.
बँक, upi, कायप्पा, शेअर मार्केट, वेगवेगळे शॉपिंग आणि फूड ॲप्स इ. ठिकाणी तोच नंबर.

आता सोडताना HR म्हणतंय की पॉलिसी बदलली आणि आम्ही legal department कडून noc नाही देऊ शकत.
परिस्थिती समजाऊन सांगितली तरी एक्सेप्शन ला नाही म्हणाले.

आतली बातमी आहे की, हा नंबर नवीन एम्प्लॉइ ला reassign न होता ओपन मार्केट ला जातो सहा महिन्यांनी.
म्हणजे स्वतःही वापरणार नाही आणि मलाही वापरू देणार नाही.

मी शक्यतो लवकर नाही irritate होत पण ह्या गोष्टीने प्रचंड irritate होतंय मला.
---
एका टूल च्या licensing renewal ईमेल मध्ये मी group cc मध्ये आहे.
मला सरळ सरळ licensing count मध्ये catch आहे तो दिसतोय.
इतर कोणी त्यावर काम केले नसल्याने कोणाच्याही लक्षात येणार नाही.

मी तो नंबर्स मधला कॅच लक्षात आणून दिला तर ह्या कंपनीचे 5 लक्ष रुपये प्रति वर्ष वाचू शकतात.
पण मी गप्प रहायचा विचार करतोय. काय करू?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम कार्डाचा घोटाळा आणि तुमचं काम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण तुम्ही ती तुम्हाला दिसणारी चूक न दाखवून दिल्याने तुमच्या सिम कार्डाचा प्रश्न सुटणार नाहीये. So don't compromise your quality of work. अजून employed आहात ना मग आपलं काम चोख करा. हा माझा सल्ला.
जर नोटिस पिरियड मध्ये असाल आणि हातात दिवस असतील तर महत्वाच्या ठिकाणी नंबर बदलून घेता येईल. थोडा त्रास होईल पण ते अशक्य नाहीये.

अरेच्या हा काय प्रश्न झाला? कंपनीशी प्रामाणिक राहू की नको? वाह!! प्रश्न पडतो असा? धन्य आहात. कदाचित तुमचा प्रश्न तुम्ही 'सीसी' आहात म्हणुन आहे. की सीसी असूनही किती दखलअंदाजी करायची?
माझे मत आहे की लवकरात लवकर तो कॅच लक्षात आणून द्या.

धन्यवाद जिज्ञासा.
आपल्या सल्याचा आदर आहे.

काही ठिकाणी नंबर बदलण्यासाठी प्रोसेस चालू केली आहे.
जड जातंय.

बऱ्याच ठिकाणी "Sorry we don't allow number change. If you want, you can open a new account with new number and email" असा reply मिळाला.

बँकेत, आर्थिक संस्थांमध्ये आणि ब्रोकर ने हेवी सर्व्हिस charge घेतलेले आहेत. एका प्रकारे हे माझं आर्थिक नुकसान आहे.
दुसरं म्हणजे जेंव्हा त्यांनी पॉलिसी बदलली, they have not been transparent to inform employees.
अजूनही कित्येक एम्प्लॉइज ह्या भ्रमात आहेत की नंबर कन्व्हर्ट करू देतात.
(अजूनही कित्येक एक्स एम्प्लॉइजना/ मित्रांना आम्ही त्याच नंबरवर फोन करतो जेंव्हा ते इथे कामाला होते).

जिज्ञासा +१.
दोन वर्षांपूर्वी हीच परिस्थिती माझ्यावर आली होती. अचानक कम्पनीने सोडून जाणाऱ्या जुन्या एम्प्लॉइजना पण सिम कार्ड देणे बंद केले. मी त्या कंपनीत 22 वर्षे होतो. पहिला सेल फोन कंपनी कडुनच मिळाला होता. सोडूज जाणाऱ्या सर्वांना सिम कार्ड आणि noc देत होते आधी.

मी वर पर्यंत रिक्वेस्ट केली, मग तक्रार केली पण माझा रीलीव्ह होण्याचा दिवस जवळ आला तो पर्यंत काही झाले नाही.
मग मी लगेच नवे सिमकार्ड, फोन घेऊन बँक्स, आधारकार्ड, क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स कम्पन्या, ट्रेडिंग अकाउंट इत्यादी इत्यादी सगळीकडे फोन नंबर बदलून घेतला. आठवून आठवून रोज दोन तास या करता ठेवून सगळीकडे फोन नंबर बदलून घेतला, सगळ्यांना नवीन नंबर कळवला.

रिलिव्ह झाल्याच्या दीड महिना नंतर कंपनीतून फोन आला, तुम्हाला जुना सिम देण्याचं मान्य केलंय सिम आणि स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करायला noc कुरियरने पाठवलंय.

>>>>काही ठिकाणी नंबर बदलण्यासाठी प्रोसेस चालू केली आहे. जड जातंय. बऱ्याच ठिकाणी "Sorry we don't allow number change. If you want, you can open a new account with new number and email" असा reply मिळाला.
Sad
गुड लक!

फलक से जुदा, मला वाटते आधारकार्ड ला लागलेली जुजबी फी वगळता मला अजून कुठे फोन नंबर बदलण्यास पैसे भरावे लागले नाहीत. बँकेला लेखी अर्ज द्यावा लागला. आधार, बँक वगळता बाकी सगळीकडे ऑनलाईन काम झाले.

धन्यवाद सामो, मानव.

महाबँकेने 168 प्रती अकाऊंट (सर्व्हिस चार्ज 150+18 gst) डेबिट केलंय अकाउंट ला.
आंतर जालावर देखील हे चार्जेस उपलब्ध आहेत.
प्रायव्हेट बँकेने जेथे salary अकाउंट तेथे काही चार्ज नाही लावले अजून.

मी जमतंय तितक्या कलिग्जना सांगतोय पॉलिसी change बद्दल.
कमीत कमी त्यांना ह्या दिव्यातून जाव लागू नये अँड to stop any further use of company sim on socials.

Not sure if it will work - but if you transfer the number to other service provider as mobile number portability, will it help ?
Sorry for English typing.

Another thing - do not mix your mobile issue with the cost saving for company. Do good- get good ..

दोन प्रकार:
एक: सिमकार्ड तुमच्या नावावर आहे. बिलही तुमच्या नावाने येते. तुम्ही बिल भरायचं, कंपनी त्याचे रीइम्बर्समेंट देते. यात पोर्ट करायचीही गरज नाही. कम्पनी सोडली की तुम्ही तुमचे सिमकार्ड घेऊन घरी.

दोन: सिम कार्ड कंपनीच्या नावावर आहे, पण तुम्हाला दिलंय. (जेव्हा सेलफोन नवीन सुरू झाले, जाळं पसरू लागले तेव्हा बहुतेक कम्पन्या घावूक भावात सिम आणि सेलफोन घेऊन एम्प्लॉइजना द्यायचे. तेव्हा कॉल रेटही जास्त होता आणि सगळेच सेलफोन कनेक्शन घेत नसत. तेव्हा पासून असलेले आमचे सिम). बिल ही कंपनीच्या नावावर येतं. प्लॅन बदलणे, पोर्ट करणे सगळे कंपनीच करू शकते आपण नाही. (कंपनी कडुन सही शिक्क्यानिशी अर्ज / छापील फॉर्म लागतो.).
तुम्ही कंपनी सोडली सिम कार्ड घेऊन पळून जरी गेलात कंपनी ब्लॉक करू शकते सिम, रद्द करू शकते, आमचा सिम घेऊन पळून गेला/गेली म्हणुन तक्रार करू शकते. पोर्ट करणे दूरची गोष्ट. इथे कंपनीकडून हे सिम आमच्या नावावर आहे ते या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करण्यात यावे असे पत्र लागते, म्हणजे आपल्या नावावर करून घेता येते.

आमच्या कंपनीने सुरवातीला दुसऱ्या प्रकारे सिम दिले होते. मग नंतर काही वर्षांनी नवीन येणाऱ्यांना पहिल्या प्रकारे. कारण तेव्हा प्रत्येका कडे सेलफोन असे, मग कंपनी तर्फे दुसरा सिम असे दोन दोन कशाला, म्हणून.

>>>>काही ठिकाणी नंबर बदलण्यासाठी प्रोसेस चालू केली आहे. जड जातंय. बऱ्याच ठिकाणी "Sorry we don't allow number change. If you want, you can open a new account with new number and email" असा reply मिळाला.

नंबर बदलायला एवढा त्रास का होतो भारतात? म्हणजे कस्टमरचा इमेल, पत्ता, फोन नंबर बदलणे एवढे कठीण असते का? आपले आपण ऑनलाईन करु शकत नाही का? किंवा ड्रायविंग लायसन्स, आधार या सारखे वॅलिड आयडी दिल्यावर कंपनीने करुन द्यायला हवे ना. ग्राहक पंचायतीत चौकशी करा या बाबत.

स्वानुभवानुसार,
बँकेत, पॉलिसीज, लाईटबिल वगैरे मधे नंबर बदलण्यासाठी म्ला काहीच अडचण आली नाही.
फक्त नवा नंबर अपडेट करताना जुना नंबर जवळ हवा(कंपनीने परत घेण्या अगोदर ही कामं आट्पुन घ्या) कारण चेंजओव्हर करताना येणारे कोड/ओटीपी वगैरे प्रथम जुन्या नंबरवर येवु शकतात.

धनवंती, रानभुली: सिम कंपनीच्या नावावर आहे... वरती मानव ह्यांनी वर्णन केल्याप्रमाणे दुसऱ्या प्रकारात मोडते.
अशावेळी ह्या सिम मध्ये कोणताही बदल, porting हे कंपनीच्या पत्राशिवाय नाही होऊ शकत (Noc to telecom provider)

हेच पत्र द्यायला कंपनी नकार देत आहे.

स्वाती2, जेम्स बाँड:

हो काही ठिकाणी इमेल वर कन्फर्म केलंय की असा नंबर नाही बदलू शकत.
मी त्यांना future security issue बद्दल विचारलं तर अकाउंट delete करू शकता म्हणून सल्ला दिला.
उदा. फोन पे (PhonePe)

काही ठिकाणी अगदी पटकन नंबर बदलून मिळाला
उदा. उबर

मानव: तुमची 22 वर्षांची पोस्ट वाचून वपुंची कथाकथन मधली "अनामिक" कथा आठवली.

चर्चगेट स्टेशन! स्टेशनच्या बाहेर MMU 7874 ही इम्पाला दिसते...

तुम्हाला मदत करत नाहीयत ना. खड्यात जाऊ दे.. काही गरज नाही त्यांचे नुकसान वाचवायची... गेले उडत...
Cc मध्ये आहात ना... इग्नोर...

च्रप्स:
ती रक्कम कंपनीसाठी क्षुल्लक आहे.
ह्यावर्षीच $1B रेव्हेन्यू मार्क क्रॉस केला कंपनीने.
त्यातुलनेत $7k फुटकळ रक्कम आहे एकदम, पण माझ्यासाठी मोठी रक्कम आहे ती.

गेले उडत, मी चाललो तुम्ही बोंबला असाच विचार येतोय मलापण.
वरती बऱ्याच जणांनी सांगितल्याप्रमाणे त्याने माझा सिम चा प्रॉब्लेम नाही सुटणार कदाचित पण कंपनीने दिलेल्या मनस्तापा बद्दल धडा शिकावल्याचं समाधान मिळेल Happy

भविष्यात कधीतरी
"How it costed a firm $7000 for not releasing a $7 sim"
टाईप लेख लिहायला आवडेल Lol

माझे पण मानवकाका यांनी लिहिलेल्या दुसऱ्या प्रकारचे सिम आहे म्हणून मी माझे आधीचा नंबर चालूच ठेवला आहे. दर दोन महिन्यांनी मिनिमम रिचार्ज करते नंबर चालू ठेवायला.

दुसरे, मला काही कळले नाही पण एक शंका, ज्या मेलमध्ये तुम्ही सीसी आहात त्या मेलमध्ये अजून असे दुसरे कोणीच नाही का ज्यांना हा घोटाळा लक्षात येईल.

तुम्हाला मदत करत नाहीयत ना. खड्यात जाऊ दे.. काही गरज नाही त्यांचे नुकसान वाचवायची... गेले उडत...
Cc मध्ये आहात ना... इग्नोर...>> चीप. तुम्हाला वाईट वागायचं असेल तर वाईट वागा, त्यात काहीच हरकत नाही. पण स्वतःच्या वाईट वागण्याला सारवासारव म्हणून दुसऱ्याच्या वाईट वागण्याला प्रतिक्रिया वगैरे गोंडस लेबल देण्याने आपलेच नुकसान होते याचे भान असूद्या.

VB:

चुकूनही तुमचा स्वतःचा नंबर वापरायचा बंद नका करू.
जो काही दोन तीन महिन्यातून रिचार्ज करायला लागतो तो चालू ठेवा.

पूर्ण ग्रुप cc मध्ये आहे पण आणखी कोणाचा त्या टूल वर तितका अभ्यास नाहीये.
नंबर्स सगळेच गंडलेले आहेत. त्यामुळे 100paid+ 90free licenses ऐवजी 190 paid ची ऑर्डर जाणार आहे.

चीप. तुम्हाला वाईट वागायचं असेल तर वाईट वागा, त्यात काहीच हरकत नाही. पण स्वतःच्या वाईट वागण्याला सारवासारव म्हणून दुसऱ्याच्या वाईट वागण्याला प्रतिक्रिया वगैरे गोंडस लेबल देण्याने आपलेच नुकसान होते याचे भान असूद्या.
>>>यात काय वाईट वागणे आहे? यात आपले नुकसान कसे? एक प्रकारे आनंद आहे यात.. आसुरी म्हणू शकतो... आणि हरिश्चंद्र वगैरे चा जमाना नाहीय... फलक ची जी चिडचिड होतेय, ती बरीच कमी होईल यामुळे...आणि त्या काहीही वाईट वागत नाहीयत.. cc मध्ये आहे ना... not responsible... मी तर cc मेल्स वाचतही नाही.. डायरेकत एका फोल्डर मध्ये जातात... आरामात वाचतो...

आता मी एक उदाहरण देतो... माझा स्वतःचा अनुभव... अमेरिकेत मी माझा पहिला जॉब करत होतो आणि मॅनेजर फार बायस आणि खडूस होता, सर्वांशी तो फटकून वागायचा.. नया नया मॅनेजर होता, स्वतःला ceo समजायचा..मी बाहेर दुसरा जॉब शोधला, आणि दोन आठवड्यांची नोटीस दिली.. मॅनेजर चिडला म्हणे तू तीन आठवडे थांब नाहीतर मी तुला एकही पेपरवर्क साठी मदत करणार नाही भविष्यात... त्याने रिक्वेस्ट केली असती, ऐकले असते... एक दोनदा समजवायचा प्रयत्न केला.. ऐकेना.. HR कडे गेलो, HR म्हणे मॅनेजर वर डिपेंड आहे स्मूथ एक्सिट.. या सगळ्या गडबडीत एक आठवडा गेला आणि शुक्रवार आला..
मी मॅनेजर कडे गेलो आणि म्हणालो हे बघ मी दोन वीक थांबायचे म्हणतोय ,तू म्हणतोय तीन वीक पेक्षा कमी थांबल्यास तू नॉट स्मूथ exit असा शेरा मारणार म्हणतोयस, मी आज चाललो.. आणि फॉर्मल ई-मेल टाकला... विचार केला एक वीक आराम करेन पण तुझे काम नाही...
पुढच्या आठवड्यात गुरुवारी एक प्रोडक्शन डिप्लोयमेंट होती... ती फाटली... मोठा प्रॉब्लेम झाला... कारण माझ्याऐवजी दुसर्याकडून ते चेंजेस करून घेतले होते...
मला कॉल केले मॅनेजर ने.. मी आरामात उचलले.. प्रॉब्लेम कळला... सोल्युशन माहीत होते...थेटरात आहे.. नंतर कॉल करतो असे बोलून उत्तरे दिली... आरामात कॉल उचलला तो रडायलाच आला होता.. चेंजेस असे होते की बॅक आउट पण शक्य नव्हता... मी म्हणालो सॉरी.. मी आता तुमच्या कंपनीत नाहीय... शेवटी मला विपी चा कॉल आला.. urgent आहे.. मदत हवीय.. प्लिज करा.. मी म्हणालो गाडी सर्व्हिसिंग ला आहे.. विपी म्हणाला मी मॅनेजर ला पाठवतो पिक करायला तुला( तेंव्हा लॅपटॉप नव्हते)..
तो मॅनेजर आला मला पिक करायला... रीतसर परमिशन वगैरे घेऊन लीडरशिप कडून की याला बिल्डिंग मध्ये एन्ट्री फक्त आज मिळावी...
त्याचा चेहरा फार उतरला होता...
शेवटी काम केले आणि आलो...
आजही हा प्रसंग आठवला की मनाला शांती मिळते...
आसुरी आनंद Happy

च्रप्स:
मलाही हेच म्हणायचंय.
मी स्वतःहून खोड काढत नाही. पण कोणी काढली आणि त्याने मला त्रास झाला तर मला संधी मिळताच, का सोडू?

कंपनी सोडताना सगळ्या महत्वाच्या फाईल्स डिलीट करा. बॅकअप असेल तर काहीतरी घोळ घालून ठेवा. जाताना ज्यांनी त्रास दिला त्यांच्या नावाने गुडबाय मेलमध्ये चांगलाच शिमगा करा.

बोकलत दादा, असा का रिप्लाय देता ? आपल्याला ज्याने माणुसकी दाखवली नाही त्याला अद्दल घडेल इतकीच माफक अपेक्षा ठेवा. फार तर नाक दाबले तर तोंड उघडते असा पवित्रा घेऊन आपले काम मार्गी लावून ज्या कंपनीने आपल्याला दोन घास मिळवून दिले तिच्याप्रती कटु भावना आपल्यात आणि आपल्याप्रती तिच्यात राहणार नाही हे किमान करायलाच हवे. कर्तव्य म्हणून अजिबात नाही. कृतज्ञता म्हणून. हे मी अजिबात माझी इमेज स्वच्छ असावी म्हणून सांगत नाही.
वड्याचं तेल वांग्यावर नको निघायला.

परत तेच.. अरे जी त्यांची रिस्पॉन्सीबिलिटी नाही तिथे फलक जबाबदार नाही.. एथिक्स चा संबंधच नाहीय इथे... cc मध्ये आहे ना... संपला विषय...

फलक बिनदास इग्नोर मारा तो घोटाळा... होऊ दे खर्च... गेले उडत attitude ठेवा.. it works..

मी फलकच्या जागी असते तर चूक दाखवली असती पण तरीही चरप्स यांच्याशी मी 100 टक्के सहमत आहे. मी कंपनीप्रती जो प्रामाणिक विचार करते तो कंपनीचे रिप्रेझेन्टेटीव्ह असलेले माझे लगेचचे मॅनेजर व एचआर माझ्याप्रती करत नाहीत/करणार नाहीत. माझ्या नजरेत कंपनी म्हणजे हे इमिजीएट बॉसेस व एचआर नसतात पण माझा जो काही निकाल लावायचा असतो तो हेच लोक लावतात. Sad Sad त्यामुळे जशास तसे असेच वागणे ठेवलेले मानसिक शांततेसाठी चांगले.

मी तो नंबर्स मधला कॅच लक्षात आणून दिला तर ह्या कंपनीचे 5 लक्ष रुपये प्रति वर्ष वाचू शकतात. >>> ते लक्षात आणून द्या. पाहिजे तर नंतर त्याचे भांडवल करून सिम बद्दल एक्स्पेशन मागा. That's totally fair

च्रप्स - तुमचे उदाहरण वेगळे आहे. तो mutual negotiations चा भाग आहे. कंपनीच्या पेरोल वर तुम्ही नसताना आलेल्या प्रॉब्लेम बद्दल तुम्ही लिहीलेले आहे. तुम्ही जे ताणण्याचे उदाहरण दिले आहे ते कंपनी सोडल्यावरचे आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्ही निर्माण केलेला नाही (नसावा Happy ).

पण असले धंदे करायचेच कशाला ?

एवढा पगार आहे तर स्वतःचेच एक सिम ठेवायचे

आणि कम्पनीने सिम दिले , त्या आधी बायो डेटात स्वतःचे सिम नंबर दिले असेलच ना ? ते कशाला बंद केले ?

कंपनी सोडताना सगळ्या महत्वाच्या फाईल्स डिलीट करा.
असे बिलुकुल करू नये. हे unethical तर आहेच पण जर खूपच महत्वाचा डेटा डिलीट झाला तर कंपनी कारवाई करू पण शकते. दुसरी कंपनी join करायच्या आधी जे बॅकग्राऊंड चेक होते त्यामध्ये विपरीत अभिप्राय देऊन विघ्न निर्माण करू शकते. थोडक्यात, कंपनीला कमी लेखू नये. तुम्ही विचार पण करू शकत नाही इतकं नुकसान ते तुमचे करू शकतात. अशी उदाहरणे आहेत. लिंक मिळाली तर देतोच.

मी स्वतःहून काहीही घोळ घालणार नाही किंवा काही unethical किंवा फाईल deletion असलं नक्कीच नाही करणार.

मुद्दा gratitude चा आहे. It should be give and take.
नंतर स्वतःला कोसन्यापेक्षा आत्ता गप्प राहिल्याने मनः शांती तरी मिळेल.

जसं कंपनीला मला noc देऊन काहीही नुकसान नाही तसंच मला गप्प राहून काहीही नुकसान नाही.

Exception देणार नाहीयेत जरी मी चूक लक्षात आणून दिली तरी.
स्पष्ट सांगितलं आहे त्यांनी we cannot make exception for one employee.

जर ते असं खडूस पणे वागू शकतात तेही काहीही कारण नसताना तर why shouldn't I use my choice to keep quite?

KT देताना मी कुठेही कमी नाही केली.
ज्या गोष्टी करायला 20 मिनिटे लागतात त्या 3 मिनिटात कशा करायच्या हे मला अवगत झालेलं ज्ञान देखील देऊन टाकले त्यांना.

तुमची कंपनी किती मोठी आहे माहीत नाही, पण कंपनीच्या वरच्या काही लेव्हल वरचे अधिकारी लोक एच आर, लीगल वगैरेंना असे अपवाद करायला भाग पाडू शकतात. तुम्ही तर लायसन्स चा पॉइण्ट लक्षात आणून दिलात तर तुम्हाला जितक्या वरच्या लेव्हलचा अधिकारी अ‍ॅप्रोचेबल आहे सरळ त्याला विनंती करायची आणि पाहिजे तर हे लायसन्सचे त्यात सांगायचे. थोडे क्रूड आहे हे पण अनफेअर काहीही नाही.

अशा अनेक सिच्युएशन्स मधे "what's the right thing to do?" हा साधा प्रश्न आपल्याला उत्तर सोपे करून जातो.

बोकलत मिरजेतच आहात का अजून? ते घरमालकाच्या फ्रीलोडर सून प्रकरणाचा काय अपडेट ?>>> हो मिरजेतच आहे. सून दिल्लीला गेली मागेच.

पण असले धंदे करायचेच कशाला ?
एवढा पगार आहे तर स्वतःचेच एक सिम ठेवायचे
आणि कम्पनीने सिम दिले , त्या आधी बायो डेटात स्वतःचे सिम नंबर दिले असेलच ना ? ते कशाला बंद केले ?
Blackcat >>

लेखाची दुसरी ओळ परत वाच मांजरे. डोळे मिटून दूध पिण्यापर्यंत ठीके पण डोळे मिटून कॉमेंट पण Lol

झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पण झाड सावली देते,
विंचू पाळणाऱ्या व्यक्तीला पण विंचू डंख मारतो.

कारण तो त्यांचा स्वभाव आहे.

तुम्ही तुमच्या स्वभावा प्रमाणे वागा.

इथेच तर गोची आहे.
एका साच्यात बसवता येईल (generalise करता येईल) असा मानवाचा स्वभाव नाही ना.

<< कंपनी सोडताना सगळ्या महत्वाच्या फाईल्स डिलीट करा. बॅकअप असेल तर काहीतरी घोळ घालून ठेवा. जाताना ज्यांनी त्रास दिला त्यांच्या नावाने गुडबाय मेलमध्ये चांगलाच शिमगा करा. >>
चुकीचा सल्ला. असे अजिबात करू नका. मेलमध्ये शिमगा करून काही फायदा होणार नाही, झाले तर नुकसानच होईल. नोकरी सोडायच्या नुकतेच आधी कुठल्या फाइल्स डिलीट केल्या अथवा कॉपी करून सोबत नेल्या हे सहज शोधता येते. लेखी पुरावा जो कधीही तुमच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो, तो सोडणे म्हणजे मूर्खपणा.

पण पुढील गोष्टी घडण्याच्या शक्यता आहेत. उदा.
१. महत्वाची माहिती चुकीने save होऊ शकते, fat fingering. डेटा corrupt किंवा खराब असू शकतो.
२. ऑटो बॅकअप 30 दिवस साठवला जात असेल तर सगळ्या बॅकअपमध्ये पण चुकीची माहितीच जमा होऊ शकते.
३. महत्वाची माहिती तुम्ही पासवर्ड टाकलेल्या फाईलमध्ये असू शकते आणि दुर्दैवाने तुम्ही पासवर्ड विसरू शकता.
४. मॅनेजरने पासवर्ड मागितले की कंपनी पॉलिसीनुसार इतरांना तुम्ही पासवर्ड सांगू शकत नाही. (इच्छा असूनही) किंवा तुम्ही जे काही २-३ पासवर्ड सांगितले ते चालत नाहीत.
५. बऱ्याच फाइल्स archive version च्या असू शकतात म्हणजे फाईलचे नाव तेच पण आतील माहिती शिळी असू शकते.
६. उपयुक्त माहिती डिलीट केलेली नसते, पण आयत्यावेळी ती सापडतच नाही. फोल्डरचे ठिकाण, नाव, फाईलचे नाव शोधूनही सापडत नाही.
मॅनेजरला मदत करायची तुमची खूप इच्छा असते, तुम्ही पूर्ण सहकार्य करायची तयारी दाखवता, पण दुर्दैवाने प्रयत्न करूनही मदत होत नाही. अशा अनेक शक्यता असू शकतात.

७००० डॉलर वर्षाला! या फडतुस रक्कमेसाठी तुम्हाला सूड वगैरे वाटून घ्यायचं असेल तर वाटून घ्या बापडे. पण कंपनी ढूंकुन ही बघणार नाही, बघुही नये. तुम्हाला सांगायचं तर सांगा, नसेल सांगायचं तर नका सांगू. दुसरा कोणी शोधून काढेलच. तुम्ही अगदी चीफ आर्किटेक्ट का असेना, तुमच्या वाचुन कुणाचं काही अडत नाही हा धडा जितका लवकर प्रोफेशनल लाईफ मध्ये शिकाल तितका चांगला.
यावरुन धडा घ्या आणि पर्सनल आणि प्रोफेशनल सेपरेशन चालू करा.
बाकी नंबर बदलणे अत्यंत सोपे आहे. रादर बदलत राहिलात तरच प्रगती होते, नाही तर साचले पण येते. नव्या अनुभवासाठी शुभेच्छा!

Pages