काय करू?

Submitted by फलक से जुदा on 12 March, 2021 - 06:06

मी सध्याचा जॉब सोडतोय. सहा वर्ष झाली इथे.
दोन मोबाईल सांभाळणे शक्य होत नव्हते आणि कंपनी जॉब सोडून देताना त्यांनी दिलेले सिम पर्सनल वर कन्व्हर्ट करू देते त्यामुळे फक्त कंपनीचं सिम वापरत होतो.
बँक, upi, कायप्पा, शेअर मार्केट, वेगवेगळे शॉपिंग आणि फूड ॲप्स इ. ठिकाणी तोच नंबर.

आता सोडताना HR म्हणतंय की पॉलिसी बदलली आणि आम्ही legal department कडून noc नाही देऊ शकत.
परिस्थिती समजाऊन सांगितली तरी एक्सेप्शन ला नाही म्हणाले.

आतली बातमी आहे की, हा नंबर नवीन एम्प्लॉइ ला reassign न होता ओपन मार्केट ला जातो सहा महिन्यांनी.
म्हणजे स्वतःही वापरणार नाही आणि मलाही वापरू देणार नाही.

मी शक्यतो लवकर नाही irritate होत पण ह्या गोष्टीने प्रचंड irritate होतंय मला.
---
एका टूल च्या licensing renewal ईमेल मध्ये मी group cc मध्ये आहे.
मला सरळ सरळ licensing count मध्ये catch आहे तो दिसतोय.
इतर कोणी त्यावर काम केले नसल्याने कोणाच्याही लक्षात येणार नाही.

मी तो नंबर्स मधला कॅच लक्षात आणून दिला तर ह्या कंपनीचे 5 लक्ष रुपये प्रति वर्ष वाचू शकतात.
पण मी गप्प रहायचा विचार करतोय. काय करू?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव++
इतके वर्ष पगार मिळाला काम करण्याचा, ह्या महिन्याचा ही मिळणार मग माहिती द्यायला काय हरकत आहे.
येस, अतिशय फ्रस्ट्रेटिंग वाटतय फोन नंबर प्रकरण, पण त्या करता असं वागलं तर आयुष्यभर चुकीचं वागल्याची टोचणी नाही का रहाणार?

उपाशी बोका:
अगदी सहमत. मी देखील काहीही unethical करण्याच्या भानगडीत पडणार नाहीये.
आपले सल्ले खत्रुड आहेत Lol
'साप भी मरा और लाठी भी नही टूटी' साच्यात बसणारे.

अमितव:
मीच म्हणतोय की $7k ने कंपनीला नाही फरक पडणार.
मी म्हणत नाहीये की माझ्यामुळे त्यांचं अडेल.
प्रश्न इतकाच आहे की तिथे कॅच आहे असं सांगितलं तर कोणीतरी शोधून काढेल पण गप्प राहिलो तर अधिकची renewation ची ऑर्डर जाईल.
बाकी पॉलिसी change झाल्यानंतर transparent न राहणं ही मला पर्सनल बाब नाही वाटत.
इथे दोन्ही गोष्टी professional आहेत.
If there's exchange in profession, it should be give and take.

इथे दोन्ही कडून give and take हा gratitude मध्ये मोडणारा आहे.
जर कंपनी अशा पद्धतीने मनमानी पणा दाखवू शकते, तर त्यांनी त्याबदल्यात gratitude ची अपेक्षा न ठेवणे चांगलेच.

शुभेच्छांबद्दल धन्यवाद, आपल्या मताचा आदर आहे.

नानबा:
पगार मिळतोय तो केलेल्या कामाबद्दल.
जी माझ्या कामाची जबाबदारी आहे ती मी पूर्णपणे पार पाडली आहे.
Projects उत्तम पद्धतीने deliver केले आहेत.
K.T. हातचं काही ना राखता दिलेली आहे.
वर सांगितल्याप्रमाणे gratitide चा मुद्दा आहे.

आणि तसंही त्यांची चूक लक्षात आणून दिली म्हणून मला जास्त पगार मिळणार नाहीये.

न सांगितल्यापेक्षा, का सांगितलं? मला तेंव्हा का खंबीर नाही होता आलं? मी गप्प का नाही राहू शकलो हे प्रश्न अधिक बोचतील असं वाटतं.

चुकीचं वागणं: हे subjective आहे.
Gratitude नाही मिळाला म्हणून नाही दिला. मी जाणून बुजून कोणाचं वैयक्तिक नुकसान करत नाहीये, किंवा काहीही unethical तर नक्कीच करत नाहीये.

जर त्यांनी आपली policy/sop बदलली आहे (जी आजपर्यंत तरी पब्लिक नाही) आणि ते त्या sop नुसार वागत आहेत तर ते बरोबर.
मी देखील माझं टूल वरचं आणि इतर आखून दिलेलं काम व्यवस्थित केलंय.
माझ्या sop नुसार मी देखील बरोबर.

Licensing माझ्या कामाच्या कक्षेत नाही. फक्त टीम DL cc मध्ये असल्याने तो कॅच माझ्या लक्षात आला आहे. आणि मी गप्प राहायचं ठरवलं आहे.

कदाचित स्वतः ला धडा मिळेल की आपण प्रेमाने वागल्यास दहापट प्रेम मिळतं आणि power आल्यानंतर मनमानी केली तर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते.

सांगा अथवा सांगू नका कंपनीला काहीही पडणार नाही.
त्यामुळे मी पण कंपनीवर सूड उगवला हे समाधान फसवं आहे, ते घ्यायचं की सांगून चांगुलपणा घ्यायचा हा तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे.

उद्या तुमची स्वतःची कंपनी असेल तिथे इंटरव्ह्यू द्यायला दोन कॅन्डीडेट्स आले. दोघेही टेक्निकल, पर्सनल इंटरव्ह्यू सारख्या गुणाने पास झालेत. त्यातील एक निवडायचा आहे.
तेवढ्यात तुम्हाला कळलं की त्यातील एकाने कंपनीचा रुल बदलला होता म्हणुन नाराज होऊन, कंपनीचे थोडेसे नुकसान होणारी गोष्ट त्याला माहित होऊनही सांगितली नव्हती. दुसऱ्याने मात्र सांगितली होती.
आता दोघांपैकी तुम्ही कुणाला निवडाल?

उद्या तुमची स्वतःची कंपनी असेल तिथे इंटरव्ह्यू द्यायला दोन कॅन्डीडेट्स आले. दोघेही टेक्निकल, पर्सनल इंटरव्ह्यू सारख्या गुणाने पास झालेत. त्यातील एक निवडायचा आहे.
तेवढ्यात तुम्हाला कळलं की त्यातील एकाने कंपनीचा रुल बदलला होता म्हणुन नाराज होऊन, कंपनीचे थोडेसे नुकसान होणारी गोष्ट त्याला माहित होऊनही सांगितली नव्हती. दुसऱ्याने मात्र सांगितली होती.
आता दोघांपैकी तुम्ही कुणाला निवडाल? >>

नक्कीच त्याला निवडणार ज्याने सांगितली. येथे हे लक्षात घ्यायला हवं की मी माझी कंपनी आहे त्यामुळे मत हे कंपनीच्याच पारड्यात पडणार.
(Biased choice).

पण जर मी दुसरी कंपनी म्हणून विचार न करता, तटस्थपणे विचार केला तर न सांगणारा हा व्यावहारिक/ practical आहे, तो चुकीचा नाही; त्याचा कल हा, तो ज्या बाजूला आहे त्याचं नुकसान होऊ न देणं ह्याकडे असतो, असा निष्कर्ष काढू शकतो. ही क्वालिटी देखील फायद्याची ठरते.

भारतात तरी बरेच नियम पॉलिसीज एम्प्लॉयर च्या बाजूचे असतात.मी नीट वाचून खात्री करेन, पण ऑफर लेटर मध्ये 'एच आर पॉलिसीज आर सब्जेक्ट टू चेंज' असेही लिहिलेले असते आणि त्यावर आपण सही करतो.थोडक्यात 'आम्ही केव्हाही काहीही बदलू, तुम्ही एकदा आत आलात की हो म्हणा'.

Anu:
अगदी सहमत.
हरकत बदल करण्याला नाही तर केलेला बदल लपवण्याला आहे.

उदा. एखाद्या कंपनीचा नोटीस पिरियड 30 दिवसांचा आहे. आणि अचानक एखाद्याच्या शेवटच्या आठवड्यात सांगितलं की पॉलिसी change झाली आहे. आता तुम्हाला 90 दिवसांचा notice period serve करावा लागेल कारण आमच्याकडे तुम्ही सही केलेला कागद आहे then हे बरोबर नाही.
पण हेच जर कंपनीने सांगितलं की 1 मे पासून पॉलिसी बदलतिये आणि revised duration 90days असेल तर नक्कीच अशा बदलाला हरकत नाही.

मी तो नंबर्स मधला कॅच लक्षात आणून दिला तर ह्या कंपनीचे 5 लक्ष रुपये प्रति वर्ष वाचू शकतात.
पण मी गप्प रहायचा विचार करतोय. काय करू?

फसेजु, गप्प रहायचा 'विचार' का करताय ; 'काय करू?' असा सल्ला मागावासा का वाटला. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधा काय करायचे त्याचेही उत्तर साथोसाथ मिळेल.

डॉन 2 मध्ये डॉन बोललाय कुछ काम करने जरुरी होते है उनमे फायदा या नुकसान देखा नही जाता. आयुष्यात आपलं काहीच नसतं. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा एक ठराविक कालावधी आपल्या अकाऊंट मध्ये क्रेडिट होतो. प्रत्येक क्षणी आपण ते क्रेडिट खर्च करत असतो. त्यामुळेच प्रत्येक क्षणी आपल्याला आनंद कसा मिळेल हे बघायचं. कोणाला काय वाटेल आणि कोण काय विचार करेल याचा विचार आपण नाही करायचा.

हर्पेन, +१
ज्या चांगुलपणामुळे आपले काहीच नुकसान नाही आणि दुसऱ्या कोणाचे तरी भले आहे तो चांगुलपणा दाखवताना बाकी कसलाही विचार करू नये. जी माणसे असा चांगुलपणा दाखवू शकतात ती अधिक compassionate आणि सहृदयी असतात. Career/professionalism वगैरे गोष्टी secondary आहेत. At the end of the day तुमच्या हातून सहज शक्य अशी एक चांगली गोष्ट घडली नाही तर it's your loss nobody else's! You lost an opportunity to become a better person.

मीच म्हणतोय की $7k ने कंपनीला नाही फरक पडणार.
मी म्हणत नाहीये की माझ्यामुळे त्यांचं अडेल.
प्रश्न इतकाच आहे की तिथे कॅच आहे असं सांगितलं तर कोणीतरी शोधून काढेल पण गप्प राहिलो तर अधिकची renewation ची ऑर्डर जाईल.
बाकी पॉलिसी change झाल्यानंतर transparent न राहणं ही मला पर्सनल बाब नाही वाटत.
इथे दोन्ही गोष्टी professional आहेत.
If there's exchange in profession, it should be give and take.

इथे दोन्ही कडून give and take हा gratitude मध्ये मोडणारा आहे.
जर कंपनी अशा पद्धतीने मनमानी पणा दाखवू शकते, तर त्यांनी त्याबदल्यात gratitude ची अपेक्षा न ठेवणे चांगलेच.

शुभेच्छांबद्दल धन्यवाद, आपल्या मताचा आदर आहे.>>> एवढे सगळे क्लिअर आहे तर प्रश्न का पडलाय तुम्हाला काय करूं म्हणून ?

एकच गोष्ट दोन बाजूंनी योग्य वाटू शकते. स्वभावाप्रमाणे फरक पडत असेल. अशा वेळी जर वेगवेगळी मतं आहेत हे माहीत असेल तर सुवर्णमध्य निघतो का हे पहावे.
कंपनी सहकार्य करत नाही म्हणून मी का माझे नसलेले कर्तव्य करावे ही एक बाजू आणि सांगून मोकळे व्हावे ही दुसरी.
सुम - कंपनीला विचारावे मी जर जाता जाता तुमचे ५ लाख रुपये वाचवले तर तुम्ही माझी अडचण दूर कराल का हे सरळसरळ विचारावे. सकारात्मक उत्तर आले तर प्रश्नच नाही.
नकार मिळाला तर तुम्हाला योग्य वाटेल ते करावे. गिल्ट राहणार नाही.

Do the right thing even when no one is looking. Its called integrity and it defines our character.
तुम्ही ग्लिच ऊजेडात आणल्याने कंपनीचे जे पैसे वाचणार आहेत त्यातले फ्रॅक्शन का असेना, वाढीव, पगार,पर्क्स, बोनस रूपाने तुमच्यासारख्या दुसर्‍या एम्प्लॉयीजच्या हातात येणार आहेत. तुम्हाला जे वाटते की तुम्ही कंपनीला धडा शिकवत आहात तर तुमच्यापुरती कंपनी म्हणजे तुमचीच सध्याची को-वर्क्रर मित्रमंडळी नाहीत का?

बरोबर

Never play with money , otherwise money plays with you.

दोन मोबाईल बाळगायला त्रास झाला तरी बाळगायचे
डबल सिम घालून वापरायचे , की 3 सिम होते ?

बाकी नोकरी सोडताना सिम कार्ड परत द्यायचे ही पॉलिसी नक्की होती का? अशी काही लिखित पॉलिसी असेल आणि लीगल लोकं ती अप्रुव्ह करतील? नक्की? मला तरी वाटत नाही.
पायंडा असेल तो फारतर. जो पॉलिसी करुन बदलला.
>>do you want advice or validation? >> +१
इंटेग्रिटी च्या मुद्द्याशीही सहमत.
मुळात नंबर बदलणं हे रॉकेट सायन्स का वाटतंय हेच मला मुद्द्लात समजत नाहिये. असो.

काय करावे ह्याबद्दल अजूनही

काय करावे ह्याबद्दल अजूनही संभ्रम असल्यास, ह्याच विषयावरून 'काय करू' असा प्रश्न तुमच्या लहान भावाने तुम्हाला विचारला असता तर तुम्ही त्याला काय ऊत्तर दिले असते असा ही विचार करून, तपासून पहा.
प्रश्न विचारणार्‍याने advice (काय करू?) वा validation (हे करणे योग्य आहे ना?) असे काहीही मागितले तरी मित्रत्वाच्या नात्याने ऊत्तर देणार्‍याची एक जनरल फिड्युशिअरी ड्युटी असते ती म्हणजे स्प्ष्ट सांगणे की 'Do the right thing'

सर्वांना धन्यवाद
खूप छान मंथन केले आपण सर्वांनी आणि मला खूप मदत झाली सगळ्यांची.

बहुतेक सर्वांचा कल हा त्यांनी काय केले ह्यापेक्षा आपला चांगुलपणा का सोडावा ह्याकडे आहे.

रानभुली ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सुवर्णमध्य काढायचं ठरवलं आहे.
Agree झाली तर उत्तम.
जरी noc द्यायला legal team agree नाही झाली तर चूक कशामुळे आहे हे न सांगता, फक्त त्या नंबर्स मध्ये चूक आहे, शोधून तुमचे पैसे वाचवा असं सांगायचं ठरवलं आहे. इतक्या clue ने देखील वाचतील पैसे त्यांचे, चुकीची ऑर्डर नाही जाणार.

Exit interview मध्ये त्यांना निक्षून सांगणार आहे की पॉलिसी change announce करा लवकरात लवकर.
ज्यांच्याकडे सिंगल सिम मोबाईल आहेत आणि जे वर्षानुवर्षे तेच सिम वापरत आहेत त्यांचं अजून नुकसान होणार नाही.

आपणा सर्वांना शुभेच्छा!

रानभुली आणि फलक से जुदा - अभिनंदन. एकाचे उत्तम उपाय सुचविल्याबद्दल.
तर दुसर्‍या व्यक्तीचे अभिनंदन, ऐकल्याबद्दल.

मस्त उपाय सापडला.

लिटरली त्रिशूल मधली केस झाली "मुझसे बात न करके आप का पाँच लाख का नुकसान हो सकता है" हे तुमचे जे कोणी आर के गुप्ता असतील त्यांना जाउन खडसावायचे Happy

तुमचा निर्णय...
पण गेले उडत attitude ने तुम्हाला मनःशांती मिळाली असती हे मात्र नक्की Happy

Pages