फळं व भाज्या कशा निवडाव्यात व कशा टिकवाव्यात ?

Submitted by अस्मिता. on 10 March, 2021 - 12:21

१. कशा बघून निवडून घ्याव्यात... ही परीक्षा !
२. स्पर्श कसा लागावा. रंग कसा असावा.
३. ठेवताना कुठे ठेवावे... फ्रिजमध्ये/बाहेर.
४. विशिष्ट स्टोरेज कंटेनर वापरता का.. पालेभाज्या अधिक कशा टिकवाव्यात. वेगवेगळ्या ऋतूंंमध्ये हे व्यवस्थापन कसे करावे.
५. चिरून ठेवाव्यात का?? कुठल्या चिरल्या तर चालतात, कुठल्या नाही.
६. कुठले कशासोबत ठेवू नये.
७. कुठले लगेच खावे.
याबद्दल व या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी हा धागा. तुमच्या कल्पना सांगा व प्रश्न असतील तर विचारा. हा सगळ्यांचाच धागा आहे.

कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी।।

लसूण, मिरच्या, कोथिंबीर। अवघा झाला माझा हरी।।
करा सुरू!
सगळ्यांना धन्यवाद. Happy
फोटो...साभार: कम्युनिटी जेनिक्रेग (admin चालत नसेल तर सुचवणे काढण्यात येईल)
*पर्यावरण व आपल्या दृष्टीने कमीत कमी अपव्यय व्हावा हे
ध्येय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संत्री मोसंबी हातात घेऊन तोलून बघावीत. जड लागतात ती घ्यायची, हलकी म्हणजे नो रस, आत नुसते चिपाड..

हापूस आंब्याचे काही खरे नाही, रंग कितीही केशरी असला तरी आंब्याला चव नसते हा अनुभव घेतलाय. बहुतेक या मार्केटत फसवणूक जास्त होते. चांगला आंबा निवडण्यापेक्षा चांगला ओळखीचा विक्रेता बघून त्याच्याकडून घ्यावा हे बरे.

एकेक लिंबू कागदात नीट गुंडाळून मग सगळी लिंबं प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये खूप दिवस ताजी राहतात. हे करून पाहिलंय.

Pages