फळं व भाज्या कशा निवडाव्यात व कशा टिकवाव्यात ?

Submitted by अस्मिता. on 10 March, 2021 - 12:21

१. कशा बघून निवडून घ्याव्यात... ही परीक्षा !
२. स्पर्श कसा लागावा. रंग कसा असावा.
३. ठेवताना कुठे ठेवावे... फ्रिजमध्ये/बाहेर.
४. विशिष्ट स्टोरेज कंटेनर वापरता का.. पालेभाज्या अधिक कशा टिकवाव्यात. वेगवेगळ्या ऋतूंंमध्ये हे व्यवस्थापन कसे करावे.
५. चिरून ठेवाव्यात का?? कुठल्या चिरल्या तर चालतात, कुठल्या नाही.
६. कुठले कशासोबत ठेवू नये.
७. कुठले लगेच खावे.
याबद्दल व या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी हा धागा. तुमच्या कल्पना सांगा व प्रश्न असतील तर विचारा. हा सगळ्यांचाच धागा आहे.

कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी।।

लसूण, मिरच्या, कोथिंबीर। अवघा झाला माझा हरी।।
करा सुरू!
सगळ्यांना धन्यवाद. Happy
फोटो...साभार: कम्युनिटी जेनिक्रेग (admin चालत नसेल तर सुचवणे काढण्यात येईल)
*पर्यावरण व आपल्या दृष्टीने कमीत कमी अपव्यय व्हावा हे
ध्येय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे पटेल मधे (काही बायका) गवार सुद्धा एक-एक निवडून घेताना पाहिले आहे.
माझ्याकडे फ्रिझरमधे ठेऊनही कडीपत्ता काळा पडतो.

कढिलिंब म्हणजे कढिपत्ता आणल्यावर पानं वेगळी करून धुवून चाळणीवर निथळून घ्यायचा. कोरडा झाला की कमी तेलावर किंचित मीठ आणि हळद घालून कुरकुरीत होईपर्यंत परतायचा, घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायचा. फ्रीजबाहेरही टिकतो खूप.

जास्तकाळ टिकणाऱया भाज्या जसे की गाजर, कोबी फ्रिजमधे तळाच्या कप्प्यात ठेवल्या तरी टिकतात. >>> माझ्याकडे गाजर फ्रीजमध्ये खराब होतं नाही पण दोन दिवसात लगेच मऊ पडतं.

मी मागचे सहा वर्षांपासून टप्परवेअरचे फ्रिजमेट प्लास्टिक डब्ब्यांचा सेट वापरतेय...त्याला दोन डोळे असतात...पालेभाज्या, कडिपत्ता, वाटाणा ठेवला कि दोन्ही डोळे ओपन ठेवायचे...गाजर,बीन्स अशा भाज्या ठेवल्या कि एक डोळा बंद, एक उघडा ठेवायचा.... भेंडी असेल तर दोन्ही बंद...डब्ब्यांचा बेस पण झीगझैग आहे..पाणी साठून भाज्या खराब होत नाहीत... पंधरा दिवस कन्फर्म टिकतात... गाजर तर महिनाभर ताजे राहते...

https://www.amazon.in/gp/product/B07MZ84RK3/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o...
या पिशव्यांचा आम्हाला चांगला उपयोग होतो. मुख्य म्हणजे किती पिशव्या धुवून घडी करुन आहेत यावरुन कोणती कोणती भाजी संपली हे फ्रीज न उघडता कळतं.

चांगला धागा अस्मिता,
प्रतिसादातून छान माहिती मिळत आहे.
कुठेतरी वाचलं होतं बहुतेक माबोवरच की टोमॅटो फ्रीज मध्ये ठेऊ नये. ते का म्हणे. टोमॅटो तर आठ आठ दिवस छान टिकतात फ्रीजमध्ये. बाहेर ठेवले तर 2,3 दिवसात सम्पवावे लागतील.

बाहेर ठेवले तर 2,3 दिवसात सम्पवावे लागतील.>>>> मी टोमॅटो बाहेरच ठेवते..दहा दिवस चांगले राहतात.

मुख्य म्हणजे किती पिशव्या धुवून घडी करुन आहेत यावरुन कोणती कोणती भाजी संपली हे फ्रीज न उघडता कळतं.>>>>यापिशवीतली भाजी त्या पिशवीत असं काही होत नाही का तुमचं?

फ्रिजमेट प्लास्टिक डब्ब्यांचा सेट वापरतेय...त्याला दोन डोळे असतात..>>>>> माझ्याकडे बिनडोळ्यांचा सेट आहे.एकदा वाटाणे ठेवले होते त्यात .विचित्र वास आल्यामुळे वापरले नाहीत.आता फक्त खवलेले/किसलेले ओले खोबरे ठेवायला वापरते.

"यापिशवीतली भाजी त्या पिशवीत असं काही होत नाही का तुमचं?"

तसं करायचा मोह होतो घाईत पण टाळतो Happy
काहीवेळा त्या नावाची पिशवी नसलेल्या भाज्या असल्या की मग पालक च्या पिशवीत करडई, किंवा फ्रेंच बीन्स च्या पिशवीत क्लस्टर बिन उर्फ गवार इतके होते.
धुतलेल्या किती पिशव्या बाहेर आहेत हे क्विक इंडिकेटर म्हणून उपयोगी पडते.खूप मोठा गठ्ठा बाहेर आहे म्हणजे फ्रीज रिकामा, त्यात फक्त दूध आणि पनीर आहे(मग डाळकांदा किंवा निशा मधूलिका दमालू किंवा पनीर भुर्जी.)
भाजी सुपरडेली वरून मागवली जाते, त्या दिवशी बेस्ट ऑफर्स वगैरे बघून जरा.

@अनु - खूप टापटिपीच्या आहात तुम्ही. आमचं म्हणजे तेल अगदी कडक तापलेलं असताना, मोहरीची शोधाशोध करायची. सगळं ऐनवेळेला कसंबसं.

नाही अजिबात नाही Happy
कधीकधी ऑर्डर्ड, व्हाईट बोर्ड वर दुसर्‍या दिवशीचा ३ जेवण मेनू तर कधीकधी अगदी घरात कांदे बटाटे पण नसतात. पण जमेल तेव्हा ऑर्डर्ड राहण्याचा प्रयत्न.

20210311_185307.jpg
अशी भेंडी असते दुकानात घ्यायला गेले की आमच्याकडे.
अर्ध्यावर शेंडे पिचकलेले असतात. आज त्यातुन न तोडता आणल्या अंदाजे.

लॉकडाऊन मध्ये लागलेला शोध. हाताशी खूप वेळ असल्याने मी जुन्या लिननच्या शुभ्र शर्टाच्या लहान लहान पिशव्या शिवल्या. हिरव्या पालेभाज्या निवडून, खूप ओल्या असतील तर वाळवून / हिरव्या मिरच्या देठं काढून त्यात ठेवायच्या. फ्रिजमध्ये एक ड्रावर ह्याचाच केलाय. पिशव्यांमुळे पाणी राहात नाही आणि भाज्या अतिशय छान टिकतात. कढिपत्ता अनेकदा वाळतो पण चव टिकते.

Mi_anu कापडी पिशवीत ठेवलेल्या भाज्या सुकत नाहीत का? मी कापडात गुंडाळून प्लास्टिक डब्यात भाजी ठेवली तरच ती ताजी राहते. नुसती कापडात गुंडाळून ठेवली तर सुकते.

अनु - खूप टापटिपीच्या आहात तुम्ही. .... Nakkich. किंवा त्यांचा एकटीचा हात असेल हे सर्व करताना.एकहाती असेल तर बरे पडते.

नाही वाळलेल्या अजून, बहुतेक लगेच संपतातच 3 दिवसात
(माझ्या टापटीपी बद्दल इथे लिहिलेलं घरी दाखवल्यास लोक लोळून हसतील Happy )
एकटीची मॅनेजमेंट त्यामुळे गोंधळ कमी हेही खरे.

छान उपयुक्त माहिती!
कोबी घेताना हलका गड्डा घ्यावा तो कोवळा असतो. जड गड्डा म्हणजे जून कोबी.
भरताचं वांगं घेताना खालच्या बाजूला जर एक उभी रेघ असेल तर ते घेऊ नये. त्यात जास्त बिया असतात. ज्यांना खालच्या बाजूला एक गोलाकार चिन्ह असतील ती वांगी घ्यावीत.

ओह्ह.. भरताच्या वांग्याचं हे माहित न्हवतं.
भरताचं वांगंही मोठं असलं तरी वजनाला हलकं/ पोकळ लागलं की त्यात बिया नसतात असं कुणीतरी (मला वाटतं सशलने) सांगितलेलं. बाकी फार ऑर्गॅनिकच्या वाट्याला जात नसलो तरी भरताची वांगी ऑर्गॅनिक घेतली की बिया कमी असतात/ किंवा नसतातच असा अनुभव आहे. खखोदेजा.

Pages