फळं व भाज्या कशा निवडाव्यात व कशा टिकवाव्यात ?

Submitted by अस्मिता. on 10 March, 2021 - 12:21

१. कशा बघून निवडून घ्याव्यात... ही परीक्षा !
२. स्पर्श कसा लागावा. रंग कसा असावा.
३. ठेवताना कुठे ठेवावे... फ्रिजमध्ये/बाहेर.
४. विशिष्ट स्टोरेज कंटेनर वापरता का.. पालेभाज्या अधिक कशा टिकवाव्यात. वेगवेगळ्या ऋतूंंमध्ये हे व्यवस्थापन कसे करावे.
५. चिरून ठेवाव्यात का?? कुठल्या चिरल्या तर चालतात, कुठल्या नाही.
६. कुठले कशासोबत ठेवू नये.
७. कुठले लगेच खावे.
याबद्दल व या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी हा धागा. तुमच्या कल्पना सांगा व प्रश्न असतील तर विचारा. हा सगळ्यांचाच धागा आहे.

कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी।।

लसूण, मिरच्या, कोथिंबीर। अवघा झाला माझा हरी।।
करा सुरू!
सगळ्यांना धन्यवाद. Happy
फोटो...साभार: कम्युनिटी जेनिक्रेग (admin चालत नसेल तर सुचवणे काढण्यात येईल)
*पर्यावरण व आपल्या दृष्टीने कमीत कमी अपव्यय व्हावा हे
ध्येय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव, गोलाकार चिन्ह असेल तर ते male वांगं असतं म्हणून बिया कमी हे एका शेफ जॉनच्या व्हिडिओत सांगितलं होतं त्याने.

या चिन्हांचे फोटो दाखवेल का कोणी?
मला दर वेळी भरताला (म्हणजे भरीत ला) बिया मिळून वैताग येतो. त्यात आधी मला वाटायचं की फिक्या हिरव्यी वांग्यात जास्त बिया आणि जांभळ्यात कमी. पण तसं काही नाही.

मला ती चिन्हं बघितल्यासारखी वाटतायत, पण मला बहुतेक ते वांगं कुठे तरी क्रेटमधे वगैरे ठेवताना घासलं गेलंय असं वाटलं असणार. पांढरट खुणा असतात का?

वांग वजनाला हलक म्हणजे हमखास शिळ आणि गर कमी असलेल असत असा माझा अनुभव आहे. Sad
अर्ध्यावर शेंडे पिचकलेले असतात. आज त्यातुन न तोडता आणल्या अंदाजे.>>> Happy
ओक्सो चे डबे हे अस्मिता:
https://www.amazon.com/OXO-Grips-GreenSaver-Keeper-Large/dp/B073TZ6RP6/r...

https://www.amazon.in/gp/product/B07MZ84RK3/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o...
या पिशव्यांचा आम्हाला चांगला उपयोग होतो. मुख्य म्हणजे किती पिशव्या धुवून घडी करुन आहेत यावरुन कोणती कोणती भाजी संपली हे फ्रीज न उघडता कळतं.>>>
अनु, मस्त आहेत बॅग्ज एकदम. आई साठी ऑर्डर करते. इथे पण तस काही मिळत का बघते.

https://www.amazon.com/Now-Designs-Produce-Reusable-Unbleached/dp/B07LD1...
हे बघा सीमा. चंची टाइप पिशव्या दिसताहेत.
तुम मुझे डब्बे दो मै तुम्हे पिशव्या दुंगा !
धन्यवाद सीमंतिनी. तिने लिंक दिली आहे.

हे डबे स्टॉबेरी , रॉस्बेरी आणि द्राक्षांसाठी लाईफ सेव्हर ठरलेत. स्ट्रॉबेरी साठी तर अगदी मस्ट आहेत.
रबरमेड ब्रँड
strawberry.JPG

किती क्युट आहेत ह्या पिशव्या, अनु >>> मम.

@अनु - खूप टापटिपीच्या आहात तुम्ही. आमचं म्हणजे तेल अगदी कडक तापलेलं असताना, मोहरीची शोधाशोध करायची. सगळं ऐनवेळेला कसंबसं. >>>अगदी अगदी. मी तर मिसळणाचा डबा काढते तेल तापत ठेऊन आणि लाखात येतं एकतरी आयटेम संपलेला असतो त्यातला, कधी मोहरी, कधी जिरं, कधी हिंग, कधी हळद, कधी तिखट. मग ते काढायची धावाधाव तोपर्यंत gas बंद करणे. माझा लहान डबा असल्याने त्यातल्या वाट्या पण नैवद्याच्या आहेत अगदी, मीच तयार केलाय तो डबा आणि मला आवडतो म्हणून बदलत नाही.

माझ्याकडे प्लास्टिकचे डबे आहेत... त्यात खाली पेपर टाकून भाजी ठेवते आणि वर पुन्हा एक पेपर ठेवते... छान टिकते भाजी... पालेभाजी जास्त दिवस ठेवायची असेल तर पेपर बदलावे लागतात.. आणि पेपर वर्तमानपत्रापेक्षा किंचित जाड वापरावा म्हणजे जास्त पाणी शोषून घेतो..

पालेभाज्या, शेंडे काढलेल्या कुठल्याही प्रकारच्या शेंगा, देठं काढलेल्या मिरच्या, भेंडी, बीट रूट, आलं, लिंबू ,कढीलिंब हे सारं मी विविध प्रकारच्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये घालून फ्रिज मध्ये ठेवते. अर्थात पालेभाज्या निवडूनच. पेपर वगैरे काहीही घालत नाही. आठवडाभर तरी सर्व भाज्या छान राहतात. डबे कुठलेही- अगदी श्रीखंडाचे , त्यातल्या त्यात बरे प्लास्टिकचे कसेही चालतात.
टोमॅटो ,संत्री ,सफरचंद ,भोपळा, कोबी ,फ्लॉवर यासाठी जाळीच्या पिशव्या घेतल्या आहे.

बर्‍याच देशात केळ्याचा घडाला शेंड्यावर प्लॅस्टीक टेप लावून विकतात. ती काढली नाही तर १० दिवस घड टिकतो. (१ घडात साधारण ८-१० केळी असतात. कमी असल्यास टिकतील १० दिवस पण संपतील लवकर Happy )
अधिक माहितीसाठी : https://www.phillymag.com/be-well-philly/2013/07/29/bananas-turning-brow...

मी आलं किसून काचेच्या बरणीत ठेवते... 2-3 महिने राहतं आणि महत्त्वाचं म्हणजे ओलसर राहतं... लवकर सुकत नाही.. मिरच्यांचे देठं काढून प्लास्टिक डब्यात पेपर टाकून ठेवल्या तर महिना - 2 महिने राहतात.. टमाटे फ्रीजच्या वरच्या ट्रे मध्ये डायरेक्ट ठेवते...

माझी नणंद आलं किसून बर्फाच्या ट्रेमध्ये पाण्यात घालून फ्रीझरमध्ये ठेवते.० टिकतं म्हणे खूप दिवस.
आमटीत वगैरे, बर्फाची क्युब टाकत असेल उकळताना.

मी आठवड्यातून एकदा किंवा बर्याचदा दोनदा ताज्या भाज्या आणते...जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या हेल्दी असतात का जरी ताज्या दिसत असल्या तरी ??

मिरच्यांचे देठं काढून प्लास्टिक डब्यात पेपर टाकून ठेवल्या तर महिना - ......मीही हेच करते मात्र एवढ्या दिवसाला पुरतील इतक्या मिरच्या आणत नाही.
पालेभाज्या किंवा इतर भाज्या कागदात गुंडाळून प्लास्टिक बॅग मध्ये ठेवल्या की छान राहतात.टोमॅटो बाहेरच ठेवते.

मी आठवड्यातून एकदा किंवा बर्याचदा दोनदा ताज्या भाज्या आणते...>>> मी सुद्धा. माझ्या घराजवळच देशी दुकाने असल्याने मला ते शक्यही आहे. पण जसे कोविड सुरू झाले तसे सारखे बाहेर जाणे टाळते. आता २०-२२ दिवसातून एकदा जाते. त्यामुळे भाजीपाला व्यवस्थापण वाढले आहे. शीतकपाट पूर्ण रिकामे झाल्याशिवाय नवीन काही आणत नाही. पुढच्या दोन दिवसाचा मेनू आधीच ठरलेला असतो. आला कंटाळा आणि केली ॲार्डर हे बंद झाले आहे. Happy

माझा स्वयंपाक घराशी जास्त संबंध नाही येत पण दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात जेव्हा मम्मी गावी गेली होती तेव्हा मी रविवारी आठवड्याची भाजी आणून स्वच्छ करून हवाबंद डब्यात भरून ठेवायचे अगदी पालेभाज्या सुद्धा नीट निवडून पिशवीत भरुन ठेवायचे, तर संफायचे तात्पर्य हे की मला वाटते फ्रीजमध्ये आढवडाभर सगळ्याच भाज्या नीट टिकत असाव्यात मी तर डबाभरून कांदा पण चिरून ठेवायचे जे चुकीचे असले तरी सोयीचे होते, सकाळचा खूप वेळ वाचायचा

माझी एक मैत्रिण सुद्धा कांदा चिरून ठेवते. पण खरेच किती वेळ लागतो कांदा चिरायला? कढई तापायला ठेवली तर ती तापेपर्यंत कांदा कापून होतो. तो कांदा तेलात छान भाजेपर्यंत टोमॅटो चिरून होतो/घुवून ठेवलेली भाजी चिरून होते/वांगी-बटाटा चिरून होतो. त्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज पडत नाही.

मीही हेच करते मात्र एवढ्या दिवसाला पुरतील इतक्या मिरच्या आणत नाही.>>मी पण मोजकीच भाजी आणते... 8 किंवा 10 दिवसांची पण प्लॅस्टिक डब्यात पेपर टाकून भाजी ठेवली tr छान टिकते हा सांगण्याचा उद्देश होता Happy

उपयुक्त धागा . वाचतेय.
कडीपत्ता साफ करून त्याची पाने काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास महिनाभर चांगली राहतात.
धुवून सुकवून ठेवल्यास हि उत्तम .

मी लिंबं आणतानाच थोडी हिरवट आणते, एक-दोन तयार. आणि सगळी घट्ट झाकणाच्या बरणीत फ्रिजमध्ये ठेवते. मस्त राहतात.

अगदी उपयुक्त धागा आहे हा.

कधीकधी ऑर्डर्ड, व्हाईट बोर्ड वर दुसर्‍या दिवशीचा ३ जेवण मेनू तर कधीकधी अगदी घरात कांदे बटाटे पण नसतात. पण जमेल तेव्हा ऑर्डर्ड राहण्याचा प्रयत्न.>>> याबाबतीत आपण जुडवा.

मी "मेगा बॅग्ज" (ब्रॅन्डनेम) वापरते. त्यात पालेभाज्या, मिरच्या कोथिंबीर वगैरे एकदम चांगली रहाते.

पण या सध्या पाचच बॅग्ज आहेत माझ्याकडे. आले लसूण वगैरे मी एकतर सेपरेट पेस्ट करुन काचेच्या बाटलीत भरुन ठेवते(शेजवान चटणी वगैरेच्या रिकाम्या बाटल्या) , थोडे आले तुकडे करुन स्टील/ टप्परच्या डब्यात ठेवते, लसूण सोलून तसच टप्पर/ स्टील डब्यात ठेवते थोडी.

कढीपत्त्याचा प्रॉब्लेम सोडवायला मी कुंडीत कढीपत्ता लावलाय Lol लागेल तेव्हढा रोजचा ताजा काढून वापरते.

सध्या संत्री मोसंबीचा मौसम नाहीये, पण ती कशी निवडावी?
बाकी केळी, पपई, खरबूज घेता येतो, कलिंगड तर एक फोड चिरूनच आपण घेतो
आंबा म्हणजे रंग आणि गाव बघून घेतात ना म्हणजे, राजापूर, रत्नागिरी etc

मी लिंबं आणल्यावर धुवून पुसून कोरडे करते...मग त्यावर तेलाचा पुसटसा हात लावून प्लास्टिकच्या डब्यात घालून बाहेरच ठेवते...साल कडक होत नाही आणि खराब पण होत नाही...या वातावरणात १०-१२ दिवस छान राहतात. थंडीच्या दिवसात अजून जास्त दिवस टिकतात..

Pages