फळं व भाज्या कशा निवडाव्यात व कशा टिकवाव्यात ?

Submitted by अस्मिता. on 10 March, 2021 - 12:21

१. कशा बघून निवडून घ्याव्यात... ही परीक्षा !
२. स्पर्श कसा लागावा. रंग कसा असावा.
३. ठेवताना कुठे ठेवावे... फ्रिजमध्ये/बाहेर.
४. विशिष्ट स्टोरेज कंटेनर वापरता का.. पालेभाज्या अधिक कशा टिकवाव्यात. वेगवेगळ्या ऋतूंंमध्ये हे व्यवस्थापन कसे करावे.
५. चिरून ठेवाव्यात का?? कुठल्या चिरल्या तर चालतात, कुठल्या नाही.
६. कुठले कशासोबत ठेवू नये.
७. कुठले लगेच खावे.
याबद्दल व या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी हा धागा. तुमच्या कल्पना सांगा व प्रश्न असतील तर विचारा. हा सगळ्यांचाच धागा आहे.

कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी।।

लसूण, मिरच्या, कोथिंबीर। अवघा झाला माझा हरी।।
करा सुरू!
सगळ्यांना धन्यवाद. Happy
फोटो...साभार: कम्युनिटी जेनिक्रेग (admin चालत नसेल तर सुचवणे काढण्यात येईल)
*पर्यावरण व आपल्या दृष्टीने कमीत कमी अपव्यय व्हावा हे
ध्येय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरबूज , टरबुज विकत घेताना तर कसे निवडावेत, म्हणजे लगेच अथवा एक दिवसानंतर खाता येईल आणि गोडसर असतील?

कोथिंबीर, मूळे कापून, न धुता, पेपर टॉवेलात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवली की बरेच बरेच दिवस टिकते.
मिर्च्यांचे देठ तोडुन धुवुन, मग झिप लॉकमध्ये घालून फ्रीझरमध्ये टाकावेत. महीनोंमहीने टिकते.

धागा उपयुक्त आहे.

भेंडी विकत घेताना भेंडीचे टोक मोडून पहायचे. टचकन तुटले म्हणजे भेंडी चांगली. गावी असेच निवडून घ्यायचो आम्ही.
मग मुंबईला असताना मात्र भाजीवाला लगेच ओरडायचा "ए भेंडी तोड रहा है क्या!!". त्याला मी म्हणायचो, काळजी नको करू, जी भेंडी तुटेल ती मी घेईन. पण ज्या भेंडीचे टोक तुटत नाही ते वाकडे व्हायचे म्हणुन भाजीवाले मनाई करायचे.
हैद्राबादला आलो, इथे मात्र टोक तोडून पाहून घेऊ देतात.
टोक न तोडता कशी निवडतात भेंडी?

खरबूज आता वास घेऊन घ्यायला जमायला लागलेय. पण कलिंगड कापून दाखवल्याशिवाय नाही जमत.
याच धाग्यावर विचारते, हल्ली खरबूज छोटे का मिळतात ? चार पाच वर्षांपूर्वीपर्यंत मोठे मिळत होते ना ?

टरबूज चा वास लगेच कळतो छान पिकलेला
कलिंगड वर हाताने मारून पाहिले की आतून एक थोडा पोकळ असल्याचा आवाज आला पाहिजे,म्हणजे तयार असते
गच्च भरलेला आवाज आला तर अजून तयार झालेलं नसतं

शेवग्याची शेंग अंगठ्या एवढ्या जाडी पेक्षा जाड घेऊ नये 'जून' असते . तसेच वरून थोडीही वाळलेली साल असेल तर शिळी असते,त्यात फारसा गर नसतो,शिजायला वेळ लागतो

शेवग्याचा नेहमी इश्यु होतो. कळतच नाही. अन मग न भरलेली, अति कवळी तरी आणली जाते नाहीतर जाडी आणि पोकळ. आणि येस एक मध्यम. तिन्ही प्रकार खरेदी केले जातात. लोल!
_______________
बरोबरे मानव, भेंडी टोक मोडूनच घ्यावी लागते. पण इथे मी ते धाडस करत नाही. आणि शिवाय वाईट म्हणजे चूकीचेही वाटते. मग नाजूक घेते.

भेंडी बाबत जसे वर लिहिलेय गवार बाबतीत बरोबर उलटे
म्हणजे एकाच हातात धरून अंगठ्याने वाकवली,अन पटकन तुटली तर 'जून' असते, म्हणजे बाजूच्या शिरा आणी बिया पटकन शिजत नाहीत आणि चवही कमी होते

वेलवर्गीय - कारलं, दोडके, घोसावळे, दुधी भोपळा , काकडी यातील कुठलीही भाजी घेताना सरळ घ्यावी
वाकडी,आत वळलेली असली की किडकी अन कडू असते

पडवळ मात्र कधीही कडू,किडके नसते
एकात 2 भाग केले की आत थोडी जरी कडक बी असेल तर खूप 'जून' असते
आत बी तयार झाली नसते, मऊ गराचा जरा जाळीसारखा भाग असतो ते पडवळ चविष्ट असते

तेजो खूपच माहितीपूर्ण प्रतिसाद...सगळेच ! आभार. Happy
माहितीत व चर्चेत भर घालणाऱ्या सर्वांचे आभार.

उपयुक्त धागा अस्मिता!
कार्ली घेताना जरा पांढुरकी कार्ली घेतली कि कमी कडू आणि कोवळी असतात. डार्क हिरवी असतील आणि जरा मऊ असतील तर पिकलेली असतात मग आतून लाल निघतात.

कांदा चिरून फ्रिजमधे ठेऊ नये. उघडा तर मुळीच ठेऊ नये.
मूळाच्या जागी लाल झालेला लेट्यूस सहसा घेऊ नये. स्टोअर करायचा झाल्यास प्रत्येक पान वेगळं करून पेपर टालने झाकून हवाबंद डब्यात ठेवावं..बराच वेळ क्रिस्पीनेस टिकून राहतो.
जास्तकाळ टिकणाऱया भाज्या जसे की गाजर, कोबी फ्रिजमधे तळाच्या कप्प्यात ठेवल्या तरी टिकतात.
कोखिंबीर, कडिपत्ता बाजारातून आणला कि साफ करून डब्यात भरताना तळाशी पेपर टाल व झाकण लावण्याआधी सुद्धा पेपरटालटठेऊन फ्रिजमधे ठेवावा.
वळलेली भेंडी सहसा घेऊ नये.

जसं आठवेल तसं लिहीते.

1. मेथी कोथिंबीर, पालक पेंडी जिथे बांधलेले असते तिथून थोडं पुढे देटाच्या बाजूला कापावी, म्हणजे निवडताना जास्त त्रास होतं नाही. आणि तसेच थोडा वेळ पसरून ठेवावी, पाणी मारलेले सुकून जाई पर्यंत.आणि मग पेपर टॉवेल मध्ये गुंडाळून ठेवावी.

2. आलं एकदम आणून 2 तास पाण्यात घालून स्वच्छ धुवून, इंचा इंचाचे तुकडे करून, खराब भाग काढून टाकावा, अजून दिवसभर सावलीमध्ये सुकवावे. मग सुती कपड्यात गुंडाळून airtight container मध्ये ठेवावे. 2 महिने काही होतं नाही

टरबूजचा वास लगेच कळतो छान पिकलेला+++1 खरबूज म्हणायचे आहे काय? Muskmelon?

टरबूज म्हणजे कलिंगड म्हणतात बुवा.. areawise वेगवेगळे म्हणतातं Proud Proud Proud

मिर्च्यांचे देठ तोडुन धुवुन, मग झिप लॉकमध्ये घालून फ्रीझरमध्ये टाकावेत. महीनोंमहीने टिकते. +++1 मी असेच करते. झिपलॉक ऐवजी सुती कपड्यात गुंडाळून airtight container मध्ये ठेवते. जास्तीचा पाणी सुती कपड्यामुळे शोषला जातं.

कढीपत्ता जास्त काळ टिकवण्यासाठी काही टिप असली तर प्लीज सांगा कोणीतरी. इथे रेग्युलरली चांगला, ताजा कढीपत्ता मिळत नाही. मग जेव्हा मिळेल तेव्हा जास्तीचा आणून साठवता आला तर बरं पडेल मला.

भेंडी विकत घेताना भेंडीचे टोक मोडून पहायचे. टचकन तुटले म्हणजे भेंडी चांगली. गावी असेच निवडून घ्यायचो आम्ही.
मग मुंबईला असताना मात्र भाजीवाला लगेच ओरडायचा "ए भेंडी तोड रहा है क्या!!". त्याला मी म्हणायचो, काळजी नको करू, जी भेंडी तुटेल ती मी घेईन. पण ज्या भेंडीचे टोक तुटत नाही ते वाकडे व्हायचे म्हणुन भाजीवाले मनाई करायचे.
हैद्राबादला आलो, इथे मात्र टोक तोडून पाहून घेऊ देतात.
टोक न तोडता कशी निवडतात भेंडी?>>>
अत्यंत राग येतो मला भेंडी तोडणार्‍या लोकांचा. :रागः भेंडी तोडून त्याच ढिगात टाकून देतात. आणि देठ काळे पडते आणि भेंडी लवकरच वाया जाते. देठ तुटले नाही तरी भेंडी कोवळी आणि चांगली असु शकते.
मानव तुमची अशी पोस्ट बघून खुप आस्चर्य वाटले. पुढच्यावेळी दुकानात तुम्ही दिसला कि अमानवीय धाग्यावऋन कुणाला तरी पाठविते सगळे देठ परत जोडायला. LOL.
दिवा घ्या. तुमच्या इतर पोस्टी एकदम छान असतात .

कोथिंबीर, पुदिना ठेवायला ऑक्सोचे डबे वापरते. खाली पाणि घालाय्च आणि देठ त्या पाण्यात बुडतात. छान आहेत ते डबे.
द्राक्षे देठ काढून पुसुन ,कोरडी करुन डब्यात घालून ठेवते. लवकर संपतात कारण पटकन उचलून खायला बरे पडते. मोठी ज्युसची मोसंबी वरच ठेवते.

उपयुक्त धागा अस्मिता! >>+१
लोक मोडून भेंडी घेतात पण ती मोडली न गेलेली, मुरगळलेली भेंडी कोणीच घेत नाही. वाया जाते. मी दिसायला ताजी, स्पर्शाला मुलायम(काटेरी नसलेली) पण करकरीत भेंडी घेते. चांगली निघते.
शेवग्याची शेंग अंगठ्या एवढ्या जाडी पेक्षा जाड घेऊ नये 'जून' असते >>+१ चांगली मिळाली कि मी जास्त घेते, धूवून थोडी साल काढून, तुकडे करून झीपलॅाक करून फ्रिझर मधे ठेवते. शेवग्याचा पालाही धुवून, कोरडा करून, खुडून डब्यात भरून फ्रिझर मधे ठेवते. वरणात/आमटीत घालून खायला आवडते.
आलेही धुवुन त्याचे मोठे तुकडे फ्रिझर मधे ठेवते. आयत्यावेळी काढून सरळ किसनीवर हवे तेव्हढे किसून लगेच परत फ्रिझर मधे ठेवते.

okra.jpg (साभारः माझेच, स्वतः काढलाय फोटो)
अशी ताजी भेंडी असली तरी लोकं मोडून घेतात. शेवटी दुकानदाराने पाटी लावली. मराठीत समजणार नाही म्हणून चूकीच्या इंग्रजीत लावली. सबब हिरवी, मुलायम, न मोडता भेंडी घ्यावी.
अव्हकाडो तपकिरी देठाचा (देठाचा खड्डा) असलेला घ्यावा.

तेलूगू लोक मला नेहेमी हरवतात... त्यांचा भेंडी निवडण्याचा वेग बघून घाबरंघाबरं होतं मला... मागे माझं पिशवीच तोंड निघेपर्यंत सगळ्या ताज्या संपल्या.
सबब हिरवी, मुलायम, न मोडता भेंडी घ्यावी. +1

ऑक्सोचे डबे  म्हणजे कुठले सीमा.
मिर्च्यांचे देठ तोडुन धुवुन, मग झिप लॉकमध्ये घालून फ्रीझरमध्ये टाकावेत. महीनोंमहीने टिकते. +++१
माझ्या कधी टिकतात कधी काळ्या पडतात.

भेंडी निवडायची म्हणजे?

भाजी करायच्या आधी शेंडा बुडखा उडवून चकत्या करणे ह्याला निवडणं म्हणताय का?

Pages