छानसे ऐकण्या\पाहण्या\ नोंद घेण्या जोगे

Submitted by रानभुली on 10 March, 2021 - 02:23

आपल्याला एखादे गाणे आवडते, एखादा छानसा वेगळा पण offbeat व्हिडिओ आवडतो. सराउंड साउंड रेकॉर्डिंगचे 8D ते ९६ D अवतार चकित करतात. एखादे चित्र. क्राफ्ट अथवा रंजक माहिती असे वाटेल ते इथे समान आवड असलेल्यांसाठी शेअर करूयात.
लिंक कॉपी पेस्ट करण्याएवजी सर्च स्ट्रींग दिली तर उत्तम.
वाहत्या पानाचा उपयोग माबोकर खूपच सुंदर करतात. एखादी लिंक वाहून गेली तरी पुन्हा शेअर करता येईलच की, त्यात काय! Happy
( उत्तम व्हिडिओज. चित्रपट, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स असे धागे आधीच आहेत. संबंधित पोस्टसाठी त्यांचा वापर करावा)

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युट्युब लिंक इथे द्यायला परवानगी आहे का ते अ‍ॅडमिन लाविचारून घ्या मॅडम कारण इथला वाचक निघून जातो ना साइटवरून लिंक क्लिक केली की. उत्तम चित्रित केलेले व्हि डो असा बाफ आहे .

अमा
ठीके. व्हिडिओ हा शब्द हटवते. आभार.
नेहमीच्या धाग्यावर आपण लिंक देतो त्या एकत्र इथे राहतील. अ आणि सीन्स अशा धाग्यावर यूट्युबच्या लिंक्स आहेत.
इथे ते नकोच आहे।
ताल चं गाणं ८ डी इफेक्ट मध्ये आहे हे शेअर केले तरी चालेल. हा वाहता धागा आहे. वाहून जाते.

>>ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका.<< मला चक्कर येते हे ऐकुन... Happy

>>ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका.
>>>>>
मला वाटले हेडफोन खराब झाला ,मग कमेंट्स वाचल्यावर समजले

ताल मधले हे गाणे ।8D surround sound ।हेडफोन लावून आणि डोळे बंद करूनच ऐका. >>> अतिशय सुंदर अनुभव! हे गाणंही माझं प्रचंड आवडतं आहे त्यामुळे जास्त मजा आली.

हा वाहता धागा कशाला?? सगळे उडून जाईल ना >>> या जगात शाश्वत असे काहीच नाही. झाड सोडल्यानंतर धागा काय करायचा ?

या व्हिडीओतली गायिका उषा उत्थुप यांची मुलगी आहे असे म्हटले जाते. हे कन्फर्म नाही. पण तिने स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही आवाजात गायलेले गाणे आश्चर्यकारक आहे. कारण स्त्रियांच्या स्वरयंत्राची रचनाच अशी असते की पुरूष आवाजात गाणे कठीण असते. हे काहीतरी दैवी आहे असेच म्हणावे लागेल.
https://youtu.be/HYslC6K2rHw?t=25

अशा नोंदींसाठी बरेच धागे शोधले. हा धागा होता याचा पूर्ण विसर पडला होता. सध्या माझ्या फीड मधे खूप छान छान व्हिडीओज येत आहेत.
त्यातली एक रोचक घडामोड आहे युट्यूबवरची

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे १९६७ साली फिल्म्स डिवीजनने १५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या आणि आता २० वर्षे वय असलेल्या अनेकांची मुलाखत घेऊन भारताबद्दल काय वाटतं ?स्वतःच्या भविष्याबद्दल, देशाबद्दल काय वाटतं या थीमवर त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

यानंतर २०२२ साली ही फिल्म एका युट्यूबरने पाहिली. ज्यांची मुलाखत फिल्म्स डिवीजनने ऑफ इंडीयाने घेतली ते भारतीय आज कुठे आहेत असा प्रश्न त्याला पडला. आणि नंतर सुरू झाला एक रोचक शोध. त्या फिल्म मधे श्रेयनामावली मधे कुणाचंच नाव नव्हतं. एका मुलीचं नाव होतं. त्यावरून मग त्याने शोध सुरू केला. बाकीचे लोक कसे शोधून काढले, ते आता काय करतात, फिल्म मधे त्यांनी भविष्याबद्दल जे सांगितले त्यातले कितपत सत्यात उतरले याचा हा शोध म्हणजे स्वतःच एका फिल्मचा विषय आहे.

https://www.youtube.com/watch?v=AICnH7QYmvM

खरंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीस किंवा तीस वर्षांनी तेव्हांच्या तरूण पिढीची स्वप्ने, त्यांची मतं नोंदवून ठेवण्याचा फिल्म्स डिवीजनचा हा उपक्रम किती दूरदर्शी होता. खरं तर यावरून कुणीतरी मायबोलीवर किंवा अन्यत्र ठराविक वयोगटाची स्वप्ने नोंदवण्याचा उपक्र्रम चालू केला तर काही वर्षांनी त्यांची स्वप्ने सत्यात आली का ? काय अडचणी आल्या हे डॉक्युमेण्टेड होईल.

खेळ म्हणूनही आपण त्या वयात काय ठरवलेलं, काय बनलो असा धागा असावा.

दुसरा हा एक रोचक व्हिडीओ
जे लोक अमेरिकेत गेल्यावर नेहमी डॉलर रूपया गणित करत असतात त्यांना नेहमी सल्ला दिला जातो "अर्न इन डॉलर, स्पेन्ड इन डॉलर"
/
पण भारत आणि अमेरिकेतील दोन्हीकडच्या खर्चांची तुलना करून परचेजिंग पावर पॅरिटी कधी चेक केलीये का ? या मुलीने ते केलंय. अमेरिकेतली कमाई खरंच पुरेसा आहे का ? भारतात होणारी कमाई खरंच खूप कमी आहे का ? हा प्रश्न ज्यांना पडत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडीओ.
Is ₹84 Lakh In America Poor??? | Purchasing Power Parity Explained
https://www.youtube.com/watch?v=8KgF9k9dAc0

बघितला व्हिडिओ. पण सुरुवातीला ती पर्चेसिंग पावर पॅरिटी वगैरे वाक्य म्हणते पण नंतर सगळ्या किमती रुपयात थेट कन्वर्ट करूनच बोलत होती की. म्हणजे " ३००० डॉ. रेन्ट म्हणजे अडीच लाख भाडे आहे अपार्टमेन्ट चे सॅन फ्रान्सिस्कोत "
"भारतात १ बेडरूम अपार्टमेन्ट ७००-८०० स्क्वे फूट असते तर अमेरिकेत ३०० स्क्वे फुट असू शकते" अशी पण सरसकट स्टेटमेन्ट - तिथे स्टुडिओ अपार्टमेन्ट चे चित्र होते. १ बेड चे नव्हे. कॅब ड्रायव्हर चा महिन्याचा खर्च ४००० डॉ, म्हणजे सवातीन लाख !! असे थेट कन्वर्जन. मला फार काही कामाचा वाटला नाही हा व्हिडिओ.

मला जे काही थोडंफार समजलं ते असं. पीपीपी प्रमाणे भारतात आपली पर्चेजिंग पावर २३ रू आहे. हा डेटा त्या व्हिडीओत नाही. या मुलीचं म्हणणं असं आहे कि नंबर्स मुळे फॅक्ट समजत नाही. म्हणून तिने किती खर्च येतो हे पाहिलं. या व्हिडीओला अमेरिकन, एशियन अमेरिकन्स अन्य देशातून आलेल्या अमेरिकन्सच्या रिअ‍ॅक्शन्स आहेत. चार हजार डॉलर कमावणारा टॅक्सीवाला भारतात थेट कन्वर्जन करून श्रीमंत असेल, पण अमेरिकेतले वेगवेगळ्या राज्यातले खर्च पाहिले तर त्याला ते इन्कम पुरेसे नाहीत. माझ्यासारख्यांना अमेरिकतेल्या खर्चांची कल्पना नसल्याने अशा व्हिडीओजमधून जे ते सांगतात तोच सोर्स असतो. तिने सांगितलेले आकडे चुकीचे असतील तर मग माझे आकलन चुकीचे होईल.