रात्रीस खेळ चाले ३

Submitted by DJ....... on 8 March, 2021 - 11:47

सीझन ३

अगदी उत्सुकतेच्या शिखरावर चढूनच भल्या मध्यरात्री हा सीझन ३ बघायला सुरुवात केली. टायटल साँग न लागताच एपिसोड सुरु झाला त्यामुळे अनपेक्षितपणे तोल गेल्या सारखंच वाटलं. एपिसोड सुरू होतो तोच मुळी पहिल्या सिझनचा पहिला एपिसोड अन दुसर्‍या सिझनचा शेवटचा एपिसोड घेऊन. आपण ठार केलेल्या सर्व माणसांच्या भुतांचा भास होत आण्णांचा मृत्यु होतो अन माई हंबरडा फोडते. दत्ता लगेच माधवला फोन करून कल्पना देतो. लगेच रघुकाका अन इतर गावकरी जमून आण्णांना नदीकाठी नेऊन क्रियाकर्म करतात तेव्हा माधव आणि अभिराम देखिल दिसतो. नदीच्या पाण्यात आण्णांच्या धगधगत्या चितेचे प्रतिबिंब उमटते अन भडकलेली चिता पाहून माधव, दत्ताला सावरण्याचा उपदेश करत रघुकाका सर्वांना परत फिरायला सांगतात. ते सर्वजण निघुन जातात पण कॅमेर्‍याच्या साक्षीने आपण मात्र आण्णांच्या चितेजवळच घुटमळत रहातो. नको म्हटलं तरी कॅमेरामन आपणाला पार चितेत घुसवतो Proud . शेवटी चितेतून मागे खेचत आपण नदीच्या पाण्यातल्या प्रतिबिंबात चिता बघत बसतो तेव्हा आण्णांचा आत्मा वर गेल्याचा भास होतो. Uhoh (हे फार भयानक चित्रण केलं आहे..!)
---------------------------------------------------------------------------०००--------------------------------------------------------------------------
मुंबईत कोण परुळेकर नामक एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक असतो त्याच्या मुंबईतल्याच टुमदार घरापासून सीनला सुरुवात होते. तो घाईगडबडीत आकेरीला निघालेला असतो जिथे त्याला आण्णा नाईकांचा वाडा इस्टेट एजंटकरवी विकत घ्यायचा असतो. तो अचानक निघालेला बघून त्याची बायको त्याला काळजीने बरेच प्रश्न विचारते परंतु त्या वाड्यात रिसॉर्ट बनवण्याच्या कल्पनेने परुळेकरवर पुर्ण ताबा घेतलेला असतो. तो एकटाच त्याच्या कारने आकेरीसाठी रवाना होतो तत्पुर्वी बायको त्याच्या हातात एक लाल धागा बांधते.

मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ-सावंतवाडी राज्यमार्ग अशी मजल-दरमजल करत आपण कधी परुळेकराच्या कार मधुन आणि कधी ड्रोनच्या माध्यमातून एरियल व्युने आकेरीतल्या नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर पोचतो तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते. आधीच्या सीझनमधील हिरवीगार निसर्गरम्य भातखाचरं या सीझन मधे मात्र पेटवून दिल्यामुळे काळी-पिवळी-तपकिरी दिसत असतात. परुळेकर आपली बी.एम.डब्ल्यु. नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर फक्त २० फुट अलिकडे थांबवतो अन समोरुन येणार्‍या इसमास आण्णा नाईकांच्या वाड्याचा पत्ता विचारतो. तो माणुसही वेडेपणा करत पुढे जाऊन डावीकडे वळा (एरियल व्यु मधे आपणाला उजवीकडे वळायचं ते लक्ख दिसलेलं असतं..!) सांगायचं तर पुढे जाऊन उजवीकडे वळा असं सांगुन तिथून पोबारा करतो. शेवटी ते २० फूट अंतर पार करून परुळेकराची कार वाड्यासमोर थांबते अन दिवेलागणीच्या वेळेस पोचलेल्या परुळेकराच्या तोंडून (अन आपल्याही तोंडून Wink ) हुंड्या-झुंबरं ल्यालेला भारदस्त वाडा पाहून शब्द फुटतात - "मार्व्हलस..!!" Bw .

परुळेकर वाड्यासमोर पोचतो तोपर्यंत आपणही अनामिक ओढीने वाड्याचा साज-शृंगार भिरभिरत्या नजरेने डोळ्यात साठवू लागतो. वाड्याचं ते पेटंट फाटक, फाटकाच्या पिलरवर लावलेले प्रकाशाचे मोठे लाईटस, आतमधे माईचं वृंदावन, वाड्याची ओसरी, पायर्‍या, ओसरीच्या लाल दगडांच्या बिचीत लावलेला सफेद रंग (हा पांढरा रंग जरा नाजुक ब्रश ने दिला असता तर बरं झालं असतं असं वाटुन जातं Uhoh ), ओसरीतील झुला, वाड्याची काळं पॉलिश केलेली भारदस्त सागवानी चौकट, दरवाजा, कडी-कोयंडा, खिडक्या, भिंतींना दिलेला फिकट निळा रंग आणि पांढर्‍या रंगाने नजरेत भरलेले दारं, खिडक्या, खोल्यांच्या कोनांचे उठाव अन यासर्वांवर हुंड्या-झुंबरं यांच्या आरस्पानी काचेतून पसरलेला नाजुक प्रकाश यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो तसा तो परुळेकरही Bw .

वाड्यात शिरता शिरताच परुळेकराच्या हातात त्याच्या बायकोने बांधलेला लाल धागा फाटकाच्या बिचीत अडकून निघतो अन तिथेच लटकून रहातो. वाड्याच्या समोर आल्यावर मंत्रमुग्ध झालेला परुळेकर "घरात कोणी आहे का?" असं विचारतो तर आण्णांचा आवाज येतो "बूट ओसरीखाली काढून समोरच्या घंगाळातल्या पाण्याने हात-पाय धुवून या..!". सुचनेबरहुकुम परुळेकर सर्व सोपस्कर करतो अन बुट काढयला लागतो तेव्हा आपणाला दिसतं की आण्णांची खेटरं वाड्याकडे टाचा करून ठेवलेली आहेत. परुळेकरालाही असंच वाटत असतं नेमकं तेव्हाच आण्णांची भारदस्त मुर्ती हातात टॉवेल घेऊन परुळेकराच्या मागुन आपणाला सामोरी येते अन आपली १ सेकंद जाम टरकते. (आण्णांची तब्येत फार सुधारली आहे Wink ).

मग झुल्यात बसून आण्णा परुळेकराला येण्याचे प्रयोजन विचारतात. परुळेकर देखिल एका दमात वाडा विकत घ्यायला आलो असं सांगतो त्यावर आण्णा "दिला..!" असं हसत सांगतात. फुकट वाडा द्यायला निघालेल्या आण्णाला बघुन चपापलेला परुळेकर किंमत विचारतो त्यावर आण्णा त्याला गोल गोल घुमवतात. मधेच आतमधे नजर टाकून पाहुणे आलेत चहापाण्याचं बघा असं फर्मावतात. माई आता येईल मग येईल अशी आपण वाट बघत बसतो खरं पण झुल्याच्या किरकिरण्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आपण माईला बघण्यासाठी आतुर झालेलो आपण मात्र आण्णा स्वतः जाऊन पितळी तांब्या-भांड्यातून पाणी आणतात तेव्हा मात्र हिरमुसले होतो. Uhoh (त्याच वेळी परुळेकरास पाटणकरणीने फास घेतलेलं अंगणातलं भेसूर झाड दिसतं.. अन तो चपापतो...!)

परुळेकर अन आण्णांच्या ओसरीतच गप्पा सुरु असतात. दिवाणखान्यात कधी जायला मिळणार अन तिथल्या भुईवरचं मडगुलं (चुन्याने रंगवलेली पेटंट नक्षी) अन रेखीव लाकडी जिना कधी बघायला मिळणार या विचारानं आपण सैरभैर झालेलो असतो. आण्णा अन परुळेकरच्या गप्पा सुरुच असतात तेव्हा आपण उगिचच उतावळेपणाने ओसरीतुन माजघराचा दरवाजा अन परसदाराचा वेध घेत असतो. चाणाक्ष कॅमेरामन आपल्या उत्सुकतेला वाटाण्याच्या अक्षता लावत आपणाला थेट आण्णांच्या खोलीतच घेऊन जातो. तिथला माहोल बघून आपले अन परुळेकराचेही डोळे दिपून जातात.

आण्णांच्या खोलियेत छताला २-२ झुंबरं अन खांबांवर डकवलेल्या हुंड्यांतून मंद प्रकाश पसरलेला असतो. आपलं मन मात्र अडकवलेली बंदुक, आण्णांचं सुप्रसिद्ध कपाट, ग्रामोफोन, मेजावरचं तांब्या-भांडं, आण्णांची खाट, तीमागची खीडकी, खिडकीतून दिसणारी बाव, समोरच्या दरवाजातून दिसणारी गॅलरी, भिंतींवरच्या आखिव-रेखीव तस्विरी, देवळ्या हे सर्व जिथं हवं तिथंच आहे का हे पहाण्यात गुंतलेलं असतं. त्याच वेळी आण्णा हसतमुख चेहर्‍याने परुळेकराला गोवा दाखवण्याच्या बोलीवर कपाटाचं दार उघडतात अन तिथला गोवा बघून आपल्याही चेहर्‍यावर मंद स्मित येतं Bw . कपाटाच्या आत आण्णांचा मुद्देमाल जसाच्या तसा असतो.. त्यात अजुन काही बाटल्यांची भर पडलेली दिसते. कपाटाच्या दारांवर आतील बाजुने भिवरी मदनिकेच्या अवतारात फोटोंवर चिकटवलेली असते. तिला बघुन आपणाला बरं वाटतं Bw .

परुळेकराला आण्णा भरपूर आग्रह करुन इतकं मदिरापान घडवतात की परुळेकराचा अक्षरशः पळूरेकर होतो Biggrin . मग नशेत चूर झालेल्या पळूरकराचं लक्ष समोरच्या भिंतीवरील तस्विरीकडे जातं अन तो ते चित्र पाहून त्याला दाद देत असतो तेव्हा आपण मात्र खूप नॉस्टेलजिक होतो. ते चित्र असतं लाल नऊवारी नेसून पाठमोरी उभी राहून आपणाकडे बघणार्‍या पाटणकरणीचं..! तिथं १४ जानेवारी २०१६ अशी तारिख असते. जुनं कॅलेंडर का लावलंय असं पळूरेकर विचारतो तेव्हा आण्णा उत्तरतात "काळ तिथंच तर थांबला..!" (ते ऐकुन आपणला जुने दिवस आठवून उगिच कावरं-बावरं व्हायला होतं Uhoh )

नशेत चुर्रर्रर्रर्र झालेल्या पळूरेकराला भिंतीवरील बंदुक दिसते अन तो अजुन रंगात येतो. आण्णा त्याला बंदुक काढुन त्यात बार भरून देतात अन रिकामी बाटली स्वतःच्या डोक्यावर ठेवत नेम धरायला सांगतात ते बघून पळूरेकराचा खरेच बार सुटतो Rofl Rofl Rofl . शेवटी आण्णांनी अतिशय आग्रह केल्याने परुळेकर शेवटी बंदुकीतुनही बार ठोकतो अन धुरात हरवलेल्या आण्णांच्या हाती फुटलेली बाटली दिसते. आण्णा पळूरेकरावर खूश होत खाली जेवणाची तयारी करण्यासाठी आवाज देतात अन खाली जातात (आपण पुन्हा एकदा ओढीने माई नाही निदान सरिताची लगबग बघायला स्वयपाक घरात जाण्यासाठी धडपडत असतो पण कॅमेरामनने थोपवून धरल्यामुळे आण्णांच्याच खोलीत चरफडत बसतो Uhoh ) त्यावेळी पळूरेकराला खाटेच्या मागच्या खिडकीतून खाली पाहिल्यावर बावीकडे कोणीतरी पळालेल्याचा भास होतो. शेवटी पळूरेकर उठून भेलकांडत जिना उतरू लागतो अन निम्यात येतो तेव्हा आण्णा वरुनच त्याला आवाज देतात तेव्हा तो अन आपणही चमकतो. या खोलियेत यायला १२ वाटा आहेत असं हसत हसत आण्णांनी सांगितलं अन ते पळूरेकराला पटलं तरी आपणाला माहित असतं की वर जायला ही एकच वाट आहे Wink

आपण पळूरेकरासोबत भेल्कांडत कपाळ्मोक्ष होणार तेवढ्यात वरील खोलित असणारे आण्णा समोर मुख्य दरवाजात जिन्याच्या तोंडाला पळूरेकराला सावरतात (आपण मात्र भुईवरील नक्षी बघण्याचा आटोकाट प्रयत्न करत रहातो अन जेव्हा ती दिसते तेव्हा खूप भ्रमनिरास होतो. संपुर्ण वाड्याला रिपेंट करणार्‍या पेंटरने नक्षीसाठी मात्र पाट्या टाकण्याचं काम केलं हे प्रकर्षाने जाणावतंं Uhoh ). मग आण्णा त्या पळूरेकराला जेवण्यासाठी गादीवर बसवतात (आपलं मन मात्र दिवाणखान्यातलं गणापती-लक्ष्मी-सरस्वतीचं चित्र बघण्यात रमतं..!) अन समोर चांदीच्या चौरंगावर चांदीच्या ताटात सुग्रास भोजन वाढलेलं असतं (आपण पुन्हा एकदा माई नाही निदान सरिताची लगबग बघायला मिळते का.. निदान छाया तरी आत्ता येऊन भोचकपणे काहीतरी बोलताना दिसेल किंवा गेला बाजार पांडु तरी "इसारलंय..इसारलंय.." करत हात झटकत आत येईल अशी वाट बघत बसतो..! पण हिरमोडच होतो.. कोण्णी कोण्णी येत नाही Uhoh ).

जेवण झाल्यावर आण्णा पळूरेकराला त्याच्या माडीवरच्या खोलियेत झोपवतात अन सकाळ होते तेव्हा इस्टेट एजंट परुळेकराला उठवत असतो. झापड आलेल्या परुळेकराला जाग येते खरी पण आपणाला समोरचं दृष्य बघून अतिशय धक्का बसतो. रात्री झुंबर-हुंड्यांनी उजळून निघालेल्या खोलीची अक्षरशः वाताहत झालेली असते. संपुर्ण खोली जाळ्या-जळमटांनी अन धुळीने भरलेली असते अन खाट, कपाट, मेज, खुर्च्या, बाकं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं.. छताची कौलं फुटलेली असतात. Uhoh Uhoh Uhoh एजंट परुळेकराला उठवतो तर परुळेकराने जेवणाऐवजी यथेच्छ माती खाल्लेली दिसते. घाबरलेला परुळेकर ओरडत जिन्यावरून खाली येतो खरा पण दिवाणखाना, ओसरी अन संपुर्ण वाडा इतका विद्रुप झालेला असतो की त्याच्या ऐवजी आपल्याच अंगावर भितीने अन संतापाने काटा उभा रहातो Uhoh :रागः

एजंट त्या परुळेकराला थांबवायचा अटोकाट प्रयत्न करतो पण परुळेकर कसाबसा बूट घालत कार मधे बसून पळ काढतो तेव्हा तो बुट घालताना रात्री करकरीत नवीन असणारी आण्णांची वहाण कुजून जीर्ण झालेली दिसते. आपणाला धक्का बसतो की नाईकांच्या वाड्याचं हे असं मातेरं का झालं असेल...? माई, सरिता, दत्ता, छाया, माधव, अभिराम, देविका कुठे आहेत..? निलिमाला नक्की कोणती शिक्षा झाली..?? असे असंख्य प्रश्न समोर उभे रहात असतानाच ४० मिनिटांचा लांबलेला पहिला एपिसोड समाप्त होतो.

प्रीकॅप मधे कोणीतरी गावगुंड त्या इस्टेट एजंटाला धमकावत असतो अन वाड्याचा व्यवहार का होत नाही म्हणुन जाब विचारत असतो. पाटणकरणीच्या (दुसर्‍या) घराच्या ठिकाणाहून भेसूर वाड्यावर कॅमेरा रोखलेला असतो अन त्या फ्रेममधे जुने पोतेरं झालेलं लुगडं नेसलेली म्हातारी पुसटशी दिसते (ही नक्कीच माई असणार यात शंका नाही.. तिला अशा अवतारात बघणे अतिशय क्लेशदायक ठरणार Uhoh )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई कुठे काय करते आणि रा खे चा आलटून पालटून बघत होते. पहिला भाग तरी काही विशेष वाटला नाही. शेवंता आणि बाकी बायकांची चित्र फार सुरेख होती. वाडा छान दिसत होता आतून. रिपीट कधी असतो बघायला पाहिजे.

Season ३ promises to be more intense... दुसऱ्या भागात चित्र अधिक स्पष्ट होतंय.

बिचारी माई आणि वेडा झालेला माधव आकेरीत राहतायत. वाड्यावर अनेकांचा डोळा आहे... अभिराम आहे... देविका दिसली नाही अजून!

दत्ता, सरिता आणि आपला पटकथा लेखक पांडू दिसला नाहीये अजून!!!

DJ मस्तच लिहिलय. मला आवडला पहिला भाग पण पुढे स्टोरी लाईन काय असणारे कळत नाहीये.

पण बाकी ची मंडळी म्हणजे माई सरिता, शेवंता ही आहेत बहुत करून ह्या भागात कारण परुळेकर अण्णाला विचारतो बाकी कोण कसं दिसत नाहीये घरात तर आण्णा सांगतो हळू हळू सगळी दिसायला लागतील तुम्हाला असं.

आण्णांची भारदस्त मुर्ती हातात टॉवेल घेऊन परुळेकराच्या मागुन आपणाला सामोरी येते अन आपली १ सेकंद जाम टरकते. (आण्णांची तब्येत फार सुधारली आहे Wink ). >>>>>>तब्येत सुधारणारच आधी ते मजनू होते व सारखे ताक प्यायचे आता मेल्यावर भूत बनल्याने सगळी व्यसने सुटली बहुदा

प्रीकॅप मधे कोणीतरी गावगुंड त्या इस्टेट एजंटाला धमकावत असतो अन वाड्याचा व्यवहार का होत नाही म्हणुन जाब विचारत असतो. >>>>>>>>>>>>>>>मला तो साध्या वेषातील पोलीस वाटला कारण त्याची खाकी प्यांट व बूट। बाकी आज कळेलच । पण कालचा एपिसोड जबरदस्त होता

जबरदस्त लिहिलं आहे तुम्ही....अक्षरशः डोळ्या समोर उभ राहिल सगळ...माझा सुरुवातिचा थोडा भाग चुकलाय..आणि हे zee मराठी वाले बाकी serials च पारायणे लावतात..पण राखेचा चा रिपिट telecast करत नाहीत..राग राग.. आता zee 5 वर बघाव लागेल..एका serial साठी app डाउनलोड कराव लागेल..

मी पण 2016 च ऐकलं.

Zee 5 हल्ली log in वैगेरे केल्या शिवाय दिसत नाही.

माझ्याकडे airtel च x stream app आहे पण त्यावर ही live च आहे फक्त राखेचा. थोडक्यात काय तर रात्री अकरा ची वेळ चुकवू नका.

मस्त लिहिले आहे. सध्या काम भरपूर असल्याने रात्री बघायला वेळ मिळत नाही. पण पहाटे उठते तेव्हा नक्की बघे न . झी फाव्ह आहे मजकडे.

तिथं १४ जानेवारी २०१९ अशी तारिख असते. >> मी २०१६ ऐकलं का???... २०१६ च म्हणाले अण्णा.
Dj.... काल एपिसोड पहिला पण आज तुमचं डिटेल रसग्रहण वाचून पूर्ण एपिसोड नव्याने डोळ्यासमोर दिसला अगदी वाड्याच्या रंगसंगती पासून. खूप मस्त लिहिता तुम्ही.

बाकी अण्णा चितेवर उठून बसून अत्तर हुंगतात तो सीन भारी जमलाय

मनीमोहर, अमा, निल्सन, तुरू, झंपी धन्स Bw

१४ जानेवारी २०२६ हे करेक्ट केलं आता.. मी पण तेच ऐकलं लिहिताना चूक झाली.

DJ पूर्ण भाग डोळ्यासमोर उभा केलात. ज्याने भाग बघितला नाहीये त्यालाही काही मीस केलंय असं वाटणार नाही. एवढं टायपून तपशीलवार लिहिण्याचा तुमच्या आवडीला सलाम.

धन्स चंपा आदरमोद.

हाही सीझन चांगला असेल अशी आशा करुया.. नाईकांची गरीबी बघवणार नाही पण Uhoh

DJ पूर्ण भाग डोळ्यासमोर उभा केलात. >>> अगदी अगदी. मी बघत नाही हि सिरीयल. सुरु झाली तेव्हाही कमी बघितली पण तेव्हा बरेच जण बघायचे आणि कमेंट्स पण लिहायचे. नंतर मात्र तुम्ही लिहिता जास्त, आवडीने बघता, छान लिहिता.

धन्स अन्जू आदरमोद.
माई आणि माधवाची दयनीय अवस्था बघवत नव्हती आज.>>++++१११११११११११ Uhoh
---------०००---------

कालचा भाग सुरु होतो तो त्या इस्टेट एजंटच्या घराच्या कंपाऊंड पासून. साळगावकर असं त्याचं आडनाव. नाईकांच्या वाड्याशेजारीच त्याचं घर असतं. त्याची बायको महाजांबाज असते अन साळगावकराला संसारात लक्ष घाल म्हणुन खनपटीला बसलेली असते. तेवढ्यात साळगावकराला इस्टेटीच्या कामांचे फोन येतात अन ते संपल्यावर दारावर थाप पडु लागते. साळगाव्कर दार उघडतो तेव्हा पीळदार मिशी असलेला गुंडासारखा दिसणारा माणूस साळगावकराचं गचुंडं धरतो अन वाड्याचा व्यवहार का होत नाही असं विचारतो. त त प प करत साळगावकर त्याला सांगतो की त्या वाड्याची मालकीण (म्हातारी माई) अंगठा देत नाही. घोळात घेण्यासाठी त्याने तिला स्वतःच्या घरी कामाला ठेवली आहे.. करतो काहीतरी अन घेतो अंगठा असं सांगुन त्या गुंड माणसाला परतवून लावतो.

मग त्याच्या घराच्या परसदारी खरकट्या भांड्याच्या ढिगामागे किरमिजलेल्या हाताने जर्मनचं पातेलं राखेने घासणारे हात दिसतात अन कॅमेरा हळुहळु वर जात नळाच्या मागे बसलेली, तपकीरी रंगावर पिवळे ठिपके असलेलं जुनं.. पोतेरं झालेलं.. मळकं लुगडं नेसलेली, डोळ्याच्या पापण्या जड झालेली, केस पांढरे झालेली, गळ्यात एक धागा सुद्धा न बांधलेली, कान ओस पडलेली, कपाळावर आठ्या पडलेली म्हातारी दिसते अन अन आपल्या काळजात चर्रर्रर्रर्रर्र होतं............ माईच असते ती...! Uhoh अन तिच्या समोर थोडा दूरवर भग्न वाडा असतो. Uhoh Uhoh

माईवर आरडाओरडा करत तो साळगावकर तिला वाडा विक म्हणून सांगु लागतो तरी माईच्या चेहर्‍यावर कसलाही लवलेश नसतो.. ती इमाने-इतबारे भांडी घासत असते. साळगावकर तिच्यासमोर कागद आणि इंकपॅड नाचवत अंगठा दे एक लाख रुपये देईन असं म्हणु लागतो. एक लाखावर किती शुन्य असतात हे माहीत आहे का तुला असं विचारून माईने राखेने घासलेल्या परातीवर तो १ आकड्यापुढे पाचवेळा ० काढतो. माई तो आकडा काढलेली परात त्याच निर्व्याज भावनेने पाण्याने धुवून टाकते अन भांडी धुवुन झाल्याचे सांगत साळगावकरणीला भाकरीची आठवण करून देते. साळगावकरीण देखील आरडाओरडा करत भाकरी आणून देते अन तिच्या भाकरीवर जगणार्‍या माईला वाड्याच्या दिशेने हातवारे करत आता "ह्या स्मशानात रहाण्यापेक्षा तो वाडा विक" असं सांगते. माई हसून तिला सांगते की तो वाडा स्मशान नाही.. ते तिचं घर आहे.. ते तिचं विश्व आहे. तिची सगळी मुलं लवकरच परत येतील. घराचं गोकूळ होईल. हे सांगताना माईच्या अर्धमिटल्या डोळ्यातही चमक दिसते.

नंतर ती साळगावकरणीने दिलेली भाकरी पदराला बांधते अन साळगावकराला तिला उठायला मदत करायला सांगते. साळगावकराला वाटतं की ती आंगठा देईल. पण उठून माई वाकून तुरुतुरु चालू लागते. तिच्या मागे शिव्या शाप देत साळगावकर जोड जातो. माईची मुलं आता काही परतणार नाहीत अन परतली तरी ही म्हातारी त्यावेळेस जिवंत असणार नाही असं बडबडत साळगावकरीण माईच्या मागे पळू लागते पण माई तिला तिची मुलं परत येणार हे सांगत माधवाच्या नावाचा घोषा करत रस्त्याने पुढेच पळू लागते.. पदरात भाकरी बांधलेली माई "माधवा.. माधवा.. " हाकारत त्याला शोधु लागते. रस्त्यावर.. बसथांब्यावर.. रस्त्यात भेटणार्‍या माणसांना विचारत माई माधवाचा माग काढू लागते तेव्हा भेटणारा प्रत्येक जण तिला झिडकारत किंवा थट्टा करताना दिसतो तेव्हा आपल्य मनाला यातना झाल्याशिवाय रहात नाहीत.

पुढच्याच दृष्यात दाढी अन केस वाढलेला, फाटके कपडे घातलेला, धुळीने माखलेला, कित्त्येक दिवसात अंघोळ न केल्याने कळकटलेल्या चामडीचा एक वेडा इसम 'आशिर्वाद' कामळेपीर, तालुका सावंतवाडी, जिल्हा-सिंधुदुर्ग असा बोर्ड लिहिलेल्या दुकानासमोर शुद्धलेखन दुरुस्त करा असं दुकानदाराला सांगत असतो. आशिर्वाद मधे श ला दुसरी वेलांटी हवी असं सांगत त्या दुकानदाराला तो बोलु लागतो तेव्हा दुकानदार त्याला हाकलून लावतो. फाटके कपडे घातलेला तो वेडगळ मनुष्य नेमका कोण आहे हे आपणाला कळत नाही. हाच माधव तर नाही ना? ही शक्यताही आपण त्याला न्याहाळत पडताळून बघु लागतो पण आपलं मन मात्र तो माधव नसावा हेच सांगत रहातं. एका ठिकाणी रस्त्यावर चांडाळ चौकडी त्याची मजा घेऊ लागते तेव्हा माई तिथं पोचते. ती त्या वेड्याला तिला एकदा "आई" म्हण असं सांगते पण तो काही तिला तसं म्हणत नाही. मग त्या वेड्याला त्रास देणार्‍या चांडाळाचौकडीला हातात दगड घेऊन माई पळवून लावते अन वेड्याला घरी - वाड्यात घेऊन येते तरी आपलं मन तो वेडा माधव असुच शकत नाही असं सांगत रहातं.

माजघरात पुर्णतः दळिद्र पसरलेलं असतं. तिथे भिंतीला टेकून तो वेडा वेडे चाळे करत बसतो अन माई त्याला माधवा माधवा करत तिला त्याने "आई" म्हणावे म्हणुन आर्जवं करत बसते. त्याची पुस्तके तिने ट्रंकेत भरून ठेवलेली असतात ती बाहेर काढते अन वेड्याला देते. वेडा इसम माधवच असावा असं मनातून आपणाला वाटु लागतं पण त्याने इतकं अफलातून वेड पांघरलेलं असतं की मन त्याला माधव मानायला तयार झालं तरी डोळे मात्र आजिबात तयार होत नाहीत. त्याच्या धूळमाखल्या दाढी, केसातून आपला माधव कुठे दिसतो का ते आपण शोधू लागतो अन शेवटी पांडबा पेक्षा अफलातून वेडा साकारला आहे माधवाने हे आपणाला मान्यच करावं लागतं..! मग माईने दिलेली पुस्तकं घेऊन माधव ती उघडून त्यावरून नजर फिरवून वाचु लागतो. मधेच झटके आल्यासारखा अनुप्रास, भुजंगप्रयात, यमक अशी अलंकार आणि वृत्तांची नावं घेत रहातो. ती नावं ऐकून माईला वाटतं की माधवावर कोणीतरी चेटूक केलंय की काय अन ती त्याची नजर काढण्यासाठी मीठ-मिरच्या घ्यायला स्वयंपाक घरात जाते.

स्वयंपपाक घराच्या कोपर्‍यातून अअपणासमोर रया गेलेलं भकास स्वयंपाकघर समोर येतं Uhoh . चूल कित्येक महिन्यात पेटलेली नसते, पुर्ण जमीन उकरली गेलेली असते, फडताळ रिकामं असतं, फळ्यांवर एकही भांडं नसतं हे भेसूर स्वयपाक घर बघुन हेच का ते माईचं नांदणारं स्वयपाक घर ? असा प्रश्न पडतो. ज्या स्वयपाक घरातली चूल्/गॅस वर कायम चहा उकळत असायचा, येणाजाणार्‍याला सतत कपबशीतून तो गाळून दिला जायचा, पातेल्यात काहीबाही रटरटुन शिजत रहायचं, टोपलीत सदानकदा कुठलीही भाजी, टोमॅटो, बटाटे डोकावत असायचे, फडताळ बरण्यांनी भरलेला असायचा, फळीवर असंख्य पितळी भांडी, कळाशा, पातेली अन डबे-डुबे मिरवत असायचे त्या स्वयपाक घराची ही अशी विदीर्ण अवस्था आपल्याच्याने बघवली जात नाही. अशा मोडून पडलेल्या स्वयपाकघरात माई मीठ-मिरच्या शोधायला आलेली असते ज्या तिला मिळणं मुश्किलच असतं.. तिलाही याची जाणीव असतेच.. तरिही ती फळीवरचा एकमेव चेपका जर्मनचा डबा उघडून बघते जो पुर्ण रिकामाच असतो. पण त्याबद्दल ती काहीही वाईट वाटु न घेता चुलीपुढल्या राख-मातीतून सुरकुतलेल्या बोटांनी थोडीशी राख-माती उचलते अन माजघरत बसलेल्या माधवाकडे जाते. तिथे हे माधव साहेब पुस्तकांची पाने फाडत त्याच्या टिकर्‍या उडवत बसलेले असतात. माईला तो पुस्तके फाडतोय याबद्दल काहीच वाटत नाही आपला मुलगा आज घरी आलाय या आनंदात ती त्यावर राख-माती उतरून फुंकते. त्यामुळे माधवाला ठसका येतो अन कशाचीतरी आठवण येऊन आपल्या मुलाच्या पोटाची काळजी असणारी माऊली भाकरीच्या ओढीने पुन्हा स्वयपाक घरात जाते. केवळ एक जर्मनची ताटली तिथं असते जीवर खुप धूळ पसरलेली असते. ती धूळभरली ताटली माई उचलते अन ती आपल्याच कमरेला पुसुन त्यात मघाशी साळगावकरणीने दिलेला अन पदराला बांधलेला भाकरीचा तुकडा ठेवत माधवासाठी ती ताटली घेऊन पुन्हा माजघरात जाते.

माजघरात माधव नसतो अन माई भाकरीची ताटली हातात घेत मधवाला हाका मारत माजघरातून दिवाणखाण्यात अन दिवाणखाण्यातून ओसरीत येते. माधव कुठेच नसतो. तो पुन्हा गायब झालेला असतो. माईला वाईट वाटत नाही. कर्माचेच भोग आहेत असं समजून ती माधव गेलेल्या रस्त्याकडे बघत रहाते.

दूरवर प्रकाश दिसत असतो अन त्या प्रकाशातून कोणीतरी येत असतं.. हळूहळु आपणाला ती व्यक्ती दिसु लागते. सायकल घेऊन पोष्ट्याच आलेला असतो. पोष्ट्याला बघताक्षणी आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते अन सुंब जळला तरी पीळ कायम रहातो तसा हा लोचट पोष्ट्या परत आल्याबद्दल आपणाला जराही दयामाया वाटत नाही :रागः "आवशे.. आवशे.." करून माईकडून आता हा पोष्ट्या चहा उकळणार असं वाटतं पण माईकडे कुठला आलाय आता चहा हे आपणाला पुर्ण उमगलेलं असतं. मग माई पोष्ट्यासोबत ओसरीतच गप्पा मारत बसते. पोष्ट्यादेखील गेल्या सीझन ईतका लोचटपणा न करता आवरतं घेतो. माई त्याला अभिरामास पत्र लिहायला सांगते. त्याला पुन्हा घरी बोलवायला सांग्ते. घराच्या भिंती खचल्या आहेत, वाईट लोक घर विकायला टपले आहेत, दत्ता दुसर्‍यांच्या शेतावर राबतो आहे, माधव गावभर वेड्यासारखा फिरत आहे, तिच्या जिवात जिव असे पर्यंत अभिरामने परत यावे अन हा वाडा ताब्यात घ्यावा असं लिहायला लावते. अभिराम बेंगलोरला आहे असं ती पोष्ट्याला सांगते. पत्र लिहिल्यावर ती साडीला बांधलेल्या गाठीतून एक रुपया काढते अन पोष्ट्याला देते. पोष्ट्या देखील "कशाला.. कशाला.." म्हणत हावरटासारखं रुपाया घेतोच. चहा नाही निदान रुपया तरी का सोडावा असा विचार प्रत्येक लोचटांच्या मनात येणारच अशी मनाची समजूत घालत आपण पुढे बघु लागतो. वास्तवीक पोष्ट्या आलाय हा माईचा भ्रम असतो (उगिच पोष्ट्याला कुणी भूत समजू नये..!) अन त्यामुळे वाड्यासमोरून जाणार्‍या लहान मुलाला माई एकटीच कुणाशी बोलतेय असा प्रश्न पडतो अन त्याने तसा प्रश्न त्याच्या आईला विचारल्यावर ती चपापलेली बाई त्याला बखोटीला धरून तिथुन पोबारा करते.

इकडे बेंगलोरमधे घरात झोपलेल्या अभिरामला दचकून जाग येते अन त्याला असं वाटतं की आई त्याची आठवण काढते. मग तो आकेरीला जाण्याचा प्लॅन बनवतो अन एपिसोड संपतो.

प्रीकॅप मधे पांडबा दिसतो. एका उंची कार मधून "तुपारे" मधल्या इशा निमकरची जाऊ मॉड रुपात उतरते. तिला पाहून पांडबा "सुसल्या" असं म्हणतो (म्हणजे ही नवीन सुसल्या आहे तर..!). पुढच्याच दृष्यात सुसल्या माईची मानगूट धरून वाड्याच्या ओसरीखाली जमीनीवर पाडताना दाखवली आहे अन कळवळणारी माई ती तिचा वाडा जीव गेला तरी सुसल्याच्या हाती देणार नाही असं जीव खाऊन सांगत असते. आता आज काय होतंय ते बघुया..!

माधवच्या बायकोने २खून केलेले असतात जिला पोलिस धरून नेतात म्हणजे तिला शिक्षा झालेली असणार. या धक्क्याने हळव्या मनाचा माधव वेडा झाला असणार. त्यांचा मुलगा आर्चिस कुठे आहे हे माहित नाही. आई खुनी अन बाप वेडा असलेल्या मुलाचं होणार तरी काय म्हणा..!! Uhoh

सगळो एपिसोड डोळ्यासमोर उभो केलास. सगळा अगदी जसाच्या तसा. कलपासून वाट बघत होतंय तुमच्या पोस्टची. टीव्हीवर बघलयचं पण ह्या वाचूक भारी वाटता.

अन्नपुर्णे_ तुझो प्रतिक्रिया वाचुन बरा वाटला गो... माका वेळ मिळतला तसा लिवुक रवतलंय हां मी. वाट बघत रवू नको गे बाय..!

Submitted by DJ....... on 24 March, 2021 - 13:22....

वाचायला सुद्धा जड जात आहे, पाहणे तर कठीण आहे. तरी ही रचलेली कथा आहे, प्रत्यक्षात ज्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवत असेल त्यांची तर कल्पनाही करवत नाही!!!

खरं आहे विक्षिप्त्_मुलगा. अशी वेळ वैर्‍यावरही ओढवू नये. परंतू अशा घटना वास्तविक जीवनात घडलेल्या मी स्वतः बघितलं आहे. हसतं-खेळतं-भरलेलं घर भकास होऊन पडलेलं मी स्वतः पाहिलं आहे.

सगळो एपिसोड डोळ्यासमोर उभो केलास. सगळा अगदी जसाच्या तसा. कलपासून वाट बघत होतंय तुमच्या पोस्टची. टीव्हीवर बघलयचं पण ह्या वाचूक भारी वाटता.+१११११

Pages