रात्रीस खेळ चाले ३

Submitted by DJ....... on 8 March, 2021 - 11:47

सीझन ३

अगदी उत्सुकतेच्या शिखरावर चढूनच भल्या मध्यरात्री हा सीझन ३ बघायला सुरुवात केली. टायटल साँग न लागताच एपिसोड सुरु झाला त्यामुळे अनपेक्षितपणे तोल गेल्या सारखंच वाटलं. एपिसोड सुरू होतो तोच मुळी पहिल्या सिझनचा पहिला एपिसोड अन दुसर्‍या सिझनचा शेवटचा एपिसोड घेऊन. आपण ठार केलेल्या सर्व माणसांच्या भुतांचा भास होत आण्णांचा मृत्यु होतो अन माई हंबरडा फोडते. दत्ता लगेच माधवला फोन करून कल्पना देतो. लगेच रघुकाका अन इतर गावकरी जमून आण्णांना नदीकाठी नेऊन क्रियाकर्म करतात तेव्हा माधव आणि अभिराम देखिल दिसतो. नदीच्या पाण्यात आण्णांच्या धगधगत्या चितेचे प्रतिबिंब उमटते अन भडकलेली चिता पाहून माधव, दत्ताला सावरण्याचा उपदेश करत रघुकाका सर्वांना परत फिरायला सांगतात. ते सर्वजण निघुन जातात पण कॅमेर्‍याच्या साक्षीने आपण मात्र आण्णांच्या चितेजवळच घुटमळत रहातो. नको म्हटलं तरी कॅमेरामन आपणाला पार चितेत घुसवतो Proud . शेवटी चितेतून मागे खेचत आपण नदीच्या पाण्यातल्या प्रतिबिंबात चिता बघत बसतो तेव्हा आण्णांचा आत्मा वर गेल्याचा भास होतो. Uhoh (हे फार भयानक चित्रण केलं आहे..!)
---------------------------------------------------------------------------०००--------------------------------------------------------------------------
मुंबईत कोण परुळेकर नामक एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक असतो त्याच्या मुंबईतल्याच टुमदार घरापासून सीनला सुरुवात होते. तो घाईगडबडीत आकेरीला निघालेला असतो जिथे त्याला आण्णा नाईकांचा वाडा इस्टेट एजंटकरवी विकत घ्यायचा असतो. तो अचानक निघालेला बघून त्याची बायको त्याला काळजीने बरेच प्रश्न विचारते परंतु त्या वाड्यात रिसॉर्ट बनवण्याच्या कल्पनेने परुळेकरवर पुर्ण ताबा घेतलेला असतो. तो एकटाच त्याच्या कारने आकेरीसाठी रवाना होतो तत्पुर्वी बायको त्याच्या हातात एक लाल धागा बांधते.

मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ-सावंतवाडी राज्यमार्ग अशी मजल-दरमजल करत आपण कधी परुळेकराच्या कार मधुन आणि कधी ड्रोनच्या माध्यमातून एरियल व्युने आकेरीतल्या नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर पोचतो तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते. आधीच्या सीझनमधील हिरवीगार निसर्गरम्य भातखाचरं या सीझन मधे मात्र पेटवून दिल्यामुळे काळी-पिवळी-तपकिरी दिसत असतात. परुळेकर आपली बी.एम.डब्ल्यु. नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर फक्त २० फुट अलिकडे थांबवतो अन समोरुन येणार्‍या इसमास आण्णा नाईकांच्या वाड्याचा पत्ता विचारतो. तो माणुसही वेडेपणा करत पुढे जाऊन डावीकडे वळा (एरियल व्यु मधे आपणाला उजवीकडे वळायचं ते लक्ख दिसलेलं असतं..!) सांगायचं तर पुढे जाऊन उजवीकडे वळा असं सांगुन तिथून पोबारा करतो. शेवटी ते २० फूट अंतर पार करून परुळेकराची कार वाड्यासमोर थांबते अन दिवेलागणीच्या वेळेस पोचलेल्या परुळेकराच्या तोंडून (अन आपल्याही तोंडून Wink ) हुंड्या-झुंबरं ल्यालेला भारदस्त वाडा पाहून शब्द फुटतात - "मार्व्हलस..!!" Bw .

परुळेकर वाड्यासमोर पोचतो तोपर्यंत आपणही अनामिक ओढीने वाड्याचा साज-शृंगार भिरभिरत्या नजरेने डोळ्यात साठवू लागतो. वाड्याचं ते पेटंट फाटक, फाटकाच्या पिलरवर लावलेले प्रकाशाचे मोठे लाईटस, आतमधे माईचं वृंदावन, वाड्याची ओसरी, पायर्‍या, ओसरीच्या लाल दगडांच्या बिचीत लावलेला सफेद रंग (हा पांढरा रंग जरा नाजुक ब्रश ने दिला असता तर बरं झालं असतं असं वाटुन जातं Uhoh ), ओसरीतील झुला, वाड्याची काळं पॉलिश केलेली भारदस्त सागवानी चौकट, दरवाजा, कडी-कोयंडा, खिडक्या, भिंतींना दिलेला फिकट निळा रंग आणि पांढर्‍या रंगाने नजरेत भरलेले दारं, खिडक्या, खोल्यांच्या कोनांचे उठाव अन यासर्वांवर हुंड्या-झुंबरं यांच्या आरस्पानी काचेतून पसरलेला नाजुक प्रकाश यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो तसा तो परुळेकरही Bw .

वाड्यात शिरता शिरताच परुळेकराच्या हातात त्याच्या बायकोने बांधलेला लाल धागा फाटकाच्या बिचीत अडकून निघतो अन तिथेच लटकून रहातो. वाड्याच्या समोर आल्यावर मंत्रमुग्ध झालेला परुळेकर "घरात कोणी आहे का?" असं विचारतो तर आण्णांचा आवाज येतो "बूट ओसरीखाली काढून समोरच्या घंगाळातल्या पाण्याने हात-पाय धुवून या..!". सुचनेबरहुकुम परुळेकर सर्व सोपस्कर करतो अन बुट काढयला लागतो तेव्हा आपणाला दिसतं की आण्णांची खेटरं वाड्याकडे टाचा करून ठेवलेली आहेत. परुळेकरालाही असंच वाटत असतं नेमकं तेव्हाच आण्णांची भारदस्त मुर्ती हातात टॉवेल घेऊन परुळेकराच्या मागुन आपणाला सामोरी येते अन आपली १ सेकंद जाम टरकते. (आण्णांची तब्येत फार सुधारली आहे Wink ).

मग झुल्यात बसून आण्णा परुळेकराला येण्याचे प्रयोजन विचारतात. परुळेकर देखिल एका दमात वाडा विकत घ्यायला आलो असं सांगतो त्यावर आण्णा "दिला..!" असं हसत सांगतात. फुकट वाडा द्यायला निघालेल्या आण्णाला बघुन चपापलेला परुळेकर किंमत विचारतो त्यावर आण्णा त्याला गोल गोल घुमवतात. मधेच आतमधे नजर टाकून पाहुणे आलेत चहापाण्याचं बघा असं फर्मावतात. माई आता येईल मग येईल अशी आपण वाट बघत बसतो खरं पण झुल्याच्या किरकिरण्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आपण माईला बघण्यासाठी आतुर झालेलो आपण मात्र आण्णा स्वतः जाऊन पितळी तांब्या-भांड्यातून पाणी आणतात तेव्हा मात्र हिरमुसले होतो. Uhoh (त्याच वेळी परुळेकरास पाटणकरणीने फास घेतलेलं अंगणातलं भेसूर झाड दिसतं.. अन तो चपापतो...!)

परुळेकर अन आण्णांच्या ओसरीतच गप्पा सुरु असतात. दिवाणखान्यात कधी जायला मिळणार अन तिथल्या भुईवरचं मडगुलं (चुन्याने रंगवलेली पेटंट नक्षी) अन रेखीव लाकडी जिना कधी बघायला मिळणार या विचारानं आपण सैरभैर झालेलो असतो. आण्णा अन परुळेकरच्या गप्पा सुरुच असतात तेव्हा आपण उगिचच उतावळेपणाने ओसरीतुन माजघराचा दरवाजा अन परसदाराचा वेध घेत असतो. चाणाक्ष कॅमेरामन आपल्या उत्सुकतेला वाटाण्याच्या अक्षता लावत आपणाला थेट आण्णांच्या खोलीतच घेऊन जातो. तिथला माहोल बघून आपले अन परुळेकराचेही डोळे दिपून जातात.

आण्णांच्या खोलियेत छताला २-२ झुंबरं अन खांबांवर डकवलेल्या हुंड्यांतून मंद प्रकाश पसरलेला असतो. आपलं मन मात्र अडकवलेली बंदुक, आण्णांचं सुप्रसिद्ध कपाट, ग्रामोफोन, मेजावरचं तांब्या-भांडं, आण्णांची खाट, तीमागची खीडकी, खिडकीतून दिसणारी बाव, समोरच्या दरवाजातून दिसणारी गॅलरी, भिंतींवरच्या आखिव-रेखीव तस्विरी, देवळ्या हे सर्व जिथं हवं तिथंच आहे का हे पहाण्यात गुंतलेलं असतं. त्याच वेळी आण्णा हसतमुख चेहर्‍याने परुळेकराला गोवा दाखवण्याच्या बोलीवर कपाटाचं दार उघडतात अन तिथला गोवा बघून आपल्याही चेहर्‍यावर मंद स्मित येतं Bw . कपाटाच्या आत आण्णांचा मुद्देमाल जसाच्या तसा असतो.. त्यात अजुन काही बाटल्यांची भर पडलेली दिसते. कपाटाच्या दारांवर आतील बाजुने भिवरी मदनिकेच्या अवतारात फोटोंवर चिकटवलेली असते. तिला बघुन आपणाला बरं वाटतं Bw .

परुळेकराला आण्णा भरपूर आग्रह करुन इतकं मदिरापान घडवतात की परुळेकराचा अक्षरशः पळूरेकर होतो Biggrin . मग नशेत चूर झालेल्या पळूरकराचं लक्ष समोरच्या भिंतीवरील तस्विरीकडे जातं अन तो ते चित्र पाहून त्याला दाद देत असतो तेव्हा आपण मात्र खूप नॉस्टेलजिक होतो. ते चित्र असतं लाल नऊवारी नेसून पाठमोरी उभी राहून आपणाकडे बघणार्‍या पाटणकरणीचं..! तिथं १४ जानेवारी २०१६ अशी तारिख असते. जुनं कॅलेंडर का लावलंय असं पळूरेकर विचारतो तेव्हा आण्णा उत्तरतात "काळ तिथंच तर थांबला..!" (ते ऐकुन आपणला जुने दिवस आठवून उगिच कावरं-बावरं व्हायला होतं Uhoh )

नशेत चुर्रर्रर्रर्र झालेल्या पळूरेकराला भिंतीवरील बंदुक दिसते अन तो अजुन रंगात येतो. आण्णा त्याला बंदुक काढुन त्यात बार भरून देतात अन रिकामी बाटली स्वतःच्या डोक्यावर ठेवत नेम धरायला सांगतात ते बघून पळूरेकराचा खरेच बार सुटतो Rofl Rofl Rofl . शेवटी आण्णांनी अतिशय आग्रह केल्याने परुळेकर शेवटी बंदुकीतुनही बार ठोकतो अन धुरात हरवलेल्या आण्णांच्या हाती फुटलेली बाटली दिसते. आण्णा पळूरेकरावर खूश होत खाली जेवणाची तयारी करण्यासाठी आवाज देतात अन खाली जातात (आपण पुन्हा एकदा ओढीने माई नाही निदान सरिताची लगबग बघायला स्वयपाक घरात जाण्यासाठी धडपडत असतो पण कॅमेरामनने थोपवून धरल्यामुळे आण्णांच्याच खोलीत चरफडत बसतो Uhoh ) त्यावेळी पळूरेकराला खाटेच्या मागच्या खिडकीतून खाली पाहिल्यावर बावीकडे कोणीतरी पळालेल्याचा भास होतो. शेवटी पळूरेकर उठून भेलकांडत जिना उतरू लागतो अन निम्यात येतो तेव्हा आण्णा वरुनच त्याला आवाज देतात तेव्हा तो अन आपणही चमकतो. या खोलियेत यायला १२ वाटा आहेत असं हसत हसत आण्णांनी सांगितलं अन ते पळूरेकराला पटलं तरी आपणाला माहित असतं की वर जायला ही एकच वाट आहे Wink

आपण पळूरेकरासोबत भेल्कांडत कपाळ्मोक्ष होणार तेवढ्यात वरील खोलित असणारे आण्णा समोर मुख्य दरवाजात जिन्याच्या तोंडाला पळूरेकराला सावरतात (आपण मात्र भुईवरील नक्षी बघण्याचा आटोकाट प्रयत्न करत रहातो अन जेव्हा ती दिसते तेव्हा खूप भ्रमनिरास होतो. संपुर्ण वाड्याला रिपेंट करणार्‍या पेंटरने नक्षीसाठी मात्र पाट्या टाकण्याचं काम केलं हे प्रकर्षाने जाणावतंं Uhoh ). मग आण्णा त्या पळूरेकराला जेवण्यासाठी गादीवर बसवतात (आपलं मन मात्र दिवाणखान्यातलं गणापती-लक्ष्मी-सरस्वतीचं चित्र बघण्यात रमतं..!) अन समोर चांदीच्या चौरंगावर चांदीच्या ताटात सुग्रास भोजन वाढलेलं असतं (आपण पुन्हा एकदा माई नाही निदान सरिताची लगबग बघायला मिळते का.. निदान छाया तरी आत्ता येऊन भोचकपणे काहीतरी बोलताना दिसेल किंवा गेला बाजार पांडु तरी "इसारलंय..इसारलंय.." करत हात झटकत आत येईल अशी वाट बघत बसतो..! पण हिरमोडच होतो.. कोण्णी कोण्णी येत नाही Uhoh ).

जेवण झाल्यावर आण्णा पळूरेकराला त्याच्या माडीवरच्या खोलियेत झोपवतात अन सकाळ होते तेव्हा इस्टेट एजंट परुळेकराला उठवत असतो. झापड आलेल्या परुळेकराला जाग येते खरी पण आपणाला समोरचं दृष्य बघून अतिशय धक्का बसतो. रात्री झुंबर-हुंड्यांनी उजळून निघालेल्या खोलीची अक्षरशः वाताहत झालेली असते. संपुर्ण खोली जाळ्या-जळमटांनी अन धुळीने भरलेली असते अन खाट, कपाट, मेज, खुर्च्या, बाकं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं.. छताची कौलं फुटलेली असतात. Uhoh Uhoh Uhoh एजंट परुळेकराला उठवतो तर परुळेकराने जेवणाऐवजी यथेच्छ माती खाल्लेली दिसते. घाबरलेला परुळेकर ओरडत जिन्यावरून खाली येतो खरा पण दिवाणखाना, ओसरी अन संपुर्ण वाडा इतका विद्रुप झालेला असतो की त्याच्या ऐवजी आपल्याच अंगावर भितीने अन संतापाने काटा उभा रहातो Uhoh :रागः

एजंट त्या परुळेकराला थांबवायचा अटोकाट प्रयत्न करतो पण परुळेकर कसाबसा बूट घालत कार मधे बसून पळ काढतो तेव्हा तो बुट घालताना रात्री करकरीत नवीन असणारी आण्णांची वहाण कुजून जीर्ण झालेली दिसते. आपणाला धक्का बसतो की नाईकांच्या वाड्याचं हे असं मातेरं का झालं असेल...? माई, सरिता, दत्ता, छाया, माधव, अभिराम, देविका कुठे आहेत..? निलिमाला नक्की कोणती शिक्षा झाली..?? असे असंख्य प्रश्न समोर उभे रहात असतानाच ४० मिनिटांचा लांबलेला पहिला एपिसोड समाप्त होतो.

प्रीकॅप मधे कोणीतरी गावगुंड त्या इस्टेट एजंटाला धमकावत असतो अन वाड्याचा व्यवहार का होत नाही म्हणुन जाब विचारत असतो. पाटणकरणीच्या (दुसर्‍या) घराच्या ठिकाणाहून भेसूर वाड्यावर कॅमेरा रोखलेला असतो अन त्या फ्रेममधे जुने पोतेरं झालेलं लुगडं नेसलेली म्हातारी पुसटशी दिसते (ही नक्कीच माई असणार यात शंका नाही.. तिला अशा अवतारात बघणे अतिशय क्लेशदायक ठरणार Uhoh )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिपीट का दाखवत नाहीत. बाकी भंगार मालिका दिवसातून चार वेळा दाखवतात. सरिताला बघून दया आली. ज्याप्रमाणे ती साडया पसरवून बसली होती आणि पावडर लावून वाड्यावर आली त्यावरून तिला वेड लागलंय का अशी शंका आली. कावेरीला मराठी कसे समजते, म्हणजे अभिराम तिच्याशी मराठीतच बोलतो. आजचा भाग तर डेंजर होता, लाल पाणी काय आणि कावेरी गेल्याचे तिलाच स्वप्न पडते. ही मालिका चालू ठेवून दुसऱ्या खोलीत गेल्यावर अतिशय भीती वाटते, पार्श्वसंगीत भयाण आहे.

घर लागले. माईचे स्वयंपाक घर बघून फार मस्त वाटले. अभिराम आई बरोबर खाली बसून बोलतो ते फार सुरेख भावात्मक. तसेच ते ओळखी चे संगीत तुकडे. भुताचा एक. संकटाच्या चाहुलीचा, घरातल्या गंमतीचा, एक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी वाजतो तो. सगळे वयस्कर झाले आहेत.

नवी सुसल्या काही फिट होत नाही मात्र. माईचा वावर सहज आहे. पांडबा नेहमीचेच.

कावेरी नथ घालूनच झोपलेली?!

एपिसोड # ८

कालचा भाग सुरु होते तीच मुळी वाड्याचं उजळलेलं बाह्यरंग दर्शवत. दुसर्‍याच सीन मधे कावेरी तिच्या कॉटवर तोंड वेंगाडत या कुशीवरून त्या कुशीवर अन त्या कुशीवरून या कुशीवर स्वतःचे हात, दंड दाबत पहुडलेली असते. काल सरिताने कावेरीचे दोन्ही हात अतिशय जोरात पकडल्यामुळे कावेरीला हा त्रास होत असावा असं आपणाला वाटतं. इतक्यात अभिराम खोलित येऊन कावेरीला गरम पाण्याची पिशवी अंग शेकण्यासाठी ठेऊन जातो. जाता-जाता कावेरी त्याला तिच्या नाकातली नथ काढून देते अन तो ती नथ टेबलावर ठेऊन खोलीचं दार बंद करून निघून जातो. त्याच वेळी हे..हे..हे............ ये..ये..ये.......ई.ई..ई...ई.... हे पेटंट म्युजिक वाजत टेबलावर ठेवलेल्या नथीला कापरं भरतं अन ती थरथरू लागते (हे असलं काहीतरी दाखवण्याची काय गरज पडली कुणास ठाऊक. उलट गेल्या सिझन मधे पहिल्या सिझनचे हे असले भुताटकीचे प्रकार हे मनाचे भास होते असं दाखवलं होतं. आताही आपण तसंच समजून हे सोसवून घ्यायचं..! Uhoh )

मग पुढच्याच क्षणाला कॉटवर झोपलेल्या कावेरिला अंगदुखीचा त्रास होऊ लागतो अन तिचं पुन्हा एकदा तोंड वेंगाडत या कुशीवरून त्या कुशीवर होत रहाण्याचे सोपस्कर ती पार पाडू लागते. तेवढ्यात तिला कोणीतरी रडतानाचा आवाज येतो. ती उठून बघते तर अभिराम तिथंच खाली बसून रडत असतो. तिला दिसतं की तिचं स्वतःचंच मढं अभिरामच्या समोर नाकात कापुस अन तोंडात पान ठेऊन झोपवलेलं आहे अन त्यासमोर अभिराम ती वारली असं समजून रडत आहे Uhoh हे बघून तिला भयानक भिती वाटते अन ती अभिरामला ओरडुन ती जिवंत असल्याचं सांगु लागते तेवढ्यात तो तिचा भास होता असं लक्षात येऊन ती उठून पलिकडच्या टेबलावर ठेवलेल्या पितळी तांब्यातलं पाणी पितळी पात्रात घेऊन पिते अन पुन्हा कॉटवर झोपते.

मग आकेरीचं ड्रोन वरून चित्रण बघत कॅमेरा आपणाला सुसल्याच्या घरापुढं आणुन सोडतो. तिथं लाल-पिवळं तोंड घेऊन केस विस्कटलेली सरिता येते अन फाटकातून आत शिरत तिथं उभ्या असलेल्या पांडुला सुसल्या कुठं आहे असं विचारते. सरिताला अशी लाल-पिवळी झालेली बघून पांडू जाम घाबरतो अन तिला ती कोण आहे असं विचारतो. त्यावर सरिता त्याला ओळख पटवून देते तेव्हा पांडु तिला म्हणातो की दत्ता भाऊचा मार खाऊन ती अशी लाल-पिवळी झाली आहे का Biggrin . त्यावर सरिता त्याला झापते अन म्हणते की त्याच्या दत्ता भाऊत आहे का सरिताला मारायची हिंमत अन त्याला सुसल्या कुठं आहे हे ती पुन्हा एकदा विचारते. त्यावर पांडु सरिताला म्हणतो की तिने सुसल्याला सुसल्या म्हणु नये तर मालकीण म्हणावं नाहीतर सुसल्या खूप मारेल Proud . मग त्याबरहुकुम वागत सरिता सुसल्याच्या घराचा दरवाजा ठोठावते अन मग हळूच दरवाजा उघडत आताची नवी सुसल्या केवीलवाणं अवसान घेत जुन्या सुसल्यासारखी सुसल्या दाखवण्याचा अटोकाट प्रयत्न करताना दिसते (हिला तोच पेटंट चिरगूट ड्रेस का दिलाय हे मात्र समजत नाही Proud ). मग सुसल्या सरिताला तिचे हे हाल कुणी केले असं विचारते तेव्हा सरिता सुसल्याला ती वाड्यावरून आली आहे अन वाड्यात अभिरामच्या नवीन बायकोने तिचे हे हाल केले असं सांगते. त्यावर चमकलेली सुसल्या १०० ची नोट सरिताला देत तिला दत्ताला घेऊन वाड्यात रहायला जाण्याची सुचना करत तिथून पिटाळून लावते अन ते बोलणं तिथं असलेला पांडु ऐकतो. Wink

इकडे वाड्यात माई स्वयपाक घरातून मीठ-मिरच्या घेऊन माडीवर कावेरीच्या खोलीत निघालेली असते (खरं तर कावेरीची खोली हे माजघरच असते पण आपणाला तिची खोली माडीवर आहे असं उगीच दाखवलेलं आहे..!) अन जिन्याच्या तोंडालाच औषधं आणायला घरातून बाहेर जाणारा अभिराम तिला दिसतो. घाईत असणाअरी माई त्याला बाजुक रव ती कावेरीची झाप काढायला निघाली आहे असं सांगते. ते ऐकून अभिरामची सटकते अन तो माईला हे झाप वगैरे सगळं खोटं असतं वगैरे ऐकवू लागतो. अशी झाप काढुन सगळं ठिक्ठाक होत असतं तर ह्या घराची ही अवस्था का झाली असती असा प्रश्न करत तो माईला निरुत्तर करतो. माईला भयानक वाईट वाटतं अन ती रडू लागते. तिचं रडु बघितल्यावर अभिराम वरमतो आणि त्याला तिला दुखवायचं नव्हतं असं सांगतो. जर हे असं झाप काढून अन देवीला नारळ वाहून सगळं ठीक होईल असं माईला वाटत असेल तर तिने ते करावं असं सांगून घरातून बाहेर पाऊल टाकतो. माई पण यामुळे थोडी प्रसन्न होते अन देवघरात जाऊन देवापुढे बसते. तिथं देवाला समजाऊन सांगत असतानाच पांडबा तिच्याशेजारी येऊन बसतो. माई त्याला सुसल्या त्रास तर देत नाही ना त्याला असं मायेने विचारत असते तेव्हा तो तिला सरिता वाड्यावर येणार आहे असं सांगतो. त्याला सावल्या दिसतात असं सांगत त्यातली एक सावली आजारी आहे असं तो म्हणतो त्यावर माई पुन्हा काळजीत पडते.

तिकडे खोलियेत कावेरीचं पुन्हा तेच झोपेत तोंड वेंगाडत अन स्वतःच स्वतःचे पाठ-खांदे स्वतःच चेपत इकडच्या कुशीवरून तिकडच्या कुशीवर होणं सुरु होतं अन आपणाला तिच्या या उलथा-पालथीचा कंटाळा येत असतानाच तिल पुन्हा भेकण्याचा आवाज येऊ लागतो. ती पुन्हा झोपेतून उठून उभी रहात खोलीतुन बाहेर पडते अन जिन्यावरून खाली उतरू लागते तेव्हा गणपती-लक्ष्मी-सरस्वतीच्या चित्रासमोरील कॉटच्या पुढे एका म्हातारी पुढे माई भेकत असते अन बाजुलाच कावेरीचा हसर्‍या फोटोला हार घातलेला असतो अन समोर पाटावर पीठ अन दिवा लावलेला कावेरीला दिसतो. माई त्या म्हातारीला सांगत असते की नवी नवरी अशी ८ दिवसाच्या आत गेली कि गो... अन पुन्हा तिचं भेकणं सुरू होतं. मग कावेरी माईला जिन्यातूनच मल्याळीत सांगु लागते की ती जिवंत आहे ती जिवंत आहे.. पण तिचा आवाज माईपर्यंत पोचत नाही अन हे स्वप्नातलं स्वप्नं तेंव्हा उलगडतं तेव्हा घामाघूम झालेली कावेरी पुन्हा उठून कॉटवर बसते. ती पाणी प्यायला जाते तर पितळी तांब्यात लाल रंगाचं पाणी असतं तेबघून ती जाम घाबरते अन तिच्या हातून तांब्या सटकतो. ती धावत जिन्यावरून खाली जाऊ लागते अन एपिसोड संपतो.

प्रीकॅपमधे पांडबा जिन्याच्या तोंडालाच उभा असतो अन त्याला वरून जिन्यावरून आलेली कावेरी समोर भिंतीतल्या आरशात पाटणकरीण झालेली दिसते. "शेवंता" असं आरशाकडे बोट दाखवत तो ओरडत मागे जिन्याकडे बघतो तर त्याला जिन्यात कावेरी दिसते.

कावेरी ती काय दक्षिणी भाषा बोलते ते छान वाट्ते. कुठुन मिळाले हे पार्सल ?! नौवा रीत पन मस्त दिसते.

कुठुन मिळाले हे पार्सल ?>> अभिराम अमेरिकेत ज्या कंपनीत नोकरी करत होता तिथेच ही कावेरी पण काम करत असते. नंतर त्या कंपनीने दोघांना बेंगलोर लोकेशनला पाठवलेलं असतं (इथं लोकं बेंगलोरहून अमेरिकेला जातात अन हे दोघे उलटी गंगा Proud ) अन मग इथे आल्यावर दोघं तो जॉब सोडून नवीन कंपनी सुरु करतात अन लग्नही करतात.

एपिसोड # ९

कालचा एपिसोड सुरु होतो तो आपणाला वाड्याचा दर्शनी भाग दाखवण्यासाठी ट्रॉलीवर बसवून खालून वर हळूवार स्क्रॉल करत. दुसर्‍याच क्षणाला आपण थेट माईच्या स्वयपाकघरात अगदी वेगळ्याच अँगलने जमीनीवर बसतो जेणे करून पश्चिमेकडून पुर्वेकडे संपूर्ण स्वयपाकघर दिसु शकेल. माई एका कापडावर जातं ठेऊन त्यावर तांदूळ दळत असते. चांगलं पायलीभर पीठ काढल्यावर त्यातील थोड पीठ ती पितळी ताटात घेते अन मिचमिच्या डोळ्यांनी काळ्या तीळाची बरणी जवळ ओढून त्यातले काही तीळ ती पीठात टाकते अन "आता मी सोडूची नाय.. माझ्या पोरांक कायोक होऊ देऊची नाय.." असं काहीसं पुटपुटत ती स्वयपाकघरातून दिवाणखान्यात अन तिथून ओसरीत जाऊ लागते.

तिकडे खोलीत गेल्या ३ दिवसांपासून झोपलेल्या कावेरीची अंगदुखी अजुनही सुरुच असते अन तिचं ते तोंड वेंगाडत या कुशीवरून त्या कुशीवर होणं आपण तोंड वाकडं करून पाहू लागतो. मधेच ती दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवत वैतागू लागते तेवढ्यात अभिराम येतो. ती अभिरामला सांगते की कशाचा तरी आवाज येतोय अन त्यामुळे तिचं डोकं धरलंय. त्यावर अभिराम तिला सांगतो की माई खाली जात्यावर दळण दळतेय त्याचा तो आवाज आहे. त्यावर तो आवाज असह्य झालेली कावेरी त्याला सांगते की खाली जाऊन तो आवाज बंद करायला सांगा. मग अभिराम जिन्याने खाली जाऊ लागतो तेवढ्यात माई स्वयपाक घरातून दळलेलं पीठ अन काळे तीळ ताटात घेऊन बाहेर निघालेली असते. माईच्या हातातील ऐवज बघून अभिराम तिला ते काय आहे असं विचारतो. त्यावर माई त्याला बाजूक रव म्हणत तिथून बाहेर अंगणात जाऊ लागते.. तिचा रोख पाटणकरणीने फास घेतलेल्या झाडाकडे असतो.

पाटणकरणीने फास घेतलेल्या झाडाखाली येत माई पाटणकरणीला उद्देशून अद्वातद्वा बोलु लागते अन तेवढ्यात अभिराम तिच्या मागे येतोच. अभिराम तिला हे सर्व काय आहे आणि हे सर्व थांबव असं म्हणतो खरा पण माई मात्र तिच्या निश्चयापासून आजिबात न ढळता ती तिच्या सुनेला-पोराबाळांना त्रास देणार्‍या या भुताटकीचा बंदोबस्त करेल असं म्हणत हातातील पितळी ताटातून तांदळाचं पीठ अन काळ्या तिळाचं मिश्रण पाराभोवती टाकत एक फेरी पूर्ण करते अन हातातलं रिकामं ताट दाणकन जमीनीवर आदळत त्याच झाडाखाली हात जोडून देवाला विनवते की बाबा रे तिच्या पोरांचं रक्षण कर. ते बघून अभिरामला खूप वाईट वाटतं. Uhoh

माई न थांबता पुन्हा स्वयपाकघरात जाते तिच्या मागोमाग अभिराम घरात येऊन दिवाणखान्यातील कॉटवर बसलेलाच असतो तेवढ्यात जळते निखारे सुपलीत घेऊन माई तिथं येते अन त्यावर मिरच्या टाकुन धूर करते. त्या धुराने ठसकत अभिराम तिला हे असं काय करते म्हणुन पुन्हा विचारू लागतो त्यावर माई त्याला गप्प रहायला सांगत सगळ्या घरात तो धूर फिरवू लागते (यावेळेस आपणाला बैठकीच्या खोलीत वेगवेगळ्या पण उत्सुकता शमवणार्‍या अँगलने शुटींग घेतलेलं दिसतं Bw ). अभिराम तो धूर कावेरीच्या खोलीत नको नेऊ असं माईला सांगतो खरा पण माई त्याचं काही एक न ऐकता तिथंही धूर फिरवून ते निखारे घेऊन ओसरीत येते अन घराची इडा-पिडा टळो असं म्हणत असताना तिला समोरून कुणीतरी येताना दिसतं अन ती सरिता आहे हे बघून माईचे मिचमिचे डोळे विस्फारतात Proud

सरिता दोन्ही हातात बोचकी घेऊन फाटकातून आत येत ओसरीसमोर येते त्याच वेळेस माई हातातल्या सुपलीतले निखारे सर्रर्रर्रर्रकन सरिताच्या दिशेने फेकते अन तिचे पाय त्या निखार्‍यांवर पडता पडता वाचतात. मग सरिता अन माईचा जो कलगीतुरा सुरू होतो त्याला शब्दात सांगणे केवळ व्यर्थ Biggrin . एकमेकींचे उणेदुणे काढत त्या वाडा डोक्यावर घेतात अन त्यांच्या आवाजाने खोलीत झोपलेली कावेरी दचकू लागते अन अभिराम तिला गोंजारू लागतो. शेवटी माई अन सरिताचं द्वंद्व असह्य होत अभिराम खाली ओसरीत येतो अन घरात यायला बघणार्‍या सरिताची बोचकी माई पुन्हा ओसरीतून बाहेर फेकून देताना त्याला दिसते. अभिरामला तिथं बघून सरिता त्याला तिचा घरावर कसा हक्क आहे हे सुनावते. अभिरामाच्या हातातील घड्याळ बघून सरिताला लालसा सुटते पण माई तिला अभिराम पासून पुन्हा दूर करत घरातून हाकलू बघते. अभिराम माईला शांत करत सरिता वैनीचा देखिल घरावर कायद्याने कसा हक्क आहे हे सांगत गप्प करतो अन पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखी सरिता माईने फेकलेली तिची २ बोचकी पुन्हा उचलून थेट आत जाऊ लागते. माई अभिरामला सुनावते की जरी ही अवदसा पुन्हा घरात आली असली तरी तिला अन्नाचा एक कणही देणार नाही म्हणून त्यावर वचवची सरिता स्वतःच्या छातीवर हात आपटत माईला सांगते की तुम्ही जशा स्वाभिमानी नाईक आहात तशीच ती देखील स्वाभिमानी नाईकच आहे अन तिला माईच्या हातचं एक शीत देखील नको असं फणकार्‍याने सांगत ती दिवाणखान्यातून माजघरात अन तिथून परसदारी गेलेली दिसते. Proud

मग इकडे खोलीत झोपलेल्या कावेरीला पुन्हा कसले आवाज येऊ लागतात अन ती आण्णांच्या खोलीत जाते. तिथं त्यांचं चित्र पहात अन बंदुक बघत ती पाटणकरणीसारखं लाडिकपणे कपाळावरील बट कुरवाळत आण्णांना येण्याची आर्जवं करू लागते. त्याचवेळी अभिराम तिथं येतो अन त्या मल्लु कावेरीला भानावर आणायला बघतो तर ती बेशुद्ध पडते. मग अभिराम माईला हाका मारू लागतो तेव्हाच एपिसोड संपतो.

प्रीकॅप लक्षात नाही... तसंही प्रीकॅप अन पुढील एपिसोडचं गणीत थोडं चुकल्यासारखंच दिसतंय Uhoh

झी च्या FB पेजवर एक पोस्ट बघितली त्यात एकाने टाकले होते कि पहिल्या राखेच्या मध्ये लास्ट एपिसोड ला , त्या माधवाच्या बायकोला जी लेडी पोलीस हाताला धरून घेऊन जाते ती दुसऱ्या सीजन पासून दाखवण्यात आलेली सरिता आहे । व्हिडीओ नीट पाहिल्यावर माझीही खात्री पटली ।

या माधवाच्या बायकोला जी लेडी पोलीस हाताला धरून घेऊन जाते ती दुसऱ्या सीजन पासून दाखवण्यात आलेली सरिता आहे>> हे तर राखेचा२ च्या धाग्यावर पण फोटोसहीत लिहिलेलं आहे Wink

छायाम्मा छायाम्मा छायाम्मा घरी आली सुस ल्याच्या सागण्यावरून. त्यांचे भक्त गण पण आले. मोठाच पुजा आरतीचा शो झाला. हा एका प्रकारे विनोदी व चिंताजनक होता. सरिता छायाच्या मदतीस येते . माधव ला पण पांडू घेउन आला घरी व त्याला साफ केले. एके काळी माधवाने दत्ताने पांडूला विहि रीवर नेउन साफ केले होते त्याची आठव्ण होते. छायाचा प्रकार अभिराम व माईला आजिबात पसं त नसतो.

अंगात आलेली कावेरी रात्रीतून छायाचे आसन उलथून टाकते. ह्या प्रकाराचे निराकरण करयला रघु रघु रघु माहराज पण येतात घरी व रात्रीतून ध्यान लावू बघतात. पण नेक्स्ट डे सकाळी थोबाडलेल्या अवस्थेत विहिरीच्या मागे पडलेले सापडतात. हे परत त्यांच्या आश्रमात येतात.
ह्यांचे भोळे भक्त व अनुयायी बघून कसे तरीच होते. पण हे सत्यपरिस्थिती आहे.

कावेरी व सयाजीराव मध्ये मधू नच शेवंता आण्णा चा साक्षात्कार होतो. सयाजी रावाचा एक व्हायोलेट कलर चा शर्ट पण अण् णा च्या शर्ट ची आठवण करून देतो. सरिता त्यांच्या तील गॅट मॅट बघते व सुसल्यला सांगा यला जाते पण तिचा विश्वास बसत नाही.
तो बसावा म्हणून सरिता मंदिरके बहाने कावेरीला त्यांच्या घरी नेते पण सयाजी कावेरी एकमेकांना ओळखत पण नाहीत. अभिराम तिला सुसल्याकडे येउन घरी घेउन जातो. माई तिला संभाळून वाग असा सल्ला देते.

आजच्या म्हणजे कालच्या भागात बहुतेक शेवं ता च्या भुताची एंट्री आहे. अपूर्वा नेमळे कर जबरी दिसते. त्यामानाने सयाजी व कावेरी लहान मुले आई बाबांची नक्कल करून खेळत आहेत असे वाट्ते. एक लव्ह सीन आहे. तो सरिता बघायचा प्रयत्न करते घरात कोणास तरी दाखवायचे म्हणून छायाला उठवायचा प्रयत्न करते. छाया टीशर्ट बॉब, पायजमा ह्या लॉक डाउन अवतारात बघून मजा वा टते. अगदी मुंबईकरीण दिसते. त्या घराबाहेर जाउन त्यांना रंगेहात पकडायचा प्रयत्न करतात पण भुतिया शक्तीने दारे बंद होतात. विहिरीपाशी अजून एक लव्ह सीन होतो. तो अंम ळ मस्तच आहे. इन सम अदर वर्ल्ड दे वेअर परफेक्ट फॉर इच अदर. शेवंताचे वजन वाढले आहे. पाठीला वळ्या!!!

मग माई अभिराम पण उठून येतात व सर्व वरात त्यांना शोधायला जाते. माई दार उघडते तेव्हा सयाजी गायब व कावेरी झोपाळ्यावर पडलेली दिसते. आता जर कावेरी दिसली तर ती परत घरातू न बाहेर पडणार नाही अशी तंबी माई सर्वांना देते व कावेरीला बाहेर बघून सर्वांना धक्का बसतो.

अमा, मस्त लिहिलं तुम्ही. तुम्ही पण लिहीत जा ना. खुसखुशीत लिहिता.. प्लीज लिहीत चला. शेवंताचे वजन वाढले आहे. पाठीला वळ्या!!!>> Biggrin

@अनिश्का - मी ठीक आहे.गेल्या शनिवार अन् रविवार मला ताप आलेला अन् कोविड१९ च्या शक्यतेने सोमवारी टेस्ट केली जी निगेटिव्ह आली. सगळं ठीक आहे आता. आराम केला ४ दिवस. धन्यवाद Bw

Dj काळजी घ्या लवकर बरे व्हा....
अमा प्रकॄति कशी आहे आता??? छान लिहिलेत आज...तुम्ही ही लवकरात लवकर बरया व्हा....

ती कावेरी आणि सयाजी अंगात भुते शिरल्यावर जो येडछाप अभिनय करतात ते पाहून वैताग येतोय. लहान मुले तरी ह्यांच्यापेक्षा चांगला अभिनय करतील. मी जास्तकरून रियालिटी शोज पाहते ते आपले एका ठराविक काळात संपतात. पण राखेचा अगदी पहिल्या सिझन पासून बघतेय आणि आवडतोयही. पण या वेळेस खूपच स्लो सुरू आहे. आणि या दोन नवीन एन्ट्रीनीं वैताग आणलाय. ते दोघेही आपल्या मूळ कॅरेक्टर मध्ये चांगले आहेत पण भुतं शिरल्यावर गंडतात.

Biggrin अगदी अगदी.

आज काय तर म्हणे कावेरी पाटणकरणीच्या जुन्या घरी जाणार अन हातानेच कुलुप तोडणार.. आत सयाजी वाट बघतोच आहे. अर्थात प्रीकॅपचा अन वास्तवातील एपिसोडची लिंक लागतेच असं नाही सद्ध्या.

काल कावेरीने सुसल्याला थेट मायेने जवळ घेत आईच्या काळजीने डोळ्यात पाणी अणलं हे बघून हसावं की रडावं असं झालं.

काल कावेरीने सुसल्याला थेट मायेने जवळ घेत आईच्या काळजीने डोळ्यात पाणी अणलं हे बघून हसावं की रडावं असं झालं. >>>>>हो ना।

झी ५ चे FB वर अपडेट मध्ये पाहिले कि अभि आणि कावेरी फिरायला जातात तेव्हा त्यांची गाडी बंद पडते आणि तो गाडी चेक करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा कावेरी तिथून सटकते आणि थेट शेवंताच्या घरी (पाटणकर आणि सुसल्या सोबत असतानाचे घर ) पोहचते तिथले टाळे तोडून आत घुसते तर ऑलरेडी आत मान वाकड्या सयाजी असतो आणि त्यांचे प्रेमचाळे सुरु होतात। इथे अभि कावेरी ला शोधत तिथे पोचतो तर दोघेही गायब आणि कावेरी थेट अण्णा च्या वाड्यासमोर. अभि तिकडे येतो आणि हिला ट्रान्स अवस्थेच बघून हबकतो तर हि बया त्यालाच विचारते कि आपण इकडे कसे पोचलो। उद्याच्या एपी मध्ये किंवा आजच बहुदा दत्ता , सरिताला न्यायला येतो पण हि काय त्याच्या वांगडा जाना नाय .

ती कशी जाईत दत्तावांगडा.. तिका तर माईचो डोक्यावर मीरे वाटुचे असात. ह्या सर्तिआ कोणत्या नकितरात जन्माक इलिहां तां रवळनाथाक म्हाईत. माईक उलटा बोलतां म्हंजे काय म्हणायचं तिका..! माईन ढिली सोडल्यान म्हणान अशी अवस्था झालीहा तिची. थोरली सुन खून करुन तुरुंगात खडी फोडुक जातली अन ह्ये मधली सून डोक्यावर मीर्‍ए वाटुक येतली. धाकट्या सुनेचो तर घटस्फोट झालाहा अन तिच्या जागी नवी सून आली तिची ही तर्‍हा..! काय व्हईत तां काय कळणा नाय रे बाबा..!!

पहिल्या भागातली सरिता आणि तिसऱ्या भागातली सरिता रिलेट होतात (कजाग, भांडखोर बोलणं , लोचट स्वभाव) पण मधली दुसऱ्या भागातली सरिता वेगळीच वाटायची म्हणजे गरीब घरातून येऊनही घरंदाज , आब राखणारी , नणंदेला समजून घेणारी।
पांडूने यावेळी बिचारीला एकदम लाचार करून ठेवले आहे कालच्या भागात ती सुसल्याच्या हातातील ब्रेड बटर पाहून ते खाण्याची मागणी करते आणि सुसल्या कडक ब्रेड उष्टावलेल्या सुरीला अगदीच नखभर बटर लावून देते व तेही सरिता अगदीच मिटक्या मारत खाते ते बघून फार वाईट वाटले

अगदी अगदी.. माझ्याही मनात अशीच कणव दाटून आली ह्या सरिताबद्दल. खरं तर आता दुसर्‍या सिझन मधल्या सरिताऐवजी पहिल्या सीझनच्या सरिताला घेतलं असतं तर ती वयाला आणि भुमिकेलाही फिट्ट बसली असती असं वाटतं.

Pages