आपली मायबोली आणि आपली जबाबदारी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या काही दिवसात मायबोलीवरचे वाद हमरीतुमरीवर आले. कुठल्याही भांडणामधे होते तसे आधी कुणी भांडण सुरु केले (किती आधीपासून सुरू केले) कुणी कसे वाढवले याची शहानिशा करणे अवघड. किंवा हे अवघड याचा काही जण फायदा घेतानाही दिसून येतात. इतकं नक्की की भांडण कधी एका व्यक्तीमुळे वाढत नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे जिथे भांडण्/वाद सुरु आहेत तिथे आणखी अनेक जण समर्थनासाठी येतात आणि भांडण सोडवणं आणखी अवघड होऊन बसतं.

यापुढे भांडण सुरु करणारे, वाढवणारे, समर्थन करणारे सगळ्यांचाच मायबोलीवरचा प्रवेश रद्द करावा लागला तर तो केला जाईल. यात दुर्देवाने नवीन जुने कुणिही मायबोलीकर असले तरी आमचा नाईलाज असेल. जेंव्हा इतर मायबोलीकर आता भांडण बास असे म्हणतील तेंव्हा तरी त्यात सहभागी असणार्‍यानी योग्य तो इशारा ओळखून वैयक्तिक संदेशातून संपर्क साधण्याचा पर्याय स्विकारणे अपेक्षीत आहे.

मायबोली जी काही आहे ती मायबोलीच्या आग्रह करण्याच्या पण सक्ती न करण्याच्या धोरणामुळे आहे. मग तो शुद्धलेखनाचा असो, देवनागरीकरणाचा असो, रतीब न घालण्याचा असो वा दर्जा टिकवण्याचा असो. पण गेल्या काही दिवसात हा आग्रह फारच टोकाला जाऊन धमकी वाटावी अशा प्रतिक्रियांपर्यंत गेला आहे. मायबोलीवरचे वातावरण टिकवण्यासाठी अशा टोकाला जाण्यार्‍या कुणाचा प्रवेश बंद करावा लागला तर नाईलाजाने का होईना ते पाऊल उचलण्यात येईल. हे धोरण कदाचित काही मायबोलीकरांना मान्य नसेल पण ते धोरण म्हणून मायबोलीने स्विकारले आहे.

विषय: 
प्रकार: 

एडमिन,
काल अचानक १०-१२ आयडी डिलिट झाले.ही action फारशी पटली नाही.दामोदरसुत नावाच्या एका मेम्बरने उघडलेल्या लोहियांच्या पुस्तकाच्या बीबीवरून ही action घेतली असावी असे मला वाटते.इतर बर्‍याच मेम्बरना ही action पटलेली नाहि,पण काही जणांना योग्य वाटली.दामोदरसुत यांनी उघडलेला हा बीबी पण अप्रकाशित झालाय.या बीबीवर या १०-१२ जणांनी नक्की काय लिहिले होते ज्यामुळे हि action घेतली?मी तो बीबी वाचत होतो.त्यात मला तशी काहीच वावगी पोस्ट दिसली नाही.२ आयडींची काही भांडणे सुरू होती.एकाने दुसर्‍याला डिवचल्यानंतर दुसर्‍याने त्याला strong response दिला होता.हे सोडले तर इतरांनी काहीच वावगे लिहिल्याचे दिसले नव्हते.हा बीबी उघडणार्‍या दामोदरसुत या मेम्बरचेही अकाऊंट ब्लॉक केलेले दिसते.त्यांनी फक्त पुस्तकाची ओळख करून दिलि होति.त्या ओळखीत अजिबात वाईट लिहिले नव्हते.पण तरी त्यांचा आयडी ब्लॉक कसा झाला?
माझी एक सजेशन आहे. या बीबीतल्या ज्या पोस्टमुळे या १०-१२ जणांचे आयडी डिलिट केले त्या पोस्ट एका नवीन बीबीवर टाकल्या तर इतरांना बघता येतील व ही टोकाची एक्शन का घेतली हे कळेल.किंवा लोहियांच्या पुस्तकावरचा हा बीबी पुन्हा प्रकाशित करावा.म्हणजे त्यात कुणी काय वावगे लिहिले आहे ते इतरांना कळेल व तुमची एक्शन जस्टिफाय करता येइल व इतरा्ंच्या शंका मिटतिल.
मला ही एक्शन फारच कडक वाटते.ती रिव्होक करावी.

अनुमोदन नरेन्द्र

जाती धर्म विषयक लेखन या बाफवरचे << तसेच राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावरून इथे बाचाबाची करू नये. >> हे वाक्य प्रशासनाने आज टाकले आहे. यावरुन आता आपल्या कृत्याचे लंगडे समर्थन करण्याचा प्रशासनाचा प्रत्यत्न दिसतो. माफ करा पण यावेळी मात्र प्रशासनाचे चुकले आहे हे सांगावेसे वाटते.

"जाती धर्म विषयक लेखन या बाफवरचे << तसेच राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावरून इथे बाचाबाची करू नये. >> हे वाक्य प्रशासनाने आज टाकले आहे. यावरुन आता आपल्या कृत्याचे लंगडे समर्थन करण्याचा प्रशासनाचा प्रत्यत्न दिसतो. माफ करा पण यावेळी मात्र प्रशासनाचे चुकले आहे हे सांगावेसे वाटते."

नक्की कुठल्या पोस्टमुळे ही एक्शन घेतली हे समजतच नाहि कारण तो बीबी अप्रकाशित केलेला आहे.एकदम १०-१२ आयडि ब्लॉक करण्याची ही पहिलिच वेळ असावी.

मोठी कारवाई झाली आहे. पेट्रोलचे भाव वाढवल्यानंतर थोडे कमीही केले जातात. कारवाई या पद्धतीची होऊ शकते हे सगळ्यांना कळालेले आहे. हेतू साध्य झालेला असावा असं वाटतं. सभ्य आयडींना पुन्हा प्रवेश देण्यात यावा असं मनापासून वाटतं. अर्थात अ‍ॅडमिनच्या निर्णयाचा संपूर्ण आदर आहेच !

सभ्य आयडींना पुन्हा प्रवेश देण्यात यावा असं मनापासून वाटतं. अर्थात अ‍ॅडमिनच्या निर्णयाचा संपूर्ण आदर आहेच !

एकदा आय डी ना बाहेर काढल्यानंतर पुन्हा त्याना घ्यायला सांगणं हा अ‍ॅडमिनच्या निर्णयाचा अपमानच नाही का?

उलट, असे केल्याने चुकीचा संदेश जाईल.... म्हणजे एखादा माणसाला बाहेर काढले, तेंव्हा अ‍ॅडमिनने फेर विचार केला नाही, आणि आता १०-१२ जणान बाहेर काढल्यावर मात्र फेर विचार करायला लावायचा म्हणजे झुंड शाहीला उघड प्रोत्साहनच देणे नाही का?

असे झाल्यास एका मोठ्या कंपूने दोन भाग करायचे, एकाने शिव्या द्यायच्या आणि दुसर्‍याने पहिल्यांवर अ‍ॅक्शन घेऊ नका म्हणून अ‍ॅडमिनवर दबाव टाकायचा असे प्रकार चालू होतील. Proud

जर माफ करायचेच असेल तर आज अखेरच्या सगळ्याच आय ड्याना - अगदी मधुकरासकट- सर्वाना का नाही जागे करायचे?

माझी एक सजेशन आहे. या बीबीतल्या ज्या पोस्टमुळे या १०-१२ जणांचे आयडी डिलिट केले त्या पोस्ट एका नवीन बीबीवर टाकल्या तर इतरांना बघता येतील व ही टोकाची एक्शन का घेतली हे कळेल.किंवा लोहियांच्या पुस्तकावरचा हा बीबी पुन्हा प्रकाशित करावा.म्हणजे त्यात कुणी काय वावगे लिहिले आहे ते इतरांना कळेल व तुमची एक्शन जस्टिफाय करता येइल व इतरा्ंच्या शंका मिटतिल.

तशी मायबोलीची पद्धत नाही.

मागे एका बीबीवर मंदार जोशी व एका आय डी ने एकमेकांना महामूर्ख हा शब्द वापरला होता. गंमत म्हणजे त्यानंतर लगेच दुसरा आय डी ब्लॉक झाला, पण मंदार जोशी हा आय डी मात्र तसाच राहिला.. आणि तो धागाही नष्ट झाला.

मग तोही धागा पुन्हा प्रकाशित करावा, म्हणजे एकच अप्शब्द दोघानी वापरुनही फक्त एकावर अ‍ॅक्शन होते व एकावर नाही, हेही जगाला समजेल. अ‍ॅडमिनचे नियम किती पारदर्शी आहेत, हेही समजू द्या सर्वाना.

कु. नर्मदा बारटक्के | 19 July, 2012 - 20:40

"मागे एका बीबीवर मंदार जोशी व एका आय डी ने एकमेकांना महामूर्ख हा शब्द वापरला होता. गंमत म्हणजे त्यानंतर लगेच दुसरा आय डी ब्लॉक झाला, पण मंदार जोशी हा आय डी मात्र तसाच राहिला.. आणि तो धागाही नष्ट झाला." >>>>

हो..... असं झालं होतं ? कधी ?
गेल्या ३-४ आठवड्यात झाल्याचं मला तरी आठवत नाही.
मंदारही तसं कधी बोलला नाही.

नर्मदातै

तुमच्या प्वाईंटात दम आहे. मी फक्त सभ्य आयडी इतकाच उल्लेख केला आहे. कुणाचं नाव घेतलेलं नाही. मी जर कुणाचं नाव घेतलं तर त्याला अजिबातच प्रवेश मिळणार नाही Proud

कु. नर्मदा बारटक्के | 19 July, 2012 - 21:31 नवीन
त्यापूर्वीची गोष्ट असावी. >>>>
हो !!
तसं असेल तर ही गोष्ट तुम्हाला कशी माहित ??
सभासद होण्याआधीपासून तुम्ही मायबोलीच्या नियमित वाचक आहात का ?

हो.

माझं एक मत ......

सर्वप्रथम ’आयडी’ हा रूढ झालेला शब्द नामशेष व्हायला हवा.
सभासद किंवा मेंबर हा शब्द यापुढे वापरात यायला हवा.
खूप फरक पडेल त्याने.
एखादा म्हणेल, आयडी काय नी सभासद काय ?
कुठला शब्द वापरला म्हणून काय फरक पडतो ?
"नांवात काय आहे ?" असं ’बरनॉड शॉ’ म्हणाला होता ना !!

हा धागा पाहण्यातच आला नाही. इतकी सविस्तर चर्चा इथे चालू झाली असल्याचे पाहून एका अर्थी समाधान झाले असले तरी अजूनही 'सदस्यत्व रद्द होणे' ही वेळ येऊ देवूच नये यासाठी धागाविषय व प्रतिसादांना नेमके कशाप्रकारे संयतपणे सामोरे जाणे गरजेचे आहे यावरही जाणकार तसेच जुन्या सदस्यांनी प्रकाशझोत टाकावे.

आज एका संदर्भासाठी मला दामोदरसुत याना विपू पाठवावा असे वाटल्याने त्यांच्या नावावर क्लिकले असता 'सदरचे पान सापडत नाही' असा संदेश मला आला. प्रथम काहीतरी तांत्रिक अडचण असेल म्हणून थोडावेळ थांबलो तर त्याचवेळी दुसर्‍या एका जालीय मित्राने 'आयडी ब्लॉक' बद्दल माहिती दिली तसेच या धाग्याची लिंकही. आठदहा सदस्यांना प्रवेश प्रतिबंध केल्याचे दिसत आहे. हा निर्णय अ‍ॅडमिन टीमने घेतला असल्याने तो विचारपूर्वकच घेतला असणार हे नक्कीच असल्याने त्याविरुद्ध प्रतिकूल मत इथे व्यक्त करणे त्यांचा उपमर्द केल्यासारखे होईल.

कदाचित संबंधितांचे सदस्य 'तात्पुरते' गोठविले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही मंदार जोशी, दामोदरसुत, गामा पैलवान, ग्रेट थिंकर यांच्यासारखे नेहमी 'अ‍ॅक्टिव्ह' असणारे सदस्य बीबीवर दिसत नसल्याचे पाहुन चुकल्यासारखे होत आहे हे सांगणे मी गरजेचे मानतो.

मी स्वतः कधीही वादाच्या जंगलात शिरलेलो नाही. "इतिहास" विषयाला सर्वस्पर्शी असे अनेक धागे इथे वारंवार बोर्डावर येत असतात. त्यापैकी कित्येक धाग्यांच्या विषयांचा माझा (बर्‍यापैकी) अभ्यास असूनही ज्या रितीने धागा तसेच धागाकर्त्याची चिरफाड होत असते ते पाहून मनी असूनही मी तिथे प्रतिसाद देण्याचे धाडस करत नाही. एकदा तसे केले होतेही आणि त्यावर एका विशिष्ट आयडीचा अकारण 'तिरकस' असा प्रतिसाद आल्याचे पाहिल्याक्षणीच मी त्या धाग्यापासून दूर राहणे पसंत केले होते.

वाद जर अभ्यासाच्या चष्म्यातून घडत असतील (भाषाही सौजन्याची असेल) तर उत्तर देतानाही आनंद होत असतो, पण मूळ छुपे दुखणे केवळ राळच उडवायची असेल तर मग त्या अभ्यासाचा हेतू शून्यच. मात्र असे असले तरी मी सहभागाबाबत कधीही नैराश्य मनी आणले नाही; कारण मला जितपत आनंद मिळवायचा असतो येथील सहभागातून तो मी निश्चित्तच मिळवित असतो.

इग्नोर इज द बेस्ट पॉलिसी ही खूणगाठ मनी ठेवली तर मग अ‍ॅडमिन टीमलादेखील शिस्तीसाठी बॅनसारखी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता भासणार नाही.

अशोक पाटील

पराग.. Happy

मला काही फार माहिती आहे अशातली गोष्ट नाही पण हा मुद्दा निघालाच आहे तर इथलं रुट क्~ओज अनालिसिस अर्थात मूळ कारण जर ड्यु आय मुळे प्रश्न निर्माण होतात असं असेल तर हा प्रकार रद्द करण्यासाठी इथले नेमस्तक काही उपाययोजना करतात का? कारण आय डी जरी वेगवेगळ्या नावांनी येत असले तरी ते कोण आहे हे साधारण नेमस्तकांना कळत असणार नं...(आय पी, मेल आय डी आणि तत्सम पाऊलखुणांवरून)
तर मूळावर घाव घालायच्या उपाययोजनांकडेही पाहायला ह्वंय ना?
मी असं ऐकते की अन्य काही संस्थळावर ही सु(?)विधा बंदच आहे त्यामुळे मग असे प्रश्न कमीवेळा येत असतील की आय डी भांडताहेत..किंवा निदान कोण कुणाशी भांडतंय हे तरी कळत असेल..

असो बाकीजाणत्या आणि अनुभव्वी मंडळींनी बरंच काही लिहून ठेवलंच आहे म्हणा..पण इतर संस्थळावरून काही शिकून ड्यु आय प्रकरणाचा बंदोबस्त केल्यास काही प्रमाणात हे वाद कमी तरी होऊ शकतील..मग फक्त खरोखरचे नाठाळ उरतील आणि होपफुली त्यांना योग्य कायदा दाखवण्यात येईल...

Happy

कारण आय डी जरी वेगवेगळ्या नावांनी येत असले तरी ते कोण आहे हे साधारण नेमस्तकांना कळत असणार नं...(आय पी, मेल आय डी आणि तत्सम पाऊलखुणांवरून)

एकाच घरचे आय डी असतील तर?
नेट कॅफेवरुन अनेकानी अनेक आय डी काढले तर?

नमस्कार एडमिन आणि समिती ! मायबोलीसाठी आपण जो निर्णय घेतला तो आपल्या दृष्टीकोनातून योग्यच असेल याची मला खात्री आहे. पण एकंदरीत गेले दोन दिवस वाहत्या पानांवरच्या गप्पांचा रोख ज्या पद्धतीने फक्त 'मंदार जोशी हा आयडी बॅन झाला' या चर्चेच्या गुर्‍हाळात रमला होता, ते पहाता, यात काही जणांनी वैयक्तिक आकस काढला की काय, अशी शंका मनात आली. शिवाय यावर एक काकाक पण आली म्हणून हा प्रपंच. 'मंदार जोशी' हा आयडी परत मायबोलीवर रुजू व्हावा म्हणून मी त्यांचे वकीलपत्र घेतलेले नाही.
आपण बर्‍याचदा पारदर्शकतेबद्दल बोलतो, त्यामुळे या प्रकरणात थोडी पारदर्शकता यावी अशी मनस्वी इच्छा आहे.
इथल्या अनेक बाफवर नेहमीच वादविवाद घडले आहेत. अनेकांनी अनेकदा पातळ्या सोडल्या आहेत. अजूनही सोडल्या जात आहेतच. ३ आठवड्यापुर्वी जन्माला आलेले आयडी मायबोलीच्या धोरणाबद्दल विचारणा करत आहेत. जुन्या ग्वाह्या देत आहेत. खोट्या नावाने येऊन धिंगाणा घालणार्‍या आयडींना उत्तर देणे मायबोली एडमिनला नक्कीच बंधनकारक नसावे.
मुखवटे धारण करून वाट्टेल ती विधाने करणार्‍या नामर्द आयडींवर मायबोली एडमिनने कारवाई केल्यास काही गैर वाटत नाही. पण एखाद्या अस्सल व्यक्तीवर कारवाई होत असेल तर त्याने कोणता धिंगाणा घातला होता हे नक्कीच जाणून घ्यावेसे वाटते. 'मंदार जोशी' या आयडीने वेळोवेळी इथे वाद घातले आहेत याची मला कल्पना आहे. पण ते त्यांनी त्यांच्या खर्‍या नावाने घातले आहेत. कोणताही खोटा मुखवटा धारण केला नाही. भलेही त्या पोस्ट त्यांनी नंतर एडीट केलेल्या असल्या तरी त्या पोस्टची वैयक्तीक जबाबदारी नाकारली नाही. जिथे चूक झाली तिथे क्षमापण जाहीरपणे मागितली आहे. त्याच व्यक्तीने इथे अनेक उत्तम कविता आणि लेख सुद्धा लिहीले आहेत. वाहत्या पानावर निव्वळ टवाळक्या करणार्‍या आणि स्वतः साधा 'श्री' सुद्धा गिरवण्याची पात्रता नसताना, इतरांच्या लिखाणाला नावे ठेवत, स्वतःची अक्कल पाजळणार्‍या आयडींपेक्षा मंदार जोशी यांचे योगदान मायबोलीवर निश्चितच जास्त आहे. त्यामुळे त्यांचा आयडी ब्लॉक करण्याच्या कारणांवर एडमिनने थोडा प्रकाश टाकावा ही नम्र विनंती.

बॅन झालेल्या व्यक्तींनी काय धिंगाणा घातला होता याची कल्पना नाहि; जाणुन घ्यायची आवश्यकता हि नाहि. माबो प्रशासनाचा निर्णय सगळ्यांवर बंधनकारक आहे हे आजवरच्या अनुभवावरुन सांगु शकतो. Happy

निव्वळ भरपुर लिखाण पाडले आणि माबोवर रोज रतीब लावला म्हणुन आमच्या वाईट वागणुकिकडे कानाडोळा करा, अशी इच्छा बाळगणे हे अतिशय हास्यास्पद आहे.

माबोच्या पुढील यशस्वी वाटचाली करता सर्व संबंधितांनी भावनेच्या आहारी न जाता परत एकदा आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे असं वाटतं.

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मायबोली!

प्रतिसाद संपादीतः

गामा पैलवान,
तुमचे आधीचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहेच. तेव्हा मायबोलीवर पुन्हा राजकारणी आणि त्यांच्यावरचे वाद नको आहेत हे तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे.
-अ‍ॅडमीन

निव्वळ भरपुर लिखाण पाडले आणि माबोवर रोज रतीब लावला म्हणुन आमच्या वाईट वागणुकिकडे कानाडोळा करा, अशी इच्छा बाळगणे हे अतिशय हास्यास्पद आहे.

अगदी अनुमोदन.

वाहत्या पानावर निव्वळ टवाळक्या करणार्‍या आणि स्वतः साधा 'श्री' सुद्धा गिरवण्याची पात्रता नसताना, इतरांच्या लिखाणाला नावे ठेवत, स्वतःची अक्कल पाजळणार्‍या आयडींपेक्षा मंदार जोशी यांचे योगदान मायबोलीवर निश्चितच जास्त आहे.

कवीराज शिरोडकर, कवीच्या भाषेत उत्तर ऐका...

राम कृष्णही आले गेले.
त्याविण जग का ओसची पडले..?

तिथे, दोन कविता, चार विडंबनं याला योगदान असा दांडगा शब्द वापरून का स्वतःला हास्यास्पद करून घेताय?

मा. अ‍ॅडमिन,

तुम्ही जेंव्हा सूचना द्याल/ एडिट कराल, तेंव्हा लाल अक्षरे वापराल का? असा दोन वेळा लाल शेरा मिळाला की आय डी बॅन असे काहीतरी केल्यास लोकांचीही त्क्रार रहाणार नाही.

चर्चा बरीच पुढे गेली, वाचली. आवडलीही.

एक मतः

मायबोलीवर लेखन करणे, नुसते वाचणे, नुसते वाहत्या पानांवर असणे किंवा लेखन 'पाडणे' यावर कारवाई करायची की नाही हे ठरणे योग्य नाही असे वाटते. (कौतुक शिरोडकरांच्या त्या मुद्याशी - तितक्याचपुरता- असहमत आहे व राज यांच्या मुद्याशी सहमत आहे).

पण शिरोडकरांची उर्वरीत पोस्ट पटत आहे.

अशोक साहेब यांची पोस्टही नेहमीप्रमाणेच पटली

सर्व प्रथम हे नमुद करतो कि, माझा आयडी काहि दिवसांपुर्वी डिलिट झाला .vetal नावाचा आयडी ईतका खालच्या पातळीला गेला होता कि मला प्रतिवाद करणे गरजेचे झाले, त्यामुळे महिन्यापुर्वी आयडी डिलिट झाला .
इथे मागच्या आठवड्यात बर्याच घडामोडी झालेल्या दिसतात त्यामुळे माझे मत मांडण्यासाठी हा आयडि घेतला आहे.
**सर्वप्रथम एडमीन यांनी सोकावलेले आयडी डिलिट केल्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन**
मायबोलिचे आपण सर्वेसर्वा आहोत ,एडमीन आपल्या खिशात आहेत या भ्रमात असणार्या विडंबनविरांना आणि पैलवानांन्ना एडमीनने जो झटका दिला आहे त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
तरीही दामोदरसुत ,उदयन यांचे आयडी हकनाक बळी पडलेले आहेत .हे आयडी वाद घालतात पण वाढवत नाहित. त्यामुळे ह्या दोन आयडींना समज देऊन ते पुन्हा सुरु करावेत हि नम्र विनंती.जमल्यास जोशी ,मास्तुरे ,गापै , जामोप्या ईत्यादिंचा मुळ आयडी समज देऊन चालु करण्यास माझे अनुमोदन आहे.

धन्यवाद बेफिकीरजी....

मला भाषेविषयी अतोनात प्रेम आहे (अभ्यासही त्या निमित्ताने घडत असतो). केवळ नित्य संभाषणासाठीच नव्हे तर प्रसंगी वादविवादासाठीही आपल्याकडे 'भाषा' हेच एक माध्यम असू शकते; पण आहे आपल्या मनीबोटी आपुली मर्‍हाटी मायबोली भाषा म्हणून त्यासाठी तिचे सुंदर मोहक रुपडे पटलावर आणण्याऐवजी जर तिला विद्रूप करूनच आपला मुद्दा हिरीरीने मांडणार असेल कुणी, तर त्याला उत्तर देणारी व्यक्ती शहाणपणाने पटलावरून माघार घेणेच पसंत करेल. कदाचित तशी उग्र भाषा वापरणारी व्यक्ती 'जिंकलो' म्हणून दुसरीकडे आरोळीही ठोकेल. पण त्यामुळे आपण भाषेची वृद्धी न करता संहार करीत आहोत ही बाब सोयिस्कररित्या विसरली जाते.

सर्वश्री दामोदरसुत, मास्तुरे, मंदार जोशी, उदयन, जागो मोहन प्यारे, गामा पैलवान आदी अनेक सदस्य खरेतर भाषाप्रभूच आहेत हे त्यांचे लिखाण वाचताना जाणवते....त्यांच्या मुद्द्यांना विरोधाचे प्रतिसाद देणारी मंडळीही तितकीच अभ्यासू आहेत....पण मध्येच कुठेतरी बार्शीलाईट रुळावरून घसरते आणि एका चांगल्या धाग्याची लक्तरे होण्यास प्रारंभ होतो....हे अनेकदा होत होते....पण अ‍ॅडमिनला जर वाटत असेल की 'पानी सरसे उपर चढ गया...' आणि कारवाई केली गेली तर त्याचा योग्य तो बोध सर्वजण घेतील यात संदेह नाही.

अशोक पाटील

माननीय प्रशासक,

>> गामा पैलवान,
>> तुमचे आधीचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहेच. तेव्हा मायबोलीवर पुन्हा राजकारणी आणि
>> त्यांच्यावरचे वाद नको आहेत हे तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे.
>> -अ‍ॅडमीन

कारणमीमांसेबद्दल आभार! Happy

माझा (आता संपादित झालेला) प्रतिसाद हा माझ्यावरील खोट्यानाट्या आरोपांचा प्रतिवाद होता. माझ्यावर खोटेनाटे आरोप केलेला संदेश उडवलेला दिसतो आहे. याबद्दल आपलं अभिनंदन!

विचार, आचार, लेखन, वर्तन यांत सुसंगती यावी असा प्रामाणिक सदस्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अश्या सदस्यांचे नाव इथे मायबोलीवर आदराने घेतले जाते. अनेकदा संदेश लांबलचक वा क्लिष्ट असले तरी सदस्यनाम पाहून वाचले जातात. हा आदर टिकवून धरण्याची जबाबदारी त्या त्या सदस्याची असते. मात्र ज्यांना केवळ धांगडधिंगाच घालायचा आहे, त्यांना स्वत:च्या (आणि इतरांच्याही) सदस्यनामाची किंमत नसते.

या दोन विरूद्धमुखी प्रवृत्ती आहेत. मायबोलीवर त्यांची सांगड घालतांना आपल्या प्रशासकीय कौशल्याचा कस लागत असणार. तसेच इतर मायबोलीबाह्य व्यवधानेही आपल्याला सांभाळावी लागत असणार (कुठली ते मी सांगत बसत नाही). एव्हढी मोठी वाचकसंख्या असणारे संकेतस्थळ चालवणे म्हणजे काय असते याची (पूर्ण नसली तरी बर्‍यापैकी) कल्पना मला आहे.

त्यामुळे आपल्याविरुद्ध माझ्या मनात कोणतेही किल्मिष नाही, हे जाहीररीत्या सांगत आहे. जो काही लढा इथे लढतो आहे तो तत्त्वांसाठी आहे. त्यास यश मिळाले तर तो "गामा पैलवाना"चा विजयबिजय नसून तत्त्वांची पाठराखण असणार आहे. एव्हढे स्पष्ट करण्याची संधी दिल्याबद्दल आपले परत एकदा आभार मानतो.

आ.न.,
-गा.पै.

. मायबोली म्हणजे काय जग नाही .. >>>> हे बर्‍याच जणांना सांगायची गरज आहे!>>> तेवढ्याने काय होतेय, यांना गंभीर आणि सखोल समुपदेशनाची गरज आहे.
निव्वळ भरपुर लिखाण पाडले आणि माबोवर रोज रतीब लावला म्हणुन आमच्या वाईट वागणुकिकडे कानाडोळा करा, अशी इच्छा बाळगणे हे अतिशय हास्यास्पद आहे.>>>प्रचंड अनुमोदन. कोण किती अ‍ॅक्टीव्ह आहे की भाषाप्रभू (?), कोणाचे योगदान किती, कोणाला श्री काढता येतो हा मुद्दाच निरर्थक आहे. दर दोन दिवसानी नवे वाद सुरु करायचे, तिथे आपापल्या 'गँग'ला बोलवून दंगा करायचा आणि शेवटी अ‍ॅडमिनच्या विपूत रडारड हे भारीच योगदान आहे!
मुळात अ‍ॅडमीनने कुणाचा आयडी का ब्लॉक केला याची कारणे एका लिमीट्नंतर कुणालाही द्यायची गरजच नाही.

मुळात अ‍ॅडमीनने कुणाचा आयडी का ब्लॉक केला याची कारणे एका लिमीट्नंतर कुणालाही द्यायची गरजच नाही.<<
+१०००००

मुळात अ‍ॅडमीनने कुणाचा आयडी का ब्लॉक केला याची कारणे एका लिमीट्नंतर कुणालाही द्यायची गरजच नाही.>> +१

प्रत्येक माबोकराने 'स्वतःची जबाबदारी ध्यानात घेऊन वर्तन करावे' प्रशासकांची एवढी माफक अपे़क्षा पूर्ण केली तर प्रशासकांना लेख/ प्रतिसाद मॅनेजमेंटमधे फार वेळ दवडावा लागणार नाही. स्वतःच्या जबाबदारीची जाणिव आणि मायबोली सारख्या प्रसिद्ध संकेतस्थळाचा आदर ठेवून वावरल्यास इतरांच्या आणि प्रशासनाच्या डोक्याला ताप होणारच नाही.

Admin Team,

नमस्कार !! आपण जो निर्णय घेतला तो योग्यच आहे.

पण एकंदरीत गेले काही दिवस / महीने अनेक डुप्लीकेट आयडी बनवलेल्या जात आहेत व एकाच वेळेला
कर्यरत आहेत.

अश्या डुप्लीकेट आयडीना कश्याचे ही बंधन नसते. सर्वत्र त्यांचा मुक्त संचार असतो आणी सर्वत्र ते
मुक्ता फळे उधळत फिरत असतात. एक आ यडी ब्लॉक झाली की दुसरी तयार होते, आणि त्यांचे चाळे
सूरूच रहातात.

एक प्रस्ताव !!

मूळात असे डुप्लीकेट आयडी काढता येऊ नयेत म्ह्णून प्रत्येक सदस्याच्या / सभासदा च्या नोंदणीच्या वेळेला
त्यांची खरी माहीती व मूळ मोबाईल नंबर नोंदला जावा व त्या मोबाईल नंबर वर पासवर्ड पाठवून सभासदाला
मायबोलीत सहभागी करुन घ्यावे.

मोबाईल नंबर पीन केल्याने नवीन डूप्लीकेट आयडी काढणे शक्य होणार नाही. एका मोबाईल नंबर ला एकच
आयडी मिळु शकेल.

Pages