आपली मायबोली आणि आपली जबाबदारी
गेल्या काही दिवसात मायबोलीवरचे वाद हमरीतुमरीवर आले. कुठल्याही भांडणामधे होते तसे आधी कुणी भांडण सुरु केले (किती आधीपासून सुरू केले) कुणी कसे वाढवले याची शहानिशा करणे अवघड. किंवा हे अवघड याचा काही जण फायदा घेतानाही दिसून येतात. इतकं नक्की की भांडण कधी एका व्यक्तीमुळे वाढत नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे जिथे भांडण्/वाद सुरु आहेत तिथे आणखी अनेक जण समर्थनासाठी येतात आणि भांडण सोडवणं आणखी अवघड होऊन बसतं.
यापुढे भांडण सुरु करणारे, वाढवणारे, समर्थन करणारे सगळ्यांचाच मायबोलीवरचा प्रवेश रद्द करावा लागला तर तो केला जाईल. यात दुर्देवाने नवीन जुने कुणिही मायबोलीकर असले तरी आमचा नाईलाज असेल. जेंव्हा इतर मायबोलीकर आता भांडण बास असे म्हणतील तेंव्हा तरी त्यात सहभागी असणार्यानी योग्य तो इशारा ओळखून वैयक्तिक संदेशातून संपर्क साधण्याचा पर्याय स्विकारणे अपेक्षीत आहे.
मायबोली जी काही आहे ती मायबोलीच्या आग्रह करण्याच्या पण सक्ती न करण्याच्या धोरणामुळे आहे. मग तो शुद्धलेखनाचा असो, देवनागरीकरणाचा असो, रतीब न घालण्याचा असो वा दर्जा टिकवण्याचा असो. पण गेल्या काही दिवसात हा आग्रह फारच टोकाला जाऊन धमकी वाटावी अशा प्रतिक्रियांपर्यंत गेला आहे. मायबोलीवरचे वातावरण टिकवण्यासाठी अशा टोकाला जाण्यार्या कुणाचा प्रवेश बंद करावा लागला तर नाईलाजाने का होईना ते पाऊल उचलण्यात येईल. हे धोरण कदाचित काही मायबोलीकरांना मान्य नसेल पण ते धोरण म्हणून मायबोलीने स्विकारले आहे.
मला कोणत्याही प्रकारचे वाद
मला कोणत्याही प्रकारचे वाद घालायचे नाहियेत , हे मी आधीच स्पष्ट करतो.
चर्चा व्हावी अशी इच्छा आहे.
काहीतरी चुकीचं घडलंय हे मान्य केलं तरी नक्की काय चूक आहे ते कळायला हवं. >>>> मान्य करु एकवेळ , पण अशी किती जणांना उत्तर द्यायची , एक दोनदा तर समजही दीलीच जाते.
मुद्देसूद प्रतिवाद केल्याने जर माझं जुनं नाम गोठवलं गेलं तर मी काय करावं बरं! अर्वाच्य, शिवराळ प्रतिसाद तसेच पहात राहावं का? >>>>
नाही सरल दुर्लक्ष कराव , तक्रार करावी रितसर ...
मी आजता गायत कधीही तक्रार केलेली नाहिये , पण दुर्लक्ष मात्र नक्की केलय ,उत्तर चोख द्याव पण तमा बाळगून, आपसूकच तो त्रास कमी होतो ... आणि किती ते धरुन ठेवाव ... मायबोली म्हणजे काय जग नाही ..
वरील ४ जणांपैकी मी एकालाच ओळखतो , ज्याच्याशी मी बोलत नाही , इतर जणांनाही मी ओळखत असेन पण या आयदीने नाही ...
झाले अनुमोदकरुपी शिफारस
झाले अनुमोदकरुपी शिफारस पत्रांचे लक्तरे फडकवण्याचे काम सुरु.
ही पोष्ट कोणासाठीही वैयक्तिक नाही.
योडी यांचे मत हे 'वैयक्तीक'
योडी यांचे मत हे 'वैयक्तीक' रागलोभातून निर्माण झालेले व्यापक मत आहे असे मला वाटते.
>>
बेफिकीर, वर सगळ्या पोस्टसमधुन हे असं तुम्हालाच वाटावं ह्यात आश्चर्य. असो.
मराठी भाषेबाबत / भाषेत केले गेलेले (एकंदर ललित) लेखन हे दुर्लक्षित राहते.
>>
असं कशावरुन म्हणता तुम्ही?? प्रतिसाद कमी आले किंवा आलेच नाहीत ह्यावरुन ते लेखन दुर्लक्षित ठरावे का??
अशा बाबींवर धागे आणून / येऊ देऊन सामाजीक विषयावर अप्रत्यक्षपणे भूमिका घेणे ही मायबोलीची पॉलिसी आहे का?
>>
अॅडमीनने प्रत्येक प्रतिसादाला, धाग्याला फिल्टर लावावा का?? हे कितीसं योग्य आहे किंवा वैयक्तिक पातळीवर जमण्यासारखं आहे ह्यावर तुम्हीच विचार करा.
मग याच्या त्याच्या तक्रारीवरून ह्याला त्याला उडवणे असे तात्कालीक उपाय योजले जातात.
>>
वर ह्यावरुनच चर्चा झाली आहे. कुणाच्याही तक्रारीवरुन किंवा सांगण्यावरुन आयडी उडवायला अॅडमीन दुधखुळे नक्कीच नाहीत.
वर मी जे काही मुद्दे मांडलेत ते वैयक्तिक आकसातुन केलेले नाहीत.
ह्या सगळ्याची सुरुवात आपली
ह्या सगळ्याची सुरुवात आपली वैयक्तिक ओळख लपवून मतप्रदर्शन करणार्यांपासून होते.
लोक म्हणनारच ना ... की तोंड लपवतो आणि मत मांडतो.
अशा लोकांविरुद्ध बंड पुकारत आपण इतर सामान्यांना आणि स्वत: लाही त्रास करुन घेतो.
मोनाली, बेफी +१
मोनाली, बेफी +१
झाले अनुमोदकरुपी शिफारस
झाले अनुमोदकरुपी शिफारस पत्रांचे लक्तरे फडकवण्याचे काम सुरु.
ही पोष्ट कोणासाठीही वैयक्तिक नाही.>>
का? सरळ आरोप करायला काही अडचण आहे? का बरं माझं अनुमोदक पोस्ट पडल्यावर हे वाक्य आलं नाहीतर? मलाही भिड्यांप्रमाणेच कुणाशीही वाद घालण्यात रसही नाही. वेळही नाहीये आत्ता. तेव्हा तुमच्या भाषेत लढवा काय खिंडी लढवायच्या ते. ज्यांना खरंच चर्चा करायच्यात ते (उदा: बेफिकीर, योडी, भिडे इ.) वरती संयमित भाषेत चर्चा करतायत. त्यांना नाही ती अशी भाषा वापरायची गरज पडत...
हेमाशेपो
'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा'
'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' ह्या नियमाने एक आयडी बॅन करुन ४ लोकं सुधारत असतील तर त्यांचंही काम थोडंफार कमी होतंय की. >>> हे नक्कीच पटलेय. असे व्हायलाच हवे. अन्यथा अॅडमिन हे भांडणे सोडवण्याकरताच रहातील. तसे होऊ नयेच.
)
इथे कोणताही स्वार्थ न ठेवता जितकी / जितक्या चांगल्या चर्चा होतील ते उत्तम. (इथे म्हणजे माबोवर
मायबोली प्रशासनाचे जे धोरण
मायबोली प्रशासनाचे जे धोरण आहे ते वर धाग्यावर दिलेले आहेच. हे २००९ साली लिहिले होते, त्यामुळे पुरेसा वेळ दिलेला आहेच. तसेच ७ महिन्यापुर्वी http://www.maayboli.com/node/31070 या धाग्यावरपण सूचना दिली होती.
या धोरणांविरुद्ध असलेल्या शक्य तितक्या धाग्यांवर कारवाई चालुच असते. नजरचुकीने काही धागे/प्रतिसाद राहून गेलेले असु शकतात. तुम्हाला जर काही तसे दिसले तर त्या वादात न पडता ती प्रशासनाच्या नजरेस आणून द्या.
वरदा, ही पोष्ट कोणासाठीही
वरदा,
ही पोष्ट कोणासाठीही वैयक्तिक नाही
हे तुम्ही वाचले नाही का?
अनेक चर्चांमधे माझे असे निरिक्षण आहे कि काही जण/णी येवून फक्त 'अनुमोदन' 'ज्जे बात' सही' चांगला झोडला अश्या काड्या टाकून पसार होतात. त्यासर्वांसाठी होते ते. खरोखर तुमच्यासाठी नव्हते. क्रुपया गैरसमज नसावा.
अॅडमीन, एक शंका. जे आयडी बॅन
अॅडमीन, एक शंका.
जे आयडी बॅन झालेले आहेत त्यांना आधी समज दिलेली होती की नाही? इथे इतर सदस्यांचे असे मत आहे की त्या आयडींना समज दिलेली नव्हती.
ओ योडम, म्या कुटं लिवलय तसं ?
ओ योडम, म्या कुटं लिवलय तसं ?
परत अॅडमीन आणि अॅडमीन टिम
परत अॅडमीन आणि अॅडमीन टिम एकच का? वेगवेगळे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
नावे जाहीर न करण्याची काही पोलीसी असल्यास प्रश्नच उरत नाही.
अॅडमीन महोदय, धन्यवाद (आशा
अॅडमीन महोदय, धन्यवाद
(आशा आहे की माझा प्रतिसाद तापदायक वाटला नसावा)
(विनंती - मुळात जातीधर्मविषयक धागे निघतात याबाबत काय धोरण असेल असे विचारायचे होते, वरच्या प्रतिसादात विचारले आहेच एकदा)
बागुलबुवा, तुझ्यासाठी नाहीय
बागुलबुवा, तुझ्यासाठी नाहीय ते. माझ्या २-३ पोस्ट्स वाचताना वाचनात आलं ते. कोणत्या पोस्ट्स ते शोधत बसायला वेळ नाहीय.
योडी, वरील प्रतिसादात असलेला
योडी,
वरील प्रतिसादात असलेला दुवा पहा.
बेफिकीर,
संयत भाषेत चर्चा चालू असेल तर ते विषय वर्ज्य नाहीत. माहीतीपर लेख सध्याही आहेत.
बाटेल बामन,
८-९ दिवसांपूर्वीच हा धागा लिहिला होता. http://www.maayboli.com/node/36333 तो पहा.
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद अॅडमीन
धन्यवाद अॅडमीन
हे उगाच: अॅडमीन कसे
हे उगाच: अॅडमीन कसे सगळ्यांना उत्तरं तोंडावर मारुन गप्प करतायत..
१. हे स्थळ 'मराठी भाषेसाठी,
१. हे स्थळ 'मराठी भाषेसाठी, तिच्या संवर्धनासाठी वगैरे' आहे असा माझा आत्तापर्यंतचा समज आहे. तो चूक असला तर जुन्यांनी करेक्ट करावे. पण जर योग्य असला तर 'भाषिक उपक्रमांऐवजी' इतर खूप काही अधिक जोरात चाललेले दिसते व ते कितीही वाढले तरी त्याचे महत्व मूळ उद्देशापेक्षा कमी आहे हे मान्य व्हावे, व्हायला हवे असे मला वाटते. जसे सामाजिक चर्चा, काही हितगुज ग्रूप्स या बाबी 'सबकुछ' बनून बसलेल्या दिसतात. पण मराठी भाषेबाबत / भाषेत केले गेलेले (एकंदर ललित) लेखन हे दुर्लक्षित राहते.<<<
बेफिकीर,
तुमचे बाकीचे मुद्दे काही प्रमाणात पटले. मात्र वरती चिकटवलेला मुद्दा पटला नाही.
मराठी भाषा, संवर्धन = मराठीतील ललित लेखनाला प्रोत्साहन, ललित लेखनाला जास्त महत्व हे गृहितक पटले नाही.
मायबोलीच्या मुखपृष्ठावर ही टॅग लाइन आहे.
>>> Marathi footsteps around the world... मायबोलीशी नातं सांगणार्या जगभरच्या पाऊलखुणा... <<<
म्हणजे मराठी भाषिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रत्येक गोष्टीला इथे समान स्थान आहे/ असायला हवे असे मला वाटते.
तुम्ही गझल व इतर लिखाणाच्या बाजूने संवर्धन करत असाल तर इतर कोणी माहितीपर, प्रवासवर्णनपर धागे टाकून. अजून कोणी चर्चाविषयांना समोर आणून संवर्धनात भाग घेत असेल. माझ्यामते सभ्य शब्दात आणि सभ्य विषयांबद्दल असलेले कुठलेही चर्चाविषय माबोवर निषिद्ध असता कामा नयेत.
अर्थात या बाफचा हा विषय नाही त्यामुळे विषयांतराबद्दल क्षमस्व.
धन्यवाद अॅडमीन. अब आयेगा
धन्यवाद अॅडमीन.
अब आयेगा मजा.
"मायबोलीच्या मुखपृष्ठावर ही
"मायबोलीच्या मुखपृष्ठावर ही टॅग लाइन आहे.
>>> Marathi footsteps around the world... मायबोलीशी नातं सांगणार्या जगभरच्या पाऊलखुणा... <<<
म्हणजे मराठी भाषिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रत्येक गोष्टीला इथे समान स्थान आहे/ असायला हवे असे मला वाटते.
तुम्ही गझल व इतर लिखाणाच्या बाजूने संवर्धन करत असाल तर इतर कोणी माहितीपर, प्रवासवर्णनपर धागे टाकून. अजून कोणी चर्चाविषयांना समोर आणून संवर्धनात भाग घेत असेल. माझ्यामते सभ्य शब्दात आणि सभ्य विषयांबद्दल असलेले कुठलेही चर्चाविषय माबोवर निषिद्ध असता कामा नयेत. " >>>>
नीधप,
तुमच्या या मुद्याशी पूर्णतः सहमत.
नीधप, सभ्य शब्दात आणि सभ्य
नीधप, सभ्य शब्दात आणि सभ्य विषयांबद्दल असलेले कुठलेही चर्चाविषय माबोवर निषिद्ध असता कामा नयेत.>>> हे बरे लिहिलेस. मला शब्दात पकडता येत नव्हते हे मगापासुन. धन्यवाद.
"जे आयडी बॅन झालेले आहेत
"जे आयडी बॅन झालेले आहेत त्यांना आधी समज दिलेली होती की नाही? इथे इतर सदस्यांचे असे मत आहे की त्या आयडींना समज दिलेली नव्हती."
मलाही तसेच वाटतेय.एकदम १०-१२ आयडी बॅन झालेले दिस्तात.त्यांना पुर्वी वॉर्निन्ग दिली होती का?त्यांचं एडमिनशि काही वैयक्तिक मतभेद होते का?त्यांच्या नक्की कुठल्या पोस्टमुळे त्यांना बॅन केले?ती पोस्ट इथे टाकली तर इतरांना पोस्ट कशी नसावी ही आयडिया येइल व अशा वाईट पोस्ट टाकणे हे फ्यूचरमधे टाळता येइल.
@नरेंद्र यांच्या नक्की
@नरेंद्र
यांच्या नक्की कुठल्या पोस्टमुळे त्यांना बॅन केले?ती पोस्ट इथे टाकली तर इतरांना पोस्ट कशी नसावी ही आयडिया येइल व अशा वाईट पोस्ट टाकणे हे फ्यूचरमधे टाळता येइल.<<
त्या धाग्यावरिल चर्चा स्वत:ला गांधीवादी म्हणवून घेणार्या आयडी/डुआयडीनी इतक्या खालच्या पातळीवर नेली होती की, प्रशासकाना तो धागाच बंद करावा लागला. आणि "उदयन" नावाच्या आयडीनी "गज्जु" ह्या आयडीला कानाखाली आवाज वैगेरे काढायची धमकी दिली होती.
हो दिलीच होती......त्याचे
हो दिलीच होती......त्याचे प्रतिसाद आपण पाहिले नव्हते वाटते .......पाहिले असल्यास तो नक्कीच डुआयडी आहे हे कळले असते आपल्याला.. असे आयडी काही ही बडबडलेले चालते का ?
ते माहीती नाही, पण आपण
ते माहीती नाही, पण आपण लिहलेला ठळक अक्षरातील "संदेश" तिथे वाचला, मग वरिल काही संदेश कदाचीत संपादितही केले गेले असतील. तुमच्या त्या संदेशानंतरच आयडी बॅन करण्याची व तो धागा नष्ट करण्याची कारवाई प्रशासकानी केली असे मला वाटते.
------------------------------------
वरिल प्रतिसादावर आक्षेप असल्यास मी तो संपादित करायला तयार आहे.:स्मित:
मला काहीच आक्षेप नाही
मला काहीच आक्षेप नाही आहे.......त्या धाग्यावरच्या आधीच्या पोस्टींमधे काय काय लिहिले गेलेले ते सुध्दा आपण वाचलेच असेल ....माझी पोस्ट सगळ्यांच्या पोस्टी नंतरच आली.. इतका वेळ मी देखील संयमच बाळगलेला... सतत एकच गोष्ट जी चुकीचीच आहे तरी सुध्दा मुद्दामुन लिहित असल्यास .......आम्ही देखील किती वेळ सहन करावे आणि का करावे....जर अरे ला उत्तर कारे हे चुकीचे मानत असल्यास......अरे ला च थोपवले असते तर कारे हे उत्तर कुणाकडुन ही आले नसतेच.....हे माझे वैयक्तिक मत आहे...
.आमच्या कडुन कोणतीही जातियवादी अथवा धार्मिक टिप्पणी करण्यात आलेली नव्हती..नाही काही वादग्रस्त लिहिले गेलेले होते.........फक्त त्या अत्यंत गलिच्छ लिहिणार्या आयडीला त्याच्याच भाषेत मी उत्तर दिलेले
.
असो मी माझा मुद्दा अॅडमिन च्या विपुत मांडला आहे...
मुद्देसूद प्रतिवाद केल्याने
मुद्देसूद प्रतिवाद केल्याने जर माझं जुनं नाम गोठवलं गेलं तर मी काय करावं बरं! अर्वाच्य, शिवराळ प्रतिसाद तसेच पहात राहावं का? >>>>
नाही सरल दुर्लक्ष कराव , तक्रार करावी रितसर ...
मी आजता गायत कधीही तक्रार केलेली नाहिये , पण दुर्लक्ष मात्र नक्की केलय ,उत्तर चोख द्याव पण तमा बाळगून, आपसूकच तो त्रास कमी होतो ... आणि किती ते धरुन ठेवाव ... मायबोली म्हणजे काय जग नाही ..
>>>>>>>>>>>> विनय भिडे + १.
विवादास्पद बाफ काढायचे, त्यांवर भांडणं, शिवीगाळ करायची, दुसर्यांच्या अक्षेपार्ह पोस्टसचे स्क्रीनशॉटस घ्यायचे आणि अॅडमिनच्या विपुत जाऊन सतत या स्क्रीनशॉटससकट तक्रारी करायच्या. किती बालिशपणा आणि रिकामपणाचे उद्योग! अॅडमिनने योग्य पाऊल उचललं आहे.
admin, आपला इथला संदेश वाचला.
admin,
आपला इथला संदेश वाचला. तिथे आपण म्हंटलंय की :
>> कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक
>> लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल. तसेच राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावरून
>> इथे बाचाबाची करू नये. याबाबतीत कुठलीही समज किंवा दुसरी संधी मिळणार नाही. हीच पूर्वसूचना
>> समजावी.
माझे "गामा पैलवान" नामक जुने खाते गोठवले आहे. मी कोणाच्याही जाती/धर्म/ वंश/वर्ण यावर टिपणी केली नव्हती. राजकीय नेत्यावरून बाचाबाची तर दूरच. नाही म्हणायला मोहनदास गांधी यांच्यावर टीका केली होती, पण ती त्यांच्या वर्तनातील विरोधाभास दाखवण्यापुरती सीमित होती. ही बाचाबाची नव्हे.
आजून एक गोष्ट म्हणजे शिवराळ भाषेत संदेश टाकणार्याच्या एका सदस्याच्या बौद्धिक क्षमतेवर शंका प्रदर्शित केली होती. मी केलेले हे कृत्य अपराध म्हणून धरता येईल का? वरील निकषावर आपणच घासून पहावे.
आपण दिलेल्या कोणत्याही निकषात माझे कृत्य बसत नसल्याने मी अपराधी नाही. मग खातं गोठवण्याची शिक्षा मला कशास्तव देण्यात आली आहे?
आ.न.,
-गा.पै.
आ.न.,
-गा.पै.
आणि किती ते धरुन ठेवाव ...
आणि किती ते धरुन ठेवाव ... मायबोली म्हणजे काय जग नाही .. >>>>
हे बर्याच जणांना सांगायची गरज आहे!
Pages