आपली मायबोली आणि आपली जबाबदारी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या काही दिवसात मायबोलीवरचे वाद हमरीतुमरीवर आले. कुठल्याही भांडणामधे होते तसे आधी कुणी भांडण सुरु केले (किती आधीपासून सुरू केले) कुणी कसे वाढवले याची शहानिशा करणे अवघड. किंवा हे अवघड याचा काही जण फायदा घेतानाही दिसून येतात. इतकं नक्की की भांडण कधी एका व्यक्तीमुळे वाढत नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे जिथे भांडण्/वाद सुरु आहेत तिथे आणखी अनेक जण समर्थनासाठी येतात आणि भांडण सोडवणं आणखी अवघड होऊन बसतं.

यापुढे भांडण सुरु करणारे, वाढवणारे, समर्थन करणारे सगळ्यांचाच मायबोलीवरचा प्रवेश रद्द करावा लागला तर तो केला जाईल. यात दुर्देवाने नवीन जुने कुणिही मायबोलीकर असले तरी आमचा नाईलाज असेल. जेंव्हा इतर मायबोलीकर आता भांडण बास असे म्हणतील तेंव्हा तरी त्यात सहभागी असणार्‍यानी योग्य तो इशारा ओळखून वैयक्तिक संदेशातून संपर्क साधण्याचा पर्याय स्विकारणे अपेक्षीत आहे.

मायबोली जी काही आहे ती मायबोलीच्या आग्रह करण्याच्या पण सक्ती न करण्याच्या धोरणामुळे आहे. मग तो शुद्धलेखनाचा असो, देवनागरीकरणाचा असो, रतीब न घालण्याचा असो वा दर्जा टिकवण्याचा असो. पण गेल्या काही दिवसात हा आग्रह फारच टोकाला जाऊन धमकी वाटावी अशा प्रतिक्रियांपर्यंत गेला आहे. मायबोलीवरचे वातावरण टिकवण्यासाठी अशा टोकाला जाण्यार्‍या कुणाचा प्रवेश बंद करावा लागला तर नाईलाजाने का होईना ते पाऊल उचलण्यात येईल. हे धोरण कदाचित काही मायबोलीकरांना मान्य नसेल पण ते धोरण म्हणून मायबोलीने स्विकारले आहे.

विषय: 
प्रकार: 

मनिस्विनी च्या पोस्ट ला १००% अनुमोदन.

दुर्दैवी असला तरी नेमस्तकांचा अतिशय योग्य निर्णय.

मायबोलीवर सर्व स्तरावरले वाचक येतात हे ओळखुन आपण प्रत्येकाने थोडीफार काळजी घेतली ("सहिष्णुता" राखली) तर नेमस्तकांचे काम आपोआप कमी होईल पण जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाईल तेव्हा हस्तक्षेप करुन त्या व्यक्ती/आयडीला बंदी घालण्याचा निर्णय अतिशय योग्य.

अ‍ॅडमिन, वरील उपाय योग्यच, पण याबरोबरच, याहूमेसेन्जर वगैरे वर असते तशी "इग्नोरची" सुविधा जर दिलीत, तर बरीच भाण्डणे "इग्नोरमधेच" जिरून जातील असे वाटते!
समजा मला कुणाच्या पोस्ट्स्/विचार आवडत नाहीत, किन्वा बर्‍याच जणान्ना लिम्बुटीम्बू ही आयडीच नालायक विकृत वगैरे वाटते, तर त्यान्ना बाय डिफॉल्ट लिम्बूटीम्बू या आयडिस इग्नोर करण्याचे स्वातन्त्र्य/अधिकार नको का द्यायला?
सध्या होत काय, की उदाहरणार्थ बर्‍याचजणान्ना लिम्बुटिम्बू ही आयडी आवडत नसूनही सहन करावी लागते, तिच्या त्या हातभर पोस्ट्स वाचायला लागतात, स्वगते वाचावी लागतात, स्वगतातून ती आयडि ज्याप्रकारे "सहानुभुती गोळा करते" त्यामुळे कित्येकान्च्या मस्तकात तिडीक जाते वगैरे वगैरे, तर या सगळ्ञान्ना एकच उपाय कामी येईल, तो म्हणजे "इग्नोरची" सुविधा!
आता या सुविधेत काय काय असावे हे स्वतन्त्रपणे ठरवता येईल, पण किमान येवढे तरी असावेच की समजा कुणी लिम्बुटिम्बु ही आयडी इग्नोर केली, तर लिम्बूटिम्बूची एकही पोस्ट त्याना बघावी लागणार नाही, त्यान्ना एकमेकान्ना एकवेकान्च्या विपु/व्य.मा बघायला मिळणार नाही, व त्यान्च्या इथे जाहिर असेल की कुणी कुणाला इग्नोर केलेले आहे, जसे की लिम्बुटिम्बुला कळेल की त्यास कोणकोणत्या आयडीन्नी इग्नोर केलेले आहे, तसेच जर लिम्बुटिम्बुने कुणाला इग्नोर केल्यास, त्याची नोन्दही त्याच्याजवळ उपलब्ध असेल
आपणांस विनन्ती आहे की या उपायाचा जरुर जरुर विचार करावात Happy

***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****

लिंब्या, हे म्हणजे एकाच घरात रहायचे पण मध्ये भिंत घालून.. Proud
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

किर्‍या, उदाहरण चूकतय तुझ
भिन्त घालून उपयोग होत नाही
आमचे पिताश्रि अन आमचे पटायचे नाही
तर ते घरात असताना आम्ही बाहेर जायचो
अन ते बाहेर गेले, की आम्ही घरात
कधि बाहेर जाणे शक्य नाहीच झाले,
तर सरळ दोन नम्बरला जाउन समाधी लावुन बसायचे! Proud
तर अस इथ काहीच शक्य नाही, त्यामुळे इग्नोरला पर्याय नाही!
अ‍ॅडमिनला बर्‍याच जणान्चे आशिर्वाद अन शुभेच्छा लाभतील ही सुविधा दिली तर! Happy

भिन्त घालून उपयोग होत नाही>>>>
लिंबुभौ, मग दोन नंबराची सोय कुठेतर केली जावी क्काय ?
काय उदाहरणे बी शोधुन देता देवा ! Proud

संदर्भ लागला नाही. कोणत्या विषयावरचे वाद अशा प्रकारे विकोपाला गेले किंवा अशिष्ट भाषा वापरली गेली ते मला तरी कळले नाही.
अ‍ॅडमिन यांच्या हाती एखादी पोस्ट थोपवण्याची सोय आहे [थोडक्यांत म्हणजे सेन्सॉरशिप] असा माझा समज आहे. तो अधिकार संपादक ह्या नात्याने अ‍ॅडमिन यांनी जरूर वापरावा. नव्हे, तो संपादकाच्या कर्तव्याचा एक भागच आहे.
शेवटी, अभिव्यक्ति-स्वातंत्र्य कधीच अमर्यादित असत नाही. फाजील उत्साहाच्या भरांत कोणाकडून मर्यादेचे उल्लंघन होत असल्यास त्या व्यक्तीला योग्य ती समज दिली जावी आणि तरीही तोच प्रकार चालू राहिला तर नाईलाजाने त्या व्यक्तिला मा.बो. वर पोस्ट करण्यापासून काही काळ रोखले जावे हे अगदी उचित आहे. निदान ह्या बाबत तरी मतभेद नसावेत
-बापू करंदीकर

बादवे ह्या धोरणी पोस्टवरच भांडण झाले तर ????????? >>> कोण आहे रे तिकडे असा धोरणी? Wink

*********************

आपण प्रेमात पडतो म्हणजे नक्की कुठे पडतो? Biggrin Wink

अरे मी हे आज वाचत आहे. उशिरच झाला हे वाचायला.

अ‍ॅडमिन योग्य निर्णय घेत आहात.
आणि मनुस्विनी च्या पोस्टला १००० मोदक.
आणि लिंबुटिंबुंची सुचना खुप योग्य वाटते. खरंच ignore बटन हवे.

वातावरण जर बिघडत असेल, सामुहिक मानसिकता जर घातक होत असेल तर अशी जरब मिळणे अतिशय आवश्यक होउन बसते.

अ‍ॅडमिन टिम.. जियो.

>>जसे की लिम्बुटिम्बुला कळेल की त्यास कोणकोणत्या आयडीन्नी इग्नोर केलेले आहे
हे कशासाठी Proud

>>> हे कशासाठी
मला (अन माझ्या हितचिन्तकान्ना) माझा "शत्रूपक्ष" नेमका ओळखता येण्यासाठी! Proud

लिम्ब्या कित्ती आशावादी आणि धोरणी आहेस नै तू? Proud

दा.सु. यांच्या सत्यमेव जयते ह्या धाग्यावर डुआयड्यानी घातलेल्या गोंधळामुळे, गेल्या एक-दोन दिवसात मास्तुरे, मंदार जोशी, दामोदरसुत यांसाएखे चांगले आयडी/व्यक्ती बॅन झालेत.
ओल्या बरोबर सुके ही जळते.:अरेरे:

आंग्रे, आयडी चांगले आणि वाईट असतात ? त्यांच्या पोस्ट चांगल्या वा वाईट असू शकतात नाही का ?

आनंद झाला , हा बाफ मी पाहिलाच नव्हता , धन्स अम्या
काही कठोर पाउले उचलावी लागतात कधी तरी ...
नाहीतर गृहित धरल जात , आणि मायबोलीच्या प्रतिमेपेक्षा कोणीही मोठा नाही.
कारण ती साकारण्याकरता बरेच वर्षांची , बरेच जणांची मेहनत आणि संयता, मेहनत आहे ...

हा धागा बघितला नव्हता. अ‍ॅडमीनने आयडी ब्लॉक केलेत किंवा सदस्यत्व रद्द केलेय ह्याचा अर्थ काहीतरी चुकीचं घडलं, बोललं गेलंय म्हणुनच. अ‍ॅडमीनच्या विपुत त्या आयडींना पुन्हा वावरु द्यावे अशा अर्थाच्या ढिगाने पोस्ट आल्यात. अ‍ॅडमीनच्या धोरणाला, त्यांच्या कारवाईला काहीच अर्थ नाहीय का? त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याची कुणालाच किंमत नाही असाच अर्थ होतो ह्याचा. जास्त काही बोलायचे नाहीय पण कुठेतरी अ‍ॅडमीनला वाटलंच असेल अति होतंय म्हणुनच हा निर्णय घेतला गेला असावा. अ‍ॅडमीन, खरंतर ही कारवाई फार आधी व्हायला हवी होती.

विनय, तुझ्या पोस्टला अनुमोदन.

योडी, कदाचीत अ‍ॅडमीनला जाणीवपूर्वक संगणमताने कट करुन एखाद्या सदस्याबद्दल चूकीची माहीती दिली जात असेल. ही शक्यताही नाकारता येत नाही.

बा बा
अ‍ॅडमीन आणि अ‍ॅडमीन टीम हे सगळ वाचत असावेत आणि कोणाच्या सांगण्या वरुन कोणालातरी काढत नसावेत.

कारण याच माणसांनी आपल कौशल्य , मराठी माणसांना एकत्र आणण्याची तळमळ यातुन हे मायबोलीच विष्व निर्माण केलय

कारण याच माणसांनी आपल कौशल्य , मराठी माणसांना एकत्र आणण्याची तळमळ यातुन हे मायबोलीच विष्व निर्माण केलय

सहमत.
कुणीही लुंग्यासुंग्याने उठावे, हा आयडी बॅन करा. असे आदेश द्यावेत. ह्या गोष्टीला आक्षेप आहे.

योडी, विनय भिडे आणि सेनापती,

>> हा धागा बघितला नव्हता. अ‍ॅडमीनने आयडी ब्लॉक केलेत किंवा सदस्यत्व रद्द केलेय ह्याचा अर्थ
>> काहीतरी चुकीचं घडलं, बोललं गेलंय म्हणुनच. अ‍ॅडमीनच्या विपुत त्या आयडींना पुन्हा वावरु
>> द्यावे अशा अर्थाच्या ढिगाने पोस्ट आल्यात. अ‍ॅडमीनच्या धोरणाला, त्यांच्या कारवाईला काहीच
>> अर्थ नाहीय का?

काहीतरी चुकीचं घडलंय हे मान्य केलं तरी नक्की काय चूक आहे ते कळायला हवं. मुद्देसूद प्रतिवाद केल्याने जर माझं जुनं नाम गोठवलं गेलं तर मी काय करावं बरं! अर्वाच्य, शिवराळ प्रतिसाद तसेच पहात राहावं का?

इथे प्रशासकांनी उभायांगी योजना (principle of parity) लागू केली आहे. शिवराळ बोलणारी केव्हढीतरी खाती गोठवली जातात तर मग मुद्देसूद बोलणारी थोडीशी खाती गोठवायला काय हरकत आहे? असा विचार कितपत योग्य आहे?

या घडीला "गामा पैलवान", "मंदार_जोशी", "मास्तुरे" आणि "दामोदरसुत" ही चार नामे एकाच वेळी गोठवली गेली आहेत. सर्वांनी एकाच वेळी चूक केली असं आपण म्हणू शकतो का? केवळ वादग्रस्त विषयावर मत ठासून मांडलं म्हणून खाती गोठवावीत का?

मी (आणि बाकीचे) दुसरा अवतार घेऊ शकतो. ती परिस्थितीशी तडजोड झाली (करावीच लागते). परंतु प्रश्न तत्त्वांचा आहे. केवळ तत्त्वासाठीच मी लढत आहे. मी तत्त्वांशी तडजोड नाही करू शकत.

आपले विचार वाचायला आवडतील.

आ.न.,
-गा.पै.

असे आदेश कोण कशाला देइल ... आणि आदेश ?????

कोणाच्याही सांगण्यावरुन कोणीही काहीही करत नाही इथे ....
हा समज डोक्यातुन काढून टाका , उदाहरणादाखल तुम्ही काही सांगून बघा ...

उत्तम सुरुवात. Happy

मात्र निधप म्हणतेय तसे डु आय वाढतील.

बॅन करण्यापुर्वी रेस्ट्रीकटेड करु शकतोच ना. तरीही नाही ऐकले तर मग आयडी रद्द असे धोरण इष्ट होईल.

कारण काही आयडी भांडण सुरु करत नाहीण, त्यांना तसा इंटरेस्ट पण नसतो पण 'अरे' ला 'कारे' करावेच लागले तर चुक नसताना कोणावर अन्याय होऊ नये असे वाटते.

बाकी अ‍ॅडमिनचा यात प्लॅन नीट ठरला असणारच त्याशिवाय हे पान सुरुच नसते केलेत आपण.

कोणाच्याही सांगण्यावरुन कोणीही काहीही करत नाही इथे ....

माहीतीबद्दल आभारी आहे.

हा समज डोक्यातुन काढून टाका
तुमच्या मताचा आदर आहेच.

उदाहरणादाखल तुम्ही काही सांगून बघा ...

सुचवनीबद्दल आभारी आहे. पण आपण असे उद्योग करत नसतो.
धन्यवाद!

आ. न.
अभक्ष्यभक्षण, अपेयपान करणारा बाटेल बामन

मोनालीप,

शीर्षकातच सारं सार आहे. आपली आणि जबाबदारी हे दोन किवर्डस् आहेत. आपुलकी आणि जबाबदारीच भान असेल तर असले प्रकार होणारच नाहीत.

>>>अ‍ॅडमीनच्या विपुत त्या आयडींना पुन्हा वावरु द्यावे अशा अर्थाच्या ढिगाने पोस्ट आल्यात. अ‍ॅडमीनच्या धोरणाला, त्यांच्या कारवाईला काहीच अर्थ नाहीय का? त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याची कुणालाच किंमत नाही असाच अर्थ होतो ह्याचा. <<<

साधारणपणे अ‍ॅडमीन यांनी घेतलेले निर्णय स्थळासाठी योग्य असणार हे मान्य होणारच.

पण बागुलबुवांनी हा धागा वर काढला आणि वाचायला मिळाला म्हणून माझेही एक दोन मुद्दे लिहून बघतो.

==========

१. हे स्थळ 'मराठी भाषेसाठी, तिच्या संवर्धनासाठी वगैरे' आहे असा माझा आत्तापर्यंतचा समज आहे. तो चूक असला तर जुन्यांनी करेक्ट करावे. पण जर योग्य असला तर 'भाषिक उपक्रमांऐवजी' इतर खूप काही अधिक जोरात चाललेले दिसते व ते कितीही वाढले तरी त्याचे महत्व मूळ उद्देशापेक्षा कमी आहे हे मान्य व्हावे, व्हायला हवे असे मला वाटते. जसे सामाजिक चर्चा, काही हितगुज ग्रूप्स या बाबी 'सबकुछ' बनून बसलेल्या दिसतात. पण मराठी भाषेबाबत / भाषेत केले गेलेले (एकंदर ललित) लेखन हे दुर्लक्षित राहते.

२. असे होत असताना काही आय डी सावरकर, राजकीय पक्ष, इतर सामाजिक विषय वगैरे घेऊन अवतरतात आणि दोन फळ्या पडतात व भांडणे सुरू होतात. अशा बाबींवर धागे आणून / येऊ देऊन सामाजीक विषयावर अप्रत्यक्षपणे भूमिका घेणे ही मायबोलीची पॉलिसी आहे का? (मला माहीत नाही). उदाहरणार्थ, सावरकर गांधी वादात पेटलेले चार सहा धागे येऊ देणे हेच मुळी अप्रत्यक्षपणे एक भूमिका घेणे आहे. उद्या गांधींपेक्षा सावरकर श्रेष्ठ होते या मताशी मायबोली सहमत आहे अशी प्रतिमा सहज निर्माण होईल, झालेलीही असेल. (अमेरिकेतील राजकारण व समाजकारण यावर का फारसे धागे येत नसतील? कमी सदस्य तिकडे आहेत म्हणून? )

३. एकदा प्रत्यक्षपणे असे धागे निर्माण होऊ दिल्यानंतर काही वेळा होणारी जहरी टीका व शिवराळ भाषा याबाबत कोणताही खास निकष वाचण्यात आलेला नाही. (मायबोलीवर पाळण्याचा व मायबोलीने जाहीर केलेला असा निकष). मग याच्या त्याच्या तक्रारीवरून ह्याला त्याला उडवणे असे तात्कालीक उपाय योजले जातात.

माझे प्रश्नः (उद्धटपणा वाटेल, पण माझ्यापुरते प्रामाणिक आहेत)

१. मायबोलीला राजकीय / सामाजिक / जातीय / धार्मिक अशी काही भूमिका घ्यायची आहे का?

२. असल्यास का घ्यायची आहे व कोणती भूमिका घ्यायची आहे?

३. नसल्यास असे धागे निर्माणच का होऊ दिले जातात?

४. असे धागे निर्माण झाल्यास त्यावर होणार्‍या वादविवादांची कोणती सीमारेषा प्रशासनाला अभिप्रेत आहे?

५. त्यावर घेतल्या जाणार्‍या उपाययोजना कितपत 'अनबाएस्ड' आहेत असे विचारल्यास कोणते विशिष्ट निकष सांगीतले जाऊ शकतील? (एवढ्या मोठ्या संकेतस्थळावरील वावराचे नियम हा धागा सातत्याने वर यायला हवा व सर्वांना वाचायला मिळत राहायला हवा असे मनात येते).

६. मायबोलीवर असे धागे निर्माण होऊ दिल्यानंतर झालेल्या चर्चेतून समाजाला किंवा संबंधीत घटकांना प्रत्यक्ष आयुष्यात कोणता फायदा झाला आहे? (जसे हबा यांची संस्था वा संयुक्ता, उद्योजक यांचे काही उपक्रम हे प्रत्यक्षात फायदेशीर असतील) तसा झालेला नसल्यास या चर्चा 'इग्नाईट' होऊ देण्यात काय मिळणार?

७. अर्थातच प्रशासन समीती व मदत समीती यांना खरंच कमी वेळ मिळणार व काम मोठे आहे हे मान्यच! पण (उदाहरणार्थ, एक दादोजी कोंडदेवांचा धागा भयानक जहरी टीका होऊन बंद पडला आणि अजूनही दिसत मात्र आहे आणि तो दिसत राहणे हे मायबोली प्रशासनाची भूमिका नक्की काय असे समाजातील काही कंटकांना वाटू शकेल इतपत धोकादायक आहे असे वाटते) असे धागे का येऊ दिले जात आहेत?

योडी यांचे मत हे 'वैयक्तीक' रागलोभातून निर्माण झालेले व्यापक मत आहे असे मला वाटते. एखाद्या विशिष्ट आय डी वरील रागामुळे 'कशाला अ‍ॅडमीनना विपू करायच्या' असे त्या म्हणाल्या असे मलातरी वाटते. पण जे आय डी काही विशिष्ट धागे सोडले तर खरोखर इज्जतीत वावरतात त्यांना सपोर्ट करायला एक दोघे धावणे हे काही विशेष नाही. काहीही न करण्यापेक्षा ते निदान ४२ जणांना एका पानावर धरून तरी ठेवतात. (हे विधान ही योडींवरील टीका अजिबातच नाही, आश्वस्त असावे).

चला, आता अशी भाषा वापरून या बीबीचंही पानिपत करायला सुरुवात झाली! (परत एडिट करून शब्द बदलायची आणि आम्ही ते केलंच नाही म्हणायची सोय आहे म्हणा..) पोस्ट टाकेपर्यंत तो शब्द एडीट झालाही Happy

विनय भिडे - अनुमोदन.

कदाचीत अ‍ॅडमीनला जाणीवपूर्वक संगणमताने कट करुन एखाद्या सदस्याबद्दल चूकीची माहीती दिली जात असेल.
>>
बागुलबुवा, हे पटत नाही. अगदी कुणी सांगितलं तरीही अ‍ॅडमीनचंही लक्ष असेलच की आयडींकडे. असं कुणीही सांगुन मला नाही वाटत अ‍ॅडमीन एखादा आयडी बॅन करत असतील.

सर्वांनी एकाच वेळी चूक केली असं आपण म्हणू शकतो का?
>>
गामापैलवान, एका वेळी एकच चुक नसेल पण एकच चुक अनेक वेळी अनेक बाफांवर केलीच असेल ना??

केवळ वादग्रस्त विषयावर मत ठासून मांडलं म्हणून खाती गोठवावीत का?
>>
इतक्याशा गोष्टीवरुन आयडी बॅन केला असेल असं मला तरी वाटत नाही.

बॅन करण्यापुर्वी रेस्ट्रीकटेड करु शकतोच ना. तरीही नाही ऐकले तर मग आयडी रद्द असे धोरण इष्ट होईल.
>>
मोनाली, आता तुम्ही असे म्हणताय पण हीच भुमिका अ‍ॅडमीनने आधीच घेतली होती. समज दिल्यावरही पुन्हा तेच झाल्यावरच आयडी बॅन केले आहेत.

बाकी अ‍ॅडमिनचा यात प्लॅन नीट ठरला असणारच त्याशिवाय हे पान सुरुच नसते केलेत आपण.
>>
नीट प्लॅन म्हणजे नेमकं काय? किती दिवस आणि किती वेळा एकाच आयडीला अ‍ॅडमीन तेच तेच सांगत बसणार? त्यांना हे एकच काम नाहीय ना. 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' ह्या नियमाने एक आयडी बॅन करुन ४ लोकं सुधारत असतील तर त्यांचंही काम थोडंफार कमी होतंय की.

अ‍ॅडमीन, तुमच्या मताची/पोस्टची गरज वाटतेय इथे.

Pages