आपली मायबोली आणि आपली जबाबदारी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

गेल्या काही दिवसात मायबोलीवरचे वाद हमरीतुमरीवर आले. कुठल्याही भांडणामधे होते तसे आधी कुणी भांडण सुरु केले (किती आधीपासून सुरू केले) कुणी कसे वाढवले याची शहानिशा करणे अवघड. किंवा हे अवघड याचा काही जण फायदा घेतानाही दिसून येतात. इतकं नक्की की भांडण कधी एका व्यक्तीमुळे वाढत नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे जिथे भांडण्/वाद सुरु आहेत तिथे आणखी अनेक जण समर्थनासाठी येतात आणि भांडण सोडवणं आणखी अवघड होऊन बसतं.

यापुढे भांडण सुरु करणारे, वाढवणारे, समर्थन करणारे सगळ्यांचाच मायबोलीवरचा प्रवेश रद्द करावा लागला तर तो केला जाईल. यात दुर्देवाने नवीन जुने कुणिही मायबोलीकर असले तरी आमचा नाईलाज असेल. जेंव्हा इतर मायबोलीकर आता भांडण बास असे म्हणतील तेंव्हा तरी त्यात सहभागी असणार्‍यानी योग्य तो इशारा ओळखून वैयक्तिक संदेशातून संपर्क साधण्याचा पर्याय स्विकारणे अपेक्षीत आहे.

मायबोली जी काही आहे ती मायबोलीच्या आग्रह करण्याच्या पण सक्ती न करण्याच्या धोरणामुळे आहे. मग तो शुद्धलेखनाचा असो, देवनागरीकरणाचा असो, रतीब न घालण्याचा असो वा दर्जा टिकवण्याचा असो. पण गेल्या काही दिवसात हा आग्रह फारच टोकाला जाऊन धमकी वाटावी अशा प्रतिक्रियांपर्यंत गेला आहे. मायबोलीवरचे वातावरण टिकवण्यासाठी अशा टोकाला जाण्यार्‍या कुणाचा प्रवेश बंद करावा लागला तर नाईलाजाने का होईना ते पाऊल उचलण्यात येईल. हे धोरण कदाचित काही मायबोलीकरांना मान्य नसेल पण ते धोरण म्हणून मायबोलीने स्विकारले आहे.

विषय: 
प्रकार: 

अगदि योग्य निर्णय घेतला आहे.
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

धाकटदपशा म्हणजे काय?

चांगलं लिहिलं आहे.. असचं करायला पाहिजे. निदान एक महिना तरी त्या त्या व्यक्तींचा प्रवेश बंद करायल पाहिजे.

योग्य निर्णय! Happy
फक्त, असे करण्या आधी काही पूर्वसूचना (नोटिस/वॉर्निन्ग या अर्थाने) देता येईल का? तसा विचार आहे का?

अ‍ॅडमिन,
अतीशय उचित!
पुन्हा एकदा, वेळ काढून या गंभीर बाबींकडे लक्ष दिल्याबद्दल आभारी!
___________________
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे.

अ‍ॅडमिन,
मायबोली हे एखाद्या कुटुंबासारखे आहे, आणि सर्वच जण आपापसात व्यवस्थित राहतान दिसून येतात मात्र कधी कधी काही आयडीज अति करतात. दुसर्‍याला मानसिक त्रास देऊन त्याना काय मिळते कुणास ठाऊक? असो. हे धोरण राबवल्याबद्दल आणि माझ्या तक्रारींची दखल घेतल्याबद्दल मी आपली आभारी आहे.

तसेच, मायबोली प्रवेश ब्नंद हा त्या आयडीला असेल का व्यक्तीला? या धोरणामधून डुप्लिकेट आयडी हे फोफावू नयेत हीच भिती आहे. पुनश्च धन्यवाद!
--------------
नंदिनी
--------------

अ‍ॅडमीन खरच योग्य निर्णय आहे. पण हे सगळ करताना आपण ड्यु आयडी साठी काही करु शकतो का?? म्हणजे ड्यु आयडींचा उपद्रव टाळण्यासाठी किंवा रोखण्यासाठी??
-------------------------
सारे खिलौने काँच के निकले
छन से टुट गये.

निर्णय योग्य की अयोग्य माहीत नाही.
या निर्णयांची अंमलबजावणी होताना दिसेल तेव्हाच त्याची व्याप्ती, पारदर्शकता आणि partial असणं/ नसणं कळून येईल.
तूर्तास आपल्या आयडीची हकालपट्टी होऊ नये म्हणून वाद घालण्यापुरता डु आय घेऊन येणारे वाढतील असं वाटतं.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

उत्तम निर्णय आहे. खरे तर ह्या गोष्टींवर आधीच नियंत्रण हवे होते....
पण जेव्हा हा निर्णय एखाद्या आयडीबाबत घेतला जाईल तेव्हा त्या आयडीची एकंदर सगळीकडे वापरली जाणारी भाषेची पण शहानिशा केली तर उत्तम राहील कारण कधी कधी भाषा इतकी उर्मट नी उद्धट असते. शिवाय तीच आयडी कुठल्याही बीबी वर मुद्दा नीट लक्षात न घेता जर जाणून बूजून त्रास देत असेल तर कुठे तक्रार नोंदवावी हे ही सांगा.

खास करून विचारपुशीत घूसून अगदी चिथावणी खोर मेसेज टाकून भांडण सुरुवात करत असेल तर कोणाला कळवायचे इथे ते ही नमूद केले तर बरे होइल.
शिवाय काही काही आयडी ह्या अगदी एखाद्या आयडीवर डोळा ठेवूनच जाणून बूजून त्रास देतात व अश्या दांडगाई आयडींचे सर्मथन करण्यार्‍यांवर सुद्धा योग्य कारवाई केली तर बरे.

एखाद्या विषयावर मतं कोणाचीच एक्मेकांशी पटत नाही ते साहजिकच आहे पण दुसर्‍याच्या मताची कदर करणे सोडा पण उर्मट पणे व्याक्तीगत लेवल वर येवून कर्तुत्व काढणे,उर्मटासारखे प्रश्ण विचारणे वगैरे चालते. सर्वांचे अनुभव ही कुठल्या एका बाबतीत सारखे नसतात पण 'आपलेच बरोबर', दुसर्‍याची मतं नी अनुभव अगदी चुकीचेच असून खोडून काढणे, आपापला ग्रूप मिळून चेष्टा करणे एखाद्या आयडीची/आयडीच्या पोस्टची, कारण नसताना त्याच त्याच आयडीला त्याच्या मागे चेष्टा करत उगीच टोमणें मारणे ह्या ही गोष्टींचा विचार केला तर अधिक उत्तम.
दुसरा मुद्दा म्हणजे , अ‍ॅडमिनच्या ओळखीचा आहे, अ‍ॅडमिन मधला आहे, सिनीयर आहे हे जरा बाजूलाच ठेवले जाईल तेव्हाच हे साध्य होइल.

असे त्रास मला झालेले असल्याने शेवटी इथे हे असे लिहावे लागले. पण मी आता त्रास देणार्‍यांना दुर्लक्ष करायला शिकले आहे.

अ‍ॅडमिन निर्णय योग्य आहे, पण प्रवेश कायमचा रद्द करू नये शक्यतो, काही काळापुरता केला तर त्या पर्टिक्यूलर आयडी ला थोडी तरी जरब बसेल. पण चुकिची पुनरावृत्ती झाल्यास प्रवेश कायमचा बंद करावा.

भांडणात तेल घालून पळून जाणारे आणि भांडण लावणारे यांच्याबद्दलही काहीतरी करायला हवे. तसेच काहीजण जुन्या गोष्टी उकरून उकरून कुरापती काढतात. त्यांनाही योग्य तो प्रसाद मिळावा.

मायबोलीचा TRP वाधतो तो या वादन्मुळे . मायबोलीने विशेश प्रयत्न न करता (e.g reality shows on channels)इथे थोदी रुसव फुगवी , रडारडी झाली तर काय हरकत आहे.(it is like online virtual-cum real entertainment in Marathee)
काहीही झाले तरी ही website आहे.एवढे मनावर का घ्यायचे कोणी. कथा आणि ललित तर काय पेपर आणि library मधे पण वाचयला मिळते.फक्त कोरड्या चर्चा वाचायला कुनी येनार नाही आणि websiteची लोकप्रियता कमी होइल्.

या निर्णयांची अंमलबजावणी होताना दिसेल तेव्हाच त्याची व्याप्ती, पारदर्शकता आणि partial असणं/ नसणं कळून येईल.
तूर्तास आपल्या आयडीची हकालपट्टी होऊ नये म्हणून वाद घालण्यापुरता डु आय घेऊन येणारे वाढतील असं वाटतं...>>>>>
नीरजाच्या ह्या मुद्यांना अनुमोदन..

पण सध्याच्या मायबोलीवर वारंवार घडत असलेल्या ,खालची पातळी गाठणार्‍या प्रकारांना आळा घालण्यासाठी केलेला एक प्रयत्न म्हणुन तरी हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे... त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल आणि त्यातुन काहीतरी मायबोलीच्या दृष्टीने सकारात्मक घडेल ही अपेक्षा...

इथे थोदी रुसव फुगवी , रडारडी झाली तर काय हरकत आहे..>>> सध्या ह्या पातळीपुरत्या गोष्टी मर्यादित राहिलेल्या नाहीत.. अ‍ॅडमिनना `एखाद्याचं सदस्यत्व रद्द होईल ' असं म्हणायची वेळ आलीये यातच काय ते आलं.

मायबोलीचा TRP वाधतो तो या वादन्मुळे . >> रक्तदाब पण वाढतो अनेकांचा ते जास्त महत्त्वाच धोकादायक आहे.

मनुस्विनीच्या संपुर्ण पोस्टला अनुमोदन आहे. न्याय सर्वांना सारखाच असावा.

मनुस्विनी,
२०० मोदक! Happy
___________________
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे.

ज न र ल प्रशास्क,
म हो द य,
२१ तार्यान्चि ``स ला मी",
निर्णय मान्य.

प्रशासक,स्वागतार्ह निर्णय ! Happy

वरच्या सर्वांना अनुमोदन.....सगळेच बरोबर बोलत आहेत(अपवाद वगळता!)

तसेच नवीन लेखन मधे कवीता वेगळया भागात आनी इतर लेखन एकीकडॅ असे करता आले तर बघा. क्रुपया.

*

तसेच नवीन लेखन मधे कवीता वेगळया भागात आनी इतर लेखन एकीकडॅ असे करता आले तर बघा. क्रुपया.

ह्याने काय होणार?? Happy Happy Happy Proud Lol
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

नेमस्तकांना हस्तक्षेप करावा लागतो असे खरे होताच कामा नये (आयडीअली).

व्यक्तीगत वाद आणि हेत्वारोप ह्याने टीआरपी वाढण्याची खरच माबोला गरज आहे का? कथा, ललित, कविता ह्यातल्या सौन्दर्यस्थानांवर किंवा मतावर किंवा उणिवांवर साधक चर्चा नक्कीच व्हावी. पण टोकाचे वाद विवाद आणि रुसवे फुगवे नको व्हायला. एकाद्या हितगुज गटात, एकमेकांच्या विचारपुसीत सदस्य काय करतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्ण आहे, पण गुलमोहोर, रंगीबेरंगी अशा ठिकाणी तरी आपण "healthy" वातावरण नक्कीच ठेवू शकतो.

ड्यु आयडी, प्रक्षोभक लिखाण हेच जर अ‍ॅडमिन पहात राहिले तर आपल्याला नवनविन सुविधा कसे काय देणार? त्यामुळे आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी आहे. माझ्याकडून अशा काही चुका होणार नाहीत ह्याची काळजी मी नक्की घेईन.

नेमस्तक, प्रत्येक व्यक्तीला सुधारण्यासाठी एक संधी द्यावीत आणि मग वाटल्यास सदस्यत्व रद्द करावे ही विनंती.

नेमस्तकांना अनुमोदन.
काही प्रश्न, काही विचार.

हे धोरण ताबडतोब अंमलात येणार की "<<काहीजण जुन्या गोष्टी उकरून उकरून कुरापती काढतात"<<>>" तसे जुन्या गोष्टी उकरून काढून त्यावर निर्णय घेणार?

ज्यांच्या आय डी रद्द करणार त्यांची नावे जाहीर करणार का? इतर लोकांना त्यावर काही मत देता येईल? का, हा निर्णय सर्वस्वी तुमचा?

ज्याप्रमाणे दूरवर पोलीसची गाडी दिसली की शहाणे लोक आपो आप वेग कमी करतात, तसे होईल अशी आशा आहे.

माझ्या मते तरुण लोकांना दक्षिणा म्हणतात तसे फक्त काही काळापुरते रद्द करावे, मग पुनः येऊ द्यावे. तरुण रक्ताला राग चटकन् येतो. पण आता समाजाची मदार तरुण लोकांवरच आहे, काही चांगले व्हायचे तर तरुण लोकांकडूनच होणार.

त्यापेक्षा म्हातार्‍यांना उडवून द्या. एकतर ते सुधारायचे नाहीत, नि जुन्या गोष्टि उकरून काढणे ही त्यांची खासियत. करायचे काय ते लोक? मारे अनुभव असेल त्यांना, पण तो कालपरत्वे उपयोगी आहे का?

योग्य निर्णय (खरं वेळ यायलाच पाहिजे नव्हती, पण काय करणार...)
>>तरुण लोकांना ...
इथे वयाचा काय संबंध? 'नवीन' म्हणायचय का?

आय अ‍ॅम सॅम, अहो ती झक्कींची पोस्ट आहे. त्यातून फारसा अर्थ काढायचा नसतो. वरती अ‍ॅडमिननी जे लिहिले आहे त्याचे सार (म्हणजे अ‍ॅडमिनच्या पोस्टीच्या सारातल्याचे सार) म्हणजे झक्कींची पोस्ट. Proud Light 1

सॅम,
झक्कींचे वय लक्षात घेता ते सोडून इथले सर्व तरूण असं म्हणायचंय त्यांना बहुतेक. Happy

टण्या!! Proud
--------------
नंदिनी
--------------

अ‍ॅडमीन जी

मा. बो. चे धोरण स्पष्ट करण्या साठी खूप खूप आभार Happy
वेळ काढून या गंभीर बाबींकडे लक्ष दिल्याबद्दल आभारी Happy

देर आये पर दुरुस्त आये.

आमच्या सारख्यांना बरे होईल. जिथे व्हि अ‍ॅन्ड सी नाही तिथेही भांडन पाहून जाम वैताग यायचा. त्यामुळे मायबोली पहिल्या पायदानावरुन खाली उतरली होती. Happy

चांगले धोरण आहे.

बादवे ह्या धोरणी पोस्टवरच भांडण झाले तर ????????? Uhoh

बादवे ह्या धोरणी पोस्टवरच भांडण झाले तर ?????????...>>> वैभवा,तर अ‍ॅडमिन इथुनच धोरण अंमलबजावणीचा श्रीगणेशा करतील Happy

Pages