दर रविवारची सकाळ म्हणजे मस्त आराम, वर्तमानपत्र व पुरवण्यांचे मनसोक्त ऐसपैस वाचन, चहा नाश्त्याच्या वेळेला घरातल्यांशी दिलखुलास गप्पा आणि दिवसभरात काय काय कामे निपटायची आहेत याचा थोडासा आढावा हा कार्यक्रम हमखास ठरलेला असतो! त्याला पुन्हा टी.व्ही.वरील मनपसंत मालिकेची फोडणी ही तर अगदी गृहित असते. पण या नव्या ठिकाणी रहायला आल्यापासून दर रविवारची माझी सकाळ एका जीवघेण्या आक्रोशाच्या छायेत उगवते!
आमची ही नवी जागा 'गावठाण' भागात आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या येथील माणसे एकमेकांना ओळखतात. त्यांचे व्यवसायही बर्यापैकी पारंपारिक. आणि माझ्या घरापासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावरच्या, अशाच व्यवसायांचा अविभाज्य भाग असलेल्या खाटीकांच्या टपर्या व दुकाने! ह्याच टपर्यांमध्ये बोकड, बकर्या, शेळ्या, कोंबड्या इत्यादींची रोज लोकांच्या मागणीनुसार कत्तल होत असते. आयुष्यातील ते एक वास्तव आहे! पूर्वी म्हणे ठराविक काळातच मांसाला भरपूर मागणी असे. पण सध्याच्या काळात सुट्ट्या, सण, निवडणुका, साप्ताहिक सुट्ट्या अशी कोणतीही निमित्ते लोकांची गर्दी ह्या दुकानांकडे खेचण्यास पुरेशी ठरतात. मग त्यासाठी दर रविवारी सकाळी अगदी माझ्या दारासमोर दोन-तीन ट्रक टेंपो थांबतात... आतमधील शेळ्या, बकर्या व त्यांची पिल्ले जणू मृत्यूची चाहूल लागल्याप्रमाणे इतकी करुण आवाजात आक्रंदत असतात की कोणाच्याही ह्रदयाला पीळ पडेल! त्यांना परमेश्वराने जर वाणी दिली असती तर त्यांचा हा आवाज नक्कीच म्हणाला असता, "देवा, वाचव रे बाबा आमच्या लेकरांना! कोणीतरी दया करा रे आमच्यावर! असे निर्घृणपणे नका ठार मारू आम्हाला! देवाने आम्हाला पण जगायचा हक्क दिलाय्...तो असा हिरावून नका घेऊ आमच्याकडून... आमचे प्राण घेऊन तुम्हाला काही क्षणांचे सुख मिळेल, तुमच्या जिभेचे चोचले पुरविले जातील... पण आमच्या प्राणांची, आमच्या बछड्यांच्या प्राणांची किंमत देऊन... आम्ही तुमचा असा कोणता गुन्हा केलाय ज्याची तुम्ही आमची हत्या करून परतफेड करणार आहात.... दया करा रे आमच्यावर, जगू द्या आम्हालाही....!!"
त्यांच्या आक्रोशाने अक्षरशः कधीकधी मला स्वतःचे विचारही ऐकू येत नाहीत! जेव्हा त्यांना पाय बांधलेल्या अवस्थेत खाटीकखान्याकडे नेले जाते तेव्हा तर त्यांच्या किंकाळ्या मन पोखरत राहतात.
कधी काळी मीदेखील मधूनच मांसाहार करायचे. मोठ्या चवीने खायचे. पण नंतर मांसाहारातून उद्भवणार्या समस्या, मानवी शरीरावर त्याचे होणारे अनिष्ट परिणाम यांविषयी ऐकले, वाचले, अनुभवले आणि माझा मांसाहार आपोआप संपुष्टात आला. चवीच्या दृष्टीने म्हणाल तर त्यांत वापरले जाणारे मसाले आपल्या नेहमीच्या भाज्या, रस्से वगैरेंमध्ये वापरले की जिभेचे 'ते' चोचले पण पुरविले जातात. भीतीने गळाठलेल्या, आक्रोशणार्या प्राण्यांच्या मांसामध्ये त्यांनी मृत्यूसमयी अनुभवलेली भीती, धक्का, संताप, दु:ख, आक्रंदन यांमुळे त्यांच्या शरीरात जे रासायनिक बदल, हार्मोनल चेंजेस घडून येतात त्यांचाही समावेश असतो! मग पैसे फेकून त्याबदल्यात अशी विकतची भीती, दु:ख कशाला घ्या! आपल्याकडे सुदैवाने व निसर्गाच्या कृपेने भरपूर भाज्या, फळे, धान्ये पिकतात. त्यांच्या किंमतीही मांसाच्या तुलनेत पहायला गेलो तर खूपच कमी आहेत. पण तरीही 'वशाट' खाण्याचा हा अट्टाहास का?
माझी काही मांसाहार करणारी स्नेहीमंडळी आमच्यात हा विषय निघाला की हटकून मला मांसाहार आरोग्यासाठी किती चांगला आहे, त्यांतून शरीराला किती उपयुक्त घटक मिळतात, अगदी आयुर्वेदातही मांसाहाराविषयी सांगितले आहे, पुरातन काळापासून मांसाहार चालू आहे ह्याचे दाखले देतात. पण मग सवाल असा उठतो की तो जर इतका चांगला आहे तर त्याचे एवढे दुष्परिणाम का आढळून येतात?
उत्तर काहीसे सोपे आहे... आजची जीवनशैली मुळातच तणावपूर्ण आहे. शहरांमध्ये तर आयुष्याची वेगवान गती, बैठे काम, अपुरा व्यायाम व इतर अनेक हानीकारक बाबी, जसे प्रदूषण, अनारोग्यकारक वातावरण, चढाओढ ह्यांची चढती भांजणी दिसते. त्यांत मांसाहार करणारे अनेकजण ते मांस कोठून येते, तिथे स्वच्छता किती असते, आरोग्याचे नियम पाळले जातात का यांविषयी बेपर्वा दिसतात. ज्या प्राण्याचे मांस मोठ्या चवीने खाल्ले जाते त्या प्राण्याच्या शरीरात काही मानवी शरीरास अपायकारक कृत्रिम संप्रेरके, खाद्य, जंतु यांचा समावेश होता का याबद्द्लही त्यांना फिकीर नसते. आयुर्वेदात जरी मांसाहार सांगितला असला तरी तो विशिष्ट ॠतूंमध्ये, विशिष्ट प्रकारे व ठराविक प्रमाणात करावयास सांगितले आहे. शिवाय तो कोणास लाभदायक आहे व कोणास कुपथ्यकारक त्याचीही सूची आढळते. मात्र त्या सर्वाशी मांसाहार करणार्या माणसाला सहसा देणेघेणे नसते. आपल्या आतड्यांची लांबी, दातांची व जबड्यांची रचना ही शाकाहारास अनुकूल आहे. परंतु हे वास्तव मांसाहारी मंडळी नजरेआड करताना दिसतात.
आज माझ्या घराजवळील खाटीकखान्यातून पंचक्रोशीतील हॉटेलवाले मांस खरेदी करतात. पण त्या हॉटेलांच्या एअरकंडिशन्ड वातावरणात बसून समोरच्या नॉनव्हेजवर ताव मारणार्यांना ते मांस जिथे विक्रीस ठेवले होते तिथल्या घोंगावणार्या माशा, घुटमळणारी भटकी कुत्री, झेपावणारे कावळे, खुडबुडणारे उंदीर घुशी, जवळच महापालिकेच्या कचर्याचा ओसंडून वाहणारा कंटेनर आणि सांडपाण्याच्या जोडीला दुकानासमोरून वाहणारे रक्ताचे पाट दिसत नाहीत. की त्यांना खाटीकाच्या दुकानात काम करणारे मळक्या कळकट गलिच्छ अवतारातील नोकर दिसत नाहीत.
आज शहराच्या तथाकथित सुसंस्कृत, सभ्य, पर्यावरणाविषयी जागरूक भागातील खाटीक खान्याची ही अवस्था आहे, तर मग इतर दुर्लक्षित भागांची कल्पनाच न केलेली परवडली!
परंतु सर्वात शेवटी मला मांसाहार करणार्या लोकांमधील 'माणसा'ला साद घालावीशी वाटते. तुम्ही एकदा तरी आयुष्यात खाटीक खान्याला अवश्य भेट द्या. आज त्या अश्राप शेळ्या, बकर्यांची बछडी जेव्हा केविलवाण्या आवाजात टाहो फोडतात तेव्हा तिथे तुम्ही एकदा तरी स्वतःची मुलेबाळे कल्पून पहा... त्या आर्त स्वरांमध्ये सार्या विश्वातील असहायता एकवटलेली असते... आईपासून विलग होण्याच्या दु:खाबरोबरच प्राणांची भीती असते. आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... त्यांना आपल्या खाद्यचक्राचा भाग बनवू नका... तुम्हाला जसा जगायचा हक्क आहे तसा त्यांनाही आहे... कृपया त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका!
माझ्या घराजवळचा खाटीक खाना बंद होईल की नाही हे मला माहीत नाही, पण हा लेख वाचून जर तुम्ही मांसाहार बंद अथवा कमी करण्याचे ठरवलेत तर माझी खात्री आहे की त्या प्राण वाचलेल्या निरपराध जीवाचे तुम्हांला अनंत दुवा मिळतील!
अभक्ष्य भक्षण आणि माणूस
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 May, 2009 - 18:40
गुलमोहर:
शेअर करा
आणि हो कुठल्याही औषधाच्या
आणि हो कुठल्याही औषधाच्या कॅप्सूलची आवरणे राह्यली. ती पण व्हेज येतात म्हणा पण औषध आणताना ते बघता का?
नी ....
नी ....
प्रिय अरुंधती, आपल्या मताचा
प्रिय अरुंधती,
आपल्या मताचा आम्ही आदर करतो... पण आम्हाला अभक्ष्य भक्षण आवडते म्हनुन खातो
बाकि सर्व थीक...
चीअर्स्स...
पाय बांधुन उलट्या लटकवलेल्या
पाय बांधुन उलट्या लटकवलेल्या कोंबड्या, बांधलेली निरागस बकरी, तिची पिले यांची फार कणव वाटते.
त्यांचे असे हाल करणार्यांना उलटे टांगुन त्यांच्या ढुंगणावर दांडक्याने वळ काढावे वाटतात .
असो, विचार काचेचे असतात आणि जग दगडाचे असते. हेच खरे.
धन्यवाद suyashtatya हा लेख मी
धन्यवाद suyashtatya
हा लेख मी लिहिला तेव्हा जगात कोणकोणत्या परिस्थितीत माणसांना काय काय खाऊन जगावं लागतं याबद्दल फारसं माहीत नव्हतं. त्यानंतर अतिशय खडतर हवामानात, आजूबाजूला वनस्पती-वृक्ष-फळांचं, भाज्यांचं दुर्भिक्ष्य असताना माणसं कशाप्रकारे प्राणी, पक्षी, किडे, जलचर, समुद्र वनस्पती इत्यादींच्या आधारे आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करतात, पोट भरतात याबद्दल अभ्यासाच्या निमित्ताने थोडेफार वाचले आहे. मला आजही वाटते की केवळ जीभेच्या चोचल्यासाठी मुक्या जनावराला मारणे अनिष्ट. परंतु जिथे खाण्यापिण्याला मांसाहाराशिवाय अन्य कोणता पर्यायच नाही तिथे जीव जगवण्यासाठी व पोषणासाठी लोक मांसाहार करत असतात. त्यांचे भौगोलिक वातावरण, पर्यावरण, अवर्षण - दुष्काळ, गरीबी यांमुळे त्यांना पर्याय नसतो. गमतीची बाब अशी की त्यातही काही जमाती अशा आहेत ज्या वाळवंटातही जमीनीच्या आतली मुळे, कंद उकरून त्याद्वारे, किंवा काही विशिष्ट नट्स, फळे, पाने इत्यादींद्वारे आपले भरणपोषण करतात. सहारा वाळवंटातील खोयसान जमातीच्या लोकांना जगातील अग्रेसर शिकारी मानले जाते. पण त्यांचा ६० टक्के आहार हा कंदमुळे, फळे, नट्स यांवर आधारित असतो आणि आहारशास्त्रज्ञांचे व संशोधकांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या अन्नाच्या व भरणपोषणाच्या प्रमुख गरजा याच आहारातून भागतात.
टुवा प्रांतातील लोक आपल्या लाडक्या घोड्याचा जर मृत्यू झाला तर त्यालाही खातात. घोडा हे त्यांचे तिथे उपजीविकेचे, दळणवळणाचे साधन आहे. ज्या घोड्याने आपल्याला अनेक वर्षे साथ दिली त्याला त्याच्या मृत्यूपश्चात खाण्यात येते.
ऑस्ट्रेलियातील अबोरिजिनल जमाती झाडांवरची वाळवी, मुंग्या, किडे इत्यादी जिवंत पकडून खाऊ शकतात.
भारतात उत्तर-पूर्व सीमेला असलेल्या काही पर्वतीय जमातीही माकडे, उंदीर, घुशी, डुकरे, कुत्री, साप इत्यादी खातात. भरणपोषणाला वनस्पती, ताज्या भाज्या, फळे, धान्ये यांचा तुटवडा आणि पर्वतीय बिकट हवामानात अशा तर्हेच्या वनस्पती जगणे, जगवणे किंवा आणणे यात असलेल्या अडचणी हे त्यांमागचे मुख्य कारण होय असे त्यांचा अभ्यास करणारे संशोधक सांगतात.
अरुंधती, मन हेलावणारा लेख,
अरुंधती,
मन हेलावणारा लेख, प्राण्यांविषयी तुमची तळमळही दिसुन आली..
कुठल्याही खाटीक खाण्याला भेट दिल्यावर, ते खाणार्या काही जणात नक्कीच फरक पडेल
अति मांसाहार करणार्यांच (आक्रमक) वागणं शेवटी याच समाजातल्या इतर लोकांना सहन कराव लागतं हे देखील एक वास्तव आहे
अति मांसाहार करणार्यांच
अति मांसाहार करणार्यांच (आक्रमक) वागणं शेवटी याच समाजातल्या इतर लोकांना सहन कराव लागतं हे देखील एक वास्तव आहे
<<
चुकीच्या अथवा शून्य डेटावर आधारलेले भावनाप्रधान वाक्य. असहमती नोंदवितो.
लेखिकेचाच प्रतिसाद तुमच्या प्रतिसादावर आलेला आहे. तो वाचलात का?
*स्नॅक्सवर एक नजर टाका*
*स्नॅक्सवर एक नजर टाका*
अलीकडे "पिझ्झा" खायला आवडणारे बरेच लोक आहेत.
चला, पिझ्झावर एक नजर टाकूया >>
पिझ्झा विकणाऱ्या कंपन्या -
"पिझ्झा हट, डोमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड्स, पिझ्झा कॉर्नर, पापा जॉन्स पिझ्झा, कॅलिफोर्निया पिझ्झा किचन, साल्स पिझ्झा"
या सर्व कंपन्या अमेरिकन आहेत.
पिझ्झाची चव चांगली करण्यासाठी त्यात ई-६३१ फ्लेवर एन्हान्सर नावाचा घटक जोडला जातो!!!
ते डुकराच्या मांसापासून बनवले जाते.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते गुगलवर पाहू शकता.
मित्रांना इशारा, जर स्नॅक्सच्या पॅकेटवर खालील कोड लिहिले असतील तर हे घटक त्यात मिसळले जातात.
E 322 - गाईचे मांस
E 422 - अल्कोहोलचे प्रमाण
E 442 - अल्कोहोलचे प्रमाण आणि रसायन
E 471 - गाईचे मांस आणि अल्कोहोलचे प्रमाण
E 476 - अल्कोहोलचे प्रमाण
E 481 - गाय आणि डुकराचे मांस यांचे मिश्रण
E 627 - घातक रसायन
E 472 - गाय + डुकराचे मांस + बकरीचे मांस यांचे मिश्रण
E 631 - डुकराचे चरबी तेल
E 635 - डुकराच्या मांसापासून बनवलेले घटक
टीप - हे सर्व कोड बहुतेक परदेशी कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये आढळतात जसे की चिप्स, बिस्किटे, च्युइंगम, टॉफी, कुरकुरे आणि मॅगी इत्यादी.
टीप - ही अफवा नाही, ती पूर्णपणे खरी आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर इंटरनेटवर, गुगलवर शोधा.
मॅगी पॅकमधील 'घटक' पहा, ते फ्लेवर (E-635) असे लिहिलेले आहे.
हे माहित असूनही तुम्ही मॅगी खाता हे आश्चर्यकारक आहे.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे सर्व नंबर गुगलवर पाहू शकता:
E100, E110, E120, E140, E141, E153, E210, E213, E214, E216, E234, E252, E270, E280, E325, E326, E327, E334, E335, E336, E337, E422, E430, E431, E432, E433, E434, E435, E436, E440, E470, E471, E472, E473, E474, E475, E476, E477, E478, E481, E482, E483, E491, E492, E493, E494, E495, E542, E570, E572, E631, E635, E904.
सर्वांना विनंती,
विनोद पाठवण्याऐवजी, हा संदेश सर्वांना पाठवा जेणेकरून लोकांना सत्य कळेल.
जर भारतातील १३५ कोटी लोकांपैकी फक्त १०% लोक दररोज १० रुपयांचा फळांचा रस पितील, तर एका महिन्यात सुमारे "३६०० कोटी" रुपये देशातच राहतील!
जर तुम्ही...
कोका कोला किंवा पेप्सी प्याल
ते "३६०० कोटी" रुपये
देशाबाहेर जाल.
कोका कोला, पेप्सी इत्यादी कंपन्या दररोज "७००० कोटी" पेक्षा जास्त रुपये लुटतात... हे विषारी पाणी प्या.
मी तुम्हाला विनंती करतो की...
उसाचा रस / नारळपाणी / आंबा / फळांचा रस इत्यादी स्वीकारा आणि देशाचे "७००० कोटी" रुपये वाचवा आणि ते आपल्या शेतकऱ्यांना द्या... तसेच तुमच्या आरोग्याचे रक्षण करा.
"शेतकरी आत्महत्या करत नाहीत..."
फळांच्या रसाच्या व्यवसायातून,
"१ कोटी" लोकांना रोजगार मिळतो आणि १० रुपयांचा एक ग्लास रस ५ रुपयांना खरेदी करता येतो.
स्वदेशी स्वीकारा,
राष्ट्राला बळकटी द्या.
आणि हा संदेश तीन लोकांपर्यंत पोहोचवा...
संदेश थांबू नये.
कोकाकोला
मॅगी
फँटा
गार्नियर
रॅव्हलॉन
लोरियल
हगिस
लेविस
नोकिया
मॅकडाउनल्ड्स
कॅल्विन क्लिन
किट कॅट
स्प्राइट
८०% लोकांनी हे वापरणे बंद केले आहे. त्यांच्या अर्ध्याहून अधिक शाखा बंद झाल्या आहेत.
यामुळे, या कंपन्यांचे बाजार मूल्य देखील कमी झाले आहे.
हा फॉर्वर्ड कुठल्या धाग्यावर पेस्ट करावा हे न समजल्याने या धाग्यावर कॉपी पेस्ट केले.
Pages