दर रविवारची सकाळ म्हणजे मस्त आराम, वर्तमानपत्र व पुरवण्यांचे मनसोक्त ऐसपैस वाचन, चहा नाश्त्याच्या वेळेला घरातल्यांशी दिलखुलास गप्पा आणि दिवसभरात काय काय कामे निपटायची आहेत याचा थोडासा आढावा हा कार्यक्रम हमखास ठरलेला असतो! त्याला पुन्हा टी.व्ही.वरील मनपसंत मालिकेची फोडणी ही तर अगदी गृहित असते. पण या नव्या ठिकाणी रहायला आल्यापासून दर रविवारची माझी सकाळ एका जीवघेण्या आक्रोशाच्या छायेत उगवते!
आमची ही नवी जागा 'गावठाण' भागात आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या येथील माणसे एकमेकांना ओळखतात. त्यांचे व्यवसायही बर्यापैकी पारंपारिक. आणि माझ्या घरापासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावरच्या, अशाच व्यवसायांचा अविभाज्य भाग असलेल्या खाटीकांच्या टपर्या व दुकाने! ह्याच टपर्यांमध्ये बोकड, बकर्या, शेळ्या, कोंबड्या इत्यादींची रोज लोकांच्या मागणीनुसार कत्तल होत असते. आयुष्यातील ते एक वास्तव आहे! पूर्वी म्हणे ठराविक काळातच मांसाला भरपूर मागणी असे. पण सध्याच्या काळात सुट्ट्या, सण, निवडणुका, साप्ताहिक सुट्ट्या अशी कोणतीही निमित्ते लोकांची गर्दी ह्या दुकानांकडे खेचण्यास पुरेशी ठरतात. मग त्यासाठी दर रविवारी सकाळी अगदी माझ्या दारासमोर दोन-तीन ट्रक टेंपो थांबतात... आतमधील शेळ्या, बकर्या व त्यांची पिल्ले जणू मृत्यूची चाहूल लागल्याप्रमाणे इतकी करुण आवाजात आक्रंदत असतात की कोणाच्याही ह्रदयाला पीळ पडेल! त्यांना परमेश्वराने जर वाणी दिली असती तर त्यांचा हा आवाज नक्कीच म्हणाला असता, "देवा, वाचव रे बाबा आमच्या लेकरांना! कोणीतरी दया करा रे आमच्यावर! असे निर्घृणपणे नका ठार मारू आम्हाला! देवाने आम्हाला पण जगायचा हक्क दिलाय्...तो असा हिरावून नका घेऊ आमच्याकडून... आमचे प्राण घेऊन तुम्हाला काही क्षणांचे सुख मिळेल, तुमच्या जिभेचे चोचले पुरविले जातील... पण आमच्या प्राणांची, आमच्या बछड्यांच्या प्राणांची किंमत देऊन... आम्ही तुमचा असा कोणता गुन्हा केलाय ज्याची तुम्ही आमची हत्या करून परतफेड करणार आहात.... दया करा रे आमच्यावर, जगू द्या आम्हालाही....!!"
त्यांच्या आक्रोशाने अक्षरशः कधीकधी मला स्वतःचे विचारही ऐकू येत नाहीत! जेव्हा त्यांना पाय बांधलेल्या अवस्थेत खाटीकखान्याकडे नेले जाते तेव्हा तर त्यांच्या किंकाळ्या मन पोखरत राहतात.
कधी काळी मीदेखील मधूनच मांसाहार करायचे. मोठ्या चवीने खायचे. पण नंतर मांसाहारातून उद्भवणार्या समस्या, मानवी शरीरावर त्याचे होणारे अनिष्ट परिणाम यांविषयी ऐकले, वाचले, अनुभवले आणि माझा मांसाहार आपोआप संपुष्टात आला. चवीच्या दृष्टीने म्हणाल तर त्यांत वापरले जाणारे मसाले आपल्या नेहमीच्या भाज्या, रस्से वगैरेंमध्ये वापरले की जिभेचे 'ते' चोचले पण पुरविले जातात. भीतीने गळाठलेल्या, आक्रोशणार्या प्राण्यांच्या मांसामध्ये त्यांनी मृत्यूसमयी अनुभवलेली भीती, धक्का, संताप, दु:ख, आक्रंदन यांमुळे त्यांच्या शरीरात जे रासायनिक बदल, हार्मोनल चेंजेस घडून येतात त्यांचाही समावेश असतो! मग पैसे फेकून त्याबदल्यात अशी विकतची भीती, दु:ख कशाला घ्या! आपल्याकडे सुदैवाने व निसर्गाच्या कृपेने भरपूर भाज्या, फळे, धान्ये पिकतात. त्यांच्या किंमतीही मांसाच्या तुलनेत पहायला गेलो तर खूपच कमी आहेत. पण तरीही 'वशाट' खाण्याचा हा अट्टाहास का?
माझी काही मांसाहार करणारी स्नेहीमंडळी आमच्यात हा विषय निघाला की हटकून मला मांसाहार आरोग्यासाठी किती चांगला आहे, त्यांतून शरीराला किती उपयुक्त घटक मिळतात, अगदी आयुर्वेदातही मांसाहाराविषयी सांगितले आहे, पुरातन काळापासून मांसाहार चालू आहे ह्याचे दाखले देतात. पण मग सवाल असा उठतो की तो जर इतका चांगला आहे तर त्याचे एवढे दुष्परिणाम का आढळून येतात?
उत्तर काहीसे सोपे आहे... आजची जीवनशैली मुळातच तणावपूर्ण आहे. शहरांमध्ये तर आयुष्याची वेगवान गती, बैठे काम, अपुरा व्यायाम व इतर अनेक हानीकारक बाबी, जसे प्रदूषण, अनारोग्यकारक वातावरण, चढाओढ ह्यांची चढती भांजणी दिसते. त्यांत मांसाहार करणारे अनेकजण ते मांस कोठून येते, तिथे स्वच्छता किती असते, आरोग्याचे नियम पाळले जातात का यांविषयी बेपर्वा दिसतात. ज्या प्राण्याचे मांस मोठ्या चवीने खाल्ले जाते त्या प्राण्याच्या शरीरात काही मानवी शरीरास अपायकारक कृत्रिम संप्रेरके, खाद्य, जंतु यांचा समावेश होता का याबद्द्लही त्यांना फिकीर नसते. आयुर्वेदात जरी मांसाहार सांगितला असला तरी तो विशिष्ट ॠतूंमध्ये, विशिष्ट प्रकारे व ठराविक प्रमाणात करावयास सांगितले आहे. शिवाय तो कोणास लाभदायक आहे व कोणास कुपथ्यकारक त्याचीही सूची आढळते. मात्र त्या सर्वाशी मांसाहार करणार्या माणसाला सहसा देणेघेणे नसते. आपल्या आतड्यांची लांबी, दातांची व जबड्यांची रचना ही शाकाहारास अनुकूल आहे. परंतु हे वास्तव मांसाहारी मंडळी नजरेआड करताना दिसतात.
आज माझ्या घराजवळील खाटीकखान्यातून पंचक्रोशीतील हॉटेलवाले मांस खरेदी करतात. पण त्या हॉटेलांच्या एअरकंडिशन्ड वातावरणात बसून समोरच्या नॉनव्हेजवर ताव मारणार्यांना ते मांस जिथे विक्रीस ठेवले होते तिथल्या घोंगावणार्या माशा, घुटमळणारी भटकी कुत्री, झेपावणारे कावळे, खुडबुडणारे उंदीर घुशी, जवळच महापालिकेच्या कचर्याचा ओसंडून वाहणारा कंटेनर आणि सांडपाण्याच्या जोडीला दुकानासमोरून वाहणारे रक्ताचे पाट दिसत नाहीत. की त्यांना खाटीकाच्या दुकानात काम करणारे मळक्या कळकट गलिच्छ अवतारातील नोकर दिसत नाहीत.
आज शहराच्या तथाकथित सुसंस्कृत, सभ्य, पर्यावरणाविषयी जागरूक भागातील खाटीक खान्याची ही अवस्था आहे, तर मग इतर दुर्लक्षित भागांची कल्पनाच न केलेली परवडली!
परंतु सर्वात शेवटी मला मांसाहार करणार्या लोकांमधील 'माणसा'ला साद घालावीशी वाटते. तुम्ही एकदा तरी आयुष्यात खाटीक खान्याला अवश्य भेट द्या. आज त्या अश्राप शेळ्या, बकर्यांची बछडी जेव्हा केविलवाण्या आवाजात टाहो फोडतात तेव्हा तिथे तुम्ही एकदा तरी स्वतःची मुलेबाळे कल्पून पहा... त्या आर्त स्वरांमध्ये सार्या विश्वातील असहायता एकवटलेली असते... आईपासून विलग होण्याच्या दु:खाबरोबरच प्राणांची भीती असते. आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... त्यांना आपल्या खाद्यचक्राचा भाग बनवू नका... तुम्हाला जसा जगायचा हक्क आहे तसा त्यांनाही आहे... कृपया त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका!
माझ्या घराजवळचा खाटीक खाना बंद होईल की नाही हे मला माहीत नाही, पण हा लेख वाचून जर तुम्ही मांसाहार बंद अथवा कमी करण्याचे ठरवलेत तर माझी खात्री आहे की त्या प्राण वाचलेल्या निरपराध जीवाचे तुम्हांला अनंत दुवा मिळतील!
अभक्ष्य भक्षण आणि माणूस
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 May, 2009 - 18:40
गुलमोहर:
शेअर करा
खरच पूर्ण भूतदया करायची तर
खरच पूर्ण भूतदया करायची तर काहीच खायला प्यायला नको ना? चमचमीत बटाटे वडे खाताना किती बटाटे, चण्याची डाळ, इ. चा बळी जातोच की! आपल्या सगळ्यांच्याच पूर्वजांनी कच्ची फळे आणि कच्चे मास दोन्ही खाल्लय. शेतीचा आणि शाकाहाराचा पर्याय बर्याच नंतर उपलब्ध झाला. माणसाला दोन्ही प्रकारच अन्न पचतय ना? मग निवडू देत की ज्याला जे हवय ते.
पल्ली, अगं, संवेदना कोणाच्या? माणसांच्या वर्षानु वर्ष चालत आलेल्या सवयी आहेत ह्या आणि प्रत्येकाचे ठाम विश्वास आहेत. आपण कशाला एवढी चर्चा करावी ? माझच बरोबर किंवा हेच योग्य म्हणून? असे म्हणून कदाचित जीवंत माणसांच्या भावना दुखवत नाही आहोत ना आपण?
शाकाहारी लोकांसाठी, You are
शाकाहारी लोकांसाठी,
You are eating the food of my food.
- एक मांसाहारी.
खर तर कुणि काय खाव हा ज्याचा
खर तर कुणि काय खाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण माझा वैयक्तिक अनुभव आहे की मी शाकाहारी झाले (आपोआप) आणि मला खूप शांतता लाभली.
गंमत म्हणून एक किस्सा सांगते!
माझी आर्ट ऑफ लिव्हिंग ची अमेरिकन टीचर पॅम एकदम पक्की शाकाहारी आहे. अगदी शांत, मृदूभाषी, एकदम dedicated teacher! एकदा काही गोष्टी द्यायला माझ्या घरी आली. तिला पोहे जाम आवड्तात. म्हटल १० मि थांबलीस तर तुला बटाटे पोहे करून देते. ती कांदा-लसूण पण खात नाही. तर मला म्हणाली पुन्हा कधितरी..आज माझी एकादशी आहे! मी फक्त फळं खाते.!!!
You are eating the food of my
You are eating the food of my food. >>
टीप : ज्या प्राण्यांचा
टीप : ज्या प्राण्यांचा reproduction rate अपवादात्मक रित्या जास्त आहे, त्यांचाच

मांसाहार म्हणुन उपयोग होतो...उदा : कोंबडी, शेळी.... >>> शेळीपेक्षा डुकराचा जास्त आहे म्हणुनच बहुतेक विदेशात डु जास्त खातात
एक भा. प्र. - फ्रोजन मासे/मांस खाल्यावर पण ताजे मासे/मांस खाण्याइतकं पाप लागतं का ? की त्याची तीव्रता ( ते थोतांडातलं कसलं तरी कार्मीक बर्डन का काय ते) थोडीफार कमी असते ?
जाईजुई, अगं बरोबर किंवा हेच
जाईजुई, अगं बरोबर किंवा हेच योग्य असं मी म्हणतच नाहीये, पण एक प्रेमळ विनंती केली होती. शाकाहारी म्हणुन मी माझं कर्तव्य पार पडलं. मांसाहारींच्या शेजारी बसुन जेवायला मला अडचण येत नाही. अरेबिक लोकांचे जेवण तर अर्धवट अख्खी बकरी, गूज, कोंबडी, गाय असे असते, त्याचा भयानक दर्प असतो, तरी त्या अन्नाला रिस्पेक्ट देऊन त्यांच्या शेजारी बसुन मी माझ्या उपासाची भगर खाल्ली आहे! ज्या वातावरणात जे मिळेल, जे खाणं आवश्यक आहे ते त्यानं खावं. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी निदान १ महिना मांसाहार न खाता राहुन पहावं. मांसाहार खाताना आणि न खाताना होणार्या फरकाकडे पहावं. फरक मानसिक, शारिरीक कसेही असतील...... एवढी चर्चा त्या कत्तल केल्या जाणार्या निष्पाप प्राण्यांसाठी! जीवंत माणसांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या मला. माझ्या आधीच्या विधानात मी कसलीच सक्ती किंवा कुणाचा उपहास केलेला नाही.
पल्ली, छान! आवडलं...
पल्ली,
छान! आवडलं... प्रामाणिकपणे माडलेलं मत कुठल्याही दाखल्या पुराव्याशिवाय समजतं.
शेवटी "चव" आणि "ढव" यापुढे कुणाचे काय चालते?
तेव्हा विज्ञानाने ढीग सिध्ध (मान्य?) केलं असलं की मानवी शरीराची जीवशास्त्रीय रचना ही मूळ शाकाहारासाठी पुरक आहे, तरिही दोन्ही बाजूने समर्थन केले जाईलच. योग्य/अयोग्य वगैरे मते निरर्थक आहेत कारण अनेक हजार वर्षे दोन्ही प्रकारचे आहार केल्यावर मानवाचे मन अन शरीर conditioned झाले आहे. फारतर दोन्हीचे गुण दोष वस्तुनिष्ठपणे तपासून त्यातून कुणी काय घ्यायचे हे ठरवता येईल, अर्थात त्यासाठीही मनाची तयारी असली तर.
शास्त्र कींव्वा शस्त्र "सोयीस्कर" वापरायच्या युगात आपण रहातो तेव्हा फारतर एकाने दुसर्यावर सक्ती करू नये ईतपत अपेक्षा ठेवू शकतो (यालाच आजकाल भूतदया म्हणतात)
थोडंसं विषयांतर.... विषयाला
थोडंसं विषयांतर.... विषयाला धरुनच...
एएक्सएन वरचं मॅन व्हर्सेस वाईल्ड कुणी पहाता का? त्यातला जो अँकर आहे तो माणूस अक्षरशः काहीही खातो... पाली, सरडे, साप, बेडूक आणि तेसुद्धा जिवंत पकडून त्यावर काहीही प्रक्रिया न करता....
-योगी
योगी, मी पहाते कधी कधी. पण
योगी, मी पहाते कधी कधी. पण असा एखादा शॉट आला तर मी मान दुसरीकडे वळवते किंवा २ मिनिटाकरता चॅनल बदलते... मी वीक आहे अशा बाबतीत.
तेव्हा विज्ञानाने ढीग सिध्ध
तेव्हा विज्ञानाने ढीग सिध्ध (मान्य?) केलं असलं की मानवी शरीराची जीवशास्त्रीय रचना ही मूळ शाकाहारासाठी पुरक आहे,>> खरच ?
दुसर्याने काय खावं आणि काय
दुसर्याने काय खावं आणि काय खाउ नये हे आपण कोण ठरवणार ?
>तेव्हा विज्ञानाने ढीग सिध्ध
>तेव्हा विज्ञानाने ढीग सिध्ध (मान्य?) केलं असलं की मानवी शरीराची जीवशास्त्रीय रचना ही मूळ शाकाहारासाठी पुरक आहे,>> खरच ?
i am going by what I have read so far, and based on what told by doctors (sisters, bro in laws) at home.
गुगलून बघ... दोन्ही (होय्/नाही) बाजूने अनेक लेख सापडतील. मी वर म्हटले आहे की शाकाहाराला पुरक आहे म्हणजे मांसाहार वर्ज्य असा अर्थ होत नाही. अनेक लेखातून तुला हाच सूर दिसेल.
ही एक फायद्याची लिंक ज्यात, शाकाहारातील (digestible) मूळ प्रथिने मांसाहारातील प्रथिनांपेक्षा अधिक सहज उपलब्ध, पचनीय, अन फायद्याची आहेत हे लिहीले आहे (attntion esp para at the bottom: Typical Values):
http://en.wikipedia.org/wiki/Biological_value
शेवटी survival of fittest हे एकच तत्व ग्राह्य मानलं तर शाकाहार वा मांसाहार या वादाला फार अर्थ उरत नाही. आणि माझ्या वरील पोस्ट मधे म्हटल्यानुसार आता अनेक वर्षे दोन्हीच भक्ष्यण केले गेले असल्याने our mind, body have been conditioned..
arundhatikulkarni यांनी चालू केलेली ईथली मूळ चर्चा एकंदर भावनिक मुद्द्यावर अधिक आवाहन करणारी आहे, which is subjective and as such not very compelling.. but the benefits or negative impacts as put forth through various research/experiments/data stats should be good enough to make one's decision on to be vege or non- vege or both!
योग, सहमत.
योग, सहमत.
नमस्कार मित्रांनो, दोन्हीकडचे
नमस्कार मित्रांनो, दोन्हीकडचे मुद्दे वाचले.
मी स्वतः शुद्ध शाकाहारी आणि by choice म्हणजे लहानपणापासुन कधिच मासाहार केला नाही आणि नन्तर कळ्त्या वयात त्याचा उगम कळल्यामुळे आणि सन्वेदनशील मनाला तो अजिबात न पट्ल्यामुळे कायमचा व्यर्ज्य केला. घरात फार धार्मिक वातावरण होते वगैरे मुळिच नाही. मात्र आई वडील खात नसत हेही खरे.
मुख्य मुद्दा असा आहे की आपल्या जिभेच्या चोचल्यांसाठी प्राण्यांची निर्घुण हत्या करावी का? केवळ आपण त्या स्वतः न करता दुसर्या कडुन आपणासाठी करुन घेतो.
वरील लिम्बुटिम्बु, पल्लुताई व मूळ लेखिकेची मते पटली
धन्यवाद
थँक्स किरण
थँक्स किरण
मुख्य मुद्दा असा आहे की
मुख्य मुद्दा असा आहे की आपल्या जिभेच्या चोचल्यांसाठी प्राण्यांची निर्घुण हत्या करावी का? केवळ आपण त्या स्वतः न करता दुसर्या कडुन आपणासाठी करुन घेतो. >>
माफ करा... असं बोलण्याचा हक्क या जगात कोणत्याही माणसाला नाही... कारण वनस्पती, झाडं हीपण सजीवच आहे... या जगात फक्त हिरव्या वनस्पती, झाडं असे सजीव आहेत जे स्वतःचे अन्न स्वतः बनवतात...
नन्तर कळ्त्या वयात त्याचा उगम कळल्यामुळे आणि सन्वेदनशील मनाला तो अजिबात न पट्ल्यामुळे कायमचा व्यर्ज्य केला. घरात फार धार्मिक वातावरण होते वगैरे मुळिच नाही. मात्र आई वडील खात नसत हेही खरे. >>
त्यामुळे जे शाकाहारी मांसाहाराचा प्राणीहत्या या कारणाने दु:स्वास करीत असतील तर तो त्यांचा दुट्प्पटीपणा आहे... कारण ते ज्यांना खातात, ते तर सजीव आणि स्वावलंबी सजीवच असतात...
मुळातच शाकाहारी/ मांसाहारी बननं हे तुमच्या घरची जेवणपध्द्त, भौगोलिक स्थान यांवर अवलबून असतं... ती मानवाची प्रकॄती आहे, संस्कृती नाही...
शाकाहारामध्ये धान्ये आणि फळे
शाकाहारामध्ये धान्ये आणि फळे ही पक्व झाल्यानंतर गळून पडण्याच्या सुमारास काढली जातात. यात वनस्पती हत्येचा प्रश्न येत नाही....ते भाग एवीतेवी गळूनच पडणार असतात... धान्य तयार झाले की या वनस्पतींचे आयुष्य संपणारच/संपलेलेच असते.... धान्य आणि फळे यांची संख्या ही झाडाचा वंश चालून काही प्राण्याना खाण्यासही पुरावी अशी असते... पण प्राणीहत्या करताना असे काही नसते. जिवंत प्राणी मारले जातात.. निसर्गातील मांसाहारी अन्नसाखळी वेगळी आहे... त्याचे उदाहरण देऊन आपल्या चिकन सूपचे स्पष्टीकरण होऊ शकत नाही.... आता माणसाम्मध्येही नैसर्गिक्रीत्या आधीच मरुन पडलेले प्राणी कुणी खाणार असेल तर काही हरकत नसावी!
( कृपया हा शाकाहाराचा पुरस्कार किंवा मांसाहाराचा दुस्वास नाही.. .. ::) ... पण मित्राशी हीच चर्चा करताना ( त्याच्याच तुकड्यातला एक तुकडा खाऊन
) या मुद्द्यावर त्याला उत्तर देता आले नव्हते... )
व्वा ! अगदी समतोल उत्तर, व ते
व्वा ! अगदी समतोल उत्तर, व ते सुध्दा विज्ञान व अध्यात्म या दोन्हींची अजिबात गल्लत न करता. माझ्या मनात तुमच्या बद्दल जी प्रतिमा तयार झालेली आहे त्याच्याशी अगदी साजेसा प्रतिसाद सापडला तो सुध्दा डिसेंबर २००९ मधला.
अर्थात डॉ.अभय बंग यांचा उल्लेख पाहिल्यावरच थोडासा अंदाज अगोदर आला होता. असो.
अतिशय समतोल उत्तराबद्दल धन्यवाद.
काहेही खा.. मला मात्र खाउ
काहेही खा.. मला मात्र खाउ नका..
आता जे खायचेय ते खा, पण
आता जे खायचेय ते खा, पण आपल्या पूर्वजांनी मांसाहार केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला विसरु नका. हे निती -अनिती, बरे-वाईटच्या उच्च गप्पा ज्या प्रभावी मेंदूतून येत आहेत तो तसा ताकदवान होण्यामागे त्यांचा मांसाहार आहे येवडं लक्षात ठेवा.
Vegetarianism - This is the practice of only killing and devouring living things that can't scream or fight back and feeling morally superior because of it.
Vegetarianism - This is the
Vegetarianism - This is the practice of only killing and devouring living things that can't scream or fight back and feeling morally superior because of it.<<<
अतिशय खटकणारे विधान
एका प्रकारचा आहार असलेल्यांनी दुसर्या प्रकारच्या आहार असलेल्यांना आहारावरून नावे ठेवणे हे दोन्ही बाजूंनी तेवढेच चुकीचे आहे. दोन्ही बाजूंनी ही नावे ठेवण्याची भरपूर उदाहरणे असतात तेव्हा अमुक नावं ठेवतात आणि अमुक नावं ठेवत नाहीत याला कणभर अर्थ नाही. दुसर्याच्या आहार-निवडीचा आदर ठेवता आलाच पाहिजे.
मला तर दोन्ही प्रकार आवडतात
मला तर दोन्ही प्रकार आवडतात
रानडुक्कर | 9 December, 2011
रानडुक्कर | 9 December, 2011 - 12:04 नवीन
काहेही खा.. मला मात्र खाउ नका..
>>> रानडुक्कर फारच चविष्ट असतं असं ऐकलय ...कधे योग येतोय देव जाणे
रानडुक्कर फारच चविष्ट असतं
रानडुक्कर फारच चविष्ट असतं असं ऐकलय ...कधे योग येतोय देव जाणे
>>>>> पंत आम्ही पण त्याच प्रतिक्षेत आहोत.
प्रत्येकाने आपापला आनंद जपावा
प्रत्येकाने आपापला आनंद जपावा आणि मिळवत रहावा. खूपच खोलात जाऊन विचार करायला गेल्यास उपासमार होण्याची शक्यता आधिक कारण मग ज्या भाज्या आपण खातो त्या सुद्धा एका जिवंत झाडाच्या मृत्यूतूनच मिळतात हा उदात्त विचार करायला काय हरकत आहे?
मी स्वतः अट्टल मांसाहारी असलो तरी माणसाची पचनसंस्था मांसाहार पचविण्यासाठी डिझाईन केली गेली नाहीये हे शास्त्राने सिद्ध केले आहे, ते पटते, शाकाहार आरोग्याला चांगला असतो(मांसाहारापेक्षा) हे ही पटते तरी मांसाहार बंद करणे मरेस्तोवर जमणार नाही.
समजा डॉक्टरने सांगीतले की यापुढे एकदा जरी मांसाहार करशील तर तू मरून जाशील तर मग मांसाहार सोडून देईन कारण मांसाहारापेक्षा माझे जगण्यावर जास्त प्रेम आहे.
असो, थांबतो आता.
रानडुक्कर असंख्य वेळा, हाक्या
रानडुक्कर असंख्य वेळा, हाक्या घालून, शिकार करून, अख्ख्या गावभर वाटून खाण्याचे सद्भाग्य मला लाभले आहे पंत.
ही सृष्टी काही ना काही चरतच
ही सृष्टी काही ना काही चरतच जगत असते. म्हणुनच हिला चराचर सृष्टी म्हणतात.. पु ल
माणूस मुळात निसर्गत:
माणूस मुळात निसर्गत: शाकाहारी की मांसाहारी ?
माणूस मुळात निसर्गत: शाकाहारी
माणूस मुळात निसर्गत: शाकाहारी की मांसाहारी ?
>>निरंजन घाटेच्या एका लेखात प्रेताहारी असं होतं.
रानडुक्कर असंख्य वेळा, हाक्या
रानडुक्कर असंख्य वेळा, हाक्या घालून, शिकार करून, अख्ख्या गावभर वाटून खाण्याचे सद्भाग्य मला लाभले आहे >>>> आम्हाला कधी बोलावताय सांगा की ...
आमच्या आप्पांच्या गावाला रानडुक्करची शिकार करायचे ...पण आम्हाला क्धी योग आला नाही ते थ्रिल एन्जोय करायचा
Pages